https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा इतिहास आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ-


 

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा इतिहास-

       महाराष्ट्र एकीकरणाच्या प्रयत्नांची सुरुवात ब्रिटिश राजवटीत झाली.

       बंगालची फाळणी रद्द झाल्यानंतर केसरी वर्तमानपत्रात भाषा आणि राष्ट्रीयत्व  हा लेख लिहून .चि.केळकरांनी मराठी भाषा  बोलणारी लोकसंख्या  एका अंमलाखाली असावी  ही इच्छा प्रदर्शित केली .

       1921 साली अहमदाबाद येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भाषिक राज्य निर्मितीचा ठराव पास केला.

       विठ्ठल ताम्हणकर यांनी लोकशिक्षण मासिकात तिभंगलेला महाराष्ट्र हा लेख लिहून मराठी भाषेत प्रदेश एका राजवटीखाली आणण्याची मागणी केली.

       .वि. पटवर्धन यांनी जोत्स्ना मासिका मार्फत 40 नामवंत नेते लेखकांकडून संयुक्त महाराष्ट्र बाबत प्रश्नावली भरून घेतली.

        1940 साली उज्जैन येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष .त्र्यं.माडखोलकरांनी सर्व राजकीय व्यवस्थेच्या नियंत्रणाखाली  आणण्याची भूमिका मांडली होती .

       संयुक्त महाराष्ट्र चळवळ-

       1940 साली बॅरिस्टर रामराव देशमुख यांनी संयुक्त महाराष्ट्र सभेची मुंबई स्थापना केली. सभेने महाराष्ट्र एकीकरण परिषद बोलून संयुक्त महाराष्ट्र बद्दल चर्चा केली.

       1947 आली बेळगाव येथील साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा ठराव संमत झाला.

       26 जुलै 1946 सर्वपक्षीय संयुक्त महाराष्ट्र परिषदेची मुंबई स्थापना झाली.

       घटना समितीने भाषावार प्रांतरचनेचा अभ्यास करण्यासाठी दार आयोग नेमला.

       जेव्हीपी समितीने भाषावार प्रांतरचना साठी हा काळ योग्य नाही हे मत प्रदर्शित केले.

       दार आयोगाने भाषावार प्रांतरचना विरोधी मत व्यक्त केले.

       राज्यांची पुनर्रचना करण्यासाठी केंद्राने फाजलअली आयोग नेमला. या कमिशनने मुंबई वगळून महाराष्ट्राची शिफारस केली. स्वतंत्र विदर्भ राज्याची शिफारस केली.

       राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीनुसार 1 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबई द्विभाषिक राज्याची स्थापना केली.

       संयुक्त महाराष्ट्र स्थापनेसाठी सर्व विरोधी पक्षांनी पुणे येथे एकत्र येऊन सहा फेब्रुवारी 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केली. महाराष्ट्रात जनजागृती आणि दिल्ली येथे मोर्चा नेला. मुंबई महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत समितीला यश प्राप्त झाले.

       वाढत्या लोकमताच्या दडपणामुळे द्विभाषिक मुंबई राज्य भंग करून 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली.

       महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी एकशे पाच लोकांना बलिदान द्यावे लागले.

       श्री यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले.


संयुक्त महाराष्ट्र चळवळ- You Tube Video Link


      


 https://www.youtube.com/watch?v=_1U9onNS1Oc&t=60s

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.