https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

भारतीय संविधाना बद्दल सर्वसाधारण माहिती आणि सरनामा


*भारतीय संविधाना ऐतिहासिक पाश्वर्भूमी-
 ईस्ट इंडिया कंपनीला रानी एलिजाबेथ कडून इसवी सन १६०० मध्ये सनद प्राप्त झाली होती.
* ईस्ट इंडिया कंपनीच्या अंतर्गत कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटने १७७३ रेगुलेटिंग एक्ट संमत केला.
* प्रथम कौन्सिल कायदा१८६१ साली संमत झाला.
*१९०९ च्या सुधारणा कायद्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदार संघ बहाल करण्यात आले होते.
* द्विदल राज्यपद्धती हे १९१९च्या कायद्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
*१९३५ च्या भारत प्रशासन कायद्यानुसार संघराज्य निर्माण करण्यात आले.
* भारत स्वातंत्र्य कायद्यानुसार भारताची फाळणी करण्यात आली होती.
* घटना समितीचे हंगामी अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे होते.
* डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते.
* बी एन राव हे घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार होते.
* घटना समितीचे पहिले अधिवेशन ९ डिसेंबर१९४६ रोजी दिल्ली येथे सुरू झाले होते.
* डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते.
* मसुदा समितीत एकूण सात सदस्य होते.
* गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, के.एम.मुन्शी, मोहम्मद सादुल्ला,एन.माधवराव, टी.टी. कृष्णमचारी इत्यादी मसुदा समितीचे सदस्य होते.
* दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता, बेगम रसूल, विजयालक्ष्मी पंडित, सरोजनी नायडू, पोर्णिमा बॅनर्जी, राजकुमारी अमृतकौर असे एकूण 15 स्त्रिया घटना समितीच्या सदस्य होत्या.
* घटना तयार करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि 18 दिवस इतका कालखंड लागला.
*२६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी घटना समितीने घटना स्वीकृत केली.
*२६ जानेवारी १९५० पासून घटनेची अंमलबजावणी सुरू झाली.
* भारतीय राज्यघटनेने संसदीय पद्धत इंग्लंडच्या घटने कडून घेतली.
* भारतीय संघराज्य पद्धतीवर अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाच्या घटनेचा प्रभाव आहे.
* भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांवर अमेरिका व फ्रान्सच्या राज्यघटनेचा प्रभाव आहे.
* भारतीय घटनेतील मार्गदर्शक तत्त्वावर आयरिश घटनेचा प्रभाव आहे.
* भारतीय घटनेतील मूलभूत कर्तव्यावर रशियाच्या घटनेचा प्रभाव आहे.
* भारतीय घटनेने घटनादुरुस्तीची पद्धत दक्षिण आफ्रिकेच्या घटनेतून घेतलेली आहे.
* आणीबाणीच्या तरतुदींवर वायमर प्रजासत्ताकाच्या घटनेचा प्रभाव आहे.
* भारताच्या मूळ राज्यघटनेत 395 कलमे आठ परिशिष्ट आणि बावीस विभाग होते.
* भारतीय राज्यघटना जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे.
* भारतीय राज्य घटनेच्या उद्देश पत्रिकेत धर्मनिरपेक्षता,समाजवाद, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता य शब्दांचा समावेश बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आलेला आहे.

      भारतीय राज्यघटनेचा सरनामा-

      भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीला उद्देश पत्रिका जोडलेली आहे.

      उद्देश पत्रिकेच्या माध्यमातून राज्यघटनेचा उद्देश आणि विचार पद्धतीचे आकलन होण्यास हातभार लागतो. घटनाकारांना अपेक्षित मूल्य व्यवस्थेचे दर्शन घडते. उद्देश पत्रिका हा राज्यघटनेचा सार किंवा  अंश मानली जाते.

      पंडित नेहरू यांनी13 डिसेंबर1946 मांडलेला उद्देश पत्रिकेचा ठराव घटना समितीने मान्य करून 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटनेत समाविष्ट केला.1976 मध्ये झालेल्या 42 व्या घटनादुरुस्तीने उद्देश पत्रिकेत धर्मनिरपेक्ष, समाजवाद आणि राष्ट्रीय एकात्मता अखंडता शब्दांचा समावेश केला.

      भारतीय घटनेचा सरनामा उद्देश पत्रिका-

      आम्ही भारतीय लोक,

      भारताचे सार्वभौम, समाजवादी,धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक ,गणराज्य निर्माण करण्याचे आणि भारताच्या सर्व नागरिकांना-

      न्याय: सामाजिक,आर्थिक,राजकीय न्याय

      स्वातंत्र्य :विचार, श्रद्धा, धर्म आणि उपासना

      समता: दर्जा आणि संधीबाबत

      बंधुता: व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता राखणारी, याची शाश्वती देण्याचे घटना समितीत आज 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी विचारपूर्वक ठरवित आहोत ही घटना आमच्यासाठी मान्य आणि स्वीकृत करत आहोत.   

      सरनामा विश्लेषण, तत्वज्ञान किंवा आधारभूत तत्त्वे-

      आम्ही भारतीय लोक- घटना जनतेने तयार केलेली असून स्वच्छेने स्वीकारलेले आहे.घटनेचा अंतिम निर्माता जनता आहे. या तरतुदीतून जनतेचे सार्वभौमत्व निहित होते.

      सार्वभौम- अंतर्गत बहिर्गत कारभारात पूर्ण स्वातंत्र्य

      प्रजासत्ताक- प्रजेच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्यकारभार चालणे.

      गणराज्य- देशाचा सर्वोच्च प्रमुख जनतेचा प्रतिनिधी

      न्याय- सामाजिक,आर्थिक राजकीय न्याय

      स्वातंत्र्य-विचार, उच्चार, श्रद्धा धर्म,उपासना

      समता- दर्जाची आणि संधीची समानता

      बंधुता- व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्रीय एकात्मता

      समाजवाद- उत्पादन आणि वितरण व्यवस्थेवर राष्ट्राच्या मालकी किंवा नियंत्रण

      धर्मनिरपेक्षता- राज्याचा अधिकृत धर्म नसणे.

      राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता

     



 

 


२ टिप्पण्या:

If you have any donuts. Lets me Know.