https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

Nature of MPSC Examination महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा स्वरूप


  •  महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा स्वरूप-
  • महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय सेवेत प्रवेश करण्यासाठीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणारी स्पर्धापरीक्षा आवश्यक असते.
  • राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने निश्चितकेलेली अहर्ता असणे आवश्यक असते. तसेच मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असते.
  • आयोगाची परीक्षा देण्यासाठी किमान वय 19 वर्ष आणिकमाल वय ते 33 वर्षे असणे आवश्यक असते. अनुसूचितजाती जमाती आणि खेळाडूंसाठी वयोमर्यादा पाच वर्षे शिथिल असते. इतर मागासवर्गीयांसाठी तीन वर्ष वयाची शिथिल केलेली असते.
  • अपंग व्यक्ती वयाच्या 45 व्या वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकते
  • राज्य सेवा आयोग परीक्षा स्वरूप-
  • राज्यसेवा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना तीन टप्प्यातून जावे लागते. त्यातील पहिला टप्पा म्हणजे पूर्वपरीक्षा होय.
  • राज्यसेवा पूर्व परीक्षा- पूर्व परीक्षा ही चाळणीच्या स्वरूपात असते. पूर्व परीक्षेत दोन पेपर असतात.
  • अ) पेपर पहिला- पहिला पेपर 200 गुणांचा असतो.200 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. प्रश्नांचे स्वरूप बहुपर्यायी असते. प्रश्न सोडवण्यासाठी दोन तासाचा वेळ दिला जातो. प्रश्न सोडवण्याची माध्यम इंग्रजी आणि मराठी असते.चालू घडामोडी, महाराष्ट्राने भारताचा इतिहास व भूगोल,भारतीय राज्यपद्धती आणि पंचायतराज, आर्थिक आणि सामाजिक विकास, सामान्य विज्ञान आणि पर्यावरणाबद्दलचे पदवी स्तरापर्यंत चे प्रश्न विचारले जातात.
  • ब) पेपर दुसरा- दुसऱ्या पेपरमध्ये 200 गुणांसाठी 80 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. प्रश्न सोडवण्यासाठीदोन तासाचा वेळ दिला जातो. या पेपरमध्ये आकलन क्षमता, संवादकौशल्य सहित आंतरवैयक्तिक कौशल्य,तर्कसंगत विश्लेषण, निर्णय क्षमता व समस्यानिराकरण, सामान्य बुद्धिमत्ता चाचणी, दहावीपर्यंतचे अंकज्ञान व माहिती विश्लेषण आणि बारावी पर्यंतचे मराठी व इंग्रजी भाषा लेखन व आकलन कौशल्य इत्यादीघटकावर प्रश्न विचारले जातात.
  • आयोगाने निर्धारित केलेले गुण प्राप्त करणाऱ्या परीक्षार्थीला लेखी परीक्षेत बसण्याची परवानगी दिली जाते.
  • राज्यसेवा मुख्य परीक्षा स्वरूप-मुख्य परीक्षा 800 गुणांची असते. परीक्षार्थींना एकूण सहा पेपर द्यावे लागतात. पेपर चा अभ्यासक्रम आयोगाच्या वेबसाईटवर दिलेला असतो. वस्तुनिष्ठ प्रश्न असलेल्या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धतीचा वापर केला जातो.तीन चुकीचे उत्तराबद्दल एक गुण वजा केला जातो.
  • भाषा पेपर 1- या पेपर मध्ये उच्च माध्यमिक शालांत दर्जाचे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमधील 50- 50 गुणांची प्रश्न विचारले जातात. प्रश्नांचे उत्तर वर्णनात्मक स्वरूपात लिहावे लागते. प्रश्न सोडवण्यासाठी तीन तास दिले जातात.
  • भाषा पेपर 2- या पेपरमध्ये पदवी स्तरापर्यंतचे मराठी आणि इंग्रजी भाषेतील 50- 50 गुणांचे असे एकूण 100 गुणांचे प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न एक गुणासाठी असतो. प्रश्नांचे उत्तर बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असते. प्रश्न सोडवण्यासाठी एक तासाचा कालावधी दिला जातो.
  • सामान्य अध्ययन पेपर - राज्यसेवा परीक्षेत सामान्य अध्ययनाबद्दल एकूण चार पेपर असतात.या प्रत्येक पेपरात 150 गुणांचे150 पदवी स्तरावरचे बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. प्रत्येक पेपर सोडवण्यासाठीसोडवण्यासाठी दोन तासाचा कालावधी दिलेला असतो.पेपरचे माध्यम इंग्रजी आणि मराठी असते. भाषेचे 200 गुणांचे दोन पेपर आणि सामान्य अध्ययनाचे 600 गुणांचे चार पेपर असे एकूण 800 गुणांसाठी सहा पेपर द्यावे लागतात.
  • लेखी परीक्षेत मिळालेल्या या गुणांच्या आधारावर आयोग किमान गुण Cut of list विविध पदे आणि प्रवर्गानुसार निश्चित करतो. मुलाखतीस पात्र ठरण्यासाठी आयोगाने निश्चित केलेले गुण प्राप्त करणे आवश्यक असते. त्यासाठी आयोगाने विविध प्रवर्गाचे पर्सेंटाइल निश्चित केलेले आहेत.
  • मुलाखत- लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पदानुरुप ऑनलाइन पद्धतीने पसंतीक्रम भरावा लागतो. मुलाखत ही साधारणता 100 गुणांची असते. मुलाखतीत उमेदवाराची कार्यक्षमता,भाषा, प्रसंगावधान, त्वरित निर्णय क्षमता,बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व इत्यादींची तपासणी केली जाते.
  • मुख्य परीक्षेतील गुण आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारावर अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते.
  • उमेदवाराला मिळालेले गुण आणि त्याने सेवेसाठी दिलेल्या प्राधान्यक्रमाचा विचार करून आयोग संबंधित विभागाकडे उमेदवाराची शिफारस करतो. शिफारशीच्या आधारावरसंबंधित विभाग उमेदवारांना परीक्षाविधीन कालावधीसाठीनियुक्ती पत्र देते. प्रशिक्षण व परीक्षाविधीन कालावधीसंपल्यानंतर कायमस्वरूपी नियुक्तीपत्र दिले जाते.


  • Nature of MPSC Examination YouTube Video Link
  • https://www.youtube.com/watch?v=RDHqSsZW_M8&t=169s

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.