https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे- Directive Principles of State


 

राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे- भारतीय घटनेच्या चौथ्या प्रकरणातील 36 ते 51 कलमांमध्ये मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. मूलभूत हक्काच्या माध्यमातून राजकीय लोकशाहीची स्थापना करता येते तर मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक लोकशाहीची स्थापना करता येऊ शकते. घटना तज्ञ ग्रेनव्हिल ऑस्टिन यांच्या मते," भारतीय राज्यघटना सामाजिक दस्तऐवज आहे. घटनेतील बहुसंख्य तरतुदींच्या माध्यमातून सामाजिक क्रांती पूरक वातावरण निर्माण करणे हा आहे. घटनेच्या तिसऱ्या आणि चौथ्या प्रकरणातील मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडते." भविष्यकाळात राज्यकर्ता वर्गाने आपली सत्ता कशी राबवावी याबाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी मार्गदर्शक तत्वांचा घटनेत समावेश करण्यात आला. ही तत्वे पवित्र घोषणा नसून राज्यकर्त्यांनी भविष्यात अंमलात आणावयाच्या कार्यक्रम आहे. या तत्त्वांच्या पाठीमागे कायदेशीर कवच वा न्यायालयीन संरक्षण नसले तरी त्यांच्या अंमलबजावणीने कडे कोणतेही सरकार दुर्लक्ष करू शकत नाही. कारण या तत्त्वाच्या आधारे सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन करता येते. कल्याणकारी राज्याची स्थापना करण्यासाठी आणि कायद्याचा अर्थ लावण्यासाठी ही तत्वे उपयुक्त ठरतात.

मार्गदर्शक तत्वे उगमस्थाने- भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश अचानक झाला नसून त्यांच्या समावेशासाठी अनेक कारणे कारणीभूत आहेत.

आयरिश राज्यघटनेचा प्रभाव-भारतीय घटनाकारांनी आयरिश घटनेतून मार्गदर्शक तत्त्वांची कल्पना घेतलेली आहे.

1935 च्या कायद्याचा प्रभाव- 1935 च्या भारत प्रशासन कायद्यातील गव्हर्नरांना मार्गदर्शन करण्यासाठी जोडलेल्या सूचना पत्रातून काही मार्गदर्शक तत्वे घेतलेले आहेत.

जागतिक समाजवादी विचारांचा प्रभाव- स्वातंत्र्य आंदोलनातील अनेक नेत्यांवर समाजवादी विचारांचा प्रभाव होता. समाजवादी विचारांच्या प्रभावातून काही मार्गदर्शक तत्वांचा समावेश घटनेत केलेला आहे.

मानवी हक्क सनद- घटना तयार होत असताना   युनो मानवी हक्क सनदेबद्दल चर्चा सुरू होती. युनोने जाहीर केलेल्या मानव अधिकार घोषणापत्राचा प्रभाव मार्गदर्शक तत्त्वांवर पडलेला दिसतो

गांधीवादाचा प्रभाव- गांधीवादाच्या प्रभावातून गोहत्या दारूबंदी सारख्या तत्वांचा मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश केला गेला.

घटनेतील मार्गदर्शक तत्वे- 

घटनेच्या 36 ते 51 कलमांमध्ये मार्गदर्शक तत्त्वे क्रमवार दिलेली आहेत. अभ्यासाच्या सोयीसाठी अभ्यासक त्यांचे पुढील पाच प्रकारात वर्गीकरण करतात.
१. आर्थिक तत्वे- घटनेच्या 39, 41, 42, 43 आणि 48 कलमात आर्थिक बाबींशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश आहेत. त्यात स्त्री-पुरूषांना समान वेतन व उपजीविकेची साधने मिळण्याचा अधिकार, उत्पादन साधनांची केंद्रीकरण करणारी अर्थव्यवस्था नसावी, राज्य आपल्या आर्थिक क्षमतेनुसार रोजगार शिक्षण देण्याचा प्रयत्न करेल, बेकारी, वृद्धत्व ,आजारपण यापासून संरक्षणासाठी आर्थिक मदत, काम धंदा व्यवसायबाबत न्याय व माणुसकीचे वातावरण, स्त्रियांना प्रसूतीसाठी सवलत व साहाय्य, शेती व औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना वेतन आणि निर्वाह वेतन आणि आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने शेती व पशुपालन व्यवसायाचे संवर्धन करणे इत्यादी तत्वांचा समावेश आहे.
२. सामाजिक तत्वे- घटनेच्या 45, 46, 47 आणि 49 व्या कलमात सामाजिक तत्वांचा समावेश केला आहे. त्यात 14 वर्षाच्या आतील लहान मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण, अनुसूचित जाती-जमातींच्या विकासासाठी राज्याने प्रयत्न करणे, आहार, राहणीमान सार्वजनिक आरोग्याचा दर्जा सुधारणे तसेच अंमली पदार्थांचा औषधा व्यतिरिक्त वापरावर बंदी लादणे, राष्ट्रीय स्मारके, ऐतिहासिक स्थळे व वास्तूंचे रक्षण करणे इत्यादी तत्वांचा समावेश आहे.
. राजकीय तत्त्वे- 40
, 44 आणि 50 व्या कलमात राजकीय स्वरूपाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश आहे. त्यात प्रत्येक गावात ग्रामपंचायतीची स्थापना, समान नागरी कायदा आणि राजकीय सत्तेचे एकत्रीकरण टाळण्यासाठी कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ एकमेकांपासून स्वतंत्र आदी तत्वांचा समावेश आहे.
४. आंतरराष्ट्रीय तत्वे- घटनेच्या 51 व्या कलमात आंतरराष्ट्रीय तत्त्वांचा समावेश आहे. जागतिक राजकारणात वावरताना भारताने आंतरराष्ट्रीय शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता कायम राखणे, परस्पर सहकार्य, आदर व न्यायाची स्थापना करणे, आंतरराष्ट्रीय कायदे व करारांचा आदर करणे आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे वाद वा संघर्ष परस्पर सामंजस्य वा लवादाद्वारे सोडविण्याचा प्रयत्न करणे इत्यादी तत्त्वांचा समावेश आहे.
५. 42 व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट तत्वे- इंदिरा गांधींच्या काळात झालेल्या 42 व्या घटनादुरुस्तीने पुढील तत्वांचा घटनेत समावेश केला होता. आर्थिक दृष्टिकोनातून मागासलेल्याना कायदेविषयक मोफत सहाय्य, बालकांची निरोगी वाढ व स्वातंत्र्यासाठी आवश्यक संधी व सवलती, कोणत्याही उद्योगात गुंतलेल्या संस्था व संघटनेच्या व्यवस्थापनात कामगारांना प्रतिनिधित्व आणि देशातील वने व वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठी राज्य प्रयत्न करेल इत्यादी तत्वांचा समावेश आहे.
भावी भारताची उभारणी कोणते मूल्य आणि तत्त्वाच्या आधारावर करावी याचे दिशादर्शन करण्यासाठी घटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश केला गेला आहे. मार्गदर्शक तत्त्वे घटनेतील पवित्र तत्वे आहे. न्यायमूर्ती छगला यांच्यामध्ये, "मार्गदर्शक तत्त्वांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली तर भारत हा देश पृथ्वीवरील स्वर्ग ठरेल." न्यायमूर्ती छगलाच्या विधानातून मार्गदर्शक तत्त्वांची महत्त्व लक्षात येते.


 





स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके-

Indian Polity - For Civil Services and Other State Examinations | 6th Edition-https://amzn.to/3AkhXPw

VASTUNISTH: BHARAT KA ITIHAS; KALA EVAM SANSKRITI (Hindi Edition)-https://amzn.to/3AvC25g

सेट/नेट राज्यशास्त्र पेपर-२-https://amzn.to/3CmgIkJ 

Samanya Budhi Avum Tarkshakti Parikshan-https://amzn.to/37yNIb0

Ksagar Sampurna Rajyashastra संपूर्ण राज्यशास्त्र-https://amzn.to/3AnWmFA 

विसाव्या शतकातील राजकीय विचारप्रवाह

https://amzn.to/36LU5rh

आधुनिक राजकीय विचारप्रणाली- https://amzn.to/3xpwU0R

भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था पुस्तक link https://amzn.to/3iwtpjt

https://amzn.to/3kMDY4U आधुनिक राजकीय सिद्धांत पुस्तक https://amzn.to/3BLcdQm महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय चळवळी आणि महाराष्ट्र प्रशासन

Redmi Note 10 (Aqua Green, 4GB RAM, 64GB Storage) -Amoled Dot Display | 48MP Sony Sensor IMX582 | Snapdragon 678 Processor link- https://amzn.to/3xpahtm

Canon EOS 1500D 24.1 Digital SLR Camera (Black) with EF S18-55 is II Lens-https://amzn.to/3AfUkax

https://amzn.to/3iG9wXl-(boya Mic for good voice Quality for lecture and video)

https://amzn.to/3y3Qr7Z (Adjustable Tripod and Stand ) https://amzn.to/36ZtgQy (Sony Camera)

https://amzn.to/2UGoDbB (Dell MS116 1000DPI USB Wired Optical Mouse)

 Redmi note 10 amazon link-https://amzn.to/3y3e8gU 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.