सनदी सेवा अर्थ व्याख्या आणि वैशिष्ट्ये-
प्रशासकीय कार्यांना सुव्यवस्थित पद्धतीने करण्यासाठी सनदी सेवकांची आवश्यकता असते. सनदी सेवा प्रशासनाच्या विविध कार्यात समन्वय घडवून आणतात म्हणून बहुसंख्य देशांनी त्यांना घटनात्मक आणि कायदेशीर कवच उपलब्ध करून दिलेले आहे. शासनाच्या ध्येय धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असते. शासनाची यश हे सनदी सेवेच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. सनदी सेवा हा प्रशासनाचा कणा मानला जातो.
सनदी सेवेचा अर्थ आणि व्याख्या-
v डॉ.फायनर यांच्या मते- नागरी सेवा म्हणजे व्यावसायिक प्रशासकीय नोकरवर्ग की जो कायमस्वरूपी पगारी आणि कुशल असतो.
v ग्लॅडन यांच्या मते- नागरी सेवा म्हणजे जो आपल्या कार्यात निपुण असून स्वहितापेक्षा राष्ट्र सेवेला महत्त्व देतो. कोणत्याही पक्ष व वर्गाचे हित जोपासत नाही.
v डिमॉक डिमॉक यांच्या मते- कायमची नोकरी अराजकीय स्वरूप व व्यावसायिक दर्जा प्राप्त असलेला पूर्णवेळ काम करणारा नोकर म्हणजे सनदी सेवक होय.
v सनदी सेवेची वैशिष्ट्ये-
v व्यावसायिकता- सनदी सेवक हा व्यवसायिक प्रशासक असतो. त्याच्यात असलेले कौशल्य, त्याला मिळालेले प्रशिक्षण आणि अनुभवाच्या जोरावर त्याची विशेष स्वरूपाची प्रतिमा निर्माण होत असते. राज्याला विविध प्रकारचे कार्य पार पाडावे लागतात. ही कार्य पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या पात्रता आणि कौशल्य असलेल्या सनदी सेवकांची गरज असते याच कारणामुळे नागरी सेवेत विविध वर्ग व श्रेण्या पाडलेल्या असतात. उदाहरणार्थ अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग, ड वर्ग
v अधिकार श्रेणी पद्धत- सनदी सेवेत अधिकार पदपरंपरा तत्त्वाचा स्वीकार करून विविध वर्ग पाडले जातात. संघटनेत कनिष्ठ सेवक हा वरिष्ठ सेवकाला जबाबदार राहून कार्य करतो. नियंत्रण व मार्गदर्शन ही प्रशासकीय तत्वे वापरून संघटनेच्या श्रेणीबद्ध रचना निर्माण केलेल्या असतात. कनिष्ठ सेवक वरिष्ठ प्रशासकाच्या आज्ञेचे पालन करतो. प्रत्येक सेवकाचे अधिकार कार्य कायद्याने निश्चित केलेली असतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नियंत्रण आणि मार्गदर्शनाची जबाबदारी असते.
v कार्याची अखंडता- सनदी सेवा ही अविरतपणे कार्य करणारी व्यवस्था असते. तिचे काम स्थायी स्वरूपाचे असते. सनदी सेवा एक गतिशील स्वरूपाचे कायमस्वरूपी व अखंडितपणे काम करणारी यंत्रणा असते.
v कायमस्वरूपी सेवा- राजकीय पदाधिकाऱ्यांप्रमाणे सनदी अधिकारी विशिष्ट काळानंतर बदलत नाही. राजकीय सत्ता कोणत्याही पक्षाची असो सनदी सेवक कायमस्वरूपी असतो. नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांना सेवेची शाश्वती दिलेली असते. सेवक कायमस्वरूपी असल्यामुळे त्यांच्या ज्ञान व अनुभवाचा फायदा प्रशासनांना मिळत असतो. कायमस्वरूपी सनदी सेवकांना मुळे प्रशासनात सातत्य व स्थैर्य निर्माण होते. कायमस्वरूपी कार्यामुळे कार्याबद्दलची आवड व कौशल्य विकसित होत जातात.
v विशेषीकरण- सनदी सेवेत सेवकांची भरती करताना आधुनिक काळात विशेष योग्यतेवर भर दिला जातो. प्रशासनातील कार्य विभाजनामुळे विशेष ज्ञान व तांत्रिक ज्ञान असलेल्या व्यक्तीची नेमणूक करणे आवश्यक बनले आहे. प्रशासन कार्यातील तांत्रिकता आणि गुंतागुंत आलो सोडविण्याची जबाबदारी विशिष्ट ज्ञान असलेल्या तज्ञाकडे सोपवले जाते.
v कायदेमंडळाला जबाबदार नसतात- नागरी सेवेतील प्रशासक वर्ग कायदेमंडळाला जबाबदार नसतो. संघटनेतील कनिष्ठ सेवक वरिष्ठ सेवकाला जबाबदार असतो. एखाद्या खात्यातील प्रशासकीय अधिकार्यांकडून चूक झाल्यास संबंधित खात्याचा मंत्री जबाबदार मानला जातो. मंत्री आपल्या खात्यातील सनदी सेवकांवर नियंत्रण ठेवत असतात. सनदी सेवक मंत्र्यांना जबाबदार राहून कार्य करतात.
v अनामिकता व तटस्थता- सनदी सेवकांना कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे लागते. कोणत्याही प्रकारचा पक्षपात न करता निपक्षपाती पद्धतीने कार्य करावे लागते.त्यामुळे त्यांना कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य होता येत नाही. निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार नसतो. शासन कोणत्याही पक्षाचे असले तरी धोरण व कायद्याची अंमलबजावणी करताना तटस्थपणे काम करणे आवश्यक असते. सनदी सेवक कोणताही गट, वर्ग वा पक्षाचा फायदा न पाहता राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून काम करत असतो.
v पगारी- सनदी सेवेतील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी पगारी असतो. कामाचा मोबदला म्हणून मासिक वेतन दिले जाते. वेतनाशिवाय विविध भत्ते आणि निवृत्ती वेतन दिले जाते जेणेकरून सनदी सेवक आर्थिक विवंचनेने पासून मुक्त राहील. सेवा करताना भ्रष्टाचार करणार नाही.
v शिस्तीला महत्त्व- सनदी सेवेत शिस्तीला महत्त्वपूर्ण स्थान असते. सनदी सेवेत शिस्त निर्माण करण्यासाठी शासनाकडून वर्तणूक आचारसहिता तयार केलेले असते. या आचारसंहितेचा विचार करून सनदी सेवकाला कार्य करावे लागते. आचारसंहितेचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना असतो. प्रशासनाचे यश शिस्तीवर अवलंबून असते. सनदी सेवेचा दर्जा आणि नीतिमत्ता टिकून ठेवण्यासाठी शिस्त पाळणे आवश्यक असते.
My Influencer Page:- https://goo.gl/8Tf2ya
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.