तालिबानी राजवटीचे अफगाणिस्तानआणि जगावरील परिणाम-
तालिबानी सरकारला जागतिक अधिमान्यता आणि मदतीची गरज असल्यामुळे तालिबानी नेते आणि प्रवक्ते पूर्वीच्या तालिबान सरकार सारखे आम्ही सारखे वागणार नाही. महिला सर्वसामान्य नागरिक अल्पसंख्यांक, परदेशी नागरिक यांना त्रास देणार नाही असे आश्वासन देत आहेत. परंतु प्रत्यक्षात ती परिस्थिती भिन्न प्रकारचे आहे. तालिबानचे राज्य आल्याबरोबर ब्युटी पार्लर बंद करण्यात आले. विवाह न झालेल्या महिलांची यादी मागितली जात आहे. बुरखा परिधान करणे बंधनकारक करण्यात आलेले आहेत. महिलांना घराबाहेर एकटे पडण्यावर प्रतिबंध घातला गेला आहे. त्यामुळे तालिबानी राजवट कितीही दावा करत असली तरी आपल्या कट्टरतावादाला सोडलेले दिसून येत नाही. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये आणि इतर देशांनी तालीबानी राजवट स्थापन करण्यात अडथळे आणू नये म्हणून आम्ही बदललो आहोत असा देखावा तालिबानी करत आहेत.
अमेरिका आणि तालिबान- तालिबान राजवट पुन्हा प्रस्थापित होण्यास अमेरिकेची अयोग्य रणनिती कारणीभूत मानली जाते. अमेरिकेने अफगाण सरकारला विश्वासात न घेता गुपचुपपणे तालिबान मधील एका गटाशी बोलणी करून सैन्य माघारीचा
निर्णय घेतला. मुल्ला बरादर सारखा तालिबानी
नेता पडद्याआड
अमेरिकेशी
चर्चा करत होता याचा अर्थ आपले सैन्य माघारी गेल्यानंतर
तालिबानची
सत्ता अफगाणिस्तान
वर येईल असे अमेरिकेने
गृहीत धरलेले होते. कारण अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सैनिक तालिबानी
सैन्याशी
लढाई करण्यात
सक्षम नव्हते हे अमेरिकेच्या लक्षात आले होते. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सैन्यास सामान्य माणसाचा
पाठिंबा
नव्हता. अफगाणिस्तानातील पख्तून आणि पठाण लोकांचे
सैन्यात
अत्यंत कमी प्रमाणात
होते. अल्पसंख्यांक समुदायातील लोकांना
सैन्यात
प्राधान्य
दिले होते. अफगाण सैन्य फारसे प्रशिक्षित
देखील नव्हते. वरील परिस्थिती लक्षात घेऊन अमेरिकेने
अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सैन्याच्या भरोशावर तालिबानशी
लढता येणार नाही हे लक्षात घेऊन तालिबानच्या
विविध गटांशी गुपचूप बोलली सुरू केले होते. त्यामुळेच
अफगाण सैन्यांना
दिल्या जाणाऱ्या
मदतीत प्रचंड प्रमाणात
कपात केली होती. या कपातीमुळे
सैन्याचे अनेक दिवसापासून
पगार देखील झाले नव्हते. अफगाण सैन्याला
वाऱ्यावर
सोडल्यामुळे
त्यांनीं
न लढता शरणागतीचा
मार्ग पत्करला
आणि अफगाणिस्तान
तालिबानच्या
हातात दिला.
तालिबानी राजवटीचे जगावरील परिणाम या घटनेचे जगावर फार व्यापक परिणाम होणार आहेत. तालिबानच्या
विजयामुळे
अफगानिस्तानतील स्त्रिया, लहान मुले, अल्पसंख्यांक यांच्या भवितव्यावर
प्रश्नचिन्ह
निर्माण
झाले आहे. गेल्या वीस वर्षापासून
लोकशाही वातावरणात वाढलेल्या
पिढीला परत मध्ययुगीन विचारांची
जुळवून घ्यावे लागणार आहे. या बदललेल्या
परिस्थितीमुळे त्यांच्या भविष्यात
समोर अंधार निर्माण
झालेला आहे. तालिबानच्या विजयामुळे
फक्त अफगाणिस्तानवर परिणाम झालेला नसून त्यांच्या
शेजारी असणाऱ्या
पश्चिम, मध्य आणि दक्षिण उपखंडातील
देशांमध्ये
भीतीचे वातावरण
निर्माण
झाले आहे. तालिबान
राजवटीमुळे
दहशतवाद्यांना एक नवे आश्रयस्थान
उपलब्ध झालेले आहे. तालिबानचे
सरकार आल्यावर
अनेक दहशतवादी
संघटनांचे
कार्यकर्ते
अफगाणिस्तानात शिरल्याच्या वार्ता येत आहेत. दहशतवादाचा
नायनाट करण्यासाठी
प्रयत्न
करणाऱ्या
देशांना
हा फार मोठा झटका मानला जातो आहे. अमेरिकेसारख्या महासत्तेच्या नाकावर टिच्चून
तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर मिळवलेले
वर्चस्व
उदारमतवाद, मानवी हक्क, लोकशाही
इत्यादींच्या दृष्टीने अत्यंत धोकेदायक
आहे. भविष्यात
तालिबानी
सत्तेची
पायमुळे
बळकट झाल्यास
मूलतत्त्ववादी विचारांना महत्त्व
प्राप्त
होईल.
तालिबानी राजवटीचे भारतावरील परिणाम- अफगाणिस्तानमधील तालिबानची राज्य भारतासाठी चिंतेची
गोष्ट बनलेले आहे. भारताने
अफगाणिस्तानच्या पुनर्निर्माणासाठी
जवळपास तीन अब्ज डॉलरपेक्षा
जास्त पैसा खर्च केलेला आहे. अफगाणिस्तानात पायाभूत सुविधा निर्माण
करण्यासाठी
अनेक प्रकल्पात
भागीदारी
केली होती. अफगाणिस्तानातील भारताच्या उपस्थितीमुळे मध्य आशियाई देशांशी
व्यापार
वाढवण्याची
संधी भारताला
मिळाली होती. तसेच पाकिस्तान
वर नजर ठेवणे भारताला
शक्य होते. परंतु अफगाणिस्तानात सत्ता बदल झाल्यामुळे प्रकल्पात गुंतवलेल्या
भांडवल संरक्षणाची
हमी नष्ट झालेली आहे. अफगाणिस्तानातील सत्ता बदलामुळे भारत आणि अफगाण व्यापारावर परिणाम होणार आहे. अफगाणिस्तानातील उत्पादनासाठी भारत ही फार मोठी बाजारपेठ होता. या व्यापारावर परिणाम झाल्याने सुकामेवाच्या भावात वाढ झाल्याचे दिसते. भारत अनेक वस्तूची निर्यात अफगाणिस्तानाला करत होता.इराण मधील चाबहार बंदर रस्त्यामार्ग अफगाणिस्ताना मधून भारतीय सीमांशी जोडण्याची योजना आणि अफगाणिस्तान मार्ग मध्य युरोपात व्यापार करण्याची भारताच्या योजनावर पाणी फेरले गेले. भारताने अफगाण विकासातील
आपली भूमिका कायम ठेवावी असे आव्हान तालिबानी
प्रवक्त्यांनी केलेले असले तरी त्यांच्या
दाव्यावर
कितपत विश्वास
ठेवावा हा प्रश्न निर्माण
झालेला आहे. तालिबानी
प्रवक्ते यांचे बोलणे वेगळे आणि प्रत्यक्षातली परिस्थिती वेगळी आहे. परिस्थितीतील झालेला बदल लक्षात घेऊन भारत सरकारने
हवाई मार्गाने
आपल्या राजनैतिक
अधिकारी
आणि नागरिकांना
भारतात परत आणण्याची
मोहीम सुरू केलेले आहे.
तालिबानी राजवट आणि जग- तालिबान राजवटीच्या
स्थापनेनंतर
जागतिक राजकारणात
एक वाक्यता
दिसून येत नाही. चीन, पाकिस्तान, रशिया यांनी तालिबानी
राजवटीशी
वाटाघाटी
सुरू केलेल्या आहेत. ब्रिटनने
देखील तालिबानी
राजवटीला
भविष्यात
मान्यता
देण्यासंदर्भात सूचक विधान केले आहे. तालिबान
संदर्भातल्या धरसोड भूमिकेमुळे
भविष्यात
नेमकी कशी रणनीती राहील याबद्दलचा
अंदाज कोणालाही
येत नाही आणि या अनिश्चिततेच्या परिस्थितीचा फायदा घेऊन तालिबानी
आपले आसन बळकट करता आहेत. एका बाजूला आपण बदललो असल्याचा
दावा करतात आणि दुसऱ्या
बाजूला आपल्या मूलतत्ववादी
कार्यक्रम अफगाणिस्तानमध्ये गुपचुपपणे
राबविताना दिसतात. या दुहेरी रणनीतीचा
जगावर फार मोठा परिणाम होणार आहे. या परिणामांचे
वास्तव लक्षात घेऊन तालिबानी
राजवटीवर
दबाव निर्माण
करणे आवश्यक आहे .अन्यथा पूर्वीसारखे
वेळ निघून गेल्यानंतर
केली जाणारी कारवाई अफगाणी भवितव्यावर
आणि जागतिक शांततेवर
प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.