नमुना निवड पध्दती वस्तुनिष्ठ प्रश्न Sample Selection Method MCQ
1.
शितावरून भाताची परीक्षा ही म्हण खालील कशाशी संबंधित आहे.
अ) मुलाखत ब) निरीक्षण क) नमुना निवड ड) सर्वेक्षण
उत्तर- क
2.
सामाजिक शास्त्रात लोकसंख्या अध्ययनाच्या खालील कोणत्या पद्धती आहेत.
अ) पेरामॅटिक पद्धती (Parametric
Methods)
ब) नॉन पेरामॅटिक पद्धती (Non-Parametric
Methods)
क) अ व व दोन्हीही ड) अ
व ब दोन्हीही नाही.
उत्तर- क
3.
अनुभवी चाचणीक्षम, प्रत्यक्ष
निरीक्षणक्षम व संकल्पनात्मक स्पष्टता गृहीत कृत्यांची लक्षणे आहेत.
अ) आदर्श ब) आभासी क) सरळ ड) सांख्यिकी
उत्तर- अ
4. नॉन
पेरामँटिक पद्धतीचा आधार कोणता?
अ) लोकसंख्या ब) नमुना क) संख्या ड) आकार
उत्तर- ब
5.
सामाजिक शास्त्रात सांख्यिकीय नमुना चाचणीचे जनक कोण आहेत?
अ) ए.ए. बाऊले ब) पॉलिन यंग क) मोझर ड) बोगाइस
उत्तर- अ
6.
नमुना त्यातील नावाप्रमाणे एक विस्तृत समूहाचा लघु प्रतिनिधी आहे ही व्याख्या कोणी केली?
अ) पॉलिन यंग ब) गुड आणि हॅट क) मोझर ड) टिपेट
उत्तर- ब
7. सजातीयता, प्रातिनिधिकता आणि अचूकता खालीलपैकी कशाशी संबंधित आहे.
अ) गृहीत कृत्य ब) संशोधन आराखड क) नमुना निवड ड) सर्वेक्षण
उत्तर- क
8.
आदर्श नमुना निवडीची वैशिष्ट्ये कोणती?
अ) पर्याप्तता ब) पूर्वग्रहापासून मुक्त क) प्रातिनिधिकता ड) वरीलपैकी सर्व
उत्तर- ड
9. वेळ, श्रम व पैशाची बचत, विश्वसनीय निष्कर्ष आणि सखोल अध्ययन हे नमुना निवडीचे काय आहेत.
अ) नमुना निवडीचे गुण ब)
नमुना निवडीच्या मर्यादा
क) नमुना निवडीचे क्षेत्र ड) नमुना निवड विश्लेषण
उत्तर- अ
10.
नमुना निवडीच्या मर्यादा कोणत्या ?
अ) पूर्वग्रह शक्यता ब)
प्रतिनिधीत्वाच्या अडचणी
क) नमुना निवडीची असंभाव्यता ड)
वरीलपैकी सर्व
उत्तर- ड
11.
नमुना निवडीचे मुख्य प्रकार कोणते ?
अ) संभाव्य नमुना निवड (Probability
Sampling) ब) गैर-संभाव्य नमुना निवड (Non-Probability
Sampling)
क) अ व व दोन्हीही ड) अ व ब दोन्हीही नाही
उत्तर- क
12.
समग्रातील सर्व एकक निवडीची समान संभाव्यता कोणत्या नमुना निवड पद्धतीत असते.
अ) संभाव्य नमुना निवड
(ब) गैर-संभाव्य नमुना निवड
क) सहेतूक नमुना निवड ड) यापैकी
नाही
उत्तर- अ
13.
निष्कर्षातील अचूकपणा, पाहणीचा खर्च, वेळ व एकूण प्रशासन या सर्वांवर प्रभाव पाडणारा घटक म्हणजे
नमुन्याचा------------ होय.
अ)वेळ ब) आकारमान क) एकक संख्या ड) भविष्यकथन
उत्तर- ब
14. लॉटरी
पद्धत,
कार्ड वा तिकिट पद्धत आणि ग्रीड पद्धत कोणत्या नमुना
निवडीचे प्रकार आहेत.
अ) साधा यादृच्छिक नमुना
ब) सहेतूक नमुना क) व्यवस्थाबद्ध नमुना ड) कोटा नमुना
उत्तर- अ
15.
यादृच्छिक अंक पद्धतीचा जनक कोण होते.
अ) बाऊले ब) पी.व्ही. बंग क) एल.एच.सी.टिपेट ड) मोझर
उत्तर- क
16.
ठरावीक क्रम पद्धतीला कोणत्या नावाने ओळखले जाते.
अ) ग्रीड पद्धत ब) व्यवस्थाबद्ध निवड
क) कोटा पद्धत ड) टिपेट पद्धत
उत्तर- क
17.१०,२०,
३०, ४०, ५० नमुना निवड
पद्धतीला काय म्हणतात?
अ) कोटा पद्धत ब) ठराविक क्रम
पद्धत
क) ग्रीड पद्धत ड) लॉटरी पद्धती
उत्तर- ब
18. भौगोलिक प्रदेशाचे काही
भाग घटक म्हणून निवडताना कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो.
अ) लॉटरी पद्धत ब) कोटा पद्धत
क) ग्रीड पद्धत ड) तिकिट
पद्धत
उत्तर- क
19. कोणत्या पद्धतील समग्राला
विविध वर्गात विभाजित करून प्रत्येक एकक निवड निश्चित केली जाते.
अ) लॉटरी पद्धत ब) कोटा
पद्धत
क) ग्रीड पद्धत ड) तिकिट पद्धत
उत्तर- ब
20. सहेतुक नमुना निवडीबाबतचे
योग्य विधान निवडा.
अ) संपूर्ण समग्राची माहिती संशोधकास असावी.
ब) संशोधकाने वस्तुनिष्ठ नमुना
निवडा.
क) अभ्यासाचे उद्दिष्ट एकच
असावे.
ड) वरीलपैकी सर्व
उत्तर- ड
21. न्यूमेनने कोणत्या पद्धतीस कुचकामी पद्धत असे म्हटले आहे.
अ) साधी यादृच्छिक पद्धत ब) सहेतूक
नमुना निवड
क) स्तरित यादृच्छिक नमुना निवड
ड) यापैकी नाही
उत्तर- ब
21. स्तरित सादृच्छिक नमुना निवड कोणत्या नमुना निवडीचे मिश्रण आहे.
अ) यादृच्छिक व सहेतूक नमुना
चाचणी
ब) कोटा व ग्रीड पद्धत
क) लॉटरी व ठरावीक क्रम पद्धत
ड) यापैकी नाही
उत्तर- अ
22. स्तरित यादृच्छिक नमुना पद्धतीचे प्रकार कोणते?
अ) समप्रमाणित स्तरीत सादृच्छिक
नमुना निवड
(Proportionate Stratified Sample)
ब) विषमप्रमाणी स्तरीय
यादृच्छिक नमुना निवड
(Disproportionate Stratified Sample).
क) भारयुक्त स्तरित यादृच्छिक
नमुना निवड
(Stratified
Weighted Sample)
ड) वरीलपैकी सर्व
उत्तर- ड
23. सोयीस्कर नमुना पद्धतीत कोणत्या घटकांचा प्रभाव पडतो.
अ) संशोधकाचा पूर्वग्रह ब)
संशोधकांची बुद्धिमत्ता
क) संशोधकाचा चाणाक्षपणा ड) यापैकी नाही
उत्तर- अ
24. खालीलपैकी गैर-संभाव्यता नमुना निवडीचा प्रकार कोणता?
अ) लॉटरी पद्धत ब) सहेतूक नमुना
क) तिकिट पद्धत ड) ग्रीड पद्धत
उत्तर- ब
25. गैर-संभाव्यता नमुना निवड म्हणजे--------
अ) संपूर्ण समग्रातील सर्व
एककांची नमुन्यामध्ये निवडीची समान शक्यता असते.
ब) संपूर्ण समग्रातील सर्व
एककांची नमुन्यामध्ये निवडीची समान शक्यता नसते.
क) अ व ब दोन्हीही ड) अ व ब दोन्हीही नाही
उत्तर- ब
26. नमुना निवडीत कमीत कमी नमुन्याचा आकार साधारणता किती असता पाहिजे.
अ) ३० ब) ६० क) ९० ड) १२०
उत्तर- अ
27. सोयीस्कर नमुना म्हणजे---------
अ) संशोधक सोयीनुसार नमुना
निवडतो.
ब) संशोधक जाणीवपूर्वक उद्देश
ठेवून नमुना निवडतो.
क) संशोधक नमुना निवडीस समान
संधी देतो.
ड) यापैकी नाही.
उत्तर- अ
28. स्वयं निर्वाचित नमुना (Self-Selection Sampling) म्हणजे-----
अ) संशोधक स्वतः नमुना निवडतो.
ब) व्यक्ती स्वतःहून
नमुन्यांचे एकक बनण्याची इच्छा संशोधकाकडे व्यक्त करतात.
क) अ व ब दोन्ही. ड) अ व ब दोन्हीपैकी एकही
नाही.
उत्तर- ब
29. गैर-संभाव्यता नमुना निवडीचे गुण कोणते ?
अ) प्रातिनिधिकतेचा अभाव ब) वस्तुनिष्ठ निष्कर्ष
क) पूर्व ज्ञानाची आवश्यकता
नसते ड) प्रातिनिधीक पद्धत
उत्तर- क
30. प्रातिनिधिकतेचा अभाव, पूर्वग्रह
दूषित आणि अशास्त्रीय पद्धत ही कोणत्या नमुना निवडीच्या उणिवा आहेत.
अ) स्वयंनिर्वाचित नमुना निवड
ब) गैर-संभाव्यता नमुना निवड
क) संभाव्यता नमुना निवड ड) कोटा पद्धत
उत्तर- ब
31. अभ्यासाच्या व्यापक क्षेत्रासाठी कोणत्या नमुना निवड पद्धतीचा वापर केला जातो?
अ) बहुमार्गी (Multi-Stage) ब) कोटा नमुना (Quota
Sample)
क) स्तरीत नमुना (Stratified
Sample ) ड) यापैकी नाही
उत्तर- अ
32. दुहेरी नमुना निवड पद्धतीत कोणत्या दोन पद्धतींचा मिलाफ आढळतो.
अ) निरीक्षण व मुलाखत ब) प्रश्नावली
व मुलाखत
क) निरीक्षण व प्रश्नावली ड) प्रश्नावली व सर्वेक्षण
उत्तर- ब
33. व्यापक नमुना निवडीचे खालीलपैकी उदाहरण कोणते?
अ) जनगणना ब) नमुना निवड क)
नमुना आकार ड) नमुना संख्या
उत्तर- ब
34. योग्य विधान निवडा.
अ) नमूना हा सर्व सग्राचा
प्रतिनिधी असावा.
ब) नमूना हा समग्राच्या तुलनेने
व्यापक असावा.
क) नमुना निवड पूर्वग्रह रहित
असावी.
ड) वरीलपैकी सर्व
उत्तर- ड
35 तथ्य संकलित करण्याच्या दोन पद्धती कोणत्या?
अ) जनगणना ब) सर्वेक्षण पद्धती
क) अ व ब दोन्हीही ड) अ
व ब दोन्हीही नाही
उत्तर- क
36. नमुना आकार, पूर्वग्रहाचे
अस्तित्व आणि विश्वसनीयता ह्या कशाच्या प्रमुख समस्या आहेत.
अ) नमुना निवड ब)
सर्वेक्षण क) निरीक्षण ड) मुलाखत
उत्तर- अ
37. नमुना म्हणजे-------
अ) ५०% ब) संपूर्ण लोकसंख्या क) लोकसंख्येचे योग्य प्रतिनिधित्व
ड) यापैकी नाही
उत्तर- क
38. व्यक्ती ते व्यक्ती मोजणी ही तथ्य संकलनाची पद्धती खालीलपैकी कोणती?
अ) निरीक्षण ब) जनगणना क) अनुसूची ड) प्रश्नावली
उत्तर- ब
39. लॉटरी पद्धत --------हे नमुना निवडीचे उदाहरण आहे.
अ) स्तरित नमुना निवड पद्धती ब)
यादृच्छिक नमुना निवड पद्धती
क) ग्रीन पद्धती ड) कोटा नमुना
निवड पद्धती
उत्तर- ब
40. नमुना निवडीची आवश्यकता खालील कोणत्या कारणासाठी असते.
अ) वेळ बचत ब) पैसा बचत क) श्रम बचत ड) वरीलपैकी सर्व
उत्तर- ड
41. लॉटरी पद्धतीत मार्गाचा अवलंब केला जातो.
अ) चिट्ट्या टाकणे ब)
नंबर देणे
क) भौगोलिक आधारावर विभाजन ड)
नमुन्याचे उपस्तर करणे
उत्तर- अ
42. नमुना निवडीबाबत अयोग्य विधान निवडा.
अ) नमुना हा संपूर्ण सामग्रीचा
एक प्रातिनिधिक अंश असावा.
ब) नमुन्याचे स्वरूप
समग्राच्या तुलनेने मोठे असावे
क) नमुना हा पक्षपात व पूर्वग्रहापासून
मुक्त असावा
ड) नमुना हा अध्ययन विषयाला
अनुकूल असावा.
उत्तर- ब
43. उत्कृष्ट नमुना म्हणजे------------
अ) संपूर्ण लोकसंख्या ब) नियंत्रित
नमुना
क) निवडलेली लोकसंख्या ड) यापैकी एकही नाही.
उत्तर- क
44. नमुना म्हणजे---------------
अ) समग्राचा प्रतिनिधी ब) संपूर्ण समग्र
क) निम्मे समग्र ड) यापैकी एकही नाही.
उत्तर- अ
45. Head-to-Head
तथ्यसंकलन--------------पद्धतीद्वारे केले जाते.
अ) नमुना निवड ब) जनगणना क) प्रश्नावली ड) मुलाखत
उत्तर- ब
46.जनगणनेत तथ्यसंकलन कोणत्या
पद्धतीने केले जात असते.
अ) मुलाखत अनुसूची ब)
निरीक्षण क) प्रश्नावली ड) समाजमिती
उत्तर- अ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.