https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

राष्ट्रीय मानव अधिकार आयोग रचना, अधिकार आणि कार्ये Human Right commission composition, power and function


 

राष्ट्रीय मानव अधिकार आयोग रचना, अधिकार आणि कार्ये- मानव अधिकार पत्र जाहीरनामा ची अंमलबजावणी करण्यासाठी नागरी आणि राजकीय हक्काचा करारनामा तयार करण्यात आला. या करारनाम्याची आधारावर 1976 मध्ये जागतिक पातळीवर मानवाधिकार आयोग स्थापन करण्यात आला. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मानव अधिकाराचा प्रचार-प्रसार आणि मानव अधिकार उल्लंघन घटनांवर देखरेख करण्यासाठी राष्ट्रीय मानव अधिकार आयोग स्थापनेचा आग्रह केला. 1990 च्या दशकात जागतिक पातळीवरून आलेल्या दडपणामुळे आणि भारत सरकारने जागतिकीकरणाचा अवलंब केल्यामुळे मानव अधिकार आयोग स्थापन करणे आवश्यक ठरले. भारत सरकारने 1992 मध्ये मानवी हक्क आयोग कायद्याचा मसुदा लोकसभेत सादर केला. हा मसुदा स्थायी समितीकडे विचारार्थ असताना वाढत्या आंतरराष्ट्रीय दडपणामुळे 27 सप्टेंबर 1993 रोजी राष्ट्रीय राज्य मानव हक्क आयोग स्थापन करण्याचा वटहुकूम काढला. या हुकुमानुसार 12 ऑक्टोबर 1993 रोजी राष्ट्रीय मानव अधिकार आयोग स्थापन करण्यात आला. 12 ऑक्टोबर हा भारतात मानव अधिकार आयोग स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. या वटहुकूमाला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी त्यात काही सुधारणा करून संसदेत विधेयक मांडण्यात आले. या विधेयकाला दोन्ही सभागृहांनी मान्यता दिल्यानंतर 8 जानेवारी 1994 रोजी राष्ट्रपतीच्या मान्यतेनंतर मानवी हक्क संरक्षण कायदा प्रत्यक्षात अमलात आला. या कायद्याचा मुख्य उद्देश राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर मानव अधिकार आयोग स्थापन करणे हा होता.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोग रचना- मानवी हक्क संरक्षण कायद्यानुसार मानवधिकार आयोगात एक अध्यक्ष, चार पुर्णवेळ सदस्य आणि चार मानस सदस्य असतात. अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयातील सर न्यायाधीश पदाचा अनुभव असलेला व्यक्ती असला पाहिजे. चार पुर्ण वेळ सदस्यात एक सदस्य सर्वोच्च न्यायालयातील कार्यरत अनुभवी न्यायाधीश किंवा माजी न्यायाधीश तर दुसरा सदस्य उच्च न्यायालयात कार्यरत न्यायाधीश किंवा माजी मुख्य न्यायाधीश आणि उरलेले दोन सदस्य मानव अधिकार क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती असतील. मान सदस्यात राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष यांचा समावेश असेल.

नेमणूक- राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष सदस्यांची नेमणूक राष्ट्रपतीकडून केले जाते. योग्य व्यक्तींची नेमणूक करण्यासाठी राष्ट्रपती पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती नेमतो. या समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. याशिवाय लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री, राज्यसभा अध्यक्ष, लोकसभा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते इत्यादी सदस्य असतात. या समितीने शिफारस केलेल्या व्यक्तींची राष्ट्रपती नेमणूक करतो.

कार्यकाल- अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाल पाच वर्षे इतका असतो. वयाच्या सत्तर वर्षापर्यंत अध्यक्ष सदस्य पदावर कार्यरत राहू शकतात. मुदत संपल्यानंतर पुन्हा नेमणूक केली जाऊ शकते. गैरवर्तन, अकार्यक्षमता, घटना द्रोह इत्यादी कारणावरून राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात. आयोग अध्यक्षाचा दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशासारखा आणि इतर सदस्यांचा सर्वोच्च न्यायालय इतर न्यायाधीशासारखा असतो. त्यांचे वेतन, भत्ते, पदावनती करण्याची पद्धत सर्वोच्च न्यायालया न्यायाधीशासारखी आहे.

सचिवालय- आयोगाचे सचिवालय महासचिवाच्या मार्गदर्शनाखाली कार्य करीत असते. महासचिव भारत सरकारच्या सचिव दर्जाचा अधिकारी असतो. तो आयोगाचा मुख्य कार्यकारीअसतो. आयोगात एक महासचिव, चौकशी विभाग प्रशासकीय विभाग, सूचना आणि संशोधन विभाग हे पाच विभाग कार्यरत आहेत.

राष्ट्रीय मानव अधिकार आयोगअधिकार आणि कार्ये

       पीडित व्यक्ती किंवा तिच्या वतीने मानव अधिकार उल्लंघन विषयक तक्रारीची नोंद घेऊन आवश्यक ती चौकशी करून योग्य ती कारवाई करणे.

       मानव अधिकार उल्लंघनाशी संबंधित न्यायालयात प्रलंबित प्रकरणात न्यायालयाच्या संमतीने मध्यस्थी करणे.

       सरकारी दवाखाने, बाल सुधार गृह आणि आश्रम शाळांना भेटी देऊन तेथे राहणाऱ्या व्यक्तींच्या परिस्थितीची पाहणी करून सरकारला सूचना शिफारशी करणे.

       4. सरकारकडून चालविल्या जाणाऱ्या कारागृहाना भेटी देऊन सरकारला त्यात सुधारणा करण्यासाठी आवश्यक शिफारशी करणे.

        मानव अधिकाराना बाधा आणणाऱ्या घटकांचे दहशतवादी कृत्या सहित परीक्षण करणे आणि योग्य उपाययोजना सुचवणे.

       मानव अधिकाराबद्दल जनतेत जागृरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे.

       मानव अधिकाराबद्दलचे प्रबंध, दस्तऐवज आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अभ्यास करून परिणामकारक अंमलबजावणीसाठी शिफारशी करणे.

       मानव अधिकार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे.

       9. मानव अधिकार कायद्याची परीक्षण करून ते लागू करण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाय सुचविणे.

       मानव अधिकार उल्लंघनाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी दिवाणी न्यायालया प्रमाणे समन्स काढणे, शपथपत्रावर साक्ष घेणे आणि सरकारी कार्यालयाकडून अभिलेख मागणी करणे.

       मानव अधिकार उल्लंघन विषयक खटल्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीच्या विरोधात आवश्यक कार्यवाहीची शिफारस करणे आणि पीडित व्यक्ती किंवा कुटुंबासाठी आवश्यक ते आर्थिक कायदेशीर सहाय्याबाबत शासनाकडे शिफारस करणे.

       दरवर्षी आयोग आपल्या कार्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर करीत असते.

मानवाधिकार संरक्षण अधिनियमानुसार राष्ट्रीय मानव अधिकार आयोग व्यापक अधिकार दिलेले आहेत. राष्टीय आयोगाप्रमाणे राज्य पातळीवर आयोग स्थापन करण्याची तरतूद मानवाधिकार संरक्षण कायद्यात केलेली आहे. भारता 14 राज्यामध्ये राज्य मानव अधिकार आयोग स्थापन झालेले दिसतात. राज्य मानवाधिकार आयोगाची रचना, कार्यकाल, कार्य अधिकार जवळपास राष्ट्रीय आयोगाप्रमाणेच आहे फक्त सदस्य, अध्यक्ष नेमणूक राज्यपालाकडून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या आधारावर केली जाते. अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक करताना उच्च आणि जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश पदाचा अनुभव असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाते.



स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके-

Indian Polity - For Civil Services and Other State Examinations | 6th Edition-https://amzn.to/3AkhXPw VASTUNISTH: BHARAT KA ITIHAS; KALA EVAM SANSKRITI (Hindi Edition)-https://amzn.to/3AvC25g सेट/नेट राज्यशास्त्र पेपर-२-https://amzn.to/3CmgIkJ Samanya Budhi Avum Tarkshakti Parikshan-https://amzn.to/37yNIb0 Ksagar Sampurna Rajyashastra संपूर्ण राज्यशास्त्र-https://amzn.to/3AnWmFA विसाव्या शतकातील राजकीय विचारप्रवाह https://amzn.to/36LU5rh आधुनिक राजकीय विचारप्रणाली- https://amzn.to/3xpwU0R भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था पुस्तक link https://amzn.to/3iwtpjt https://amzn.to/3kMDY4U आधुनिक राजकीय सिद्धांत पुस्तक https://amzn.to/3BLcdQm महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय चळवळी आणि महाराष्ट्र प्रशासन Redmi Note 10 (Aqua Green, 4GB RAM, 64GB Storage) -Amoled Dot Display | 48MP Sony Sensor IMX582 | Snapdragon 678 Processor link- https://amzn.to/3xpahtm Canon EOS 1500D 24.1 Digital SLR Camera (Black) with EF S18-55 is II Lens-https://amzn.to/3AfUkax https://amzn.to/3iG9wXl-(boya Mic for good voice Quality for lecture and video) https://amzn.to/3y3Qr7Z (Adjustable Tripod and Stand ) https://amzn.to/36ZtgQy (Sony Camera) https://amzn.to/2UGoDbB (Dell MS116 1000DPI USB Wired Optical Mouse) Redmi note 10 amazon link-https://amzn.to/3y3e8gU

.

1 टिप्पणी:

If you have any donuts. Lets me Know.