https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

महाराष्ट्रातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था परिचय वा ओळख


 

महाराष्ट्रातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था परिचय वा ओळख - भारतात काही स्थानिक स्वराज्य संस्था प्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. उदा. ग्रामपंचायत काही संस्थांची स्थापना ब्रिटिश काळात झालेली दिसून येते. काही संस्थांची स्थापना स्वातंत्र्योत्तर काळात झालेली दिसून येते. उदा. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती भारतात शहरी आणि ग्रामीण या दोन प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांचा समावेश होतो. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था त्रिस्तरीय आहेत. या संस्थांना 'पंचायतराज' या नावाने देखील ओळखले जाते. बलवंतराय मेहता समितीने 'पंचायतराज' संकल्पना मांडली. भारतात सर्वप्रथम राजस्थान राज्याने 'पंचायतराज' संस्थांची स्थापना केली. महाराष्ट्रात वसंतराव नाईक समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारावर जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 हा कायदा संमत केल्यानंतर 1 मे 1962 पासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची स्थापना करण्यात आली.

जिल्हा परिषद- जिल्हा परिषद ही पंचायतराज  मधील सर्वोच्च संस्था आहे. मुंबई आणि नवी मुंबई हे शहरी जिल्हे वगळता महाराष्ट्रात 34 जिल्हा  परिषदा आहेत. जिल्हा परिषदेत निर्वाचित, पदसिद्ध स्वीकृत हे तीन प्रकारचे सदस्य असतात. निर्वाचित सदस्यांची संख्या 50 ते 75 दरम्यान असते.  निर्वाचित सदस्यांसाठी शासनाच्या नियमाप्रमाणे आरक्षण असते. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. जिल्ह्यातील पाच सहकारी संस्थांचे सभापती स्वीकृत सदस्य असतात. वयाची एकवीस वर्षे पूर्ण झालेल्या जिल्हा मतदार यादीत नाव  असलेल्या व्यक्तीला जिल्हा परिषदेची निवडणूक लढवता येते. जिल्हा परिषदेचा कार्यकाल पाच वर्षे इतका असतो. जिल्हा परिषदेच्या वर्षातून चार बैठका घेणे कायद्याने बंधनकारक असते. जिल्हा परिषदेच्या राजकीय प्रमुखास जिल्हा परिषद अध्यक्ष असे म्हणतात. अध्यक्षांची निवड सदस्यांकडून अडीच वर्षांसाठी केले जाते. अध्यक्षपदासाठी देखील आरक्षण असते. अध्यक्षाला राज्यमंत्र्यांचा दर्जा असतो. जिल्हा परिषदेचे कामकाज चालवण्यासाठी आवश्यक अधिकार अध्यक्षाला दिलेले असतात. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय प्रमुखास मुख्य कार्यकारी अधिकारी असे म्हणतात. त्याची नेमणूक करण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो. जिल्हा परिषदेचे दैनंदिन प्रशासन पाहण्यासाठी स्थायी समितीसह 10 समिती असतात. स्थायी समिती आणि विषय समितीच्या सभापती आणि सदस्यांची निवड क्रमदेय मतदान पद्धतीने होते. त्यांचा कार्यकाल अडीच वर्षे इतका असतो. एका सभापतीकडे  एक किंवा दोन  समित्यांचे सभापती पद दिले जाते. एक सभापतीपद उपाध्यक्षकडे असते. कृषी पशुसंवर्धन समितीचा एकच सभापती असतो. महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी महिलेची निवड केली जाते. समाज कल्याण सभापती पदी मागासवर्गीय किंवा अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीची निवड केली जाते. समिती आपापल्या क्षेत्रात काम करत असतात. जिल्हा परिषदेकडे 108 विषय सोपवलेले आहेत. यात शिक्षण आरोग्य सामाजिक कल्याण, कृषी अनुसूचित जाती-जमातींचा विकास, मागासवर्गीयांचा विकास इत्यादी महत्वपूर्ण विषयांचा समावेश आहे.  ही कार्य पार पाडण्यासाठी जिल्हा परिषदेला व्यवसाय कर, मनोरंजन कर, पाणीपट्टी इत्यादी करांच्या माध्यमातून उत्पन्न मिळवता येते. करा शिवाय राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान आणि कर्ज काढून देखील उत्पन्न मिळवता येते.

पंचायत समिती- पंचायतराज मधील मधला स्तर म्हणजे पंचायत समिती  होय. प्रत्येक तालुक्यासाठी शहरी हद्द वगळून उरलेल्या ग्रामीण भागासाठी पंचायत समिती स्थापन केली जाते. महाराष्ट्रात सध्या 351 पंचायत समिती आहेत. पंचायत समितीत निर्वाचीत, पदसिद्ध आणि स्वीकृत हे तीन प्रकारचे सदस्य असतात. प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघातून दोन पंचायत समिती सदस्य निवडले जातात. निर्वाचित सदस्यातील अनुसूचित जाती-जमातींना लोकसंख्येप्रमाणे, इतर मागासवर्गीयांना 27 टक्के आणि महिलांसाठी 50 टक्के जागा आरक्षित आहेत. तालुक्यातून जिल्हा परिषदेवर निवडून गेलेले सदस्य पंचायत समितीचे पदसिद्ध सदस्य असतात. तालुक्यातील  खरेदी-विक्री  संघाचा सभापती पंचायत समितीचा स्वीकृत सदस्य असतो. एकवीस वर्षे वय पूर्ण झालेल्या व्यक्तीला पंचायत समितीची निवडणूक लढवता येते. पंचायत समितीचा कार्यकाल पाच वर्षे इतका असतो. पंचायत समितीची महिन्यातून एकदा बैठक घेतली जाते. पंचायत समितीच्या राजकीय प्रमुखास सभापती असे म्हटले जाते. सभापती पदाचा कार्यकाल अडीच वर्षे इतका असतो. सदस्य आपल्यामधून एकाची सभापती म्हणून निवड करत असतात. सभापतीपदासाठी आरक्षण असते. कार्यकाल संपण्यापूर्वी अविश्वास प्रस्ताव संमत करून सभापतींना पदावरून दूर करता येते. गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव कार्यकारी प्रमुख असतो. त्यांची नेमणूक राज्य शासनाकडून विशिष्ट काळासाठी केले जात असते. पंचायत समिती जिल्हा परिषदेची छोटी प्रतिकृती असते. समितीकडे 76 विषयांची जबाबदारी सोपवलेले आहे. त्यात पशुसंवर्धन, जंगले, समाज कल्याण, कुटिर उद्योग हस्त उद्योग, शिक्षण, आरोग्य इत्यादी विषयांचा समावेश आहे. पंचायत समितीचे दैनंदिन काम पार पडण्यासाठी जिल्हा परिषदेप्रमाणे समित्या निर्माण  केलेल्या आहेत. पंचायत समितीला स्वतंत्र अनुदान आणि उत्पन्नाची साधने दिलेली नाहीत. जिल्हा परिषदेने दिलेल्या अनुदानावर त्यांना अवलंबून राहावे लागते.

ग्रामपंचायत- ग्रामपंचायत हा पंचायत राज मधील सर्वात शेवटचा  स्तर मानला जातो. भारतात प्राचीन काळापासून ग्रामपंचायती अस्तित्वात असल्याचे दिसून येते. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार महाराष्ट्रातील सध्याच्या ग्रामपंचायतीची रचना दिसून येते. ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी 600 ते 300 च्या दरम्यान लोकसंख्या असणे आवश्यक असते. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 7 ते 17 या दरम्यान असते. 1500 किंवा त्यापेक्षा कमी लोकसंख्या 7 सदस्य आणि त्यापुढील 1500 लोकसंख्येसाठी 2 सदस्य वाढत जातात. ग्रामपंचायत सदस्य निवडण्यासाठी वॉर्ड तयार केले जातात.  एका वॉर्डातून दोन ते तीन सदस्य निवडले जातात. ग्रामपंचायत जागांसाठी शासकीय नियमाप्रमाणे आरक्षण असते. ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत नाव असलेल्या 21 वर्षे  वय पूर्ण झालेल्या व्यक्तीला निवडणूक लढवता येते. ग्रामपंचायतीचा कार्यकाल पाच वर्ष इतका असतो. महिन्यातून एक बैठक बोलवावी लागते. ग्रामपंचायतीचा प्रमुख सरपंच असतो. त्याची निवड सदस्यांकडून पाच वर्षासाठी केली जाते. अविश्वास प्रस्ताव संमत करून कार्यकाल पूर्ण होण्याआधी त्याला पदावरून दूर करता येते. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सचिव असतो. त्याची नेमणूक जिल्हा परिषदेकडून  केली जाते. ग्रामपंचायतीकडे आवश्यक आणि ऐच्छिक अशा दोन प्रकारची कार्य सोपवलेली आहेत. त्यात सार्वजनिक आरोग्य, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, समाज शिक्षण, सांडपाण्याची विल्हेवाट, जन्म, मृत्यू, विवाहाची नोंद, बांधकाम परवानगी, गावाच्या सुशोभीकरणाच्या दृष्टिकोनातून आवश्यक कार्य इत्यादी जवळपास 79 विषय सोपवलेले आहेत. ग्रामसूचीतील विषयांवर कार्य करण्यासाठी घरपट्टी, पाणीपट्टी, वाहन कर, दिवाबत्ती कर, बाजार यात्रा कर इत्यादी करांच्या माध्यमातून उत्पन्न मिळवता येते. राज्य शासन आणि जिल्हा परिषदेकडून अनुदान देखील मिळत असते.


 स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके-

Indian Polity - For Civil Services and Other State Examinations | 6th Edition-https://amzn.to/3AkhXPw VASTUNISTH: BHARAT KA ITIHAS; KALA EVAM SANSKRITI (Hindi Edition)-https://amzn.to/3AvC25g सेट/नेट राज्यशास्त्र पेपर-२-https://amzn.to/3CmgIkJ Samanya Budhi Avum Tarkshakti Parikshan-https://amzn.to/37yNIb0 Ksagar Sampurna Rajyashastra संपूर्ण राज्यशास्त्र-https://amzn.to/3AnWmFA विसाव्या शतकातील राजकीय विचारप्रवाह https://amzn.to/36LU5rh आधुनिक राजकीय विचारप्रणाली- https://amzn.to/3xpwU0R भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था पुस्तक link https://amzn.to/3iwtpjt https://amzn.to/3kMDY4U आधुनिक राजकीय सिद्धांत पुस्तक https://amzn.to/3BLcdQm महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय चळवळी आणि महाराष्ट्र प्रशासन Redmi Note 10 (Aqua Green, 4GB RAM, 64GB Storage) -Amoled Dot Display | 48MP Sony Sensor IMX582 | Snapdragon 678 Processor link- https://amzn.to/3xpahtm Canon EOS 1500D 24.1 Digital SLR Camera (Black) with EF S18-55 is II Lens-https://amzn.to/3AfUkax https://amzn.to/3iG9wXl-(boya Mic for good voice Quality for lecture and video) https://amzn.to/3y3Qr7Z (Adjustable Tripod and Stand ) https://amzn.to/36ZtgQy (Sony Camera) https://amzn.to/2UGoDbB (Dell MS116 1000DPI USB Wired Optical Mouse) Redmi note 10 amazon link-https://amzn.to/3y3e8gUFor more reading click following Link-https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/08/directive-principles-of-state.html स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके- Indian Polity - For Civil Services and Other State Examinations | 6th Edition-https://amzn.to/3AkhXPw VASTUNISTH: BHARAT KA ITIHAS; KALA EVAM SANSKRITI (Hindi Edition)-https://amzn.to/3AvC25g सेट/नेट राज्यशास्त्र पेपर-२-https://amzn.to/3CmgIkJ Samanya Budhi Avum Tarkshakti Parikshan-https://amzn.to/37yNIb0 Ksagar Sampurna Rajyashastra संपूर्ण राज्यशास्त्र-https://amzn.to/3AnWmFA विसाव्या शतकातील राजकीय विचारप्रवाह https://amzn.to/36LU5rh आधुनिक राजकीय विचारप्रणाली- https://amzn.to/3xpwU0R भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था पुस्तक link https://amzn.to/3iwtpjt https://amzn.to/3kMDY4U आधुनिक राजकीय सिद्धांत पुस्तक https://amzn.to/3BLcdQm महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय चळवळी आणि महाराष्ट्र प्रशासन Redmi Note 10 (Aqua Green, 4GB RAM, 64GB Storage) -Amoled Dot Display | 48MP Sony Sensor IMX582 | Snapdragon 678 Processor link- https://amzn.to/3xpahtm Canon EOS 1500D 24.1 Digital SLR Camera (Black) with EF S18-55 is II Lens-https://amzn.to/3AfUkax https://amzn.to/3iG9wXl-(boya Mic for good voice Quality for lecture and video) https://amzn.to/3y3Qr7Z (Adjustable Tripod and Stand ) https://amzn.to/36ZtgQy (Sony Camera) https://amzn.to/2UGoDbB (Dell MS116 1000DPI USB Wired Optical Mouse) Redmi note 10 amazon link-https://amzn.to/3y3e8gU Use Product video making- Mic: https://amzn.to/39WbfUO Tripod: https://amzn.to/2OKuBlF Camera: https://amzn.to/3uQFswU Laptop: https://amzn.to/3tieMEP Ring Light: https://amzn.to/32bpfGh Web Hosting Link: https://www.hostinger.in/vedant My Influencer Page:- https://goo.gl/8Tf2ya

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.