https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

2005 च्या माहिती अधिकार कायदा तरतुदी, आवश्यकता, महत्त्व आणि मर्यादा


 

माहिती अधिकार कायदा 2005-

देशातील सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि गतिमानता निर्माण करण्यासाठी त्या प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील माहिती सर्वांना विनाविलंब प्राप्त व्हावी यासाठी माहिती अधिकार कायदा 2005 संमत करण्यात आला. लोकशाही व्यवस्थेत कार्यक्षमता, गतिमानता आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी हा कायदा आवश्यक मानला जातो. कारण गोपनीयतेच्या नावाखाली सार्वजनिक माहिती दडपून ठेवण्याच्या वृत्तीवर हा कायदा अंकुश असतो. जगात सर्वप्रथम स्विडन देशात हा अधिकार देण्यात आला त्यानंतर अनेक देशात माहिती अधिकार कायदा संमत करण्यात आला. युनोने देखील आपल्या सनदेतील 19 व्या कलमानुसार सदस्य राष्ट्रांनी देशाच्या जनतेला माहितीचा अधिकार द्यावा अशी तरतूद केली. भारतात अनेक स्वयंसेवी संस्थांनी माहिती अधिकाराच्या आवश्यकतेवर जोर दिला. महाराष्ट्रात समाजसेवक अण्णा हजारे, निवृत्त सनदी अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थेची मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने सर्वप्रथम 2002 मध्ये माहिती अधिकार कायदा केला. त्यानंतर भारत सरकारने माहिती अधिकार कायदा संमत केला. 12 ऑक्टोबर 2005 मध्ये जम्मू-काश्मीर वगळता देशभर कायदा लागू झाला. या कायद्यामुळे शासनाच्या सर्व विभाग, संस्था आणि शासनाकडून अनुदान प्राप्त करणाऱ्या संस्थांकडून नागरिकांना माहिती मिळवता येते. माहिती अधिकार कायद्यात 1 ते 31 कलमे असून सहा प्रकरणांमध्ये विभागली आहेत. माहिती अधिकार कलम 3 नुसार भारतीय नागरिक, अनिवासी भारतीय आणि  परदेशात स्थायिक असलेल्या मूळ भारतीयांना माहिती मिळवण्याचा अधिकार हा कायदा देतो.

माहिती अधिकार म्हणजे काय- कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे असलेली किंवा त्यांच्या नियंत्रणात असलेली माहिती आणि या अधिनियमान्वये मिळविता येण्याजोगी माहिती मिळवण्याचा अधिकार होय.

सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे काय- माहिती अधिकार कायद्यात सार्वजनिक प्राधिकरण याची व्याख्या केलेली आहे. संसद आणि राज्य विधिमंडळाच्या कायद्याने स्थापन झालेले, शासनाने काढलेल्या अधिसूचनेद्वारे स्थापन झालेले, शासनाची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मालकी नियंत्रण असलेले आणि शासनाकडून वित्तपुरवठा केल्या जाणाऱ्या शासकीय, अशासकीय संघटनांचा समावेश सार्वजनिक प्राधिकरणात केला जातो.

माहिती अधिकार कायद्यातील तरतुदी-

या कायद्यानुसार केंद्र आणि राज्य पातळीवर माहिती आयोगाची स्थापना करणे. सरकारी निर्माण कार्य बद्दल माहिती प्राप्त करणे, इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील माहिती मिळवणे उदा. संगणकात जतन करून ठेवलेली माहिती, सरकारी दस्तावेज कागदपत्रे, नोंदी, शेरे, कागदपत्रे, प्रतिकृती स्वरुपाची माहिती नागरिक मागू शकतात.

केंद्र-राज्यकायद्याने स्थापन झालेल्या सरकारी गैरसरकारी अनुदान प्राप्त संस्थांकडून माहिती मिळविता येते.

आपल्या विभागांचे कर्तव्य, कार्य, अधिकारी, निर्णय प्रक्रिया, पर्यवेक्षण उत्तरदायित्व, अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्य निर्वाचन नियम, प्रस्तावित खर्च, अनुदान माहिती, अधिकाऱ्याचे नाव पदनाम इत्यादी प्रकारची माहिती अधिकार कलम 4 (1)() नुसार प्रत्येक कार्यालयाने वरील 17 बाबींची माहिती स्वतःहून प्रकाशित करणे आवश्यक आहे.

माहिती अधिकार कायद्यातील मर्यादा- माहिती अधिकार कलम 8 नुसार नागरिकांना पुढील माहिती मागता येत नाही.

१.   देशाची सुरक्षितता, सार्वभौमत्व, सुरक्षा धोरण आर्थिक धोरण धोक्याच येईल अशी माहिती देण्यास कायद्याने मनाई केली आहे.

२.   संसद विधिमंडळ विशेषाधिकाराचा भंग, न्यायालयाने मनाई केलेली माहिती, गुन्हेगारास अटक खटला भरण्याचा अडथळा निर्माण करणारी माहिती देता येत नाही.

३.   सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तीच्या खाजगी बाबी आणि खाजगी जीवनाबद्दल माहिती देता येत नाही.

४.   व्यक्तीचे जीवित आणि शारीरिक सुरक्षिततेत धोका निर्माण करणारी माहिती सुरक्षेच्या कारणास्तव नाकारले जाऊ शकते.

५.   न्यायालयीन अवमान न्यायालयीन कामात अडथळा अनारी माहिती देण्यास कायद्याने बंदी आहे.

६.   व्यवसायिक गोपनीयतेचा भंग, व्यावसायिक गुपित, बौद्धिक संपदा श्रेणीत समाविष्ट होणारी माहिती सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय देता येत नाही.

७.   मंत्रिमंडळाचे कागदपत्रे, मंत्री सचिव अधिकाराचा विचारविमर्श, केंद्राच्या गुप्तवार्ता सुरक्षा एजन्सी कडून सुरक्षा संबंधी माहिती मागता येत नाही.

माहिती अधिकार यावरील बंधने टाकलेली असली तरी शासकीय गुपिते अधिनियम 1923 किंवा माहिती अधिकार पोटकलम (1) अन्वये काही अपवाद केलेले आहेत. सार्वजनिक हितासाठी अपवादात परिस्थितीत माहिती देता येईल.

माहिती अधिकार प्रक्रिया- सार्वजनिक प्राधिकरणाकडून माहिती देण्यासाठी प्रत्येक कार्यालयात एक सक्षम अधिकारी नियुक्त केलेला असतो. माहिती मिळवणारे व्यक्ती आवश्यक शुल्क दहा रुपये आणि विशिष्ट नमुन्यात प्राधिकृत अधिकाऱ्याकडे अर्ज करू शकतो. या अर्जाला 30 दिवसाच्या आत उत्तर देणे बंधनकारक असते. प्राधिकृत अधिकाऱ्याने माहिती देण्यास टाळाटाळ केली किंवा अयोग्य माहिती दिली तर त्या विरोधात अपीलीय अधिकाऱ्याकडे विशिष्ट फी आणि नमुना अर्ज सादर करून अर्ज करता येतो. या अपिलाचे उत्तर 45 दिवसाच्या आत आवश्यक असते. अपिलीय अधिकाऱ्याच्या माहितीने समाधान झाल्यास माहिती आयुक्ताकडे अर्ज करावा लागतो. माहिती आयुक्तांचा निर्णय अंतिम असतो. 90 दिवसाच्या आत निर्णय देणे आयुक्तांना बंधनकारक असते. माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या आणि जाणून बुजूनचुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यास प्रति दिन 250 रुपये आणि जास्तीत जास्त पंचवीस हजार रुपये पर्यंतचा दंड केला जाऊ शकतो. लेखी माहिती मिळण्याची विनंती करता येऊन शकणाऱ्या नागरिकांना कलम 6 नुसार सहाय्यक प्राधिकृत अधिकाऱ्याने मदत करावी अशी तरतूद केलेली आहे. दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीला फी माफ असते. इतर व्यक्तींना फी सोबत प्रती दोन रूपये खर्च आणि टपाल        खर्च      द्यावे लागतात. व्यक्तीचे जीवित स्वातंत्र्य रक्षणाची संबंधित माहिती अठ्ठेचाळीस तासाच्या आत प्रदान करणे आवश्यक असते.

अशा प्रकारे माहितीपासून कोणी वंचित राहू नये यासाठी माहिती अधिकार कायद्यात व्यापक तरतुदी केलेल्या आहेत.

स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके-

Indian Polity - For Civil Services and Other State Examinations | 6th Edition-https://amzn.to/3AkhXPw VASTUNISTH: BHARAT KA ITIHAS; KALA EVAM SANSKRITI (Hindi Edition)-https://amzn.to/3AvC25g सेट/नेट राज्यशास्त्र पेपर-२-https://amzn.to/3CmgIkJ Samanya Budhi Avum Tarkshakti Parikshan-https://amzn.to/37yNIb0 Ksagar Sampurna Rajyashastra संपूर्ण राज्यशास्त्र-https://amzn.to/3AnWmFA विसाव्या शतकातील राजकीय विचारप्रवाह https://amzn.to/36LU5rh आधुनिक राजकीय विचारप्रणाली- https://amzn.to/3xpwU0R भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था पुस्तक link https://amzn.to/3iwtpjt https://amzn.to/3kMDY4U आधुनिक राजकीय सिद्धांत पुस्तक https://amzn.to/3BLcdQm महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय चळवळी आणि महाराष्ट्र प्रशासन Redmi Note 10 (Aqua Green, 4GB RAM, 64GB Storage) -Amoled Dot Display | 48MP Sony Sensor IMX582 | Snapdragon 678 Processor link- https://amzn.to/3xpahtm Canon EOS 1500D 24.1 Digital SLR Camera (Black) with EF S18-55 is II Lens-https://amzn.to/3AfUkax https://amzn.to/3iG9wXl-(boya Mic for good voice Quality for lecture and video) https://amzn.to/3y3Qr7Z (Adjustable Tripod and Stand ) https://amzn.to/36ZtgQy (Sony Camera) https://amzn.to/2UGoDbB (Dell MS116 1000DPI USB Wired Optical Mouse) Redmi note 10 amazon link-https://amzn.to/3y3e8gU

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.