https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

कोविड १९ जागतिक महामारीमध्ये प्रशासनाची भूमिका


 

कोविड १९ जागतिक महामारीमध्ये प्रशासनाची भूमिका


      जागतिकीकरणाच्या युगातील विश्वाला कोरोन विषाणूने अभूतपूर्व हादरा दिला आहे. २०१९ च्या अखेरीस कोरोना व्हायरसचा उगम चीनमधील वूहान प्रांतात झाला. त्यांच्या पहिला तडाखा चीनला बसला.अवघ्या तीन महिन्यात जगातील जवळपास १९५ देशांमध्ये पोहचला. भारतात जवळपास ६० हजारच्या आसपास कोविड १९ च्या संसर्गाने ग्रस्त व्यक्ती सापडलेल्या आहेत. २००० लोकांचा बळी गेलेला आहे. जगात जवळपास ४० लाखापेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे. जगात कोविड १९ मुळे बळी पडणाऱ्याचे प्रमाण २ लाख ८० हजार पर्यत पोहचले आहे या आकडेवारीवरून कोरोना महामारीचे दाहकता स्पष्ट होते. कोरोना विषाणूचा जलद प्रसार होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे अंतरराष्ट्रीय विमान प्रवासात मोठ्या प्रमाणवर झालेली वाढ मानली जाते. तांत्रिक व दळणवळण क्षेत्रातील विकासाने ‘जगाला वैश्विक खेड्याचे रूप दिले.’ हे रूप जगाला गिळंकृत करेल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. महत्वाची शहरे विशेषतः आंतरराष्ट्रीय विमानतळे असणारी शहरे ही कोरोना संसर्गाची आगार बनली. परदेशातून आणि शहरातून आलेल्या व्यक्तीविषयी नकारत्मतेची भावना वाढू लागली. परदेशी आणि शहरी व्यक्तीकडे क्रोरोना पसरविणारे स्त्रोत म्हणून संशयाने पहिले जाऊ लागले. शहरे आणि गावे भयग्रस्ततेची आणि अस्वस्थतेची केंद्र बनली.

कोविड १९ चे परिणाम :-

      ‘स्वाइल फ्लू’ च्या महामारीनंतर जग पुन्हा एकदा कोविड १९ महामारीने ग्रस्त झालेलं आहे.कोरोना साथीमुळे होणारा वैश्विक मृत्युदर हा जगाच्या चिंतेत भर घालणारा आहे. या विषाणूच्या महामारीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक क्षमता जगातील अनेक देशातील आरोग्य व्यवस्थामध्ये नाही हे प्रकर्षाने दिसून आले. कोविड १९ च्या विषाणूच्या लागणारी करणे आणि त्यांच्या निश्चित लक्षणाबाबत अजूनही मोठ्या प्रमाणावर अस्पष्टता होते. दररोज प्रसिद्धी होणाऱ्या वेगवेगळ्या माहितीमुळे गोंधळात अधिक भर पडत आहे. इतर संसर्गजन्य रोगांपेक्षा कोविड १९ ची प्रसार क्षमता कित्येक पटीने जास्त आहे. कोविड १९ च्या उद्रेकामुळे जागतिक अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या स्थितीत आलेल्या आहेत. विशानुविषयी असलेले समज-गैरसमज आणि संभ्रमामुळे वेगवेगळे पर्याय जगभरातील देशातून सुचविले जात आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी लॉकडाऊन, शरीरिक व सामाजिकविलगीकरण आणि शरीरिक वा सामाजिक अंतर हे सर्वोत्तम पर्याय असल्याचे जगातील अनेक देशाचे मत आहे.कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी जगातील अनेक देशांनी लॉकडाऊनचा पर्याय स्विकारला. लॉकडाऊनच्या पर्यायामुळे जागतिक अर्थकार विस्कळीत झाले. जगातील सर्वच देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वेग मंदावू लागला. जागतिक अर्थकारणाला बसलेल्या फटक्यापासून कोणताही देश अलिप्त राहू शकला नाही. कोरोना विषाणूचा फटका, वित्तीय बाजारपेठा, उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्राला बसला.कच्चा तेलाच्या किंमतीत अभूतपर्व घसरण नोंदविण्यात आली. संपूर्ण जगाचे अर्थचक्र थांबल्यासारखे वाढू लागले. जानेवारी ते एप्रिल २०२० मधील आकडेवारी लक्षात घेतली तर औद्योगिक उत्पादन,किरकोळ विक्री आणि गुतंवणूक इत्यादी क्षेत्रात ६० टक्क्यापेक्षा जास्त घसरण नोंदविण्यात आली. जागतिक अर्थतज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षाही जास्त असल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक बनत चाललेली आहे. प्रा. सुभाष ग.शिंदे यांनी सामना वर्तमानपत्रातील ‘महाराष्ट्राचे अर्थकारण आणि कोरोना’ लेखात लिहिलेले आहे की, “कोविड १९ मुळे एक एक गोष्ट मात्र अधोरेखित झाली व ती म्हणजे संपूर्ण आर्थिक व उत्पादनाच्या क्षेत्रातील अतिशय महत्वाची बाब म्हणजे मनुष्यबळ ही होय. त्यामुळे भविष्यात फक्त मनुष्यबळ विकासच नव्हे तर त्यांची सुरक्षितता देखील तेवढीच महत्वाचा ठरणार आहे.’’ मनुष्यबळाचा विकास करतांना त्यांचा सुरक्षिततेचा फारसा विचार उत्पादन आणि प्रशासनाने न केल्यामुळे कोविड १९ च्या तडाख्यात अर्थकारणाचे चाक रुपले आहे.

प्रशासन आणि जागतिक व्यवस्थाचे अपयश :-

      जागतिक कोणत्याही देशाच्या शास्त्रज्ञ आणि आरोग्य व्यवस्थाना कोविड १९ वर रामबाण औषण सापडले नाही. कोरोना विषाणूवर लस तयार करण्याची प्रक्रिया प्रारंभिक अवस्थेत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते कोरोना विषाणूवर लस तयार होण्यासाठी डिसेंबर २० पर्यंतची वाट पाहावी लागेल. वैद्यकशास्त्र शर्थीने प्रयत्न करत असूनही कोणतीही लस सापडलेली नाही किवा या आजारांवरील उपचारांची नेमकी अजूनही पद्धत सापडलेली नाही.कोरोना महामारीने जागतिक सर्वच देशाच्या आरोग्य व्यवस्थेचे अपयश उघड केले. एका अर्थाने जगभरच्या प्रशासनाचे अपयश मानता येईल. कोरोना विषाणूने निर्माण केलेल्या संकटाची खूप मोठी किंमत जगातील अनेक देशांना आणिमानवजातीला मोजावी लागणार आहे. या संकटाचा सामना करून त्यातून बाहेर येऊन जगाची नव्याने उभारणी करण्याच्या फार मोठ्या दिव्यातून मानव जातीला जावे लागणार आहे. या संकटामुळे लाखो लोकांची स्वप्ने धुळीला मिळाली.हजारो कुटुंबाची वाताहत झाली. शेकडो समूह कोलमडून पडले. मानवतेची देखील कसोटी लागली. या महाभंयकर संकटात मानवा मानवात संशयाचे वातावरण निर्माण झाले. मानव मानसिकदृष्ट्या चिंताग्रस्त व भयग्रस्त बनला. उद्याच्या भविष्यविषयी संभ्रमित होऊ लागला. मानव जाती पुढे आलेल्या घोर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग राज्यकर्ते,शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांना सापडत नसल्याने कोविड १९ सह जगण्याची सवय करा असा सूर लावला जातो आहे. कोविड १९ च्या वाढत्या संसर्गातून विषाणू हळूहळू निष्क्रिय होत जाईल आणि आपण संकटावर मात करू असा नवा आशावाद विकसित केला जात आहे. जागतिक पातळीवर पसरलेली घबराट आणि लॉकडाऊन सारख्यासर्व देशांच्या प्रशासनाने अवलंबलेल्या उपाययोजना मागे वळून पाहायला लावत आहेत. अनेक दिवस लॉकडाऊन करूनही कोविड १९ नियंत्रणात येण्याची कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. जग ह्या साथीच्या आजारातून कसं पार होईल याची कोणतीही शाश्वती नाही. कोरोना विषाणूच्या संकटाबद्दल अच्युत गोडबोले आणि देशमुक दीपा यांनी साधना साप्ताहिकात ‘कोरोनच विश्व’  लेखात लिहिलेले आहे की, ‘’कोरोनाचं संकट दुसऱ्या महायुद्धानंतरचं सगळ्यात भीषण अरिष्ट आहे. राजकारण,अर्थकारण,समाजजीवन,शिक्षण,कला.क्रीडा आणि मानसिक आरोग्य अशा सगळ्यांवरच याचा इतका परिणाम होणार आहे की; जेव्हा आपण यातून पूर्णपणे बाहेर पडू, त्या वेळी हे जग कदाचित आपल्याला ओळखू देखील शकणार नाही.’’ कोविड १९ चे संकट आपण समजता इतके सोपे नाही.

      “सद्यकालीन विश्वव्यवस्था चांगल्या पद्धतीने काम करत राहिली असती तर जगावर आलेले कोरोना वायरसचे संकट ओळखण्यात विलंब केला नसता.जगावर आलेल्या संकटाला ओळखून त्यावर मात करण्यासाठी संपूर्ण जगाला जागे केले असते. परंतु असे होऊ शकले नाही. ‘’कोरोना वायसरने पसरविलेल्या महामारीने वैश्विक समाज आणि प्रशासनाच्या सर्व मर्यादा उघड करून महामारीचे संकट अधिक तीव्र होणार असल्याचे दाखवून दिले. कोरोना महामारीमुळे आंतरराष्ट्रीय संघटनांची वैधानिकता मोठ्या प्रमाणावर कमी झाली. कोरोना सारज्या वैश्विक महामारीवर मात करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने सुरुवातीच्या काळात फारसे गतिमान प्रयत्न केले नाहीत. चीनसारख्या विस्तारवादी देशावर अति विश्वास व्यक्त केला. वैश्विक संघटनाचे मोठ्या प्रमाणावर राजकीयकरण झाल्यामुळे व्यवस्थपणे काम करण्याची क्षमता कमी होत आहे. वैश्विक महामारीच्या संकटांना समोरे जाण्यसाठी आवश्यक एकात्मता राष्ट्रांमध्ये विकसित होण्या ऐवजी राष्ट्रवादाची लाट आलेली आहे. वैश्विक पातळीवर राष्ट्रे एकमेकांना सहकार्य करण्याऐवजी राष्ट्रवादाच्या सार्वभौमत्वाचे प्रदर्शन करण्यात व्यस्त आहेत. संपूर्ण विश्वाला महामारीत ढकलणारा चीन औषधे आणि मदत पुरविण्याच्या नावाखाली जागतिक मसीहा बनण्याचा प्रयत्न करीत आहे. गरजवंत देशांना स्वास्थ संसाधने आणि आतकालीन मदत उपलब्ध करून देत आहे जेणेकरून अमेरिका आणि पाश्चिमात्य देशाकडून केल्या जाणाऱ्या आरोपापासून बचाव करण्यासाठी हे मार्ग वापरत आहे. अमेरिका आणि युरोपियन देशांची कोरोना महामारीत अत्यंत बिकट परिस्थिती बनली आहे. जगाची तारणहार असलेली राष्ट्रे आज हतबल झालेली आहेत. युरोपियन युनियन.नाटो सारख्या संघटना आपल्या सदस्य देशांना मदत करू शकत नाही. जगातील देशाचे एकमेकांवर अवलंबित्व हे संकटाचे कारण बनले. सद्यकालीन विश्वव्यवस्था कोरोना विषाणूमुळे येणाऱ्या संकटाला लवकरात लवकर ओळखून संपूर्ण जगाला जागृत करू शकली असती आणि या विषाणूंवर मात करण्यासाठी आवश्यक मार्गाचा प्रचार करून कोरोनाचा फैलाव रोखू शकली असती. परंतु कोरोना महामारीच्या संकटात हे घडू शकले नाही. वैश्विक व्यवस्था  अव्यवस्था परिवर्तित झाल्या. कोरोना महामारीच्या प्रकोपाने आपले प्राधान्यक्रम कसे चुकीचे होते हे सिद्ध करून दिले आहे. आरोग्यसारख्या क्षेत्राकडे जगातील सर्वच देशांनी केलेले अक्षम्य दुर्लक्ष आपल्या मुळावर उठलेले आहे. या महामारीने आरोग्य व्यवस्थेचा आजारीपणा सर्वासमोर उजागर केलेला आहे. तांत्रिक आणि व्यावसायिक शिजजाचा सर्वत्र उदो उदो केल्यामुळे मुलभूत विज्ञानाच्या संधोधानाकडे झालेल्या दुर्लक्षतेमुळे कोरोना सारख्या महामारीवर आपण  औषध किवा लस शोधू शकला नाही. परिणामत: प्रत्येक देशातील उपचार पद्धतीत मोठ्या प्रमाणावर विविधता आली. उपचार पद्धतीत नेमक्या दिशेचा अभावामुळे महामारीने मृत्युमुखी पडणाऱ्याचे प्रमाण काही देशात प्रचंड प्रमाणात आहे.

उपयोजना व सारांश :-

      कोरोना महामारीने अनेक देशाच्या प्रशासनाच्या मर्यादा उजागर केलेल्या आहेत. अनेक देशांची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. लोक मानसिकदृष्ट्या त्रस्त बनले आहेत. मानवाला आपल्या भवितव्याची चिंता लागलेली आहे. माणसे एकमेकांकडे संशयाने पाहू लागली आहेत. त्यामुळे कोरोनावर मात निव्वळ औषधेपचाराने वा लॉकडाऊन सारख्या पर्यायाने होणार नाही हे प्रशासनाने लक्षात घेण्याची गरज आहे. कोरोनावर मात करण्यासाठी ज्या काही उपाययोजना केल्या जातात आहेत त्या बहुसंख्य उपयायोजना कुमकामी ठरलेल्या आहेत. उदा. लॉकडाऊन,लॉकडाऊन कायमस्वरूपी ठेवता येणार नाही हे जगाच्या अनेक देशाच्या लक्षात येऊ लागलेले आहे. लॉकडाऊन उठविल्यानंतर जगातील सर्व व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी लोकांचे मनोबल उचावणे गरजेचे आहे. मानसिकदृष्ट्या लोकांना लढ्यासाठी तयार केल्यास या वैश्विक संकटावर निश्चित आपल्याला मात करता येईल. कोविड १९ च्या साथीने लोकांचे मनोबल प्रचंड खचले आहे. जगाच्या इतिहासात अनेक महामाऱ्या व साथीचे रोग आलेले आहेत. त्यांना मानवाने खंबीरपणे तोंड दिलेले आहे त्याप्रमाणे कोरोना साथीवर निश्चितपणे मात करू असा सकारत्मक प्रचार जनतेत प्रशासनाकडून झाला पाहिजे. या महामारीने संपूर्ण विश्व समुदायाला एक नवी संधी दिलेली आहे. सर्व देशांनी एकजूट होऊन या महामारीच्य्या विरोधात लढा देण्याची आवश्यकता आहे.एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून प्रश्न सुटणार नाही. जगातील देशांनी आपले प्रधान्यक्रम बदलण्याची गरज आहे. आरोग्य यंत्रणेकडे आपले लक्ष्य केंद्रित करावे लागेल. आरोग्यवर होणाऱ्या खर्चाचे प्रमाण वाढवावे लागेल. तंत्रज्ञानापेक्षा मुलभूत संशोधनावर अधिक भर द्यावा लागेल. आरोग्यावर होणाऱ्या खर्चाचे प्रमाण वाढवावे लागेल. प्रशासनाचे आपली संपूर्ण शक्ती एकदिलाने झोकून दिल्याशिवाय महामारीवर मात करता येणार नाही. त्यासाठी प्रशासनाला कडक पावले देखील उचलावी लागतील. लोकांवर सक्ती देखील करावी लागेल. जनतेचे अपेक्षित सहकार्य देखील मिळवावे लागेल. ही लढाई एकट्या प्रशासनाच्या ताकदीवर कोणत्याही देशाला जिंकता येणार नाही. नागरिक,स्वयंसेवी संस्था, राजकीय अभिजन आणि प्रशासन यांनी मिळून एकत्र प्रयत्न केल्यास महामारीवर मात करणे शक्य आहे. या पूर्वी देखील विश्वावर संकटे आलेली आहेत. या संकटावर आपण मात केलेली आहे. संकटावर मात करण्याची मानवाची वृत्ती ही पूर्वापार पासून चालत आलेली आहे. या व वृत्तीला नव्याने उजगार करून नव्या आत्मविश्वास जगातील लोकांमध्ये विकसित करून कोरोना महामारीवर मात करता येईल.

संदर्भ सूची.:-

१.     गोडबोले,अच्युत आणि देशमुख दीपा(२ मे २०२०) कोरोनाचं विश्व पुणे, साप्ताहिक

२.     शिंदे, सुभाष, ग.(२२ एप्रिल २०२०). महाराष्ट्राचे  अर्थकारण आणि कोरोना. मुंबई.सामना

३.     थरूर शशी आणि सरन समीर (८ एप्रिल २०२०). कोविड-१९ अव्यवस्था और नई विश्व व्यवस्था में भारत की भूमिका ! नवी दिल्ली, इंडियन एक्सप्रेश

४.     www.mygov.in/covid-19

५.     www.worldometer.info.com

६.     www.patrika.com

 

 स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके-

Indian Polity - For Civil Services and Other State Examinations | 6th Edition-https://amzn.to/3AkhXPw VASTUNISTH: BHARAT KA ITIHAS; KALA EVAM SANSKRITI (Hindi Edition)-https://amzn.to/3AvC25g सेट/नेट राज्यशास्त्र पेपर-२-https://amzn.to/3CmgIkJ Samanya Budhi Avum Tarkshakti Parikshan-https://amzn.to/37yNIb0 Ksagar Sampurna Rajyashastra संपूर्ण राज्यशास्त्र-https://amzn.to/3AnWmFA विसाव्या शतकातील राजकीय विचारप्रवाह https://amzn.to/36LU5rh आधुनिक राजकीय विचारप्रणाली- https://amzn.to/3xpwU0R भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था पुस्तक link https://amzn.to/3iwtpjt https://amzn.to/3kMDY4U आधुनिक राजकीय सिद्धांत पुस्तक https://amzn.to/3BLcdQm महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय चळवळी आणि महाराष्ट्र प्रशासन Redmi Note 10 (Aqua Green, 4GB RAM, 64GB Storage) -Amoled Dot Display | 48MP Sony Sensor IMX582 | Snapdragon 678 Processor link- https://amzn.to/3xpahtm Canon EOS 1500D 24.1 Digital SLR Camera (Black) with EF S18-55 is II Lens-https://amzn.to/3AfUkax https://amzn.to/3iG9wXl-(boya Mic for good voice Quality for lecture and video) https://amzn.to/3y3Qr7Z (Adjustable Tripod and Stand ) https://amzn.to/36ZtgQy (Sony Camera) https://amzn.to/2UGoDbB (Dell MS116 1000DPI USB Wired Optical Mouse) Redmi note 10 amazon link-https://amzn.to/3y3e8gU

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.