https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

पारधी समाजाचा इतिहास, रूढी आणि परंपरा


पारधी समाजाचा इतिहास, रूढी आणि परंपरा -

        पारध्याची उत्पत्ती आणि अर्थ –

        पारधी समाजाची उत्त्पती विषयी पौराणिक व ऐतिहासिक उल्लेखांवरच विसंबून राहावे लागेल.

        मानववंशशास्त्रीयदृष्ट्या जसजशी विचारसरणी प्रगत होत गेली तसतशी पारध करण्याची व्यवस्था विशिष्ट समूहांनी स्वीकारली असावी.त्यातून पारधी जमातीची उत्त्पती झाली असावी असे म्हणने तर्कसंगत ठरेल

        एकूणच पारध करणारे ते पारधी अशी त्यांची उत्त्पती आहे.

        पारधी हा शब्द ‘पारध’या मराठी शब्दापासून तयार झाला आहे.पारध म्हणजे शिकार आणि शिकार करणारा तो पारधी (कुलकर्णी२००७).

         महाराष्ट्रात फासे पारधी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ह्या समाजाला विजापूर भागात ‘अटवी संचार’असे म्हणतात.(चव्हाण १९८९).

        आंध्रप्रदेशात ‘नहार’या नावाने परिचित आहेत (खरात,१९८३)

        पारध्यांचे पूर्वज हे राणा प्रतापच्या पदरी होते असे म्हणतात.त्यांनी मोगल सम्राट अकबर याला मदत केली; या संशयावरून राणाप्रतापने त्यांचा निष्पात करण्याचा निर्धार केला म्हणून ते गुजरातकडे पळून गेले व स्वतःला ‘पारधी’ म्हणवू लागले.

        सध्याच्या पारधी लोकांच्या पूर्वजांनी २५० वर्षापूर्वी गुजरातमधून महाराष्ट्रात स्थलांतर केले.

        जुनागडची ‘अंबिका देवी’हि त्यांची कुलदेवता आहे यावरून ते मुळचे गुजरातकडचे आहेत हे सिद्ध होते.(राठोड.१९८४).

         कुलकर्णी (२००७)यांच्या मते पारध्यांचे मूळ राजपुतान्यात सापडले.

         रसेल हिरालाल (१९१६)यांच्या मते पारधी लोक हे बावरिया किवा काही राजपूत जाती आणि गोंड यांच्या मिश्रणातून तयार झाले असावेत(शिरोळे २००२०)

        पारध्याचा ऐतिहासिक संबंधामध्ये राजस्थान,मध्यप्रदेश,गुजरात,या भागाच्या पश्चिम सरहद्दीवरील राज्यातील राजपूत घराण्याशी संबंध सांगितले जातात.

        राजपूत भामटा,बंजारा,कंजारभाट,लमाण आणि पारधी यांच्यात स्त्री कुमारीपणाबद्दल व जातपंचायतीच्या निवाड्या संदर्भात समान संकेत दिसतात या वरून त्यांचे मूळ एक असल्याचे निष्पन्न होते .

        पर्ध्याचे धार्मिक जीवन विवाह प्रथा जातपंचायत आणि स्त्री जीवन विचारात घेतले तर भारतीय परंपरेतील प्रामुख्याने उत्तरेकडील प्रथा पारधी समाजात मोठ्या प्रमाणात दिसून येतात .

        उत्तरेत मुस्लीम राजवटीत पराभवच जीवन जगण्याची किवां धर्मांतराची वेळ येऊ नये म्हणून हि जमत दक्षिणेकडे आली हे सांगणे कठीण असले तरीही .पारधी जमात उत्तरेकडून गुजरात मार्गे खानदेशात प्रथम आली असावी कारण पारध्याची वस्ती धुळे जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे इतरत्र ती तुरळक आहे.खानदेशातून ती इतरत्र स्थलांतरित झाली असावी.असा अनुमान काढता येतो 

        ते स्वताच्या जातीची ओळख ‘वाघरी’अशी करून देतात.

        ‘वाघुर’ म्हणजे जाळे किंवा पाश.

        राजस्थानातील ओसाड टेकड्याना ‘वाघह’असे म्हणतात.वाघह टेकडीवरून आलेले म्हणून ‘वाघरी’असे नाव प्रचलित झाले असावे.

        पाचकुळी –भोसले,काळे,चव्हाण,शिंदे,पवार

        ‘भोसले’ कुळीचा संबंध ‘शिसोदिया’ घराण्याशी संबंध असून, पवार कुळीचा ‘जारोळा’ घराण्याशी ,तर काळे, चव्हाण यांचा ‘झालीवाडा’घराण्याशी तर ‘शिंदे’यांचा ‘वागिसन्या’घराण्याशी संबंध आहेत.

        पारधी समाजाच्या कोणत्याही विधी मध्ये समारंभामध्ये प्रथमतः सूर्यदेव (दादोबा)व पूर्वज या देवतांना अग्रक्रमाने पुजण्यात येते.

         स्वातंत्र्यापूर्वीचा आणि स्वातंत्र्योत्तर पारधी समाजाचा इतिहास-

        क्रांतिवीर समरसिंग पारधी हा आदिवासी समाजाचा पहिला क्रांतिवीर आहे ज्यांनी १८५७ च्या उठावात सक्रीय सहभाग घेतला.

        एकोणिसाव्या शतकातील पारधीच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान मराठी साहित्यिक भास्कर  भोसले यांनी सविस्तर मांडलेला आहे

        पारधी समाजाच्या क्षत्रीयत्वाच्या अनेक सुरस कथा आहेत.पारधी समाजाने खुल्या मनाने जर कथा सांगितल्या आणि या कथाचे प्रदेशपरत्वे संकलन झाले तर पारधी समाजाचा खरा इतिहास पुढे येऊन खोटा इतिहास पुसला जाईल

        भारतीय समाजातील वंशपरंपरेने आणि सामाजिक प्रथेनुसार गुन्हेगारीवर व भटक्या वृत्तीवर गुजराण करणाऱ्या काही जाती-जमातींना ब्रिटीश राजवटीत गुन्हेगार जमाती म्हणून नोंद करण्यात आली

        १८६० साली भारतीय दंड संहिता अंमलात आली पुढे  १८७१ मध्ये गुन्हेगारी जमात कायदा करण्यात आला,या कायद्याचे रुपांतर १९२४ मध्ये गुन्हेगारी जमाती केंद्रीय अधिनियम मध्ये करणायत आले

        हा कायदा ३१ ऑगस्ट १९५२ रोजी रद्द करण्यात आला.व जातींना विमुक्त जाती जमाती अशी संज्ञा दिली गेली

        ३१ ऑगस्ट १९५२हा दिवस गुन्हेगारी जमातीचा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन ठरला

        ब्रिटिशानि केलेला कायदा रद्द झाला खरा,पण त्याऐवजी ‘सराईत गुन्हेगार कायदा’लागू झाला.

        पूर्वीचा कायदा हा संपूर्ण ‘जमातींना’ गुन्हेगार ठरविणारा होता.नंतरचा केवळ’व्यक्तीना’लागू झाला.पण व्यक्तीहि कमी जास्ती फरकाने विशिष्ट जमातीच्याच होत्या.

        शिवाय पूर्वी ब्रिटीशांनी या जमातीना दिलेल्या विशिष्ट सवलतीही कायद्याबरोबर रद्द झाल्या.उदा.सोलापूरच्या कापड गिरणीतील या जमातींना रोजगारासाठी सवलती होत्या त्या रद्द झाल्या.

        स्वातंत्र्यानंतर त्यांच्या उपेक्षित जीवनाची गुंतागुंत अधिकच वाढली.आगीतून फुफाट्यात पडल्या सारख झाल.

  पारधी समाजाच्या रूढी आणि परंपरा-

        पारधी समाजाचे लोकांचे वर्णन व बोलीभाषा :

        पारधी या भटक्या जमातीचे लोक हे बहुतेक गोऱ्या रंगाचे,गारोळ्या डोळ्यांचे असतात.

        पारधी लोकांची बोलीभाषा हि गुजराती,मारवाडी,हिंदी भाषेच्या मिश्रणातून निर्माण झालेली आहे.  तिला ‘वाघरी’’’पारुशी’’असे संबोधतात .

        पारध्यांच्या भाषेला ‘पारसी’किंवा ‘पारधी भाषा’म्हणतात.

        पारधी लोकांची वेशभूषा

        पारंपारिक वेशभूषेत पुरुषांच्या कंबरेला लंगोटी.अंगात अंगरखा अगर बंडी ,डोक्याला मुंडासे.केस दाढी वाढवलेली

        स्त्रीच्या पारंपारिक वेशात काष्टा पदराची साडी,अंग झाकले जाईल असे पोलके परिधान करतात

        हातात बांगड्या अगर चांदीचे गोट,रुप्याचे गोट,गळ्यात काळी पोत,रंगबेरंगी मन्याच्या माळा असतात.

        हातावर गोंदण कपाळावर गोंदण हातावर सूर्य,चंद्र’वृक्ष किवा रामाचा रथ अशा चित्रांचे गोंदण करतात’

         पारध्याचे दैवत –

        सर्वच पारधी समाजामध्ये सूर्यदेव (दादोबा)व पूर्वज या देवतांना अग्रक्रमाने पुजिले  जाते.

        पारधी समाजात पंचमहाभूते (जमीन,वृक्ष,नदी,पाणी,वारा )यांना अनन्यसाधारण महत्व आहे

        पारध्याचे घराचे तोंड फक्त पूर्वेलाच असते कारण पालच्या पश्चिम दिशेला बंद पेटीत देव ठेवलेले असतात.

        पारधी स्त्री ही कधीही पालच्या पश्चिम बाजूस जात नाही.ती तिचे सर्व नैसर्गिक विधी पालच्या थोड्या अंतरावर पूर्वेस पार पाडते.

        हाल्या करणे किंवा जत्रा करणे-

        पारधी समाजात देवीचा नवस फेडायची ही एक रीत आहे.

         एकत्र येण्याचे-गाठीभेटीचे, सोयरीक जुळवण्याचे हे एक माध्यम.

        पारधी जत्रा-यात्रा मध्ये फारसे रमताना दिसत नाहीत. तरीही ‘जव्हारण’ हि त्यांची जत्रा वैशिष्टपूर्णतेने विचारात घ्यावी लागते

        पारध्यामध्ये जत्रा करणे,नवस बोलणे,नवस फेडणे याला विशेष महत्व आहे.

        जत्रेला रेडा बळी देण्याची प्रथा आहे त्याला ‘टोणगा मारणे’असे म्हणतात.

        पण पोलिस यंत्रणा हाल्या करण्याच्या प्रथेला पारध्यांची गुन्ह्यांची   नियोजन करण्याची योजना म्हणतात.

        सण-उत्सव-

        पारधी समाजात हिंदुच्या सण –उत्सवास अधिक महत्त्व आहे.

        हिंदू धर्माप्रमाणेच ते दिवाळी ,होळी, नवरात्री हे सण साजरे करतात.

        सण उत्सवामध्ये ते मांसाहाराला अधिक महत्त्व देतात.

        पारधी समाजाचे जीवन स्थिर नसल्याने त्यांचे सण हे पालानुसार साजरे होताना दिसतात.

        गुढी पाडवा, अक्षय तृतीया, पोळा, नवरात्र, दिवाळी, होळी इ. सण ते साजरे करतात

        पारधीची वस्ती  -

        पारध्यांच्या वस्तीला ‘पारधवाडा’म्हणतात.

        पारधी पुरुषांना ‘बावरी” तर स्त्रीयांना ‘बावन”म्हणतात.

        पारधी लोकांची घरांना ‘पाल’ म्हणतात.

        घरांची रचना हि पूर्व पश्चिम असते.

        . त्यांची मातीच्या धाब्याची घरे एकमेकाला लागून असतात. त्यांनापाळम्हणतात.

        विधी-

        पारध्यांचा ‘सांबर फोडणे’असा एक विधी असल्याचा उल्लेख पेशवाई दप्तरात आढळतो

        मृत पूर्वजासाठी “गोट’विधी होताना दिसतो हा विधी गीसडी, बेलदार, भामटा,बंजारा या समाजांमध्येही होतांना दिसतो.

        पारधी समाजात जमातबहिष्कृत केलेल्या व्यक्तीला परत जमातीत घेताना ‘कानाला चीर’ देण्याची प्रथा आहे. 

        जव्हारणविधी—

        ऐतिहासिक काळापासून गाव पारधी जाळे लावण्याच्या ३ ते ६ दिवस  अगोदर देवाचा कार्यक्रम करतात त्याला ते ‘जोहरन’ म्हणतात देवाच्या कार्यक्रमासाठी उभारलेल्या मंडपाला “पाल”म्हणतात

        जव्हारण विधी हा पारध्यांचा यातुशक्तीयुक्त पवित्र विधी असतो.

        जव्हारन मध्ये ‘गुंजविधीला’खूप महत्त्व असते या विधीशिवाय जव्हारण पूर्ण होत नाही.

        जव्हारन विधीमध्ये ‘झापिलेवान’(उकळत्या तेलातून पुऱ्या काढणे) हा एक महत्त्वाचा विधी असतो  .

        जंगली जत्रा ,जोगण ,देवदेव किव्हा जव्हारन अशा नावानी ओळखल्या

           जाणाऱ्या विधीला पारध्याच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनात महत्त्व असते

        या विधीपासून स्त्रीयांना कटाक्षाने दूर ठेवले जाते’त्यासाठी दिशाही

           निश्चित केलेली असेते’

        पारधी समाजाची खाद्यसंस्कृती-

        खाद्य पदार्थामध्ये ससे,लाव्हर ,कुरकुंज्या,कोंबडे,बकरे आदी पशुपक्ष्यांचे मासं असते.

        पारधी समाजाचा आहार हा एकूणच मांसाहारी असतो असे दिसते.

      

Green Background Product Link- (Purchase Removing Video Backgroud to use Chroma Key)


https://amzn.to/3eGUXSh (Tripod) https://amzn.to/3rBeqt3 आधुनिक राजकीय विचारवंत पुस्तक
Amazon Associate Product Link- विसाव्या शतकातील राजकीय विचारप्रवाह https://amzn.to/36LU5rh भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था पुस्तक link https://amzn.to/3iwtpjt https://amzn.to/3kMDY4U आधुनिक राजकीय सिद्धांत पुस्तक https://amzn.to/3BLcdQm महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय चळवळी आणि महाराष्ट्र प्रशासन https://amzn.to/3y3Qr7Z (Adjustable Tripod and Stand ) https://amzn.to/36ZtgQy (Sony Camera) Link Boya Mic- https://amzn.to/3zdpJds ( Purchase for Good Voice Quality for Youtube Video) Green Background Product Link- (Purchase Removing Video Backgroud to use Chroma Key) https://amzn.to/2VXNLuB https://amzn.to/3eGUXSh (Tripod) https://amzn.to/3rBeqt3 आधुनिक राजकीय विचारवंत पुस्तक
 

 

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.