भारतातील सनदी सेवेचा इतिहास वा ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि विकास-
• सनदी सेवा जगातल्या अनेक देशात प्राचीन काळापासून उपलब्ध असल्याचे पुरावे सापडलेले आहेत. इजिप्त प्राचीन रोम, ग्रीस आणि भारतात सनदी सेवा असल्याचे दिसून आलेले आहे. आधुनिक सनदी सेवेची देणगी युरोपने जगाला दिलेली आहे. प्रशियातील फ्रेडरिक विल्यम्स यांनी सतराव्या शतकात सरंजामशाही व्यवस्था नष्ट करून कार्यक्षम प्रशासकीय यंत्रणा उभी केली होती. युरोपमधल्या अनेक देशात अठराव्या शतकात सुसंघटित स्वरूपाच्या सनदी सेवा निर्माण करण्यास सुरुवात झाली होती.
• भारतातील सनदी सेवेचा विकास- इंग्लंडमध्ये सुसंघटित स्वरूपाची सनदी सेवा थोडी उशिरा अस्तित्वात आली. 1853 मध्ये लॉर्ड मेकाले यांनी हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये सनदी सेवकांची भरती करण्यासाठी खुल्या स्पर्धा परीक्षेचा विचार मांडला. त्यांच्या विचारांच्या आधारावर इंग्लंडमध्ये सर्वप्रथम 1855 मध्ये 'सिविल सर्विसेस कमिशन' स्थापन करण्यात आले. या कमिशनचा उद्देश योग्य आणि गुणवान उमेदवारांची सनदी सेवेत भरती करणे हा होता. इंग्लंड मध्ये सनदी सेवकांच्या निवडीवर अनुवंशिकता, वंशपरंपरा आणि राजकीय प्रभाव पडत होता. या सर्व घटकांचा प्रभाव कमी करण्यासाठी हा आयोग स्थापन करण्यात आला.
• भारतावर दीर्घकाळ ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य होते. कंपनीने आपले व्यापार विषयक कार्य पार पाडण्यासाठी एजंट आणि मर्चंट अशा दोन प्रकारच्या नोकर वर्गाची निर्मिती केले होते परंतु या पद्धतीत अनेक गैरप्रकार निर्माण झाल्यामुळे कंपनीने करार पद्धतीने सनदी सेवा सुरू केली. या पद्धतीत सैनिकी सेवक वर्ग आणि असैनिकी सेवक वर्ग हे दोन प्रकारचे सेवक होते. असैनिक सेवक वर्गालाच सनदी सेवक म्हणण्याचा प्रघात पडला. तांत्रिक आणि वैज्ञानिक कार्य न करणाऱ्या आणि देशाच्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या सेवक वर्गासाठी ब्रिटिश काळात नागरी सेवक हा शब्द रूढ झाला.
• कंपनीच्या सनदी सेवेत अकार्यक्षमतेचा बोलबाला होता. म्हणून या सनदी सेवेत सुधारणा करण्यासाठी लॉर्ड मेकाले यांच्या अध्यक्षतेखाली 'कमिटी ऑन इंडियन सिविल सर्विसेस' नावाची समिती स्थापन करण्यात आली. या समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारावर 'इंडियन सिविल सर्विस’ नावाची सेवा सुरू करण्यात आली. या सेवेत प्रवेश घेण्यासाठी 'ब्रिटिश सिविल सर्विसेस कमिशन' मार्फत परीक्षा घेतली जात असे. सुरुवातीला या सेवेत फक्त ब्रिटिशांना प्रवेश होता. 1858 मध्ये कंपनीची सत्ता नष्ट करून भारताचे प्रशासन इंग्लंडच्या राणीच्या नियंत्रणाखाली आणले गेले. राणीने काढलेल्या जाहीरनाम्यानुसार भारतीयांच्या सनदी सेवेच्या प्रवेशाला मान्यता देण्यात आली
• सुरुवातीच्या काळात सनदी सेवाचे परीक्षा केंद्र फक्त इंग्लंड मध्ये होते नंतरच्या काळात भारतात केंद्र सुरू करण्यात आले. सनदी सेवेत निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी इंग्लंड मध्ये जावे लागत असे. ब्रिटिशांनी सनदी सेवेत सुधारणा करण्यासाठी एटचिझन कमिशन, इजलिंगटन कमिशन, माँटफॉर्ड कमिशन, ली कमिशन, इत्यादी विविध आयोगाची स्थापना केली. या आयोगांच्या शिफारशींच्या आधारावर सनदी सेवेत बदल घडवून आणले. 1919 च्या कायद्यानुसार भारतातील सनदी सेवकांची भरती करण्यासाठी स्वतंत्र मंडळाची निर्मिती करण्याचे निश्चित करण्यात आले. 1 ऑक्टोबर 1926 रोजी 'केंद्रीय सनदी सेवा आयोगा'ची स्थापना करण्यात आली. 1935 च्या कायद्यानुसार प्रांतिक लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नाव बदलून सांघिक लोकसेवा आयोग असे करण्यात येऊन आयोगाच्या अधिकारात वाढ करण्यात आली.
• सनदी सेवा आणि भारतीय राज्यघटना-
• भारतीय घटनाकारांनी ब्रिटिश कालीन नागरी सेवेची पद्धती स्वीकारून त्यात काही बदल केले. घटनेच्या सातव्या अनुसूचित सनदी सेवेसंदर्भात उल्लेख आहे. सनदी सेवेचा समावेश केंद्रसूचित केला. भविष्यात अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार राज्यसभा सभागृहाला देण्यात आला. सनदी सेवकांची भरती करण्यासाठी घटनात्मक संरक्षण असलेला 'संघ लोकसेवा आयोग' स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. भारतीय राज्यघटनेच्या चौदाव्या भागातील कलम 315 ते 323 दरम्यान संघ आणि राज्य लोकसेवा आयोगा विषयी तरतूद करण्यात आलेली आहे. अखिल भारतीय सेवा आणि केंद्रीय सेवेतील वर्ग 1 आणि 2 सनदी सेवकांची भरती संघ लोकसेवा आयोगाकडून खुल्या स्पर्धा परीक्षेद्वारे केली जाते. राज्यसेवेतील सनदी सेवकांची भरती राज्य लोकसेवा आयोगाकडून खुल्या स्पर्धा परीक्षेद्वारे केली जात असते. अशाप्रकारे भारतीय सनदी सेवेची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि विकास स्पष्ट करता येतो.
• स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके-
Indian Polity - For Civil Services and Other State Examinations | 6th Edition-https://amzn.to/3AkhXPw VASTUNISTH: BHARAT KA ITIHAS; KALA EVAM SANSKRITI (Hindi Edition)-https://amzn.to/3AvC25g सेट/नेट राज्यशास्त्र पेपर-२-https://amzn.to/3CmgIkJ Samanya Budhi Avum Tarkshakti Parikshan-https://amzn.to/37yNIb0 Ksagar Sampurna Rajyashastra संपूर्ण राज्यशास्त्र-https://amzn.to/3AnWmFA विसाव्या शतकातील राजकीय विचारप्रवाह https://amzn.to/36LU5rh आधुनिक राजकीय विचारप्रणाली- https://amzn.to/3xpwU0R भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था पुस्तक link https://amzn.to/3iwtpjt https://amzn.to/3kMDY4U आधुनिक राजकीय सिद्धांत पुस्तक https://amzn.to/3BLcdQm महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय चळवळी आणि महाराष्ट्र प्रशासन Redmi Note 10 (Aqua Green, 4GB RAM, 64GB Storage) -Amoled Dot Display | 48MP Sony Sensor IMX582 | Snapdragon 678 Processor link- https://amzn.to/3xpahtm Canon EOS 1500D 24.1 Digital SLR Camera (Black) with EF S18-55 is II Lens-https://amzn.to/3AfUkax https://amzn.to/3iG9wXl-(boya Mic for good voice Quality for lecture and video) https://amzn.to/3y3Qr7Z (Adjustable Tripod and Stand ) https://amzn.to/36ZtgQy (Sony Camera) https://amzn.to/2UGoDbB (Dell MS116 1000DPI USB Wired Optical Mouse) Redmi note 10 amazon link-https://amzn.to/3y3e8gUFor more reading click following Link-https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/08/directive-principles-of-state.html स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके- Indian Polity - For Civil Services and Other State Examinations | 6th Edition-https://amzn.to/3AkhXPw VASTUNISTH: BHARAT KA ITIHAS; KALA EVAM SANSKRITI (Hindi Edition)-https://amzn.to/3AvC25g सेट/नेट राज्यशास्त्र पेपर-२-https://amzn.to/3CmgIkJ Samanya Budhi Avum Tarkshakti Parikshan-https://amzn.to/37yNIb0 Ksagar Sampurna Rajyashastra संपूर्ण राज्यशास्त्र-https://amzn.to/3AnWmFA विसाव्या शतकातील राजकीय विचारप्रवाह https://amzn.to/36LU5rh आधुनिक राजकीय विचारप्रणाली- https://amzn.to/3xpwU0R भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था पुस्तक link https://amzn.to/3iwtpjt https://amzn.to/3kMDY4U आधुनिक राजकीय सिद्धांत पुस्तक https://amzn.to/3BLcdQm महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय चळवळी आणि महाराष्ट्र प्रशासन Redmi Note 10 (Aqua Green, 4GB RAM, 64GB Storage) -Amoled Dot Display | 48MP Sony Sensor IMX582 | Snapdragon 678 Processor link- https://amzn.to/3xpahtm Canon EOS 1500D 24.1 Digital SLR Camera (Black) with EF S18-55 is II Lens-https://amzn.to/3AfUkax https://amzn.to/3iG9wXl-(boya Mic for good voice Quality for lecture and video) https://amzn.to/3y3Qr7Z (Adjustable Tripod and Stand ) https://amzn.to/36ZtgQy (Sony Camera) https://amzn.to/2UGoDbB (Dell MS116 1000DPI USB Wired Optical Mouse) Redmi note 10 amazon link-https://amzn.to/3y3e8gU Use Product video making- Mic: https://amzn.to/39WbfUO Tripod: https://amzn.to/2OKuBlF Camera: https://amzn.to/3uQFswU Laptop: https://amzn.to/3tieMEP Ring Light: https://amzn.to/32bpfGh Web Hosting Link: https://www.hostinger.in/vedantMy Influencer Page:- https://goo.gl/8Tf2ya
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.