भारत आणि पाकिस्तानच्या स्वातंत्र्याबद्दल काही रोचक गोष्टी-
सर्वात प्रथम पाकिस्तानच्या स्वातंत्र्याबद्दलच्या गोष्टी जाणून घेऊ. पाकिस्तानला 14 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य का देण्यात आले याबद्दल असे सांगितले जाते की, '14 ऑगस्ट हा दिवस पवित्र रमजान महिन्यातील पवित्र व शुद्ध असा 27 वा दिवस होता.' मुस्लिम कॅलेंडर नुसार महिन्याच्या शेवटचा दिवस म्हणजे अलविदा जुम्मा होता. म्हणून या पवित्र दिवशी पाकिस्तानला स्वातंत्र्य देण्यात आले परंतु या मतांमध्ये फारसे तथ्य नाही. कारण मुस्लिम कॅलेंडर नुसार 14 ऑगस्ट हा रमजान महिन्यातील शेवटचा म्हणजे 27 वा दिवस नसून 26 वा दिवस होता. 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने संमत केलेल्या भारत स्वातंत्र्य कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 पासून भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश अस्तित्वात येतील असा उल्लेख आहे. तसेच जुलै 1948 मध्ये पाकिस्तान सरकारने विशेष टपाल तिकीट प्रकाशित केले. त्या तिकिटावर पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन म्हणून 15 ऑगस्ट 1947 असल्याची नोंद आहे.
काही अभ्यासकांच्या मते, 'भारताचे शेवटचे
गव्हर्नर लॉर्ड माउंटबॅटन यांना दोन्ही देशांच्या स्वातंत्र्यदिनी हजर राहणे शक्य नव्हते म्हणून ते 13 ऑगस्ट 1947 ला कराचीला
गेले. 14 ऑगस्ट 1947 च्या सकाळी पाकिस्तानच्या संविधान सभेत भाषण दिले मात्र या भाषणात
पाकिस्तान 15 ऑगस्ट पासून स्वतंत्र होईल असे घोषित केले आणि पाकिस्तानच्या वर्तमानपत्रांनी
देखील 15 ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्याबद्दल बातम्या दिल्या. 14 ऑगस्ट सायंकाळी लॉर्ड
माऊंटबॅटन दिल्लीला आले आणि मध्यरात्री संपन्न झालेल्या भारत स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. 29 जुलै
1948 रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या बैठकीत
14 ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला. पाकिस्तानचे
राष्ट्रपिता बॅरिस्टर महंमद अली जीना यांनी 14 ऑगस्ट 1947 रोजी सार्वभौम पाकिस्तानचे
राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्यामुळे हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो
असे पाकिस्तानचे अनेक अभ्यासक मानतात.
भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस 15 ऑगस्ट का निवडण्यात
आला याबद्दल देखील अनेक मते आहेत. 20 फेब्रुवारी 1947 मध्ये ब्रिटिश पंतप्रधान लॉर्ड
ऍटली यांनी आणि ब्रिटिश संसदेने 30 जून 1948 पर्यंत भारतीयांकडे सत्तेचे हस्तांतरण
केले जाईल असे घोषित केले होते. हे हस्तांतरण योग्य पद्धतीने पार पडण्यासाठी शेवटचे
गव्हर्नर म्हणून लॉर्ड माउंटबॅटन यांची नेमणूक केली होती. 15 ऑगस्ट ही तारीख निवडण्यात
त्यांचा फार मोठा वाटा आहे. काही अभ्यासकांच्या मते, "त्यांनी
ही तारीख सी. राजगोपालाचारी यांच्या सल्ल्याने निवडली होती." राजगोपालाचारी यांच्या मते,
"30 जून 1948 पर्यंत भारताला स्वातंत्र्य दिले नाही तर सत्ता हस्तांतरण करण्याचा
अधिकार ब्रिटिशांना राहणार नाही." या तांत्रिक अडचणींचा विचार करून लवकरच स्वातंत्र्याची तारीख निश्चित करण्यात आली असे काही लोक मानतात.
'फ्रीडम एट मिडनाइट' या पुस्तकात लेरी कॉलिंग आणि लेपियर डॉमिनिक असे सांगतात की, "ब्रिटिश
भारत सोडून जातील याबाबतची तारीख निश्चित करण्याचा आग्रह माऊंटबॅटन यांनी ब्रिटीश पंतप्रधानांकडे धरला होता. पंतप्रधानांनी ती जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. भारताला
स्वातंत्र्य देण्यासाठी एखादा दिनांक निश्चित केलेला आहे का अशी विचारणा केली असता
माऊंटबॅटन यांच्या मनात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील तारखांबाबत विचार सुरू होता.
त्यात त्यांनी 15 ऑगस्ट ही तारीख निवडले कारण ही तारीख ब्रिटीशासाठी खास होती. दुसऱ्या महायुद्धात जपानने इंग्रजांचा समोर
शरणागती पत्करली होती. या घटनेला 15 ऑगस्ट 1947 रोजी दोन वर्षे पूर्ण होणार होती. या
ऐतिहासिक दिनी भारताला स्वातंत्र्य द्यावे हा विचार मनात आल्याने ही तारीख निश्चित
करण्यात आली."
काही लोकांच्या मते बॅरिस्टर महंमद अली जिना यांना कॅन्सरचा
आजार होता जर 30 जून 1948 पूर्वी त्यांचा मृत्यू झाला असता तर हिंदुस्थानची फाळणी करण्याच्या
इंग्रजांच्या प्रयत्नाला खीळ बसली असता. या कारणामुळे लवकरात लवकर स्वातंत्र्य
देऊन देशाची फाळणी करण्यात आली अर्थात या मताला फारसा ऐतिहासिक पुरावा उपलब्ध
नाही.
15 ऑगस्टच्या मध्यरात्री का स्वातंत्र्य देण्यात आले याबद्दल असा तर्क सांगितला जातो की, '15 ऑगस्ट हा दिनांक ज्योतिषांच्या मते शुभ नव्हता. ज्योतिषांनी माऊंटबॅटन यांना विविध शुभ दिन सुचवले होते परंतु दिनांकात फेरबदल न करता तोडगा काढण्याचे सुचविण्यात आले. या तोडग्यनुसार मध्यरात्री स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली आणि विशिष्ट कालावधीत पंतप्रधान पंडित नेहरू यांचे लाल किल्ल्यावरील भाषण संपवण्यात आले अर्थात या मताला देखील फारसा लेखी पुरावा उपलब्ध नाही.
ज्येष्ठ इतिहासकार बिपिन चंद्रा यांनी 'इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडेंस'
या पुस्तकात असे म्हटले आहे की," ब्रिटिशांना भारतातील धार्मिक प्रश्न सोडविणे दिवसेंदिवस कठीण जाऊ लागले. त्यामुळे भारतातील अनेक लोक त्यांच्यावर टीका करू लागले. वल्लभभाई पटेल यांनी, 'तुम्ही
स्वतः राज्य करत नाही आणि आम्हाला करू देत नाही.' अशी टीका
माऊंटबॅटन यांच्यावर केली होती तसेच अनेक इंग्रज
अधिकारी लवकरात लवकर इंग्लंड मध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. सर्व बाजूने दडपण आल्यानंतर
आणि धार्मिक संघर्षाच्या प्रश्नापासून सुटका करून घेण्यासाठी ठरलेल्या तारखेपेक्षा
आधीच म्हणजे 15 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य देण्यात आले.
अशा पद्धतीने भारत आणि पाकिस्तानच्या स्वातंत्र्याबद्दल
अनेक रोचक कथा आणि मते आहेत. परंतु या सर्व मतांना कागदोपत्री किंवा ऐतिहासिक पुरावा
आहे असे नाही. काही मतांना ऐतिहासिक पुरावा आहे तर काही मते तर्क किंवा ऐकीव माहितीवर
आधारित आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी.
स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके-
Indian Polity - For Civil Services and Other State Examinations | 6th Edition-https://amzn.to/3AkhXPw
VASTUNISTH: BHARAT KA ITIHAS; KALA EVAM SANSKRITI (Hindi Edition)-https://amzn.to/3AvC25g
सेट/नेट राज्यशास्त्र पेपर-२-https://amzn.to/3CmgIkJ
Samanya Budhi Avum Tarkshakti Parikshan-https://amzn.to/37yNIb0
Ksagar Sampurna Rajyashastra संपूर्ण राज्यशास्त्र-https://amzn.to/3AnWmFA
विसाव्या शतकातील राजकीय विचारप्रवाह
आधुनिक राजकीय विचारप्रणाली- https://amzn.to/3xpwU0R
भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था पुस्तक link https://amzn.to/3iwtpjt
https://amzn.to/3kMDY4U आधुनिक राजकीय सिद्धांत पुस्तक https://amzn.to/3BLcdQm महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय चळवळी आणि महाराष्ट्र प्रशासन
Redmi Note 10 (Aqua Green, 4GB RAM, 64GB Storage) -Amoled Dot Display | 48MP Sony Sensor IMX582 | Snapdragon 678 Processor link- https://amzn.to/3xpahtm
Canon EOS 1500D 24.1 Digital SLR Camera (Black) with EF S18-55 is II Lens-https://amzn.to/3AfUkax
https://amzn.to/3iG9wXl-(boya Mic for good voice Quality for lecture and video)
https://amzn.to/3y3Qr7Z (Adjustable Tripod and Stand ) https://amzn.to/36ZtgQy (Sony Camera)
https://amzn.to/2UGoDbB (Dell MS116 1000DPI USB Wired Optical Mouse)
Redmi note 10 amazon link-https://amzn.to/3y3e8gU
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.