https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

महापौर-


 

  • महापौर-
  •  महानगरपालिकेच्या कार्यकारी आणि राजकीय प्रमुखास महापौर असे म्हणतात.
  • महापौर हा महानगराचा प्रथम नागरिक मानला जातो.
  • महानगरपालिकेची निवडणुका झाल्यानंतर पहिल्या बैठकीत विधी सभेचे सदस्य आपल्या मधून एकाची महापौर आणि दुसर्याची उपमहापौर म्हणून निवड करतात.
  • महापौरांचा कालावधी अडीच वर्षे इतका असतो. हा कालावधी संपल्यानंतर पुन्हा निवडणूक लढवता येते.
  • राजीनामा=
  • महापौर अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण होण्याच्या आधी स्वच्छेने राजीनामा देऊ शकतो किंवा विधी सभेनेअविश्वास प्रस्ताव दोन तृतीयांश बहुमताने संमत केल्यास त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो.
  • महापौर आपल्या पदाचा राजीनामा विभागीय आयुक्तांकडे देतो तर उपमहापौर महापौरांकडे देऊ शकतो.
  • महापौरपदासाठी काही जागा राखीव असतात. आरक्षित जागेवर त्याच प्रवर्गातील व्यक्तीला महापौर बनता येते.
  • महापौरपद हे प्रतिष्ठेचे शोभेचे पद आहे. त्या पदाला फारसे अधिकार दिलेले नाहीत.
  • महापौर अधिकार कार्य-
  • महानगरपालिकेचे सभा बोलून तिची अध्यक्षस्थान भूषविणे.
  • सभेचे संचालन करणे वशिष्ठ निर्माण करणे. सभेत विविध विषयांवर चर्चा घडवून आणणे. सभेचे कामकाज चालवणे शक्य नसल्यास सभा स्थगित करणे.
  • महानगरपालिकेच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
  • महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांवर देखरेख नियंत्रण ठेवणे.
  • समान मते पडल्यास निर्णायक मत देणे.
  • राज्य शासनाने सोपविलेली कामे पार पाडणे आणि आपल्या कार्याचा अहवाल राज्य शासनाला देणे
  • शहराचा प्रथम नागरिक म्हणून नगराचे प्रतिनिधीत्व करणे.
  • महानगरपालिकेचे हिशोब, कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे.
  • नगर आयुक्त यांच्या मदतीने शहराच्या विकासासाठी योजना तयार करून परिषदेची मंजुरी घेणे.
  • परिषदेने संमत केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.
  • शहरातील सांस्कृतिक कार्यक्रमांना मदत करणे आणि उपस्थित राहणे.
  • शहरात येणारे पाहुणे आणि विशेष अतिथींचे स्वागत करणे.
  • महानगरपालिकेत विरोधी पक्षनेत्या मान्यता देणे.
  • शहर विकासाच्या दृष्टिकोनातून सर्व अत्यावश्यक अधिकार महापौरांना असतात.
  • महापौरांच्या अनुपस्थितीत या सर्व जबाबदाऱ्या उपमहापौरपार पाडत असतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.