https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

मूलभूत हक्कअर्थ,वैशिष्ट्ये-, राज्यघटनेतील मूलभूत हक्क- Fundament Rights


 मूलभूत हक्क- Fundament Rights 

मूलभूत हक्क ही मानवी जीवनाच्या विकासाची गुरुकिल्ली मानली जाते. हक्कांशिवाय व्यक्ती विकासाची कल्पना करता येत नाही म्हणून मानवाने प्राचीन काळापासून राज्य आणि समाजव्यवस्थेशी संघर्ष करून विविध हक्क प्राप्त केलेले आहेत. हक्काचे मानवी जीवनातील स्थान घेऊन प्राध्यापक  लास्की म्हणतात की," कोणत्याही राज्याचा दर्जा ते राज्य आपल्या नागरिकांना किती प्रमाणात हक्क देते यावरून ठरत असते." आधुनिक काळात राज्याची भूमिका हक्‍क देण्यापुरती मर्यादित नसून हक्कांच्या उपभोगायोग्य परिस्थिती निर्माण करणे हे देखील आहे. हक्क उपभोगण्यास योग्य परिस्थिती नसेल तर हक्क ही शोभेची वस्तू ठरेल.

मूलभूत हक्क म्हणजे काय-

प्रा. लास्की यांच्यामते, " हक्क म्हणजे समाज जीवनाच्या अटी की ज्याच्या शिवाय व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही." प्राध्यापक लास्कीच्या व्याख्येवरुन सांगता येते की, हक्कांशिवाय व्यक्तिविकास होऊ शकत नाही. व्यक्ती विकासासाठी आवश्यक परिस्थितीला राज्य आणि समाजाने अधिकृत मान्यता प्रदान करणे म्हणजे हक्क होय.

मूलभूत हक्क विकास-

* जगात सर्वप्रथम 1791 मध्ये अमेरिकन राज्यघटनेत मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आला होता.
* भारतात स्वातंत्र्य चळवळीच्या काळात विविध नेत्यांनी भारतीयांना मूलभूत हक्क देण्याची ब्रिटिशांकडे मागणी केली होती.

* भारतीय घटनेतील मूलभूत हक्कांवर अमेरिका, फ्रान्स, वायमर प्रजासत्ताक, आयर्लंड आणि कॅनडाच्या घटनेचा प्रभाव दिसून येतो.

* भारतीय राज्यघटनेच्या तिसऱ्या प्रकरणातील 12 ते 35 कलमात मूलभूत अधिकारांचा समावेश आहे. मूळ राज्यघटनेत सात मूलभूत हक्कांचा समावेश होता. 44 व्या घटनादुरुस्तीने मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कातून वगळल्यामुळे सध्या सहा मूलभूत अधिकार आहेत.
मुलभूत हक्काची वैशिष्ट्ये-

विस्तृत नोंद-भारतीय घटनाकारांनी मूलभूत हक्कांची अत्यंत सविस्तरपणे नोंद घेतलेली आहे. घटनेतील 24 कलमे हक्कांशी संबंधित आहेत.

सकारात्मक आणि नकारात्मक हक्क-घटनेत सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही प्रकारांच्या हक्कांचा समावेश आहे.  भाषण स्वातंत्र्य हे सकारात्मक हक्काचे उदाहरण आहे तर धर्म, लिंग, जन्मस्थान इत्यादींच्या  आधारांवर भेदभाव करता येणार नाही ही राज्याच्या अधिकारावर मर्यादा नकारात्मक हक्कातून  लादलेली आहे.

न्यायालयाचे संरक्षण-घटनेत समाविष्ट हक्क न्यायप्रविष्ट आहेत. घटनेच्या 32 व्या कलमानुसार हक्कांना न्यायालयीन संरक्षण प्रदान केलेले आहे. हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालय 32 व्या कलमानुसार आणि उच्च न्यायालय 226 व्या कलमानुसार पाच प्रकारचे आदेश निर्गमित करू शकते.उदा. बंदीप्रत्यक्षीकरण, परमादेश, अधिकारपृच्छा इत्यादी.
हक्कांवर मर्यादा-भारतीय घटनेने प्रदान केलेले हक्क अमर्याद स्वरूपाचे नाहीत. अधिकारावर अनेक मर्यादा लादलेले आहेत.संसदेला विशिष्ट परिस्थितीत हक्कांवर मर्यादा लादता येतात.
हक्क बंधनकारक- भारतीय घटनेतील समाविष्ट हक्क भारतातील सर्व व्यक्ती, संस्था आणि शासनावर देखील बंधनकारक आहेत.
आणीबाणीच्या काळात  स्थगित-आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित होतात.

भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क- भारतीय राज्यघटनेच्या तिसऱ्या प्रकरणातील 12 ते 35 कलमात मूलभूत अधिकारांचा समावेश आहे.
समतेचा अधिकार
-घटनेच्या 14 ते 18 कलमात समतेच्या अधिकाराचा समावेश केलेला आहे. समतेच्या अधिकारात कायद्यासमोर समानता, कायद्याचे समान संरक्षण, भेदभावाचा अभाव, सार्वजनिक सेवेत समान संधी,  मागासलेल्या वर्गांसाठी विशेष सवलती, अस्पृश्यता निवारण आणि कृत्रिम भेदभाव निर्माण करणाऱ्या पदव्यांचे समाप्तीकरण इत्यादी संकल्पनांचा समावेश आहे.
स्वातंत्र्याचा अधिकार- 19 ते 22 कलमात स्वातंत्र्याच्या  अधिकाराचा समावेश आहे. 19 व्या कलमात भाषण व मतप्रदर्शन स्वातंत्र्य, निशस्त्रपणे सभा भरविणे, संघटन व संचार स्वातंत्र्य, वास्तव्य स्वातंत्र्य आणि व्यवसाय स्वातंत्र्याचा समावेश आहे. वीस ते बावीस कलमात व्यक्ती स्वातंत्र्याची हमी देण्यासाठी जीविताचा हक्क आणि अटक स्वातंत्र्य दिलेले आहे.
शोषणाविरुद्धचा हक्क-घटनेच्या 23 आणि 24 व्या कलमात शोषणाविरुद्धच्या अधिकारांचा समावेश आहे. 23 व्या कलमानुसार वेठबिगारी आणि देवदासी सारख्या  अमानुष रुढया घटनाबाह्य मानण्यात आल्या. 24 व्या कलमानुसार 14 वर्षाच्या आतील लहान मुलांकडून शारीरिक श्रम करून घेण्यास बंदी लादण्यात आली. सरकार सार्वजनिक हितासाठी कोणताही भेदभाव न करता नागरिकांवर सक्ती करू शकतो. उदाहरणार्थ युद्धकाळात सक्तीने लष्कर भरती
धार्मिक स्वातंत्र्य- 25 ते 28 कलमात धार्मिक स्वातंत्र्याचा समावेश आहे. पूजाअर्चा करण्याचा अधिकार,  धर्मांतर स्वातंत्र्य, धार्मिक काळासाठी देणगी गोळा करण्याचा आणि संस्था स्थापन  करण्याचा अधिकार तसेच धार्मिक शिक्षणाची सक्ती केली जाणार नाही. सामाजिक सुधारणांच्या हेतूने धार्मिक आचरणावर प्रतिबंध लादण्याचा वा धर्मात हस्तक्षेप करण्याचा अधिकार शासनाला असेल.

सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क-29 आणि 30 कलमात सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकाराचा समावेश आहे. या हक्कानुसार प्रत्येक नागरिकाला आपली भाषा,लिपी व संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे. भाषिक व धार्मिक अल्पसंख्यांक आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी शैक्षणिक संस्था स्थापन करू शकतात. या संस्थांना मदत करताना सरकार भेदभाव करणार नाही.
घटनात्मक उपाययोजनेचा हक्क-घटनेच्या 32 व्या कलमानुसार मूलभूत हक्कांना न्यायालयीन संरक्षण दिलेले आहे. हक्कांच्या संरक्षणासाठी व्यक्ती न्यायालयात दाद मागू शकते. 32 वे कलम त्यांना संरक्षण देत असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर सांगतात की, 32 वे कलम भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे. हक्क संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालय 32 व्या कलमानुसार आणि उच्च न्यायालय 226 व्या कलमानुसार 

  • बंदीप्रत्यक्षीकरण- बेकायदेशीर अटक  
  • परमादेश- अन्याय निवारण 
  • अधिकारपुच्छा- अयोग्य व्यक्ती सार्वजनिक पदावर बसण्यास मनाई 
  • प्रतिषेध-  खटल्याचे कामकाज स्थगित करणे
  • उत्प्रेषण- वरच्या न्यायालयात खटला वर्ग करणे 
  • इत्यादी पाच प्रकारचे आदेश काढू शकते.

अशाप्रकारे भारतीय घटनाकारांनी व्यक्तिस्वातंत्र्याच्या  संरक्षणासाठी मूलभूत अधिकार बहाल केलेले आहेत. कारण अधिकारा शिवाय व्यक्ती स्वातंत्र्याची कल्पना प्रत्यक्षात येणे शक्य नसल्याने घटनेत हक्कांचा समावेश करणे आवश्यक बनले होते.



स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके-

Indian Polity - For Civil Services and Other State Examinations | 6th Edition-https://amzn.to/3AkhXPw

VASTUNISTH: BHARAT KA ITIHAS; KALA EVAM SANSKRITI (Hindi Edition)-https://amzn.to/3AvC25g

सेट/नेट राज्यशास्त्र पेपर-२-https://amzn.to/3CmgIkJ 

Samanya Budhi Avum Tarkshakti Parikshan-https://amzn.to/37yNIb0

Ksagar Sampurna Rajyashastra संपूर्ण राज्यशास्त्र-https://amzn.to/3AnWmFA 

विसाव्या शतकातील राजकीय विचारप्रवाह

https://amzn.to/36LU5rh

आधुनिक राजकीय विचारप्रणाली- https://amzn.to/3xpwU0R

भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था पुस्तक link https://amzn.to/3iwtpjt

https://amzn.to/3kMDY4U आधुनिक राजकीय सिद्धांत पुस्तक https://amzn.to/3BLcdQm महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय चळवळी आणि महाराष्ट्र प्रशासन

Redmi Note 10 (Aqua Green, 4GB RAM, 64GB Storage) -Amoled Dot Display | 48MP Sony Sensor IMX582 | Snapdragon 678 Processor link- https://amzn.to/3xpahtm

Canon EOS 1500D 24.1 Digital SLR Camera (Black) with EF S18-55 is II Lens-https://amzn.to/3AfUkax

https://amzn.to/3iG9wXl-(boya Mic for good voice Quality for lecture and video)

https://amzn.to/3y3Qr7Z (Adjustable Tripod and Stand ) https://amzn.to/36ZtgQy (Sony Camera)

https://amzn.to/2UGoDbB (Dell MS116 1000DPI USB Wired Optical Mouse)

 Redmi note 10 amazon link-https://amzn.to/3y3e8gU 

1 टिप्पणी:

If you have any donuts. Lets me Know.