https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

भारतातील सनदी सेवा घटनात्मक तरतुदी आणि प्रकार


 

भारतातील सनदी सेवा घटनात्मक तरतुदी आणि प्रकार -

भारतात ब्रिटिश काळात तीन प्रकारच्या सेवा अस्तित्वात  होत्या.

        केंद्रीय सेवा- केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली कार्यरत होत्या.

        इंपिरियल सेवा- भारत सरकारच्या सचिवाच्या नियंत्रणाखाली कार्यरत होत्या.

        प्रांतीय सेवा- प्रांतीय गव्हर्नर वा मंत्रिमंडळाच्या नियंत्रणाखाली कार्यरत होत्या.

सनदी सेवेबाबत घटनात्मक तरतुदी-

भारत स्वतंत्र झाल्यामुळे अनेक ब्रिटिश अधिकारी मायदेशी परतल्यामुळे सनदी सेवेची पुनर्रचना करणे आवश्यक बनले. सरदार पटेल यांनी सनदी सेवेला राष्ट्र उभारणीचे माध्यम बनवण्यासाठी अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा आग्रह धरला.  घटनेतील सातवी अनुसूचीतील केंद्रसुचीत सनदी सेवेचा समावेश केलेला आहे. घटनेच्या 308 ते 314 कलमात केंद्र आणि राज्य सेवेबद्दल तरतूदी करण्यात आलेल्या आहेत 311 व्या कलमानुसार सनदी सेवकांना घटनात्मक संरक्षण दिले आहे. अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार राज्यसभेला देण्यात आलेला आहे. सनदी सेवकांच्या भरतीसाठी स्वतंत्र घटनात्मक संरक्षण असलेल्या संघ आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या विषयी तरतुदी घटनेच्या कलम 315 ते 323 मध्ये  दिलेल्या आहेत.

स्वातंत्र्योत्तर काळातील सनदी सेवा-

       भारतात सनदी सेवेचे तीन प्रकार पडतात.

        अखिल भारतीय सेवा- अखिल भारतीय सेवेत भारतीय प्रशासकीय सेवा, (IAS) भारतीय पोलिस सेवा (IPS) आणि भारतीय वनसेवा (IFS) या तीन सेवांचा समावेश होतो.  अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांची निवड  संघ लोकसेवा आयोगाकडून केली जाते. निवड झालेल्या उमेदवाराच्या नियुक्तीची शिफारस आयोग करत असतो आणि त्यांना नियुक्ती  पत्र केंद्र सरकार देत असते. अखिल भारतीय सेवेतील अधिकारी केंद्र आणि राज्य सरकार मधील सनदी सेवेतील महत्वपूर्ण पदे सांभाळत असतात. उदाहरणार्थ जिल्हाधिकारी, केंद्र सरकारच्या विविध खात्यात सल्लागार, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा वन अधिकारी

       केंद्रीय सेवा- केंद्रीय सेवा केंद्र  प्रशासनाशी संबंधित खात्यांचे कार्य करीत असतात. केंद्राकडे परराष्ट्र व्यवहार, संरक्षण, रेल्वे, आयकर, पोस्ट तार, इत्यादी 97 विषय सोपवले आहेत. या  विषयांशी संबंधित विभागात काम करण्यासाठी केंद्रीय सेवेतील अधिकारी नेमलेले असतात. केंद्रीय सेवेत वर्ग आणि वर्ग हे दोन प्रकारचे अधिकारी असतात. त्यांच्यात राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकाऱ्यांचा समावेश असतो. या अधिकार्‍यांची निवड संघ लोकसेवा आयोगाकडून केली जाते. केंद्रीय सेवेत भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय महसूल सेवा, भारतीय रेल्वे अकाउंट सेवा, भारतीय डाक आणि तार सेवा भारतीय सूचना सेवा, भारतीय संरक्षण सेवा, केंद्रीय आरोग्य सेवा, केंद्रीय अभियांत्रिकी सेवा, केंद्रीय सचिवालय सेवा, इत्यादी जवळपास पन्नास पेक्षा जास्त सेवांचा समावेश केंद्रीय सेवेत केलेला दिसून येतो.

       राज्यसेवा- राज्य प्रशासनाशी संबंधित असलेल्या सेवांचा राज्य सेवेत समावेश होतो. राज्याकडे कायदा सुव्यवस्था, जमीन महसूल, शेती, शिक्षण, सहकार, स्थानिक स्वराज्य संस्था, मनोरंजन इत्यादी 66 विषय सोपवले आहेत. या  विषयांशी संबंधित विभागात काम करण्यासाठी राज्य सेवेतील अधिकारी नेमलेले असतात. राज्य सेवेत राजपत्रित अराजपत्रित, वर्ग आणि वर्ग या दोन्ही प्रकारचे अधिकारी असतात. या अधिकार्‍यांची निवड राज्य लोकसेवा आयोगाकडून केली जाते आणि नियुक्ती राज्य शासनाकडून केली जाते.  राज्य सेवेत उपजिल्हाधिकारी,  सहाय्यक जिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, प्रांताधिकारी, गट विकास अधिकारी, तहसीलदार, विक्रीकर अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, नायब तहसीलदार,  साहाय्यक, पोलीस उपनिरीक्षक, इत्यादी महत्त्वपूर्ण पदांचा समावेश होतो.


स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके-

Indian Polity - For Civil Services and Other State Examinations | 6th Edition-https://amzn.to/3AkhXPw VASTUNISTH: BHARAT KA ITIHAS; KALA EVAM SANSKRITI (Hindi Edition)-https://amzn.to/3AvC25g सेट/नेट राज्यशास्त्र पेपर-२-https://amzn.to/3CmgIkJ Samanya Budhi Avum Tarkshakti Parikshan-https://amzn.to/37yNIb0 Ksagar Sampurna Rajyashastra संपूर्ण राज्यशास्त्र-https://amzn.to/3AnWmFA विसाव्या शतकातील राजकीय विचारप्रवाह https://amzn.to/36LU5rh आधुनिक राजकीय विचारप्रणाली- https://amzn.to/3xpwU0R भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था पुस्तक link https://amzn.to/3iwtpjt https://amzn.to/3kMDY4U आधुनिक राजकीय सिद्धांत पुस्तक https://amzn.to/3BLcdQm महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय चळवळी आणि महाराष्ट्र प्रशासन Redmi Note 10 (Aqua Green, 4GB RAM, 64GB Storage) -Amoled Dot Display | 48MP Sony Sensor IMX582 | Snapdragon 678 Processor link- https://amzn.to/3xpahtm Canon EOS 1500D 24.1 Digital SLR Camera (Black) with EF S18-55 is II Lens-https://amzn.to/3AfUkax https://amzn.to/3iG9wXl-(boya Mic for good voice Quality for lecture and video) https://amzn.to/3y3Qr7Z (Adjustable Tripod and Stand ) https://amzn.to/36ZtgQy (Sony Camera) https://amzn.to/2UGoDbB (Dell MS116 1000DPI USB Wired Optical Mouse) Redmi note 10 amazon link-https://amzn.to/3y3e8gU

.

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.