https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

संशोधन प्रबंध लेखन पद्धत किंवा संशोधन प्रबंध कसा लिहावा How to right Research Dissertation


 

संशोधन प्रबंध लेखन पद्धत किंवा संशोधन प्रबंध कसा लिहावा -

प्रबंध हा मूळ संशोधनावर आधारित शैक्षणिक लेखनाचा एक प्रकार असतो. तो साधारणत: पदवी प्राप्त करण्यासाठी एखाद्या संशोधन संस्थेला किंवा विद्यापीठाला सादर केला जातो. त्यामुळे प्रबंधाचे स्वरूप सर्वसाधारण लेखनापेक्षा वेगळे असते. संशोधन प्रबंध लेखनाबाबत विविध संशोधन संस्था आणि विद्यापीठांचे वेगवेगळे नियम आहेत. उदा. कागदाचा वापर, ओळीतील अंतर, संदर्भ सूचीचा वापर संशोधन प्रबंधाची रचना क्षेत्रानुसार वेगवेगळे असते. सामाजिकशास्त्रातील प्रबंध दीर्घ स्वरूपाचे असतात. प्रबंधाचे साधारणत: तीन भागात विभाजन केले जात असते.

प्राथमिक विभाग Primary Section-

v प्राथमिक विभागाचे अनेक उपविभागात  विभाजन केलेले असते.

v  शीर्षक पृष्ठ- (Title  Page) प्रबंधाच्या मुखपृष्ठावर संशोधनाबद्दलची प्राथमिक माहिती दिलेली असते. संशोधन समस्येचे शीर्षक, मार्गदर्शक आणि संशोधकाचे नाव, संशोधन संस्थेचे नाव, संशोधन प्रस्तूत करण्याची तारीख आणि वर्ष इत्यादी माहिती दिलेली असते.

v  प्रमाणपत्रे ऋणनिर्देश- (Acknowledgement) शीर्षक  पृष्ठानंतर प्रमाणपत्रे असतात.  सर्वप्रथम संशोधकाचे प्रतिज्ञापत्र असते. त्यात मूळ संशोधन साधने वापरून हा प्रबंध तयार केलेला आहे आणि कुठे ही  प्रकाशित केलेला नाही ते नमूद करावे लागते. त्यानंतर मार्गदर्शकाचे प्रमाणपत्र असते त्यात संशोधन संस्थेच्या विद्यापीठाच्या नियमानुसार संशोधन केलेले आहे असे मार्गदर्शक प्रमाणित करत असतो. ऋणनिर्देश पत्रात प्रबंध लेखनासाठी मदत करणाऱ्या संस्था मित्र, नातेवाईक, मार्गदर्शक इत्यादींचे आभार आणि धन्यवाद व्यक्त केलेले असतात.

v गोषवारा- (Abstract) प्रबंधाचा अत्यंत थोडक्यात म्हणजे 150 ते 300 शब्दात  गोषवारा लिहिला जातो. त्यात संशोधन विषय, उद्दिष्टे, गृहितके, संशोधनात वापरलेल्या पद्धती, मुख्य परिणामांचा सारांश, निष्कर्ष थोडक्यात मांडलेले असतात.

v अनुक्रमणिका- (Table of Contents) अनुक्रमणिका ही प्रबंधाची एक प्रकारे जंत्री किंवा सारणी असते. अनुक्रमणिकेत प्रबंधात समाविष्ट प्रकरणे, आलेख, तक्ते. नकाशे, संदर्भसूची आणि परिशिष्टे कोणत्या   पृष्ठ क्रमांकावर याबाबतची माहिती दिलेली असते.

v सामग्री सारणी- (List of Figures and Tables) सामग्री सारणीत प्रबंधात समाविष्ट आकृत्या, सारणी, नकाशे आलेख इत्यादींची वर्णक्रमानुसार आणि पृष्ठक्रमांकानुसार यादी दिलेली असते जेणेकरून वाचकाला संबंधित  माहितीचा शोध घेता येईल.

v  संक्षेपांची यादी किंवा शब्दावली- (List of Abbreviations) प्रबंधात वापरलेल्या  संज्ञा किंवा संकल्पना वाचकांना परिचित  नसतील तर वर्णक्रमानुसार संक्षेपांची यादी देणे योग्य असते. या यादीत संकल्पनेचे वर्णन किंवा अर्थ किंवा व्याख्या संक्षिप्त स्वरूपात दिलेली असते.

v  अशा प्रकारे प्राथमिक विभागात शीर्षका पासून ते शब्दावली पर्यंतच्या गोष्टींचा समावेश असतो. प्राथमिक विभाग हा परिचयात्मक स्वरूपाचा असतो.

v मुख्य विभाग Main Section-

v प्रबंधातील सर्वात महत्वपूर्ण भाग म्हणजे मुख्य विभाग होय.  संशोधनाबद्दलच्या महत्वपूर्ण माहितीचा समावेश या विभागात केलेला असतो. मुख्य विभागाचे चार भागात विभाजन केले जाते.

v  प्रस्तावना- (Introduction) प्रस्तावनेत प्रबंधासाठी निवडलेल्या विषयाबद्दल माहिती दिलेली असते. कोणत्या ज्ञानशाखेतील विषय आहे हे देखील नमूद केले जाते. प्रबंधाचा थोडक्यात परिचय होईल या उद्देशाने प्रस्तावना लिहिली जाते. प्रस्तावनेत प्रबंध रचनेचा धावता आढावा घेतलेला असतो तसेच संशोधन समस्येची ओळख करून दिली जाते. प्रबंधात कोणकोणत्या घटनेचे अध्ययन केले जाईल.  संशोधन समस्येचे महत्व, संशोधनाच्या मर्यादा आणि परीक्षणासाठी निवडलेल्या गृहीत कृत्याच्या परीक्षेला बद्दल स्पष्टीकरण  दिलेले असते

v संशोधन साहित्य समीक्षा आणि सैद्धांतिक चौकट-(Literature Review& Theoretical Framework) संशोधन सुरू करण्यापूर्वी आपल्या प्रबंधाची संबंधित विषयासंदर्भात आधीपासून अस्तित्वात असलेल्या साहित्याचे पुनरावलोकन केले जाते. संशोधन संदर्भातील उपलब्ध पुस्तके, संशोधन लेख, प्रबंध इत्यादी  स्रोतांचे विश्लेषण आणि मूल्यांकन करून आपले संशोधन कसे नाविन्यपूर्ण आणि संशोधन खंड भरणारे आहे हे स्पष्ट करावे लागते. संशोधन साहित्याचे पुनरावलोकन प्रबंधाची सैद्धांतिक चौकट विकसित करण्यास हातभार लावत असते. सैद्धांतिक चौकटीत मुख्य संकल्पना आणि सिद्धांत परिभाषेत वा विश्लेषित केल्या जातात. प्रबंधातील संकल्पना आणि चल यातील संबंधांचे विश्लेषण केले जाते.

v संशोधन पद्धती- (Research Methodology)यात संशोधनासाठी वापरलेल्या पद्धतींचे विश्लेषण केलेले असते. संशोधनासाठी आवश्यक सामग्री प्राप्तीचे मार्ग आणि सामग्री स्रोतांची माहिती दिलेली असते. माहिती मिळवण्यासाठी वापरलेल्या पद्धती आणि माहितीची विश्वसनीयता पडताळा करणाऱ्या पद्धतींचा उल्लेख केलेला असतो. तथ्य संकलनाच्या पद्धतींची माहिती दिलेली असते. उदा. प्रश्नावली, मुलाखत,  नमुना निवडीचे तंत्र, नमुन्याचा  आकार आणि नमुना निवड पद्धतीची माहिती दिली जाते.  तथ्य विश्लेषण करण्यासाठी वापरलेल्या पद्धती नमूद कराव्या लागतात उदा. सांख्यिकी पद्धती तथ्य संकलित केल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्याचे विश्लेषण केले जाते.संशोधनासाठी वापरलेल्या साधने आणि साहित्याची माहिती द्यावी लागते. उदा. संगणक कार्यक्रम, प्रयोगशाळा उपकरणे संशोधनातील अडथळे आणि त्यावरील उपाय योजना नमूद केल्या जातात. प्रबंधात वापरलेल्या संशोधन पद्धतीचे मूल्यांकन आणि औचित्य नमूद केले जाते.

v सामग्री विश्लेषण आणि निर्वचन- (Data Analysis & Interpretation)  तथ्यांचे विश्लेषण करून काढलेल्या परिणामाच्या  उपयोगितेबद्दल प्रबंधात चर्चा केली जाते. तथ्यांचे गुणात्मक आधारावर वर्गीकरण करून परस्परांशी तुलना करून समग्राचे स्थान वर्ग निश्चित केले जातात.  विश्लेषित केलेली   माहिती सर्वांना समजेल अशा भाषेत मांडण्यासाठी आकडेवारी, सारणी, आलेख आणि तक्त्यात प्रस्तुत केले जाते. संशोधक हाती आलेल्या निष्कर्षांची वेगवेगळ्या दृष्टिकोनाच्या आधारावर परिणामांची चर्चा करतो. निष्कर्षात वापरलेल्या संकल्पनेचे निर्वचन करतो. तथ्यांचे वैज्ञानिक पद्धतीने निर्वचन  करून निष्कर्ष काढतो. निष्कर्षाच्या आधारावर सूचना देखील करतो. निष्कर्षाच्या माध्यमातून संशोधक फलनिष्पती मांडत असतो तर सूचनेच्या माध्यमातून समस्येवरील उपाय योजना किंवा भविष्यकालीन संशोधनाला चालना आणि दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक गोष्टींची चर्चा करतो.

v संदर्भ विभाग Reference Section-

v प्रबंधाचा सर्वात शेवटचा भाग म्हणजे संदर्भ विभाग होय. या विभागाचे तीन उपविभाग पडतात.

v  संदर्भसूची- (Bibliology)संदर्भ सुचित प्रबंधासाठी तथ्य सामग्री संकलित केलेल्या पुस्तके, प्रबंध, नियतकालिके, अहवाल, दस्तऐवज, साहित्य संशोधन पत्रिका इत्यादींची माहिती द्यावी लागते.  संदर्भसूचीच्या माध्यमातून प्रबंधाला पुराव्याची आधार उपलब्ध करून दिले जातात. प्रबंधाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी संदर्भ उपयुक्त असतात. संदर्भ लेखनाच्या अनेक पद्धती प्रचलित आहेत.  उदाहरणार्थ  हार्वर्ड पद्धत, MLA, APA,  विद्यापीठाने मान्य केलेली पद्धती आपल्याला वापरावी लागते.

v परिशिष्टे- (Appendices)प्रबंधात वापरलेल्या संशोधन सामग्रीच्या सत्य प्रतिलिपीचे विवरण परिशिष्टात दिलेले असते. परिशिष्टे  वर्णक्रमानुसार दिलेले असतात.

v  सूची पत्र- (Catalog) सूची पत्र संशोधन विषयानुसार बनवावे लागते. संशोधनात वापरलेल्या महत्त्वपूर्ण संकल्पना शब्द संज्ञा आणि घटना कोण कोणत्या पृष्ठावर आहेत हे वर्णक्रमानुसार माहिती द्यावी लागते.



स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके-

Indian Polity - For Civil Services and Other State Examinations | 6th Edition-https://amzn.to/3AkhXPw VASTUNISTH: BHARAT KA ITIHAS; KALA EVAM SANSKRITI (Hindi Edition)-https://amzn.to/3AvC25g सेट/नेट राज्यशास्त्र पेपर-२-https://amzn.to/3CmgIkJ Samanya Budhi Avum Tarkshakti Parikshan-https://amzn.to/37yNIb0 Ksagar Sampurna Rajyashastra संपूर्ण राज्यशास्त्र-https://amzn.to/3AnWmFA विसाव्या शतकातील राजकीय विचारप्रवाह https://amzn.to/36LU5rh आधुनिक राजकीय विचारप्रणाली- https://amzn.to/3xpwU0R भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था पुस्तक link https://amzn.to/3iwtpjt https://amzn.to/3kMDY4U आधुनिक राजकीय सिद्धांत पुस्तक https://amzn.to/3BLcdQm महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय चळवळी आणि महाराष्ट्र प्रशासन Redmi Note 10 (Aqua Green, 4GB RAM, 64GB Storage) -Amoled Dot Display | 48MP Sony Sensor IMX582 | Snapdragon 678 Processor link- https://amzn.to/3xpahtm Canon EOS 1500D 24.1 Digital SLR Camera (Black) with EF S18-55 is II Lens-https://amzn.to/3AfUkax https://amzn.to/3iG9wXl-(boya Mic for good voice Quality for lecture and video) https://amzn.to/3y3Qr7Z (Adjustable Tripod and Stand ) https://amzn.to/36ZtgQy (Sony Camera) https://amzn.to/2UGoDbB (Dell MS116 1000DPI USB Wired Optical Mouse) Redmi note 10 amazon link-https://amzn.to/3y3e8gU

. Use Product video making- 

Mic: https://amzn.to/39WbfUO Tripod: https://amzn.to/2OKuBlF Camera: https://amzn.to/3uQFswU Laptop: https://amzn.to/3tieMEP Ring Light: https://amzn.to/32bpfGh Web Hosting Link: https://www.hostinger.in/vedant My Influencer Page:- https://goo.gl/8Tf2ya


 

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.