ई-प्रशासन अर्थ व व्याख्या, स्वरूप,उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये -
v लोकप्रशासनाच्या क्षेत्रात ई-प्रशासन ही नवीनतम आणि आधुनिक अवधारणा मानली जाते. ई-प्रशासनाला काही लोक माहिती तंत्रज्ञानयुक्त प्रशासन असे म्हणतात. ई-प्रशासन ही संकल्पना माहिती तंत्रज्ञानाच्या विकासातून जन्माला आलेली आहे. ई-प्रशासनाच्या माध्यमातून
लोकांना वेगवान पद्धतीने सेवा उपलब्ध करून देता येते. प्रशासन व्यवस्थेत क्रांतिकारी बदल करता येतात. ई-प्रशासनाच्या माध्यमातून सर्व सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देता येतात. त्यामुळे वेळ आणि काळाचे बंधन राहत नाही. ई-प्रशासन हे स्मार्ट प्रशासनाच्या दिशेने जाणारी एक पाऊल आहे.
v ई-प्रशासन अर्थ व व्याख्या -ई-प्रशासनातून ई गव्हर्नन्स ही एक बहुअंगी आणि बहुविध स्वरूपाची संकल्पना जन्माला आली. ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून नागरिक आणि शासकीय सेवकांचा आचार विचार आणि दृष्टिकोनात मूलभूत बदल घडवून आणता येतो. शासकीय सेवा सर्वसामान्यांना सहज उपलब्ध करून देता
येतात. प्रशासनाला अधिक लोकाभिमुख आणि कार्यक्षम बनविणे ई-प्रशासनात अभिप्रेत असते.
v विश्व बँकेच्या मते-ई-प्रशासन म्हणजे सरकारच्या विविध विभागामार्फत माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देणे.
v एन. गोपाल स्वामी यांच्या मते-सरकारी सेवा आणि योजनांची माहिती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लोकांपर्यंत पोचवणे म्हणजे ई-प्रशासन होय.
v जे. सत्यनारायण यांच्या मते-ई प्रशासन ही संकल्पना प्रशासनाशी संबंधित प्रशासनाचे समाजातील विविध घटकांची माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने संबंध प्रस्थापित करणे ही प्रशासनात अभिप्रेत असते.
v
ई-प्रशासनाची उद्दिष्टे-
v ई-प्रशासनाची खालील उद्दिष्टे आहेत.
v प्रशासन आणि जनता यांच्यातील संपर्कात
सुलभता आणणे.
v प्रशासकीय प्रक्रियेत जनतेचा सहभाग वाढविणे.
v प्रशासकीय व्यवहारात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व विकसित करणे.
v प्रशासनातील प्रस्थापित कार्यपद्धतीत सुधारणा घडून आणणे. प्रशासन लोकाभिमुख बनवणे आणि त्यांची व्याप्ती वाढवणे.
v प्रशासकीय कार्यक्षमता आणि गतिमानतेत वाढ घडवून आणणे.
v कागद विहिरीत प्रशासनाला चालना देणे.
v प्रशासनातील दप्तर दिरंगाई, भ्रष्टाचार, विलंबता इत्यादींचे प्रमाण कमी करणे.
v
ई-प्रशासनाची वैशिष्ट्ये-
v पारंपारिक प्रशासनापेक्षा ई-प्रशासनाची वैशिष्ट्ये पूर्णपणे वेगळे आहेत.
ती पुढीलप्रमाणे सांगता येतात.
v इलेक्ट्रॉनिक सेवादान-ई-प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कमीत कमी वेळात जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. उदा. महाराष्ट्रातील महा ई-सुविधा केंद्राच्या माध्यमातून अनेक प्रकारची प्रमाणपत्रे त्वरित उपलब्ध करून दिली जातात. इलेक्ट्रॉनिक सेवादानाच्या माध्यमातून कागदी प्रशासनाचे रूपांतर डिजीटल प्रशासनात केले जाते.
v कागद विरहित प्रशासन-ई-प्रशासनामुळे सरकारी कार्यालयातील फाईलचा ढिगारा कमी करण्यास हातभार लागतो. संगणकात डिजिटल स्वरूपात माहिती साठवता येते. इंटरनेटद्वारे ती सर्वांना केव्हाही उपलब्ध करून देता येते. त्यामुळे कागद विहिरीत प्रशासन निर्माण करता येऊ शकते. कागदविहिरीत प्रशासनामुळे वेळ आणि खर्चाची बचत होते. प्रशासनात गतिमानता देखील येते
v डिजिटलायझेशन-डिजिटलायझेशन ही एक माहितीचे रुपांतर करण्याची संगणकीय प्रक्रिया आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून माहितीचे संगणकीकरण केले जात असते. मजकूर, आवाज, प्रतिमा इत्यादी विविध प्रकारची माहिती एकाच बायनरी कोड मध्ये रूपांतरित केली जाते. डिजिटलायझेशनच्या माध्यमातून सरकारी माहिती संग्रहित व जतन केली जाते. या प्रक्रियेमुळे सरकारी माहिती जनतेला अत्यंत सहज पद्धतीने उपलब्ध करून देता येते. उदा. दाखले, प्रमाणपत्र डिजिटलायझेशन यामुळे सर्व माहिती एका क्लिकवर नागरिकांना उपलब्ध करून देता येते. उदा. ऑनलाईन सातबारा काढण्याची सोय
v संगणकीकरण- ई-प्रशासनात संगणकीकरणाला महत्वपूर्ण स्थान असते. ई-प्रशासनासाठी सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वैयक्तिक संगणक उपलब्ध करून दिले जातात. संगणक चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. संगणकामुळे माहितीचे संकलन आणि देवाण-घेवाण ही प्रक्रिया वेगवान पद्धतीने करता येते. प्रशासकीय कामात गतिमानता आणण्यासाठी संगणक आणि संगणकीय प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर ई प्रशासनात वापर केला जातो.
v एकाच ठिकाणी सेवेची उपलब्धता-ई-प्रशासनामुळे नागरिकांची विविध सरकारी कार्यालयात होणारी पायपीट आणि गैरसोय कमी झाली. शासनाच्या विविध विभागाचे संगणक मुख्य सर्वरला जोडलेले असल्याकारणाने नागरिकांनी लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी हवी ती माहिती उपलब्ध होऊ लागली आहे. उदा. ई-महा सेवा केंद्र मार्फत विविध प्रकारची
सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात.
v शासनात सुधारणा आणि पारदर्शकता-ई-प्रशासनामुळे प्रशासनाच्या क्षेत्रात व्यापक बदल झालेले दिसतात. फाईली
आणि कागदांचे महत्त्व कमी झाल्यामुळे दप्तर दिरंगाई आणि भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी झालेले दिसते. कागदपत्रे ई-स्वरूपात अपलोडिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे सरकारी कार्यालयातील फायलींचा ढीग कमी झाला. सरकारी प्रकल्प योजना आणि लाभार्थ्यांची माहिती ऑनलाइन पद्धतीने सहज उपलब्ध होऊ लागल्यामुळे प्रशासनात पारदर्शकतेला वाव मिळू लागला.
v कार्यक्षमता आणि उत्तरदायित्वास वाढ-ई-प्रशासनामुळे शासनाची कार्यक्षमता आणि उत्तरदायित्वात
वाढ झालेली दिसते. पूर्वीच्या काळात प्रशासकीय सेवा मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयात अनेकदा फेऱ्या
माराव्या लागत असे. ई-प्रशासनामुळे कार्यालयात जाण्याची आवश्यकता नसते. उदा. संगणकाद्वारे ऑनलाईन कागदपत्रे डाऊनलोड करता येतात. ई-प्रशासनात
उत्तरदायित्व संकल्पनेला महत्वपूर्ण स्थान असते. सेवा पुरवणाऱ्या सर्व घटकांचे उत्तरदायित्व कायद्याने निश्चित केलेले असते. उत्तरदायित्व नाकारणाऱ्या घटकाला ई प्रशासनास स्थान नसते.
v प्रशासनाची विश्वासार्हता वाढते-सर्वांना समान नियम आणि समाजसेवा हा ई-प्रशासनाचा मूलमंत्र आहे. त्यामुळे प्रशासनातील भेदभाव आणि पक्षपाताचे प्रमाण कमी होऊ लागले. पारंपारिक प्रशासनात बहुसंख्य कामे सनदी सेवकांकडून पार पाडले जात असत.
त्यामुळे कार्य करताना सनदी सेवकांचे वैयक्तिक पूर्वग्रह आणि पक्षपाताचा प्रभाव पडत असे. ई-प्रशासनातील तांत्रिकता आणि यांत्रिकतेच्या जोरावर कामे पार पाडली जात असल्यामुळे पक्षपाताला स्थान मिळत नसल्यामुळे प्रशासनाच्या विश्वासार्हतेत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसते.
v ऑनलाइन उपस्थिती आणि संपर्क-ई-प्रशासना द्वारे ऑनलाईन संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सरकारी विभागांनी आपल्या विभागाच्या वेबसाईट सुरु करून विभागाबद्दलची माहिती आणि पुरवल्या जाणाऱ्या सेवाबाबत सर्वांना माहिती उपलब्ध करून देण्यास सुरुवात केल्यामुळे सरकारी विभागांना ऑनलाइन उपस्थिती मध्ये सहभागी होता आले. तसेच सरकारी विभागानी विविध प्रकारच्या सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्यामुळे ऑनलाईन संपर्क प्रस्थापित करणे देखील सोपे झाले. उदा. निवडणूक आयोगाने मतदान नोंदणीची ऑनलाईन सोय उपलब्ध करून दिली.
v अशा पद्धतीने ई-प्रशासनामुळे प्रशासनाच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल होऊन नोकरशाहीवृत्ती, वशिलेबाजी आणि लाचलुचपत इ. काही प्रमाणात आळा बसलेला दिसतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.