उपजिल्हाधिकारी राजपत्रित अधिकारी अ वर्ग पद आहे. राज्यसेवेतील सर्वोच्च पद आणि दहा ते पंधरा वर्षे सेवेनंतर जिल्हाधिकारी बनण्याची संधी प्राप्त होते.
उपजिल्हाधिकारी नेमणूक-
उपजिल्हाधिकारी पदावर सरळ सेवा भरती आणि बढतीच्या मार्गानेनेमणूक होत असते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षेतसर्वोत्तम गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारास उपजिल्हाधिकारी पदीनेमणूक केली जात असते.
तहसीलदार पदावर दहा ते पंधरा वर्षे सेवा केल्यानंतर बढती द्वारे किंवा विभागीय परीक्षा देऊन उपजिल्हाधिकारी बनता येते.
उपजिल्हाधिकारी परीक्षा-
उपजिल्हाधिकारी परीक्षा देण्यासाठी पदवी असणे अनिवार्य असते.पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येते. परंतु मुलाखतीच्या आधी पदवी प्राप्त करणे आवश्यक असते.
परीक्षा देण्यासाठी खुला प्रवर्ग-18 ते 38, मागास प्रवर्ग-18 ते 43 अपंग-18 ते 45
परीक्षा तीन टप्प्यात होते.
पूर्व परीक्षा-400 गुणासाठी दोन पेपर पहिला पेपर सामान्य ज्ञान 200 गुण, दुसरा पेपर200 गुण C-CAT
मुख्य परीक्षा- एकूण 6 पेपर, दोन पेपर इंग्रजी मराठी भाषा आणि चार पेपर-इतिहास भूगोल भारतीय राज्यघटना राजकारण मानवी हक्क अर्थशास्त्रअर्थव्यवस्था विज्ञान व तंत्रज्ञान आणि पर्यावरण विषयाबद्दलचे सामान्य-ज्ञान
मुलाखत- मुलाखतीत व्यक्तिमत्व तपासणी, निर्णय क्षमता
परीक्षेचे तिन्ही टप्पे यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या परीक्षार्थी उपजिल्हाधिकारीम्हणून निवड केली जाते. उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झालेल्याउमेदवाराची एकूण पंधरा प्रकारच्या पदांवर निवड होऊ शकते.उपविभागीय अधिकारी, निवासी जिल्हाधिकारी, विविध खात्याचे उपजिल्हाधिकारी म्हणून नेमणूक होऊ शकते.
उपजिल्हाधिकारी अधिकार व कार्य-
उपजिल्हाधिकाऱ्यांना मिळालेले नेमणूकी नुसार कार्य करावे लागते.
उपविभागीय अधिकारी म्हणून नेमणूक मिळाल्यास शांतता वसुव्यवस्था, महसूल वसुली, निवडणूक अधिकारी, पोलीस पाटलांचीनेमणूक, आपत्ती व्यवस्थापन आणि रोजगार हमी योजनेचीअंमलबजावणी इत्यादी कामे करावी लागतात.
विविध खात्याचा उपजिल्हाधिकारी म्हणून कार्य करताना त्या खात्याशीसंबंधित कार्य पार पाडावे लागते.
निवासी जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक मिळाल्यास वरिष्ठ व कनिष्ठकार्यालयात समन्वय निर्माण करणे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत जिल्हा प्रशासन सांभाळणे. जिल्हा प्रशासनात सुसूत्रता आणणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.