नगराध्यक्ष-
- नगरपालिकेच्या कार्यकारी प्रमुख आणि राजकीय प्रमुखास नगराध्यक्ष म्हणतात.
- नगराध्यक्ष हा शहराचा पहिला नागरिक मानला जातो.
- नगराध्यक्ष पूर्वी जनतेकडून निवडलेल्या नगरसेवकांकडून अडीच वर्षासाठी निवडला जात असे. भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना जनतेकडून प्रत्यक्ष व गुप्त मतदानाद्वारे नगराध्यक्षांची पाच वर्षासाठी निवड केली जाऊ लागली.महाविकास आघाडी सरकारने प्रत्यक्ष जनतेकडून नगराध्यक्ष निवडण्याची पद्धत रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
- नगराध्यक्षपदासाठी शासकीय नियमाप्रमाणे आरक्षण असते.
- मानधन-नगराध्यक्षांना नगरपालिका निधीतून पुढील प्रमाणे मानधन व अतिथ्य भत्ता दिले जातात.
- अ वर्ग नगरपालिका पंचवीस हजार मानधन आणि 36000 आतिथ्य भत्ता
- ब वर्ग नगरपालिका 20 हजार रुपये मानधन आणि चोवीस हजार अतिथ्य भत्ता
- क वर्ग नगरपालिका 15000 मानधन आणि 18 हजार रुपये अतिथ्य भत्ता
- नगरसेवकांना कोणतेही मानधन वा अतिथ्य भत्ता दिला जात नाही मात्र शंभर रुपये मिटींग भत्ता दिला जातो.
- राजीनामा-
- नगराध्यक्षांची निवड झाल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदस्य आपल्यामधून एकाचीउपनगराध्यक्ष म्हणून निवड करतात. या निवडणुकीत समान मते पडल्यास नगराध्यक्ष निर्णायक मत देऊ शकतो.
- नगराध्यक्ष आपला कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी स्वच्छेने राजीनामा देऊ शकतो. नगरपालिका सदस्यांनी दोन-तीनदिवस बहुमताने अविश्वास प्रस्ताव मंजूर केल्यास त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागतो.
- नगराध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकार्यांकडे देतो तर उपनगराध्यक्ष नगरसेवक आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्ष कडे देतात.
- नगराध्यक्ष अधिकार व कार्य-
- नगराध्यक्ष नगरपालिका प्रशासनाचा केंद्रबिंदू असल्यामुळे त्यांना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.
- नगरपालिकेचे सभा बोलणे व सभेचे अध्यक्षस्थान भूषविणे.
- सभेचे संचालन करणे आणि सभागृहात शिस्त निर्माण करणे.
- नगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून कागदपत्रे , प्रतिवृत्ते,हिशोब व अहवाल मागविणे.
- नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांवर देखरेख व नियंत्रण ठेवणे.
- राज्य शासनाने सोपविलेली कामे पार पाडणे.
- आपल्या कार्याचा जिल्हाधिकारी व राज्य शासनास अहवाल पाठवणे.
- शहराचा प्रथम नागरिक म्हणून नगराचे प्रतिनिधित्व करणे.
- मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे आणि त्याच्या मदतीने अंदाजपत्रक तयार करणे.
- शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून नवीन नवीन योजना व कार्यक्रमांची आखणी करणे.
- परिषदेने मंजूर केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.
- नगरपालिकेचे हिशोब,कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांवर देखरेख ठेवणे.
- शहर विकासासाठी नगर आयुक्तांच्या मदतीने विकास योजना तयार करून परिषदेची मंजुरी घेणे.
- जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक कारवाई करणे.
- जनतेच्या तक्रारींची दखल घेणे.
- नगराध्यक्षांच्या अनुपस्थितीत ही सर्व कार्य उपनगराध्यक्ष पार पडत असतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.