प्रमाणशीर प्रतिनिधित्व / क्रमदेय / एकल
संक्रमणीय मतदान पद्धत :- Single Transferable
Voting System
(विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणूक मतदान पद्धत)
भारतात निवडणुकीसाठी दोन मतदान पद्धतीचा वापर केला जातो.
साधी मतदान पद्धती आणि क्रमदेय वा एकल संक्रमणीय मतदान पद्धती. साध्या मतदान
पद्धतीत उमेदवाराला एक मत देण्याचा अधिकार असतो. मतदाराला एकापेक्षा जास्त
उमेदवारांना मते देता येत नाही. निवडणुकीला योग्यतेचे असे दोन उमेदवार उभे असले तर मतदारांसमोर गंभीर समस्या
निर्माण होते. योग्यतेच्या दोन उमेदवारांपैकी एकालाच मत देता येते व दुसऱ्याला
पूर्णपणे नाकारावे लागते. हा दोष दूर करण्यासाठी एकल संक्रमणीय मतदान पद्धतीचा
वापर केला जातो. साध्या मतदान पद्धतीत सर्वात जास्त
मते मिळवणाऱ्या उमेदवाराला विजय घोषित केले जाते अर्थात त्या उमेदवाराला बहुमत
मिळाले नसले तरी सर्वाधिक मते मिळाल्यामुळे घोषित केले जाते. साध्या मतदान
पद्धतीमुळे अनेकदा मतदार संघात बहुमताचा पाठिंबा नसलेला उमेदवार देखील निवडून येतो
वास्तविक लोकशाही तत्वानुसार उमेदवाराला मतदार संघातील बहुमताचा पाठिंबा असणे
गरजेचे असते. परंतु साध्या मतदान पद्धतीत हे घडेलच असे नाही. त्यामुळे बहुमताचा पाठिंबा या लोकशाही मूलतत्त्वाशी ही निवडणूक पद्धत
जुळत नाही हा दोष दूर करण्यासाठी अनेक देशात एकल संक्रमणीय मतदान पद्धतीचा वापर केला जातो. या उलट क्रमदेय मतदान पद्धतीत एकापेक्षा जास्त मते
देण्याचा अधिकार असतो. या मतदान पद्धतीत पसंतीनुसार मतदान करावे लागते. भारतात राष्ट्रपती निवडणूक, राज्यसभा व विधान परिषदेच्या काही
जागांसाठी निवडणूक आणि विद्यापीठ प्राधिकरणाच्या निवडणुकीसाठी प्रमाणशीर
प्रतिनिधीत्व पद्धतीचा वापर केला जातो. कवयित्री बहिणाबाई चौधरी
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या
प्राधिकरणाच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीसाठी साध्या मतदान पद्धती ऐवजी
प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीचा किंवा क्रमदेय मतदान पद्धतीचा अवलंब केला जातो.
साध्या मतदान पद्धतीत कितीही उमेदवार हवे असले तरी मतदाराला एकच मत देता येते.
परंतु क्रमदेय मतदान पद्धतीत मतदाराला आपल्या पसंतीनुसार एकूण निवडून द्यावयाच्या
जागा इतकी मते देता येतात.
🗳️👉🏻 पसंतीक्रम / क्रमदेय एकल संक्रमणीय
मतदान पद्धत :-
क्रमदेय एकल संक्रमणीय मतदान पद्धतीत मतपत्रिकेवर उमेदवारांची नावे
नोंदवलेली असतात. मतदाराने मतपत्रिकेवर आपल्या पसंतीच्या नावासमोर फुली न करता
" पसंती क्रम नोंदवायचा असतो. " उदा. निवडणुकीला दहा उमेदवार उभे असून
त्यातील पाच उमेदवारांची निवड करावयाची आहे
असे गृहीत धरु मतपत्रिकेवर अ, ब, क, ग, च, ड, इ. फ. म ह, अशी दहा
नावे आहेत. मतदाराच्या दृष्टीने 'क' हा
उमेदवार अधिक योग्यतेचा आहे. योग्यतेच्या दृष्टीने क च्या नंतर अ तर अ च्या नंतर इ
व इ च्या नंतर ग आणि ग च्या नंतर म असा क्रम लागतो. त्यामुळे मतदार "क"
या उमेदवाराला पहिल्या पसंतीचे मत देतो. त्याच्या नावासमोर 1 हा आकडा टाकतो.
"अ " च्यासमोर 2 तर " इ "च्या समोर 3 , " ग"च्या 4
समोर आणि म"च्या 5 समोर हा अंक नोंदवतो. या प्रमाणे पसंती क्रमानुसार त्याला उमेदवाराच्या
नावासमोर अंक लिहून मतदान करावे लागते.
अ.क्र. |
उमेदवाराचे
नाव |
पसंती
क्रमांक |
1 |
अ |
2 |
2 |
ब |
|
3 |
क |
1 |
4 |
ग |
4 |
5 |
च |
|
6 |
ड |
|
7 |
इ |
3 |
8 |
फ |
|
9 |
म |
5 |
10 |
ह |
|
🗳️👉🏻 वैध/ अवैध मतपत्रिका :- या पध्दतीत सर्व मतपत्रिका
एकत्र केल्या जातात. त्यातील अवैध मतपत्रिका बाद केल्या जातात, मतपत्रिका अवैध असण्याची निरनिराळी कारणे असू शकतात.
उदाहरणार्थ, काही मतपत्रिका कोऱ्या असू शकतात. काही
मतपत्रिकांवर 1 हा पसंतिक्रम दोन किंवा अधिकजणांना दिलेला असू शकतो, काही मतपत्रिकांवर 1 पसंतिक्रम दिलेला नसतो. मतपत्रिका अवैध ठरण्यासाठी
अन्य काही कारणे असू शकतात.
🗳️👉🏻 कोटा पद्धत :-
मतमोजणीसाठी वैध मतपत्रिका लक्षात घेतल्या जातात. प्रथम गणिताच्या एका
सूत्रानुसार कोटा निश्चित केला जातो. या कोट्यानुसार उमेदवाराला निवडून येण्यासाठी
पहिल्या पसंतीची किमान किती मते पडणे आवश्यक आहे हे निश्चित केले जाते. प्रमाणशीर प्रतिनिधत्व पद्धतीत 50 टक्के
मते मिळाल्याशिवाय उमेदवाराला विजय घोषित केले जात नाही म्हणजे उमेदवार हा पूर्ण
बहुमताने निवडून येणे आवश्यक असते. एकापेक्षा जास्त मत देण्याचा अधिकार
असल्याकारणाने उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कोटा निश्चित केला जातो. कोटा निश्चित
करण्यासाठी पुढील सूत्राचा वापर केला जातो.उदा.विद्यापीठ. सिनेट साठी
1800 वैद्य मतदान झाले. त्यातून पाच उमेदवार निवडून द्यायचे असतील तर पुढील
सूत्राचा वापर करून कोटा काढला जातो.
कोटा काढण्याचे सूत्र पुढीलप्रमाणे आहे.
सूत्र 👉🏻
एकूण वैध मतसंख्या
कोटा = ---------------------- +१
प्रतिनिधी संख्या + १
१८००
कोटा = ------- + १= ३०१
५+१=६
अशा पध्दतीने उमेदवाराला पहिल्या
पसंतीची ३०१ मते मिळाल्यास तो कोटा पूर्ण
करून निवडून येतो.
🗳️👉🏻 मतमोजणी / मतमोजणी फेरी :- या पध्दतीत मतमोजणी पुढील
मार्गाने केली जाते. मतमोजणी करताना सर्वप्रथम पहिल्या पसंतीची मते मोजली जातात.या
फेरीत कोणत्याही उमेदवाराने कोटा पूर्ण केला नाही तर पहिल्या पसंतीची सर्वात कमी
मते ज्या उमेदवाराला पडतात तो निवडणुकीच्या रिंगणातून बाद केला जातो. या बाद
केलेल्या उमेदवाराच्या पहिल्या पसंतीच्या मतपत्रिकेतील दुसऱ्या पसंतिक्रमाची मते
मते मोजली जातात. तरी ही कोटा पूर्ण न झाल्यास सर्वात कमी मते मते असलेल्या
उमेदवाराला बाद केले जाते आणि त्याच्या पुढच्या फेरीतील मते मोजली जातात. मतमोजणीच्या अनेक फेऱ्या
होतात. कोटा पूर्ण होत नाही तोपर्यंत मतमोजणी सुरु राहते.
१) एक प्रतिनिधी मतदार संघातून सामान्य पद्धतीने
होणाऱ्या निवडणुकीतील दोष प्रमाण
प्रतिनिधी पद्धतीतून दूर केले जातात.
२) या पद्धतीमुळे समाजातील अल्पसंख्याक निवडून येण्याची शक्यता असते. कारण प्रमाणशीर
प्रतिनिधी पद्धतीत पसंतिक्रमाने मतदान करता येते. त्यामुळे समाजातील
अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व देता येते.
३) या पद्धतीला शैक्षणिक मूल्य आहे. मतदाराला
उमेदवाराची योग्यता लक्षात घ्यावी लागते. उमेदवारांच्या योग्यतेनुसार क्रम ठरवावा
लागतो. त्याप्रमाणे मतदान करावे लागते.
४) या पद्धतीमुळे मतदाराने दिलेले मत वाया जात
नाही. एखाद्या उमेदवाराने पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा ओलांडला तरी कोट्यापेक्षा
अधिक पडलेली मत दुसऱ्या उमेदवाराला हस्तांतरित करता येतात.
५) मतदारासमोर अनेक उमेदवार असतात. मतदार
त्यांची योग्यता लक्षात घेऊन त्यांना पसंती क्रम देतो. त्यामुळे मतदाराकडून सर्व
उमेदवारांना न्याय दिला जातो.
६) प्रमाणशीर प्रतिनिधी पद्धत ही लोकशाहीच्या
तत्वाशी अधिक जुळणारी आहे. कारण उमेदवाराच्या योग्यतेनुसार मतदान केले जाते.
🔴 प्रमाणशीर प्रतिनिधी दोष-
१) ही पद्धत अत्यंत गुंतागुतीची आहे.
मतदानानंतरची मतमोजणी ही अधिकच गुंतागुंतीची आहे. या पद्धतीत काही उमेदवार
क्रमाक्रमाने बाद होत जातात. त्यांच्या मतपत्रिका पुनः पुन्हा लक्षात घेऊन मते
संक्रमित केली जातात.
२) मतमोजणीच्या अनेक फेऱ्या होतात. त्यामुळे
निवडणुकीचा निकाल मिळण्याला विलंब होतो.
३) मतदाराच्या दृष्टीने ही पद्धत अवघड आहे.
त्याला उमेदवाराच्या कार्यकर्तृत्वाचा तौलनिक विचार करावा लागतो व पसंतिक्रम
ठरवावा लागतो.
४) मोठ्या लोकसंख्येच्या देशात या पद्धतीचा
अवलंब करणे कठीण जाते. ज्या समाजात निरक्षरता अधिक आहे व राजकीय जागरूकता कमी आहे, त्या समाजात या पद्धतीचा उपयोग होऊ शकत नाही.
५) या पद्धतीमुळे अनेक पक्षांचे उमेदवार व
स्वतंत्र उमेदवार निवडून येऊ शकतात. त्यातून संमिश्र सरकार निर्माण होण्याची
शक्यता अधिक असते. त्यामुळे शासनातील
एकजिनसीपणा कमी होतो. सरकारच्या स्थैर्याला मर्यादा येतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.