UPS, OPS आणि NPS मध्ये काय फरक आहे?
केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी (२४
ऑगस्ट २०२५ )
युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) मंजूर केली. या योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना
निवृत्तीनंतर खात्रीशीर पेन्शन मिळणार आहे. सरकारच्या घोषणेनुसार ही योजना १
एप्रिल २०२५ पासून लागू होईल. नवीन पेन्शन योजनेत (NPS) सुधारणा करून, या
योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.
युनिफाइड पेन्शन योजना काय आहे?
•
युनिफाइड
पेन्शन योजनेची पाच प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे
•
खात्रीशीर
पेन्शन : नवीन योजनेनुसार २५ वर्षे नोकरी
केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होण्यापूर्वीच्या शेवटच्या १२
महिन्यांमध्ये मिळालेल्या सरासरी मूळ वेतनाच्या (बेसिक पे) ५० टक्के रक्कम पेन्शन
म्हणून मिळेल.
•
खात्रीशीर
किमान पेन्शन : किमान १० वर्षे सेवा बजावलेले
सरकारी कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर दरमहा किमान १० हजार रुपये इतके निवृत्तिवेतन
मिळण्यासाठी पात्र असतील.
•
खात्रीशीर
कौटुंबिक निवृत्तिवेतन :
निवृत्त व्यक्तीच्या मृत्यूनंतर कर्मचाऱ्याचे जवळचे कुटुंब त्यांच्या शेवटच्या
वेळी काढलेल्या पेन्शनच्या ६० टक्के रकमेसाठी पात्र असतील.
•
महागाई
निर्देशांक : वर नमूद केलेल्या तिन्ही पेन्शन
योजनांमध्ये महागाई सवलत असेल; ज्याची गणना औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय
ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित अशी असेल.जसे की, सेवारत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आहे
•
सेवानिवृत्तीवेळी
एकरकमी पैसे : निवृत्तीनंतर ग्रॅच्युईटीशिवाय
एकरकमी पैसे दिले जातील
OPS आणि NPS / UPS मध्ये फरक काय?
•
आयुष्यभर
उत्त्पन्न, सेवानिवृत्तीनंतर शेवटच्या पगाराच्या निम्मे ५० टक्के पेन्शन,
मृत्यूनंतर कौटुंबिक निवृत्तिवेतन, GPF
भुगतान, पेन्शन खर्च सरकार करत असे.
•
अटलबिहारी
वाजपेयी सरकारने १/१/२००४ नवीन पेन्शन योजना आणली होती. नवीन पेन्शन योजनेत
खात्रीशीर पेन्शनची हमी नाही आणि कर्मचाऱ्यांना पेन्शनमध्ये त्यांचे योगदान द्यावे
लागते. कर्मचाऱ्याच्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या १० टक्के योगदान द्यावे
लागते. २०१९ मध्ये यात १४ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. त्यामुळे या योजनेला वारंवार
विरोध होत आलाय. २०१९ NPS योजना आणली. मार्केटशी लिंक,
•
“जुनी
पेन्शन योजना ही एक विनाअनुदानित नॉन-काँट्रिब्युटरी योजना आहे. युनिफाइड पेन्शन
योजना ही एक अनुदानित योगदान योजना आहे,” असे ते म्हणाले. या योजनेंतर्गत
प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांचे योगदान १८.५ टक्क्यांपर्यंत वाढवले जाणार आहे.
UPS पेन्शन योजना दोष-
•
जुन्या
पेन्शन योजनेच्या (OPS) मागणीला पद्धतशीरपणे नाकारण्यासाठी UPS (Unified Pension Scheme) नावाची पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय
सरकारने जाहीर केला.
•
या
योजनेत ज्या 10 / 12 वर्ष पूर्ण होऊन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांस जुन्या
पेन्शन योजनेत 50% पेन्शन मिळते तशी न मिळता किमान 10,000 रु
वर बोळवण होईल, आणि हे 10,000 रु ही 10/ 12 वर्षांची कर्मचारी कपात रक्कम जप्त करून मिळतील..उदा-
जिथे OPS नुसार विनाअट 30,000 रु पेन्शन मिळायला पाहिजे तिथे UPS पेन्शन
मध्ये केवळ 10,000 पेन्शन मिळेल, व त्यासाठीही कर्मचाऱ्याचे कपातीचे
जवळपास 10 लाख रु जप्त केले जातील.
•
UPS पेन्शन योजनेत नवीन वेतन आयोग लागू होणार नाही, त्यामुळे
जुन्या पेन्शन धारकांच्या तुलनेत भरीव अशी 30 ते 40% ची पेन्शन वाढ मिळणार नाही.
•
जुन्या
पेन्शन योजनेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास वयाच्या 80 व्या वर्षी सरसकट 20% पेन्शन
वाढ मिळते, तर 85 वर्षी 30% वाढ, 90 व्या वर्षी 40% , 95 वर्षी
50% , आणि 100 वर्षी 100% पेन्शन वाढ मिळते.. तर या UPS मध्ये
तशी कोणतीही पेन्शन वाढ नसेल.
•
या
सोबतच
जुन्या पेन्शन योजनेतील कंत्राटी सेवा पेन्शन साठी ग्राह्य धरणे, सेवेत खंड क्षमापीत करणे, असे कोणतेही
लाभ नियम या सुधारित UPS पेन्शन मध्ये नसणार आहेत
कारण ही कपात आधारित पेन्शन योजना आहे..
•
अंतिम वेतनाच्या 50% पेन्शनची ग्यारंटी. अट- किमान 25
सर्व सेवा ( 25 वर्ष वेतन कपात असणे बंधनकारक) पण सेवा 25 वर्षांपेक्षा कमी असेल त्यांना त्याप्रमाणात कमी पेन्शन दर
राहील. उदा- 20 वर्ष सेवा- तर 40% पेन्शन, 15 वर्ष -
30%पेन्शन , 10 वर्ष सेवा- 20% पेन्शन/किमान पेन्शन.)
•
१०० % अंशदान मिळणार नाही तर सेवानिवृत्तीवेळी जे शेवटचं
वेतन असेल त्याच्या 10% × एकूण सेवा वर्षच्या
दुप्पट मिळेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.