https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

मानवाधिकार संकल्पना आणि भारतीय राज्यघटना Human Rights Concepts and Indian Constitution


 

मानवाधिकार म्हणजे काय- मानव अधिकार म्हणजे व्यक्तीला जन्माने प्राप्त झालेले आणि सन्मानाने जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले अधिकार होय. मानव अधिकाराचा संबंध व्यक्तीच्या प्रतिष्ठेची आहे. व्यक्तीत असलेली आत्मसन्मानाची भावना,व्यक्तीच्या प्रतिष्ठेला रेखांकित करत असते आणि हीच भावना मानवी समाजाला पुढे नेण्याचे काम करत असते. थोडक्यात असे सांगता येईल की, मानव अधिकार मानवी स्वभावात अंतर्भूत आहेत आणि हे अधिकार मानवाच्या समग्र विकासासाठी आणि आत्मसन्मानासाठी अनिवार्य आहे.

मानवाधिकार संकल्पना- प्रत्येक व्यक्तीस निसर्गाकडून जन्मजात असे काही अधिकार मिळालेले आहेत असे प्राचीन काळापासून मानले जाते. मानव अधिकार संकल्पनेची मुळे नैसर्गिक अधिकार संकल्पनेत सापडतात. मानव अधिकार संकल्पना मानवी विकासाच्या विविध टप्प्यांवर आलेल्या अनुभवातून विकसित झालेली दिसते. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात झालेल्या अपरिमित जीवितहानीमुळे मानव अधिकार संकल्पनेच्या चर्चेने जोर पकडला. भविष्यातील हानीपासून मानव जातीला वाचवण्यासाठी व्यापक उपाययोजनेचा एक भाग म्हणून मानव अधिकाराचा विचार केला जाऊ लागला. संयुक्त राष्ट्र संघटनेने देखील मानवी हक्क प्रश्नाला विशेष महत्त्व दिले. युनोच्या आमसभेत मानवी हक्कांशी संबंधित मुद्द्यांचा समावेश केला. मानवी हक्काच्या प्रस्थापनेसाठी आणि प्रसारासाठी कटिबद्ध असल्याचे युनोने जाहीर केले. मानवी हक्क हे मानवी जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. प्रत्येक व्यक्तीला मानव या नात्याने मिळालेल्या नैसर्गिक अधिकारांना मानव अधिकार असे म्हणतात. मानव अधिकाराच्या उपस्थिती शिवाय व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होणार नाही. चांगल्या जीवनाची प्राप्ती होणार नाही. युनोच्या स्थापनेनंतर एलिनॉर रुझवेल्ट यांनी मानव म्हणून प्रत्येक व्यक्तीला जागतिक पातळीवर हक्क मिळाले पाहिजे ही मागणी केली. मानवी अधिकारांची एक विशेष यादी तयार केली. हा प्रयत्न म्हणजे मानव अधिकार घोषणापत्र निर्मितीतील पहिले पाऊल मानले जाते. युनोने मानव अधिकाराचा अभ्यास करण्यासाठी एलिनॉर रूझवेल्ट यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला. या आयोगाच्या शिफारशींची आधारावर 10 डिसेंबर 1948 रोजी मानव अधिकाराचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. फ्रान्समधील कायद्याचे प्राध्यापक आणि न्यायमूर्ती रेने कासिन यांनी मानव अधिकार वैश्विक जाहीरनाम्यातील तीस कलमी मसुदा तयार करण्याचे काम केले. या जाहीरनाम्यात तीस मानवी हक्कांचा समावेश आहे. युनोच्या आमसभेने 10 डिसेंबर 1950 रोजी मान्यता दिली. आम सभेतील अठ्ठावन्न राष्ट्रांच्या प्रतिनिधीने एक मुखी मान्यता दिली. 10 डिसेंबर हा दिवस मानव अधिकार दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. युनोने मानव अधिकाराचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला असला तरी तो सदस्य राष्ट्रांवर कायदेशीररीत्या बंधनकारक नव्हता. त्यामुळे युनोने जाहीरनामाच्या आधारावर नागरी आणि राजकीय हक्कासंबंधी वचनामा आणि आर्थिक सामाजिक सांस्कृतिक हक्कासंबंधी वचननामा तयार केला. नागरी आणि राजकीय हक्कासंबंधी वचननाम्याला 1966 मध्ये स्वीकारले आणि 1976 पासून अमलात आणण्याबाबतची मान्यता 160 यांनी दिली. दुसरा वचननामा 1976 ध्ये स्वीकारला आणि 2011 पर्यंत 167 राष्ट्रांनी मान्य केला. या वचननाम्याला  नंतरच्या काळात अतिरिक्त मसुदे जोडण्यात आले. युनोच्या घोषणा पत्रानुसार प्रत्येक राष्ट्राने मानव अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी मानवाधिकार आयोगाची स्थापना करावी त्यासाठी 1978 मध्ये जिनिव्हा येथे एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आणि या कार्यशाळेत वरील ठराव संमत करण्यात आला. पंजाब, जम्मू काश्मीर आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये दहशतवाद आणि हिंसाचाराच्या घटनेमुळे मानवी हक्क उल्लंघनाचे आरोप भारतावर होऊ लागले. भारतातील अल्पसंख्यांक आयोगाने देखील मानव अधिकार आयोगाची स्थापना करण्याची मागणी केली. 1991 च्या निवडणूक जाहीरनाम्यात काँग्रेस पक्षाने मानवाधिकार आयोग स्थापन करण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या काळात सर्व मुख्यमंत्र्यांच्या संमेलनात चर्चा होऊन आयोग स्थापन करण्यास तत्वतः मान्यता दिली गेली. जागतिक पातळीवरील वाढत्या दडपणामुळे 12 ऑक्टोबर 1993 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापन करण्याचा वटहुकूम भारत सरकारने जारी केला. या वटहुकूमानुसार मानव अधिकार आयोग स्थापन करण्यात आला. या वटहुकूमात काही सुधारणा करून संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी प्रदान केल्यानंतर 8 जानेवारी 2014 रोजी राष्ट्रपतींच्या संमतीने नंतर भारतात प्रत्यक्षात अमलात आला.

भारतीय राज्यघटना आणि मानव अधिकार- घटना निर्मितीच्या काळातच जागतिक पातळीवर मानव अधिकार घोषणापत्र निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती. या प्रक्रियेत भारताचा देखील सक्रिय सहभाग होता. मानव अधिकार घोषणा पत्राचे प्रतिबिंब घटनेवर पडलेले दिसते. या घोषणा पत्रातील विविध तरतुदींचा घटनेच्या विविध भागात समावेश केलेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या पुढील भागात मानव अधिकाराचा समावेश आहे.

प्रस्तावना किंवा सरनामा- भारतीय राज्यघटनेचा सरनाम्यात विविध प्रकारचे स्वातंत्र्य, दर्जा संधीची समानता, कायद्यासमोर समानता, धर्मनिरपेक्षता, बंधुता आणि व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकात्मता, सामाजिक, आर्थिक, राजकीय, न्याय इत्यादी संकल्पना मानव अधिकाराशी निगडीत आहेत. भारतीय राज्यघटनेच्या सरनामाच्या माध्यमातून मानव अधिकाराचा समावेश केलेला आहे. सरनामा हा मानवाधिकाराचा मूल स्रोत मानला जातो.

मूलभूत हक्क- भारतीय राज्यघटनेच्या 12 ते 35 कलमांमध्ये समाविष्ट केलेल्या मूलभूत अधिकारात मानवाधिकाराचे अस्तित्व दिसून येते. मानव अधिकार जाहीरनाम्यातील 2 ते21  मा मधील अनेक मा अधिकाराचा मूलभूत अधिकारात समावेश आहे. समतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्य, सांस्कृतिक शैक्षणिक हक्क इत्यादी सर्व अधिकारांमध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश आहे. भारतीय राज्यघटनेने निव्वळ हक्क दिलेले नसून हक्कांच्या संरक्षणाची सोय देखील केलेले आहे. हक्क संरक्षणासाठी व्यक्तीला न्यायला दाद मागता येते.

राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे- मानव अधिकार जागतिक जाहीरनाम्यातील 22 ते 28 लमा मानव अधिकारांचा समावेश 36 ते 51 कलमांमध्ये मार्गदर्शक तत्त्वात केलेला आहे. नागरी आणि राजकीय अधिकार तसेच सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक संविधा मध्ये समाविष्ट अधिकारांचा देखील समावेश मार्गदर्शक तत्त्वांमध्ये केलेला आहे. उदा. स्त्री, पुरुषांना उपजीविकेची समान साधने उपलब्ध करून देणे, बेकारी, वृद्धत्व, जारपणकाळात सरकारी मदत, श्रमिकांना विश्रांतीचा आणि निर्वा वेतनाचा अधिकार, कलम 51 मध्ये आंतरराष्ट्रीय शांततेची संबंधित कलमे

मूलभूत कर्तव्ये- हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या बाजू आहेत. 1976 मध्ये झालेल्या 42 व्या घटनादुरुस्तीने 4 () भागातील 51 () कलमात मूलभूत कर्तव्य यांचा समावेश आहे. या कर्तव्या मानवतावाद, हिंसेचा त्याग, विविधतेचे रक्षण, बंधुभाव वृत्ती, सांस्कृतिक वारशाचे जतन, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला बाधा आणणाऱ्या रुढींचा त्याग इत्यादी तरतुदींच्या माध्यमातून भारत सरकारने मानव अधिकार जाहीरनाम्यातील तत्त्वांना घटने स्थान दिलेले आहे.

घटनात्मक उपाय- भारतीय राज्यघटनेने मानव अधिकाराच्या संरक्षणासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. मूलभूत हक्कातील कलम 32 मध्ये दिलेल्या घटनात्मक उपाययोजनेचा हक्काच्या माध्यमातून एखादी व्यक्ती संस्था किंवा सरकारकडून अधिकारावर आक्रमण झाल्यास सर्वोच्च  न्यायालयात दाद मागता येते. 226 व्या कलमान्वये उच्च न्यायालयात दाद मागता येते. उच्च सर्वोच्च न्यायालय मानवी हक्क संरक्षणासाठी पाच प्रकारचे आदेश काढू शकते. 32 कलम हक्क संरक्षणासाठी असल्याने बाबासाहेब आंबेडकरांनी या कलमाला राज्यघटनेचे प्राण मानले आहे.

वैधानिक उपाय- मानवाधिकाराच्या प्रभावी संरक्षणासाठी केंद्र शासनाने मानवाधिकार संरक्षण अधिनियम 1993 मध्ये संमत केला. या कायद्यानुसार मानव अधिकाराच्या प्रकरणांवर देखरेख करण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य मानव अधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली. या योगाच्या माध्यमातून मानव अधिकार उल्लंघनाच्या तक्रारी स्वीकारून चौकशी करून पीडित व्यक्तींना न्याय उपलब्ध करून दिला जातो.

अशा प्रकारे मानव अधिकाराच्या संरक्षणासाठी आवश्यक तरतुदी भारतीय घटनेत आणि कायद्यात केलेल्या दिसून येतात.


स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके-

Indian Polity - For Civil Services and Other State Examinations | 6th Edition-https://amzn.to/3AkhXPw VASTUNISTH: BHARAT KA ITIHAS; KALA EVAM SANSKRITI (Hindi Edition)-https://amzn.to/3AvC25g सेट/नेट राज्यशास्त्र पेपर-२-https://amzn.to/3CmgIkJ Samanya Budhi Avum Tarkshakti Parikshan-https://amzn.to/37yNIb0 Ksagar Sampurna Rajyashastra संपूर्ण राज्यशास्त्र-https://amzn.to/3AnWmFA विसाव्या शतकातील राजकीय विचारप्रवाह https://amzn.to/36LU5rh आधुनिक राजकीय विचारप्रणाली- https://amzn.to/3xpwU0R भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था पुस्तक link https://amzn.to/3iwtpjt https://amzn.to/3kMDY4U आधुनिक राजकीय सिद्धांत पुस्तक https://amzn.to/3BLcdQm महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय चळवळी आणि महाराष्ट्र प्रशासन Redmi Note 10 (Aqua Green, 4GB RAM, 64GB Storage) -Amoled Dot Display | 48MP Sony Sensor IMX582 | Snapdragon 678 Processor link- https://amzn.to/3xpahtm Canon EOS 1500D 24.1 Digital SLR Camera (Black) with EF S18-55 is II Lens-https://amzn.to/3AfUkax https://amzn.to/3iG9wXl-(boya Mic for good voice Quality for lecture and video) https://amzn.to/3y3Qr7Z (Adjustable Tripod and Stand ) https://amzn.to/36ZtgQy (Sony Camera) https://amzn.to/2UGoDbB (Dell MS116 1000DPI USB Wired Optical Mouse) Redmi note 10 amazon link-https://amzn.to/3y3e8gU

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.