https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

लोकमान्य टिळकांचे राजकीय विचार


  •  लोकमान्य टिळकांचे राजकीय विचार-
  • टिळकांच्या राजकीय जीवनाचे दोन कालखंड आहेत.
  • राजकीय जीवनाच्या प्रथम कालखंडात ब्रिटिशांनी केलेल्यासुधारणा आणि कामाची प्रशंसा करतात. ब्रिटिशांमुळे भारतात कायदा-सुव्यवस्था शिक्षण आणि राष्ट्रवादी विचारांचे बीजारोपण झाले.टिळकांची ब्रिटिश राजवट विषयी सुरुवातीच्या काळातील भूमिका नेमस्तांच्या भूमिकेशी मेळ खाणारी होती.
  • टिळकांनी आपल्या राजकीय जीवनात सुरुवातीच्या काळात ब्रिटिश राजवटीचे समर्थन केले असले तरीनंतरच्या काळात आपली भूमिका बदलली. ब्रिटिशराजवटीवर कठोर टीका करू लागले. ब्रिटिश राजवटीला विरोध करू लागले.
  • 1896-97 च्या दुष्काळ निवारणाचा बाबत ब्रिटिशांनी फारसे प्रयत्न केले नाही. प्लेग निवारणाच्या काळात रँड व इतर अधिकाऱ्यांनी जनतेवर केलेला अन्याय रोखण्यासाठी प्रयत्नकेल्यामुळे टिळकांनी केसरी व मराठा वर्तमानपत्रात ब्रिटिशांनी वर टीका केली.
  • लॉर्ड कर्झन यांनी केलेल्या बंगालची फाळणीमुळे टिळकांचा ब्रिटीश राजवटी वरील विश्वास उडाला. बंगालच्या फाळणीला विरोध करण्यासाठी टिळकांनी वंगभंग आंदोलनाला पाठिंबा दिला.
  • कलकत्ता अधिवेशनात चतुःसूत्रीचा ठराव मांडून ब्रिटिशांविरोधात आक्रमक भूमिका घेतली.
  • ब्रिटीश राजवटीला विरोध- 
  • भारताचा राज्यकारभार ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या लहरीवरचालतो. भारतीयांना ते राजकीय क्षेत्रात अमानुष वागणूक देतात.
  • प्रशासनातील वरिष्ठ जागांवर भारतीयांची नेमणूक करत नाही.
  • ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणामुळे भारतात दारिद्रय वाढते आहे.
  • ब्रिटिश अधिकारी हुकूमशाही वृत्तीने वागतात.
  • सरकारी पैशाच्या जोरावर चैनी व विलासी जीवन जगतात.
  • ब्रिटिश अधिकाऱ्यांना भारतीयांच्या सुखदुःखाशी देणेघेणे नाही.
  • ब्रिटिश नोकरशाहीपासून देशाला वाचवण्यासाठी टिळकांनी जहालवादी भूमिकेचा स्वीकार करून स्वराज्य प्राप्तीसाठी संघर्ष करण्याची जाहीर केले.
  • साम्राज्यशाहीची मीमांसा-
  • टिळकांनी ब्रिटिश राजवटीची खरे स्वरूप सर्वांसमोर उघड केले.
  • मवाळांच्या मांडणीतील कच्चे दुवे लक्षात घेऊन ब्रिटिश राजवटीच्या साम्राज्यशाही धोरणाची मीमांसा केली.
  • ब्रिटिशांचा उदारमतवादी, न्यायवादी आणि लोकशाहीवादीअसल्याचा दावा अमान्य केला.
  • ब्रिटिशांच्या साम्राज्यशाही नीतीला विरोध करण्यासाठी जहालवादी राजकारणाचा अवलंब केला.
  • ब्रिटिशांशी संघर्ष करण्यासाठी आवश्यक कार्यक्रम जनतेला दिला.
  • ब्रिटिश साम्राज्यशाही विरोधात राष्ट्रीय चैतन्य निर्माण करून स्वराज्य मिळवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली.
  • लोकमान्य टिळकांचे राजकीय विचार- YouTube Video Link


  • https://www.youtube.com/watch?v=RQPzmukrBm8&t=47s

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.