https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

भारतातील निवडणूक प्रक्रिया घटक, महत्त्व-स्वरूप आणि वैशिष्ट्ये-


 

भारतातील निवडणूक प्रक्रिया-

निवडणूक प्रक्रियेचे घटक-

निवडणूक आयोग, राजकीय पक्ष आणि मतदार हे तीन निवडणूक प्रक्रियेचे घटक आहेत.

निवडणूकआयोग-भारतीय घटनाकारांनी मुक्त आणि पारदर्शक पद्धतीने निवडणुका घेण्यासाठी 324 ते 329 या कलमांमध्ये तरतुदी केलेल्या आहेत.

निवडणूक आयोगाची कार्य-

       मतदार याद्यांची निर्मिती करणे-

       निवडणूक संचालन कार्य- निवडणूक कार्यक्रम घोषणेपासून ते मतमोजणी पर्यंतची सर्व कामे आयोगाला करावी लागतात.

       मतदारसंघ पुनर्रचना- संसदेने संमत केलेल्या निर्वाचन क्षेत्र निर्धारक आयोग कायद्यानुसार मतदार संघाचे परिसीमन आयोग दर दहा वर्षांनी करतो. परंतु भारतात हे कार्य नियमितपणे केले गेलेले नाही. आत्तापर्यंत या कायद्याच्या आधारावर 1952, 1963, 1973 आणि 2002 मध्ये मतदार संघ परिनियम आयोग निर्माण करण्यात आले या आयोगांच्या शिफारशींच्या आधारावर मतदार संघाची निर्मिती करण्यात आली. 2026 पर्यंत मतदार संघाचे परिसीमन आयोग नेमता येणार नाही असा कायदा 2002 मध्ये केलेला आहे.

       राजकीय पक्षांची निगडित कार्य- राजकीय पक्षांना मान्यता देणे, नोंदणी करणे, निवडणूक चिन्ह वाटप, राष्ट्रीय आणि राज्य पक्षाचा दर्जा देणे, चिन्ह गोठविणे,पक्षात फूट पडल्यास घटनेनुसार निर्णय देणे.

       संसदेने केलेल्या निवडणूक कायद्यांची अंमलबजावणी करणे

       निवडणूकीत  गैरप्रकार घडल्यास निवडणूक रद्द करणे

       पोटनिवडणूक घेणे, निवडणूक बाबत राष्ट्रपती आणि सरकारला सल्ला देणे

       भारतातील निवडणूक प्रक्रियेची वैशिष्ट्ये-

       स्वंतत्र आणि स्वायत्त निवडणूक आयोग

       प्रौढमताधिकार तत्त्वाचा अवलंब- 1893 न्यूझीलंड देशाने सर्वात प्रथम हा अधिकार दिला.

       प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष निवडणुका- लोकसभा आणि विधानसभा निवडणुका- प्रत्यक्ष जनतेकडून निवड गुप्त मतदानाद्वारे प्रतिनिधींची निवड केली जाते. साध्या मतदान पद्धतीचा अवलंब केला जातो. सर्वात जास्त मते मिळविणाऱ्या उमेदवार विजयी होतो.

        राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यसभा आणि विधान परिषद  सदस्यांचीअप्रत्यक्ष पद्धतीने निवड होते.  या पदांसाठी  क्रमदेय मतदान पद्धतीचा अवलंब केला जातो. आयोगाने निश्चित केलेला कोटा पूर्ण  करणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषीत केले जाते.

         संसद आणि विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी राखीव मतदारसंघ

       आणीबाणीच्या काळात संसद आणि विधानसभा कार्यकाळात एक वर्षे संसदेला कायदा करून वाढवता येतो. मध्यंतरीच्या काळात आणीबाणी रद्द झाल्यास फक्त सहा महिने कार्यकाळ वाढतो.

        लोकसभा आणि विधानसभा विसर्जित झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत निवडणुका घेणे आयोगावर बंधनकारक आहे.

        लोकसभा आणि विधानसभेसाठी प्रादेशिक मतदार संघाची निर्मिती- लोकसभा 10  लाख तर विधानसभेसाठी 3  लाख 20 हजार मतदारांसाठी एक मतदार संघ निर्माण केला जातो. एका मतदार संघातून एका सदस्यांची निवड केली जाते.

       निवडणुकांचे महत्त्व-

       शासनाला  अधिमान्यता देण्याचा मार्ग,

       नागरिकांना राजकीय सहभागाची संधी,

       राजकीय शिक्षणाचे माध्यम,

       शांततेच्या मार्गाने सत्तांतराचा मार्ग,

       लोकमत निर्मिती आणि राजकीय जागृतीसाठी उपयुक्त,

       प्रतिनिधींची निवड करणे,

       राज्यकर्त्या वर्गावर नियंत्रण ठेवण्याचा मार्ग,

       शासक शासित यातील माध्यम, राजकीय सहभाग मिळवून देणारी प्रक्रिया,

       राजकीय शिक्षण देणारी प्रक्रिया

       राजकीय पक्ष-

       निवडणुकीत उमेदवार उभे करणे,

       राजकीय जाहीरनामा प्रसिद्ध करणे,

        प्रचार यंत्रणा  राबविणे

       बहुमत मिळाल्यास सरकार स्थापन करून राज्य कारभार चालवणे,

       बहुमत मिळाल्यास विरोधी पक्षाची भूमिका बजावणे

       सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवणे.

       मतदार-

       विविध पर्यायातून एकाची निवड करणे,

       सरकारच्या कार्याचे मूल्यमापन करणे

       राजकीय चर्चा आणि विचारविनिमय करून मत निश्चिती करणे,

       सरकारवर अंकुश ठेवणे

       मतदान करणे.



        स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके-

Indian Polity - For Civil Services and Other State Examinations | 6th Edition-https://amzn.to/3AkhXPw VASTUNISTH: BHARAT KA ITIHAS; KALA EVAM SANSKRITI (Hindi Edition)-https://amzn.to/3AvC25g सेट/नेट राज्यशास्त्र पेपर-२-https://amzn.to/3CmgIkJ Samanya Budhi Avum Tarkshakti Parikshan-https://amzn.to/37yNIb0 Ksagar Sampurna Rajyashastra संपूर्ण राज्यशास्त्र-https://amzn.to/3AnWmFA विसाव्या शतकातील राजकीय विचारप्रवाह https://amzn.to/36LU5rh आधुनिक राजकीय विचारप्रणाली- https://amzn.to/3xpwU0R भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था पुस्तक link https://amzn.to/3iwtpjt https://amzn.to/3kMDY4U आधुनिक राजकीय सिद्धांत पुस्तक https://amzn.to/3BLcdQm महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय चळवळी आणि महाराष्ट्र प्रशासन Redmi Note 10 (Aqua Green, 4GB RAM, 64GB Storage) -Amoled Dot Display | 48MP Sony Sensor IMX582 | Snapdragon 678 Processor link- https://amzn.to/3xpahtm Canon EOS 1500D 24.1 Digital SLR Camera (Black) with EF S18-55 is II Lens-https://amzn.to/3AfUkax https://amzn.to/3iG9wXl-(boya Mic for good voice Quality for lecture and video) https://amzn.to/3y3Qr7Z (Adjustable Tripod and Stand ) https://amzn.to/36ZtgQy (Sony Camera) https://amzn.to/2UGoDbB (Dell MS116 1000DPI USB Wired Optical Mouse) Redmi note 10 amazon link-https://amzn.to/3y3e8gU

.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.