https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

प्रशासकीय कायदा अर्थ, उगमस्थानेम,आवश्यकता आणि महत्त्व-


 

प्रशासकीय कायदा-

कायदेमंडळ,  कार्यकारीमंडळ आणि न्याय मंडळ ही शासनाची प्रमुख तीन अंगे आहेत. या तिन्ही अंगांनी द्वारे वेगवेगळ्या प्रकारची कार्य पार पडली जातात. ही कार्ये योग्य पद्धतीने पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची निर्मिती केलेली असते.

      प्रशासकीय यंत्रणेला कार्य करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कार्य करत असताना अनेक विवाद किंवा संघर्ष देखील निर्माण होत असतात यांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासकीय कायद्याची आवश्यकता असते याच व्यावहारिक गरजेतून विसाव्या शतकात जगातील विविध देशात प्रशासकीय कायद्यांचा विकास झालेला दिसतो.

      कल्याणकारी राज्य संकल्पनेमुळे राज्याचे कार्यक्षेत्र वाढले. राज्याने जनहितासाठी विविध कार्य करण्यास सुरुवात केल्यामुळे प्रशासनाचा विस्तार दिवसेंदिवस वाढू लागला. वाढत्या विस्तारामुळे प्रशासनातील विविध विभाग आणि घटकांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्यासाठी प्रशासकीय कायद्यांची निर्मिती करणे आवश्यक बनले. प्रशासकीय विभागांचे कार्यक्षेत्र आणि अधिकार निश्चित करण्यासाठी प्रशासकीय कायद्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. विसाव्या शतकात प्रशासकीय कायदे कायद्याचे एक अंग किंवा शाखा म्हणून विकसित झाले.

प्रशासकीय कायदा म्हणजे काय-

      प्रा. डायसी यांच्या मते-" प्रशासकीय पदाधिकाऱ्यांची वैधानिक स्थिती आणि उत्तरदायित्व निश्चित करणारे, प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिक यांच्यातील परस्पर संबंध आणि उत्तरदायित्वास संदर्भातील नियमांना प्रशासकीय कायदा असे म्हणतात."

      आयवर जेनिग्स यांच्या मते- "प्रशासकीय कायदा प्रशासनाशी संबंधित कायदा असतो. त्यात प्रशासकीय यंत्रणेचे संघटन, अधिकार आणि कर्तव्यांचा समावेश असतो."

      वेड- यांच्या मते "प्रशासकीय कायदा प्रशासकीय यंत्रणेच्या नियंत्रणाची संबंधित कायदा असतो."

      वरील परीभाषेवरून असे लक्षात येते की, प्रशासकीय विभाग आणि महामंडळांचे स्वरूप, अधिकार आणि त्यातील सेवक वर्गाशी संबंधित नियमांचा समावेश प्रशासकीय कायद्यात होत असतो थोडक्यात असे सांगता येईल की, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे संघटन, त्यांच्या वरील नियंत्रण आणि त्यांचे नागरिकांची असलेले संबंध प्रशासकीय कायद्याद्वारे निश्चित केले जातात. प्रशासकीय कायदा प्रशासकीय अधिकाऱ्यांचे उत्तरदायित्व निश्चित करत असतो.

प्रशासकीय कायद्यांची उगमस्थाने-

      संविधान,

      कायदे मंडळाने केलेले कायदे,

      न्यायालयाने दिलेले निकाल,

       रूढी, प्रथा, आणि परंपरा

      करार आणि सनदा,

      सरकारी आदेश आणि आज्ञा,

      प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेले परिनियम,

      शासनाने काढलेल्या अध्यादेश इत्यादींतून प्रशासकीय कायदे निर्माण होत असतात.

प्रशासकीय कायदा आणि घटनात्मक कायदे-

      प्रशासकीय कायदे घटनात्मक कायद्यापेक्षा भिन्न असतात. घटनात्मक कायदे वैयक्तिक अधिकारावर भर देतात तर प्रशासकीय कायदे लोकहिताला महत्त्व देतात. घटनात्मक कायद्याच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणेची यंत्रणा निश्चित केले जात असते तर प्रशासकीय कायद्याच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणेचे उत्तरदायित्व, कर्तव्य आणि काम करण्याच्या पद्धती निश्चित केल्या जात असतात. संविधानिक कायदे संसदेकडून निर्माण केले जातात तर प्रशासकीय कायदे प्रशासकीय विभागांकडून निर्माण केले जातात.

प्रशासकीय कायद्याची आवश्यकता-

      प्रशासनातील विविध घटकात समन्वय साधण्यासाठी प्रशासकीय कायदा उपयुक्त असतो.

      प्रशासकीय कायद्याद्वारे प्रशासकीय यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कार्यक्षेत्र आणि अधिकार निश्चित केले जातात.

      संसद आणि विधिमंडळात ने केलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय यंत्रणेला प्रशासकीय कायद्याच्या आधारे नियम  उपनियम निश्चित करता येतात.

      कायद्यची अंमलबजावणी करण्यासाठी आणि परिस्थितीनुरूप निर्णय घेण्यासाठी प्रशासकीय कायदे फायदेशीर असतात.

      प्रशासकीय कार्यात सुलभता, कार्यक्षमता आणण्यासाठी देखील प्रशासकीय कायदे उपयुक्त असतात.

      प्रशासकीय कायद्याद्वारे प्रशासकीय अधिकाऱ्यांची उत्तरदायित्व कायद्याद्वारे निश्चित करता येते.

      प्रशासनातील वाढती गुंतागुंत आणि तांत्रिकतेचीसोडवणूक करण्यासाठी प्रशासकीय कायद्यांची गरज असते.

      सरकारी विभाग विभागातील आणि विभागांतर्गत संबंध निश्चित करण्यासाठी प्रशासकीय कायदे आवश्यक असतात.

      प्रशासकीय कायद्याद्वारे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हक्काने कर्तव्य निश्चित केले जातात. शासकीय अधिकारी आणि नागरिक यांच्यातील संबंधांचे स्वरूप निश्चित करता येते. प्रशासकीय अधिकारी आणि नागरिक यांची कर्तव्य देखील लिखित केली जातात.

प्रशासकीय कायदा महत्त्व-

      प्रशासकीय कायद्याचे वाढते महत्त्वामुळे ते आधुनिक प्रशासनाचे अंग बनत चालले आहे. प्रशासकीय कायद्यांचा विस्तार देखील प्रचंड वाढत चाललेला आहे. प्रशासकीय कायद्याशी संबंधित खटले सामान्य न्यायालयात दाखल करता विशेष अशा स्थापन केलेल्या प्रशासकीय न्यायालयात चालवले जातात. प्रशासकीय न्यायालयात कायद्यापेक्षा लोकहिताला जास्त महत्व असते.



 स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके-

Indian Polity - For Civil Services and Other State Examinations | 6th Edition-https://amzn.to/3AkhXPw VASTUNISTH: BHARAT KA ITIHAS; KALA EVAM SANSKRITI (Hindi Edition)-https://amzn.to/3AvC25g सेट/नेट राज्यशास्त्र पेपर-२-https://amzn.to/3CmgIkJ Samanya Budhi Avum Tarkshakti Parikshan-https://amzn.to/37yNIb0 Ksagar Sampurna Rajyashastra संपूर्ण राज्यशास्त्र-https://amzn.to/3AnWmFA विसाव्या शतकातील राजकीय विचारप्रवाह https://amzn.to/36LU5rh आधुनिक राजकीय विचारप्रणाली- https://amzn.to/3xpwU0R भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था पुस्तक link https://amzn.to/3iwtpjt https://amzn.to/3kMDY4U आधुनिक राजकीय सिद्धांत पुस्तक https://amzn.to/3BLcdQm महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय चळवळी आणि महाराष्ट्र प्रशासन Redmi Note 10 (Aqua Green, 4GB RAM, 64GB Storage) -Amoled Dot Display | 48MP Sony Sensor IMX582 | Snapdragon 678 Processor link- https://amzn.to/3xpahtm Canon EOS 1500D 24.1 Digital SLR Camera (Black) with EF S18-55 is II Lens-https://amzn.to/3AfUkax https://amzn.to/3iG9wXl-(boya Mic for good voice Quality for lecture and video) https://amzn.to/3y3Qr7Z (Adjustable Tripod and Stand ) https://amzn.to/36ZtgQy (Sony Camera) https://amzn.to/2UGoDbB (Dell MS116 1000DPI USB Wired Optical Mouse) Redmi note 10 amazon link-https://amzn.to/3y3e8gU

. Use Product video making- 

Mic: https://amzn.to/39WbfUO Tripod: https://amzn.to/2OKuBlF Camera: https://amzn.to/3uQFswU Laptop: https://amzn.to/3tieMEP Ring Light: https://amzn.to/32bpfGh Web Hosting Link: https://www.hostinger.in/vedant My Influencer Page:- https://goo.gl/8Tf2ya

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.