https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

Gram Sevak ग्रामसेवक


 ग्रामसेवक पदाचे महत्त्व

       ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय प्रमुखास ग्रामसेवक असे म्हणतात.

       ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सचिव असतो.   त्याची नेमणूक, बदली आणि भरतीचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असतो.

       एक किंवा एकापेक्षा जास्त ग्रामपंचायतीसाठी एका ग्रामसेवकांची नियुक्ती केली जाते.

       ग्रामसेवकावर गट विकास अधिकारी यांचे नियंत्रण असते.

  ग्रामसेवक पात्रता-

       ग्रामसेवक हा ग्रामप्रशासनातील वर्ग 3 चा सर्वात कनिष्ठ अधिकारी असतो.

       ग्रामसेवकाचे वेतन भत्ते जिल्हा निधीतून दिले जातात.

         ग्रामसेवक पदासाठी 60 गुणांनी बारावी पास किंवा  MCVC शाखेतून बारावी पास, कृषी पदविका किंवा कृषी पदवी, BSW म्हणजे समाज कल्याण पदवी, इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी,B.tech पदवी

       MS-CIT संगणक परीक्षा उत्तीर्ण

       परीक्षा देण्यासाठी वय 18 ते 38 दरम्यान

ग्रामसेवक परीक्षा स्वरूप-

       ग्रामसेवक पदासाठी जिल्हा निवड मंडळाकडून परीक्षा घेतली जाते. परीक्षा एकूण 200 गुणांची असते.

       परीक्षेत 100 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात.   एका प्रश्नासाठी दोन गुण असतात.

       कृषी- 80 गुणांसाठी 40 प्रश्न

       इंग्रजी व्याकरण- 30 गुणांसाठी 15 प्रश्न

       मराठी व्याकरण- 30 गुणांसाठी 15 प्रश्न

      बुद्धिमत्ता चाचणी- 30 गुणांसाठी 15 प्रश्न

    सामान्य ज्ञान चाचणी- 30 गुणांसाठी 15 प्रश्न

ग्रामसेवक अधिकार कार्य-

       ग्रामपंचायतीचा हिशोब ठेवणे.

       ग्रामपंचायत क्षेत्रातील जन्म मृत्यू आणि विवाहाची नोंद ठेवणे.

       कर वसुली करणे आणि ग्रामपंचायतीचा पत्रव्यवहार पाहणे.

       गावातील लोकांना शासनाच्या विविध योजना बद्दल माहिती देणे.

       ग्रामपंचायत सभांना उपस्थित राहून सभेचे इतिवृत्त लिहिणे.

       ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प तयार करणे.

       ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कार्यावर देखरेख नियंत्रण ठेवणे

       ग्रामपंचायतीचा हिशोब ठेवणे.

       ग्रामपंचायत क्षेत्रातील जन्म मृत्यू आणि विवाहाची नोंद ठेवणे.

       कर वसुली करणे आणि ग्रामपंचायतीचा पत्रव्यवहार पाहणे.

       गावातील लोकांना शासनाच्या विविध योजना बद्दल माहिती देणे.

       ग्रामपंचायत सभांना उपस्थित राहून सभेचे इतिवृत्त लिहिणे.

       ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प तयार करणे.

       ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कार्यावर देखरेख नियंत्रण ठेवणे.

       ग्रामपंचायतीने मंजूर केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.

       गावाच्या हद्दीतील रोजगार हमी योजनेच्या कामाची नोंद घेणे.

       ग्रामपंचायतीची कागदपत्रे, विवरणपत्रे, हिशोब दस्तऐवज सांभाळणे.

       आपल्या कार्याचा अहवाल गटविकास अधिकार्‍यांकडे सुपूर्त करणे.

       ग्रामसभांना उपस्थित राहून मंजूर ठरावांची अंमलबजावणी करणे

ग्रामसेवक you tube Video Link



 https://www.youtube.com/watch?v=Hdxprjq1KRc&t=8s

 

1 टिप्पणी:

If you have any donuts. Lets me Know.