https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

भारतातील निवडणूक कायदे, महत्व आणि आवश्यकता Election Law in India


 

भारतातील निवडणूक कायदे-

भारतीय घटनाकारांनी मुक्त आणि पारदर्शक पद्धतीने निवडणुका घेण्यासाठी 324 ते 329 या कलमांमध्ये निवडणूक आयोग आणि निवडणुकाबद्दल तरतुदी केलेल्या आहेत.

       324 कलम- मुक्त आणि निपक्षपातीपणे निवडणुका घेण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद तसेच निवडणुकीसंदर्भात देखरेख, दिशानिर्देशन आणि नियंत्रणाचा अधिकार आयोगाला असतो.

       मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपतीला आवश्यकता  वाटतील तितके इतर निवडणूक आयुक्त संसदेने निश्चित केलेल्या अटीनुसार राष्ट्रपती नियुक्त करू शकतो.

       संसदेने पारित केलेल्या कुठल्याही कायद्याअंतर्गत राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले निवडणूक आयुक्त आणि प्रादेशिक आयुक्तांची सेवा आणि कार्यकाळ बदलता येत नाही.

       सरन्यायाधीश यांना ज्या प्रक्रियेचे पालन करून पदावरून दूर केले जाते त्याच प्रक्रियेचा वापर निवडणूक आयुक्तां साठी वापर करावा.

       निवडणूक आयुक्त किंवा प्रादेशिक आयुक्त यांना मुख्य निवडणूक आयुक्ताचा सल्ला घेतल्याशिवाय पदावरून काढता येत नाही.

       आयोगाने विनंती केल्यास राष्ट्रपती किंवा राज्याचा राज्यपाल अतिरिक्त किंवा प्रादेशिक आयुक्त आयोगाला उपलब्ध करून देऊ शकतो.

       325 कलम - धर्म, वंश, जात, लिंग इ. च्या आधारावर मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यास अपात्र ठरवले जाणार नाही. संसद आणि राज्य विधिमंडळ निवडणुकीत क्षेत्रीय मतदार संघासाठी एकच सर्वसाधारण यादी असेल याचा अर्थ मतदानाचा अधिकार देताना घटनेने सर्वांना समान मानलेले आहे.

       326 कलम - लोकसभा आणि विधानसभा निवडणुका प्रौढ मताधिकाराच्या तत्त्वाने होती.1988 मध्ये झालेल्या 61 घटना दुरुस्तीने 21 वरून मतदाराचे वय 18 करण्यात आले. भ्रष्ट व्यवहार, अयोग्य वर्तन, मानसिकदृष्ट्या विकल,  देशद्रोह, अनिवास इत्यादी आधारावर संसद आणि राज्य विधिमंडळ कायदा करून मतदानासाठी एखाद्या व्यक्तीला अपात्र घोषित केले जाऊ शकते

       327 कलम - संसद आणि विधिमंडळात निवडणुकी संदर्भात कायदे करण्याचा अधिकार संसदेला असतो.

       328 कलम विधिमंडळ निवडणुकींबाबत कायदा करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाला आहे.

       329 कलम() () कलम - निवडणूक विषयामध्ये हस्तक्षेप करण्यास न्यायालयांना प्रतिरोध

       मतदारसंघ परिसीमनाबाबच्या कायद्याच्या वैधतेला बद्दल न्यायालयात जाता येणार नाही.

       330 कलम- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी लोकसभेत आरक्षण

       331 कलम - अँग्लो-इंडियन समाजाला लोकसभेत आरक्षण (126 व्या घटना दुरुस्ती विधेयकानुसार अँग्लो-इंडियन आरक्षण समाप्त})

       332 कलम- विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव जागा

       333 कलम-  घटक राज्य विधान परिषदेत अँग्लो-इंडियन समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलेले आहे. एक जागा राज्यपाल कडून नियुक्त 126 व्या घटना दुरुस्तीनुसार अँग्लो-इंडियन आरक्षण समाप्त

       334 कलम- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विशेष प्रतिनिधित्व असलेल्या जागांना संसदेच्या कायद्याने मुदतवाढ दिली जाते. सध्याच्या कायद्यानुसार 2030 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.



  स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके-

Indian Polity - For Civil Services and Other State Examinations | 6th Edition-https://amzn.to/3AkhXPw VASTUNISTH: BHARAT KA ITIHAS; KALA EVAM SANSKRITI (Hindi Edition)-https://amzn.to/3AvC25g सेट/नेट राज्यशास्त्र पेपर-२-https://amzn.to/3CmgIkJ Samanya Budhi Avum Tarkshakti Parikshan-https://amzn.to/37yNIb0 Ksagar Sampurna Rajyashastra संपूर्ण राज्यशास्त्र-https://amzn.to/3AnWmFA विसाव्या शतकातील राजकीय विचारप्रवाह https://amzn.to/36LU5rh आधुनिक राजकीय विचारप्रणाली- https://amzn.to/3xpwU0R भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था पुस्तक link https://amzn.to/3iwtpjt https://amzn.to/3kMDY4U आधुनिक राजकीय सिद्धांत पुस्तक https://amzn.to/3BLcdQm महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय चळवळी आणि महाराष्ट्र प्रशासन Redmi Note 10 (Aqua Green, 4GB RAM, 64GB Storage) -Amoled Dot Display | 48MP Sony Sensor IMX582 | Snapdragon 678 Processor link- https://amzn.to/3xpahtm Canon EOS 1500D 24.1 Digital SLR Camera (Black) with EF S18-55 is II Lens-https://amzn.to/3AfUkax https://amzn.to/3iG9wXl-(boya Mic for good voice Quality for lecture and video) https://amzn.to/3y3Qr7Z (Adjustable Tripod and Stand ) https://amzn.to/36ZtgQy (Sony Camera) https://amzn.to/2UGoDbB (Dell MS116 1000DPI USB Wired Optical Mouse) Redmi note 10 amazon link-https://amzn.to/3y3e8gU

.

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.