https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

मूलभूत कर्तव्य- अर्थ, स्वरूप, घटनेतील तरतुदी, मूल्यमापन आणि आवश्यकता Fundamental Duties


 मूलभूत कर्तव्य- अर्थ, स्वरूप, घटनेतील तरतुदीमूल्यमापन आणि आवश्यकता Fundamental Duties

     हक्क आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना नसेल तर हक्कांचा उपभोग घेता येणार नाही. कर्तव्य विना अधिकार म्हणजे अराजकता होय तर अधिकारविना कर्तव्य म्हणजे गुलामगिरी ठरेल. त्यामुळे घटनेत हक्क आणि कर्तव्य दोन्हींचा समावेश करणे आवश्यक असते. मूळ राज्यघटनेत कर्तव्यांचा समावेश नव्हता. हक्कांसोबत कर्तव्य गृहीत धरलेली होती. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात लोक कर्तव्य विसरले. वास्तविक रशिया आणि इतर साम्यवादी देशात कर्तव्यांचा राज्यघटनेत समावेश होता. हाच आदर्श लक्षात घेऊन भारत सरकारने सरदार सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीच्या आधारावर 1976 मध्ये 42 वी घटनादुरुस्ती करून ४ अ हा नवा भाग  विभाग निर्माण करून 51 अ कलमात दहा मूलभूत कर्तव्य यांचा समावेश केलेला आहे. 2002 मध्ये झालेल्या ८६ व्या घटना दुरूस्तीनुसार 11 व्या  मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला.

    सामाजिक  स्वास्थ्याच्या संरक्षणासाठी व्यक्ती कडून अपेक्षित केल्या जाणाऱ्या कृतींना कर्तव्य असे म्हणतात.भारतीय राज्यघटनेत सामाजिक, आर्थिक, नैतिक, सार्वजनिक, कायदेशीर आणि राजकीय स्वरूपाच्या कर्तव्यांचा समावेश केलेला आहे. कर्तव्याच्या समावेशनातून उत्तरदायित्व आणि सहकार्याची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे.  भारतीय जनतेत एकता उत्तरदायित्व आणि सहकार्याची वृद्धी करण्यासाठी कर्तव्यांचा घटनेत समावेश करण्यात आला.घटनेत समाविष्ट मूलभूत कर्तव्य पुढील कर्तव्यांचा समावेश आहे.
१. राज्यघटना, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा सन्मान करणे
२. स्वातंत्र्यलढ्यात प्रेरक ठरलेल्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्याचे अनुकरण करणे
३. भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता वृद्धिंगत करून त्यांचे संरक्षण करणे
४. राष्ट्राचे संरक्षण करणे आणि गरजेनुरूप राष्ट्रीय सेवा करण्यास तयार राहणे
५. भारतात वर्ग रहित आणि भेदाभेद रहित बंधुत्वाची भावना तयार करणे आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला बाधा ठरणाऱ्या प्रथा नष्ट करणे
६. आपल्या देशातील एकात्म संस्कृती आणि गौरवशाली परंपरेचे रक्षण करणे
७. जंगले, सरोवरे, नद्या आणि पशुपक्षी इत्यादी नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करणे व सजीव प्राण्यांबद्दल भूतदया दाखवणे
८. शास्त्रीय प्रवृत्ती, मानवतावाद, शोधक बुद्धी आणि सुधारक वृत्तीचा विकास करणे
९. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे व व हिंसाचारापासून दूर राहणे
१०. राष्ट्र सतत प्रगतिशील राहील यासाठी वैयक्तिक आणि सामुदायिक क्षेत्रात कठोर प्रयत्न करणे.

११. 6  ते 14 वयागटातील मुलामुलींना पालकांनी शिक्षणाची संधी दयावी.
कर्तव्याचे मूल्यमापन –

1.अपुरी यादी-मूळ राज्यघटनेत कर्तव्यांचा समावेश नव्हता परंतु नंतरच्या काळात दुरुस्ती करून त्यांचा समावेश करण्यात आला. घटनेत समाविष्ट कर्तव्यांची यादी अपुरी आहे. उदा. मतदान, साक्षरता सारख्या महत्वपूर्ण कर्तव्यांचा समावेश नाही.कर्तव्याच्या अंमलबजावणीबाबत स्पष्ट  सूचना दिलेल्या नाहीत.

2.मूलभूत हक्काचा संकोच-मूलभूत कर्तव्याच्या समावेशाने मूलभूत हक्काचा संकोच केला जाऊ शकतो. हक्कांवर प्रतिबंध लादण्यासाठी सरकार कर्तव्यांचा वापर करू शकतो.

३.संदिग्ध वाक्यरचना- कर्तव्यात समाविष्ट केलेल्या अनेक गोष्टी मोघम किंवा संदिग्ध वाटतात. उदा. मानवतावाद, शोधकबुद्धी या शब्दांचा सरकार सोयीनुसार अर्थ लावू शकते. कर्तव्य पालनाच्या क्तीतून सरकारला हुकूमशाही प्रस्थापित करता येईल.

४.कायदेशीर स्वरूप नाही- नागरिकांच्या वर्तणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार सरकारला असताना त्यांनी कर्तव्याचा घटनेत समावेश करून काय साध्य करण्याचा प्रयत्न केला असा प्रश्न अभ्यासकांनी उपस्थित केला.  कर्तव्यांना कायदेशीर संरक्षण नसल्यामुळे त्याच्या पालनाबाबत एक प्रकारची अनिश्चितता निर्माण होते.

५.अयोग्य काळात समावेश- कर्तव्यांचा समावेश आणीबाणीच्या काळात केला गेला ही समावेशानाची योग्य वेळ नव्हती. आणीबाणीच्या काळात कर्तव्यांचा समावेश केल्यामुळे राज्यकर्त्यांच्या हेतूबद्दल अनेक अभ्यासकांनी शंका व्यक्त केल्या.  आणीबाणीच्या काळात हक्क स्थगित होतात त्याप्रमाणे कर्तव्य देखील स्थगित होतात याचे उत्तर घटनेत दिलेले नाही.

6.राज्य कर्तव्यांचा समावेश नाही- घटनेत फक्त व्यक्तींच्या कर्तव्याचा उल्लेख आहे परंतु राज्यांच्या कर्तव्यांचा समावेश नाही. कर्तव्य पालनासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी राज्याची आहे. त्यामुळे व्यक्तींच्या कर्तव्यासोबत राज्याच्या कर्तव्यांचा समावेश घटनेत असणे आवश्यक होते.

मूलभूत कर्तव्याची आवश्यकता- मूलभूत कर्तव्यांच्या समावेशाबाबत अभ्यासकांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे क्षेप नोंदवलेले आहेत. कर्तव्यांच्या समावेशाबाबत अभ्यासकांनी अनेक शंका व्यक्त केलेले केलेल्या असल्या तरी हक्कांच्या उपभोगासाठी कर्तव्य आवश्यक असतात म्हणून कर्तव्यांचा समावेश एका अर्थाने हक्कांना संरक्षण देण्यासाठी केलेली एक उपाययोजना आहे.  रशिया, चीन, पोलंड आणि समाजवादी देशांच्या राज्यघटनेत कर्तव्यांचा समावेश आहे. कर्तव्याच्या जोरावर देशात शिस्त निर्माण करता येते. देशाचा वेगाने विकास करता येतो. कर्तव्याच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता, सहकार्य, बंधुभाव आणि शिस्त निर्माण करता येते. कर्तव्याचा हेच महत्त्व लक्षात घेऊन आपल्या देशातील राज्यकर्त्यांनी उशिरा का होईना मूलभूत कर्तव्यांचा समावेश करून घटनेतील एक उणीव कमी केली.



स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके-

Indian Polity - For Civil Services and Other State Examinations | 6th Edition-https://amzn.to/3AkhXPw

VASTUNISTH: BHARAT KA ITIHAS; KALA EVAM SANSKRITI (Hindi Edition)-https://amzn.to/3AvC25g

सेट/नेट राज्यशास्त्र पेपर-२-https://amzn.to/3CmgIkJ 

Samanya Budhi Avum Tarkshakti Parikshan-https://amzn.to/37yNIb0

Ksagar Sampurna Rajyashastra संपूर्ण राज्यशास्त्र-https://amzn.to/3AnWmFA 

विसाव्या शतकातील राजकीय विचारप्रवाह

https://amzn.to/36LU5rh

आधुनिक राजकीय विचारप्रणाली- https://amzn.to/3xpwU0R

भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था पुस्तक link https://amzn.to/3iwtpjt

https://amzn.to/3kMDY4U आधुनिक राजकीय सिद्धांत पुस्तक https://amzn.to/3BLcdQm महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय चळवळी आणि महाराष्ट्र प्रशासन

Redmi Note 10 (Aqua Green, 4GB RAM, 64GB Storage) -Amoled Dot Display | 48MP Sony Sensor IMX582 | Snapdragon 678 Processor link- https://amzn.to/3xpahtm

Canon EOS 1500D 24.1 Digital SLR Camera (Black) with EF S18-55 is II Lens-https://amzn.to/3AfUkax

https://amzn.to/3iG9wXl-(boya Mic for good voice Quality for lecture and video)

https://amzn.to/3y3Qr7Z (Adjustable Tripod and Stand ) https://amzn.to/36ZtgQy (Sony Camera)

https://amzn.to/2UGoDbB (Dell MS116 1000DPI USB Wired Optical Mouse)

 Redmi note 10 amazon link-https://amzn.to/3y3e8gU 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.