https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

टपाली मतदान आणि बदली मतदान (Proxy Voting)-


 टपाली मतदान आणि बदली मतदान (Proxy Voting)

मतदान हक्कापासून कोणताही नागरिक वंचित राहू नये म्हणून निवडणूक आयोगाने टपाली मतदानाची सोय केलेली आहे. मतदार संघा बाहेर असणाऱ्या किंवा निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आयोगाकडून टपाली मतदानाची सोय केली जाते

टपाली मतदान अधिकार मतदार-

    पुढील  मतदारांसाठी टपाली मतदानाची सोय असते.

1. सेवा मतदार-सैन्यदले, सुरक्षा दले, देशाबाहेरील अधिकारी व्यक्ती उदाहरणार्थ परदेशातील राजपूत त्यांच्या पत्नी इत्यादींचा समावेश सेवा मतदारात केला जातो. सेवा मतदार टपाली मतदानासाठी पात्र असतात. मतदार संघ बाहेरील सेवा मतदार बदली व्यक्तीमार्फत मतदान करू शकतात किंवा टपाली मतदान करू शकतात. दोन्हीपैकी एका पर्यायाचा स्वीकार करू शकतात.

2. विशेष मतदार-लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 कलम 20 मधील पोटकलम (4) च्या तरतुदी लागू असलेल्या धारण करणाऱ्या व्यक्तीस किंवा त्यांच्या पत्नीस टपाली मतदानाचा अधिकार असतो. उदाहरणार्थ सैन्य दलातील अधिकारी त्यांच्या पत्नी

3. स्थानबद्ध-कोणत्याही कायद्याखाली प्रतिबंधात्मक स्थानबद्ध असलेल्या व्यक्ती उदाहरणार्थ राष्ट्रद्रोह सारखे गंभीर गुन्ह्यात अटक केलेल्या व्यक्ती

4. नोटिफाईड-लोक प्रतीनिधी अधिनियं 1951 कलम 60 () नुसार आयोगाने जाहीर केलेल्या व्यक्तीला टपाली मतदानाचा अधिकार असतो.

5. निवडणूक कर्तव्यावर असलेले मतदार-निवडणूक कर्तव्यावर असलेले, केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, सुरक्षा कर्मचारी आणि इतर कर्मचारी इत्यादींची नेमणूक मतदारसंघाबाहेर केली जात असल्यामुळे त्यांना टपाली मतदान करण्याची सोयी उपलब्ध करून दिली जाते.

टपाली मतदान प्रकिया-

टपाली मतदान करण्याचा अधिकार असलेल्या मतदारास मतदान दिनांकाच्या सात दिवस आधी किंवा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या परवानगीने त्यापेक्षा कमी दिवस आधी टपाली मतदानाचा नमुना 12 आणि मतपत्रिका पाठवले जाते. नमुना 12 आणि मतपत्रिका मिळाल्यानंतर मतदाराने अर्जातील सर्व माहिती योग्य पद्धतीने भरून मतपत्रिकेत आपल्या पसंतीच्या उमेदवारास मत देऊन पोस्टाने तो अर्ज आणि मतपत्रिका संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवावी किंवा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात तयार केलेल्या मतदान केंद्रातील मतपेटी टाकता येते. काही मतदारसंघात टपाली मतदानासाठी एक दिवस निश्चित करून बूथ लावला जातो. त्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन टपाली मतदान करता येते किंवा जमा करता येते. एकदा टपाली मतपत्रिका पाठविल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला टपालाने मतदान करावे लागते. त्याची नियुक्ती रद्द झाली आत्मा तो राखी कर्मचारी असला तरी हा नियम लागू होतो. टपाली मतपत्रिका देण्यात आलेल्या मतदाराचे मतदान यादीतील नावापुढे 'PB'असे लिहिलेले असते. मतमोजणी चे नवीन नियमानुसार सर्वात प्रथम टपाली मतपत्रिकेची मोजणी केली जाते त्यानंतर मतदान यंत्रातील मतमोजणी केले जाते.

बदली मतदान (Proxy Voting)-निवडणूक विषयक सुधारणा अधिनियम 2003 आणि निवडणूक संचालन नियम 2003 नुसार सशस्त्र दलातील मतदारांना मतदानासाठी दोन पर्याय आयोगाने उपलब्ध करून दिले आहेत. त्यातील प्रथम पर्याय म्हणजे टपाली मतपत्रिका द्वारा मतदान करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे बदली व्यक्ति द्वारा मतदानाचा हक्क बजावण्याची संधी देणे. बदली व्यक्ति द्वारा मतदान करणाऱ्या मतदारास वर्गीकृत सेवा मतदार (Classifier Service Voter) असे म्हणतात 18 वर्षे पूर्ण असलेला आणि संबंधित मतदार संघातील मतदार यादीत नाव असलेला मतदार बदली मतदानासाठी पात्र मानला जातो

बदली मतदान प्रकिया- मतदाराने बदली मतदानाची लेखी सूचना निवडणूक निर्णय अधिकारी याकडे नामनिर्देशन पत्रे भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत दिली पाहिजे. बदली मतदान करणाऱ्या मतदाराचे नाव मतदार यादी च्या शेवटच्या भागात CVS म्हणून नोंदविले जाते. बदली मतदार मतदान केंद्रावर इतरांप्रमाणे मतदान करू शकतो. बदली मतदार त्या केंद्रावरचा नियमित मतदार असेल तर तो स्वतःचे मत देखील नोंदवू शकतो. बदली मतदारास दोन मते देतात. सेवा मतदारासाठी एक आणि स्वतःचे एक अशी दोन मते देता येतात.

लोकप्रतिनिधी अधिनियम 2017 लोकसभेत संमत विधेयकानुसार परदेशात स्थायिक अनिवासी भारतीयांना बदली मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.

 अशा पद्धतीने मतदानापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून निवडणूक आयोगाकडून टपाली मतदान आणि बदली मतदानाची सोय करण्यात आलेली आहे.



Amazon Product Link- https://amzn.to/3kMDY4U आधुनिक राजकीय सिद्धांत पुस्तक https://amzn.to/3BLcdQm महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय चळवळी आणि महाराष्ट्र प्रशासन https://amzn.to/3iG9wXl-(boya Mic for good voice Quality for lecture and video) https://amzn.to/3y3Qr7Z (Adjustable Tripod and Stand ) https://amzn.to/36ZtgQy (Sony Camera)


 Redmi note 10 amazon link-https://amzn.to/3y3e8gU 


OnePlus Nord CE 5G (Charcoal Ink, 8GB RAM, 128GB Storage)

  
Amazon'sChoicefor "oneplus nord ce"

Deal Price:₹24,999.00 Fulfilled
Inclusive of all taxes
FREE delivery: Friday, July 30 Details
EMI starts at ₹1,177. No Cost EMI available EMI options 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.