https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

Introduction of Maharashtra महाराष्ट्राची ओळख-


 

महाराष्ट्राची ओळख-

       महाराष्ट्र नावाची उत्पत्ती-

       महाराष्ट्र संज्ञेचा वापर व्या आणि ६व्या शतकात केला गेला.

       सातवाहन कालीन शिलालेखात'महारठी'हा उल्लेख.

       बौद्ध साहित्यात 'महारठ्ठ' हा उल्लेख.

       महाराष्ट्र म्हणजे महान मोठे राष्ट्र.

       प्राकृत भाषेवरून प्रदेशाचे नाव महाराष्ट्र पडले.

       जॉन विल्सन यांनी मोल्सवर्थ कोशात महार+राष्ट्र=महाराष्ट्र ही व्युत्पत्ती मांडली.

       ओपर्ट यांनी भारतातील मूळ रहिवाशी'ग्रंथात महाराष्ट्राला मल्लराष्ट्र म्हटले.मल्ल म्हणजे मार आणि मार म्हणजे म्हार म्हणतात.

       अशोक शिलालेखात  राष्ट्रिक लोकांचा उल्लेख  महाराष्ट्राच्या संदर्भात केला आहे

       महाराष्ट्र शब्दाची उत्पत्ती 'रट्ठ्' नावाच्या प्राचीन जातीतून झाली.

       डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रामशास्त्री भागवत यांच्या मते महार नावाच्या  जातीतून महाराष्ट्र हे नामकरण झाले.

       डॉक्टर काणे महान राष्ट्र ते महाराष्ट्र

       चि.वि.वैद्य मल्ल लोकांचे राष्ट्र ते महाराष्ट्र

       काही अभ्यासकांच्या मते मराठा शब्दापासून महाराष्ट्र हे नाव पडले.

       महाराष्ट्र शब्दाचा अर्था बाबत अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत.

       परंतु चक्रधर स्वामी ज्ञानेश्वरांनी मराठी भाषा महाराष्ट्राचा  स्पष्ट उल्लेख केलेला आहे. महाराष्ट्र ही संकल्पना मध्ययुगीन काळात अस्तित्वात आल्याचे दिसते.

       महाराष्ट्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी-

       बाराव्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या काळात बहुसंख्य मराठी प्रदेश त्यांच्या अमलाखाली होता.

       अल्लाउद्दीन खिलजीने यादवांचा पराभव करून महाराष्ट्रात मोगल सत्तेची स्थापना केली.

       हसन गंगू बहमनी यांनी बहामनी राज्याची स्थापना केली. अंतर्गत सत्तासंघर्ष तून बहामनी राज्याचे पाच तुकडे पडले. उदा.निजामशाही, आदिलशाही,कुतुबशाही

       उत्तर भागावर मोगलांचे आणि कोकण देशावर सतराव्या शतकात शिवाजी महाराजांचे राज्य होते.

       पेशव्यांच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रावर सत्ता होती. सत्तेचा विस्तार उत्तरे पर्यंत झाला.

       इंग्रजांनी अठराशे अठरा मध्ये पेशव्यांचा पराभव करून आपली सत्ता स्थापन केली.

       महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती-

       भौगोलिक दृष्ट्या तिसऱ्या क्रमांकाचे राज्य

       3लाख08 चौ.कि.मी.भूप्रदेश, भारताच्या भूप्रदेशात पैकी9.8 टक्के भूप्रदेश महाराष्ट्राचा

       सहा सीमावर्ती राज्य- गुजरात,मध्य प्रदेश, छत्तीसगढ,गोवा ,कर्नाटक आणि आंध्र प्रदेश

       दक्षिणोत्तर विस्तार सातशे किमी  तर  पूर्व-पश्चिम विस्तार  आठशे किमी

       720 किलोमीटर समुद्रकिनारा, 49 बंदरे त्यात मुंबई आणि न्हावाशेवा  आंतरराष्ट्रीय बंदरे

       महाराष्ट्राचे चार प्राकृतिक विभाग-. कोकण किनारपट्टी . सह्याद्री पर्वतरांग . पूर्वेकडील पठारी प्रदेश . उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांग

       महाराष्ट्राचे सामाजिक आर्थिक जीवन-

       हिंदू,मुस्लीम, बौद्ध,ख्रिश्चन,पारशी आणि ज्यू इत्यादी समुदायाचे वास्तव्य

       मराठी राजभाषा अहिराणी, वऱ्हाडी आणि कोकणी  बोलीभाषा

       हिंदी,उर्दू आणि गुजराती भाषिकांची संख्या बऱ्यापैकी

       प्रमुख व्यवसाय शेती बाजरी, ज्वारी,कापूस,मका,ऊस ही प्रमुख पिके कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त

       हे 40 टक्के लोक नागरी भागात तामिळनाडू नंतर देशात दुसरा क्रमांक नागरी लोकसंख्येचा

        2011 च्या जनगणनेनुसार 11 कोटी 23 लाख 74 हजार 333 इतकी लोकसंख्या भारतात दुसरा क्रमांक

          महाराष्ट्रात साक्षरता 82.9 स्त्रियांचे प्रमाण हजारामागे 929

       महाराष्ट्राचे राजकीय जीवन-

       मुख्यालय मुंबई, विधानसभा आणि विधान परिषद अशी द्विगृही सभागृहे विधानसभा 288 तर विधान परिषद 78 सदस्य

        राज्यपाल कार्यकारी प्रमुख तर मुख्यमंत्री वास्तव प्रमुख

       मुख्यमंत्र्यांसह त्रेचाळीस मंत्री

       सहा प्रशासकीय विभाग- कोकण, नाशिक, पुणे,अमरावती ,औरंगाबाद आणि नागपूर

       महाराष्ट्रातील 36 जिल्हे आणि 358 तालुके आहेत.

       अहमदनगर सर्वात मोठा जिल्हा आणि मुंबई उपनगर सर्वात लहान जिल्हा

       महाराष्ट्रात एकूण 28800 ग्रामपंचायती, पंचायत समिती 358, जिल्हा परिषद 34

       354 नगरपालिका, 124 नगरपंचायत आणि 27 महानगरपालिका

        Maharashtra State Administrative Division and District You tube video Link

https://www.youtube.com/watch?v=XAaJSVuBx80&t=8s

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.