सनदी सेवा-
•
लोकप्रशासनाचे क्षेत्रात सनदी सेवेला महत्वपूर्ण स्थान असते.
•
प्रोफेसर विलोबी यांनी सेवक प्रशासनाच्या तीन व्यवस्था सांगितले आहेत.
•
1. नोकरशाही व्यवस्था- नोकरशाही व्यवस्था जनतेच्या प्रभावी नियंत्रणापासून मुक्त असते. सर्व सत्ता अधिकाऱ्यांच्या हाती केंद्रित असते.
•
2. कुलीन तंत्र व्यवस्था- वर्गश्रेष्ठत्वाच्या आधारावर वरिष्ठ व कुलीन वर्गात वरिष्ठ प्रशासकीय पदांचे वाटप केले जाते.
•
3. लोकशाही पद्धत- सर्वांना समान संधी आणि गुणवत्तेच्या आधारावर सनदी सेवकांची भरती केले जाते.
•
सनदी सेवेची ऐतिहासिक पार्श्वभूमी-
•
भारतात सनदी सेवेची पायाभरणी ब्रिटिश राजवटीने केली.
•
ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरांना सनदी सेवक म्हटले जात होते.
•
लॉर्ड मेकाले समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारावर केलेल्या शिफारशींच्या आधारावर 1855 मध्ये 'सिव्हिल सर्व्हिस कमिशन, स्थापन करण्यात आले. या कमिशन मार्फत गुणवत्तेच्या आधारावर निवड केली जाऊ लागली.
•
1919 च्या कायद्यानुसार 1जानेवारी 1926 'केंद्रीय सनदी सेवा आयोगाची' भारतातील सनदी सेवकाच्या हा स्वतंत्र आयोग नेमण्यात आला.
•
1935 च्या कायद्यानुसार केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नामकरण सांघिक लोकसेवा आयोग करण्यात आले आणि प्रांतांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात आले.
•
26 जानेवारी 1950 सांघिक लोकसेवा आयोगाचे नाव बदलून संघ लोकसेवा आयोग असे करण्यात आले.
•
सनदी सेवेचा अर्थ-
•
फायनर यांच्या मते- नागरी सेवा म्हणजे व्यावसायिक प्रशासकीय नोकरवर्ग की जो कायमस्वरूपी,पगारी आणि कुशल असतो.
•
ग्लडन यांच्या मते- नागरी सेवा म्हणजे जो आपल्या कार्यात निपूण असून स्व हितापेक्षा राष्ट्र सेवेला वाहून घेतो. कोणत्याही पक्षाचे व वर्गाचे हित जोपासत नाही.
•
डिमाक डिमाक- यांच्या मते कायमस्वरूपी नोकरी, अराजकीय स्वरूप असलेला व व्यवसायिक दर्जा प्राप्त झालेला पूर्णवेळ काम करणारा नोकर म्हणजे सनदी सेवक होय.
•
सनदी सेवेची वैशिष्ट्ये-
•
सनदी सेवक हा व्यवसायिक प्रशासक असतो.
•
सेवक प्रशासन अधिकार परंपरा तत्वावर आधारलेले असते.
•
सनदी सेवकांना सेवेची शाश्वती दिलेली असते. ते कायमस्वरूपी पदावर राहतात.
•
सनदी सेवक कायदेमंडळाला जबाबदार नसतात.
•
सनदी सेवकांना कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे लागते.
•
सनदी सेवकांना निपक्षपातीपणे आणि तटस्थपणे काम करावे लागते.
•
सनदी सेवकांना राजकारणापासून अलिप्त राहून काम करावे लागते.
•
सनदी सेवकांना मोबदला म्हणून योग्य पगार दिला जातो.
•
सनदी सेवकांची कार्य-
•
राजकीय प्रमुखांना सल्ला देणे आणि मदत करणे.
•
शासकीय निर्णयाची अंमलबजावणी करणे.
•
प्रदत्त विधिनियम तयार करणे.
•
प्रशासकीय न्यायदान करणे.
•
लोककल्याणकारी कार्य करणे.
•
जनतेच्या अडीअडचणी सोडवणे.
•
देशाच्या विकासाला हातभार लावणे.
•
आर्थिक स्वरूपाची कार्य पार पाडणे.
•
परस्पर विरोधी हितात समन्वय साधणे.
•
सनदी सेवेचे गुण-
•
सनदी सेवक कुशल व प्रशिक्षित असतात.
•
सनदी सेवक शिस्तीचे पालन करतात.
•
सनदी सेवकांमुळे प्रशासनाला स्थैर्य प्राप्त होते.
•
सनदी सेवेमुळे लोककल्याणकारी कार्य करणे शक्य होते.
•
सनदी सेवक शासन व जनतेला उत्तरदायी असतात.
•
सनदी सेवकात पक्षपातीपणाचा अभाव असतो.
•
सनदी सेवेमुळे प्रशासनात एकता निर्माण होते.
•
सनदी सेवेचे दोष-
•
सनदी सेवेत अनेकदा अकार्यक्षम व्यक्तीची निवड होते.
•
सनदी सेवेत दप्तर दिरंगाईचा दोष असतो.
•
सनदी सेवेत लाचलुचपत आणि वशिलेबाजी आढळून येते.
•
सनदी सेवेत नोकरशाही प्रवृत्ती वाढत आहे.
•
सनदी सेवक सत्तेचा बेजबाबदारपणे वापर करतात.
•
सनदी सेवक परंपरावादी आणि अनुदारवादी असतात.
•
सनदी सेवक उद्देशपूर्तीपेक्षा साधना ला जास्त महत्व देतात.
•
सनदी सेवकांमध्ये हुकूमशाही वृत्तीचा विकास होताना दिसतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.