https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

संशोधन आराखडा वस्तुनिष्ठ प्रश्न Research Design MCQ


 संशोधन आराखडा  वस्तुनिष्ठ प्रश्न  Research Design MCQ

1. संशोधन आराखडा म्हणजे काय?

अ) तथ्य संकलन आणि तथ्य विश्लेषणाच्या प्रत्येक टण्याचे नियोजन

होय,

ब) निष्कर्ष आणि सामान्यीकरणाचे नियोजन होय

क) नमुना निवड योजनेचे नियोजन होय.

ड) संशोधन समस्येबाबतचे भाकीतकथन होय,

उत्तर- अ

2. आदर्शमूलक सर्वेक्षणाची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती आहेत.

अ) तिर्यक छेदात्मक पद्धतीचा वापर

ब) संख्यात्मक आणि गुणात्मक माहितीचे संकलन

क) कमी वेळ व श्रमात माहितीचे संकलन ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- ड

 3. सामाजिक सर्वेक्षणाचे अभ्यासविषय कोणते आहेत.

अ) लोकसंख्या व सामाजिक पर्यावरण

ब) सामाजिक क्रिया, विचार व मनोवृत्ती

क) अ व व दोन्हीही ड) अ व ब दोन्हीपैकी नाही

उत्तर- क

4. सामाजिक संशोधन व सामाजिक सर्वेक्षण फरकाबाबत योग्य विधान निवडा.

अ) सामाजिक सर्वेक्षण हे मूलत: व्यावहारिक असते तर सामाजिक संशोधन हे मुख्यत्वे सैद्धांतिक असते.

ब) सर्वेक्षणाचे क्षेत्र मर्यादित असते तर संशोधनाचे क्षेत्र संपूर्ण समाज असते.

क) सामाजिक संबंधाचा संबंध विशिष्ट घटना, क्षेत्र व समुदायापुरते मर्यादित असते तर सामाजिक संशोधन विशाल व व्यापक असते.

ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- ड

5. वर्णनात्मक आराखड्याबाबत अयोग्य विधान कोणते?

अ) समस्येशी संबंधित असलेल्या वास्तविक तथ्यांच्या आधारावर वर्णनात्मक विवेचन करणे.

ब) विशिष्ट व्यक्ती किवा समूह वैशिष्ट्यांचे वर्णनात्मक विवेचन करणे,

क) एखाद्या सामाजिक घटनेच्या मुळाशी असलेल्या कारणांचा शोध घेणे

ड) वरीलपैकी एकही नाही.

उत्तर- क

6. प्रा. आर.ए. फिशर यांनी अनुभवजन्य वा प्रयोगात्मक संशोधन आराखड्याची कोणती मूलभूत तत्त्वे सांगितली आहेत.

अ) पुनरूक्ती तत्त्व ब) यादृच्छिकरण

क) स्थानिक नियंत्रणाचे तत्त्व ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- ड

7. नियंत्रित गटाबाबत योग्य विधान कोणते ते सांगा.

अ) नियंत्रित गटावर बाह्य परिस्थिती किंवा कारकाचा कोणताही परिणाम होऊ देत नाही.

 ब) नियंत्रित गट म्हणजे संशोधकाला नियंत्रित करणाऱ्या लोकांचा गट असतो.

क) नियंत्रित गटावर बाह्य कारकाचा प्रभाव होऊ दिला जातो.

ड) वरील पैकी सर्व

उत्तर- अ

8. प्रयोगात्मक अध्ययन पद्धतीच्या मर्यादा कोणत्या असतात.

अ) समान गट निवड अशक्य ब) बाह्य कारकांचा गटाचा प्रभाव

क) नियंत्रित अवस्था निर्मिती अशक्य ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- ड

9. संशोधन आराखडा म्हणजे-----------

अ) संशोधनाची ब्ल्यू प्रिंट ब) संशोधनाची जननी

क) संशोधनाचा गाभा ड) वरीलपैकी एकही नाही.

उत्तर- अ

 10. संशोधनाचे सार-------मध्ये दिलेले असते.

अ) कृती संशोधन ब) संशोधन आराखडा क) सिद्धांत ड) नियोजन

उत्तर- ब

11. संशोधन आराखडा म्हणजे-----------------------

अ) तथ्य संकलन आणि तथ्य विश्लेषणातील सर्व टप्प्यांचे नियोजन

म्हणजे संशोधन आराखडा होय

ब) तथ्य संकलनाच्या कार्याचे नियोजन म्हणजे संशोधन आराखडा होय.

क) संशोधनाची पूर्वतयारी म्हणजे संशोधन आराखडा होय

ड) वरील पैकी एकही नाही.

उत्तर- अ

12. शास्त्रीय संशोधन साहित्य आढाबाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

अ) विश्वसनीयता ब) शास्त्रीयता

क) पारदर्शक/निष्पक्षपातीपणा ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- ड

13. संशोधनाची प्रथम पायरी म्हणजे----------------होय

अ) साहित्य सर्वेक्षण ब) आशय विश्लेषण

क) नमुना निवड ड) अहवाल लेखन

उत्तर- अ

 14 संशोधन साहित्य परीक्षणाचे सर्वात आधुनिक माध्यम खालीलपैकी कोणते?

अ) पुस्तके ब) नियतकालिके क) संशोधन पेपर ड) इंटरनेट

उत्तर- ड

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.