किचन कॅबिनेट-
•
किचन कॅबिनेट ही संविधानिक किंवा संसदीय स्वरूपाची संस्था नाही.
•
लोकशाहीच्या विकासासोबत विकसित झालेली एक अनौपचारिक संस्था आहे.
•
किचन कॅबिनेट हा समविचारी लोकांचा लहान गट असतो. तो गट पंतप्रधानांना महत्वपूर्ण प्रश्नावर निर्णय घेण्यास मदत वा सहाय्य करत असतो.
•
किचन कॅबिनेट इतिहास-
•
किचन कॅबिनेट हा शब्द इंग्लंडमध्ये हेरॉल्ड विल्सन पंतप्रधान असताना वापरला गेला कारण त्यांच्या काळात ते मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने निर्णय घेण्याऐवजी राजकीय मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबियांच्या सल्ल्याने राजकीय निर्णय घेत असत. त्यांच्या निर्णयावर कॅबिनेट बाहेरील लोकांचा प्रभाव होता.
•
अमेरिका आणि किचन कॅबिनेट-
•
अमेरिकेत अँण्डयू जॅक्शन यांनी अध्यक्ष पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर त्यांना आपल्या मंत्रिमंडळाचे सदस्य कुचकामी वाटल्याने ते मंत्र्याना ऐवजी आपल्या मित्रांचा सल्ला घेत.
•
अब्राहम लिंकन च्या काळात त्यांनी स्वतःचे सल्लागार मंडळ निर्माण केले होते. ते सल्लागार मंडळाच्या सल्ल्याने निर्णय या मंडळातील अनेक सदस्य राजकारणाशी संबंधित नव्हते.
•
भारत आणि किचन कॅबिनेट-
•
भारतात पंडित नेहरूंच्या काळापासून अनौपचारिक स्वरूपात किचन कॅबिनेट आढळून येते.
•
पंतप्रधान इंदिरा गांधींच्या काळात किचन कॅबिनेट अत्यंत शक्तिशाली होते.
•
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात देखील किचन कॅबिनेट अस्तित्वात असल्याचे दिसून येते.
•
किचन कॅबिनेट म्हणजे काय-
•
संसदीय लोकशाहीत पंतप्रधान मंत्रिपरिषद निर्माण करत असतो. परंतु मंत्री परिषदेतील सर्व सदस्यांची महत्त्वपूर्ण प्रश्नांवर चर्चा करत नसतो. मंत्रिमंडळातील आपले जवळचे मंत्री किंवा मंत्रिमंडळात नसलेले परंतु पंतप्रधानाच्या विश्वासाच्या असलेल्या लोकांच्या सल्ल्याने निर्णय घेतला जातो अशा गटाला किचन कॅबिनेट असे म्हटले जाते.
•
किचन कॅबिनेट पंतप्रधानाच्या जवळच्या लोकांचा एक लहानसा गट असतो. तो गट महत्वपूर्ण प्रश्न मंत्रिमंडळात मांडण्यापूर्वी किंवा निर्णय घेण्यापूर्वी पंतप्रधानाला सल्ला देत असतो. पंतप्रधानाच्या निर्णयाला प्रभावित करणाऱ्या लोकांचा गट म्हणजे किचन कॅबिनेट होय. किचन कॅबिनेट च्या अनोपचारिक स्वरूपात नियमित बैठका होत असतात.
•
किचन कॅबिनेटची भूमिका-
•
किचन कॅबिनेट मधले लोक पंतप्रधानाचे अत्यंत जवळचे व विश्वासू लोक असतात. त्यात मित्र, कुटुंबीय देखील असू शकतात. ते राजकारणी असतीलच असे नाही. ते पंतप्रधानांना राजकीय आणि प्रशासकीय बाबतीत सल्ला देतात. त्यामुळे निर्णय प्रक्रियेत किचन कॅबिनेट चा अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका असते.
•
किचन कॅबिनेटचे फायदे-
•
किचन कॅबिनेटमध्ये मर्यादित लोकांचा समावेश असल्याने कॅबिनेट पेक्षा वेगाने निर्णय घेऊ शकतात.
•
प्रत्येक सदस्यांशी व्यवस्थित चर्चा होऊ शकते.
•
कॅबिनेट पेक्षा किचन कॅबिनेट मध्ये महत्वपूर्ण प्रश्नावर गोपनीयता चांगल्या प्रकारे पाळली जाऊ शकते.
•
किचन कॅबिनेटचे तोटे-
•
किचन कॅबिनेट मुळे निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी आणि मंत्रिमंडळाचे महत्व कमी होते. पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार जी दुसऱ्या व्यक्तींच्या सल्ल्याने निर्णय घेतात.
•
किचन कॅबिनेट मध्ये अनेकदा मंत्रिमंडळाला बाहेरील लोकांचा समावेश असल्यामुळे जबाबदारी आणि उत्तरदायित्व नसलेल्या लोकांच्या हातात राष्ट्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाची माहिती जाऊ शकते ही बाब गोपनीयतेच्या दृष्टीने योग्य नाही.
•
संसदीय लोकशाहीत मंत्रिमंडळ सामुहिक जबाबदारीच्या तत्वावर कार्य करते. किचन कॅबिनेट मूळे या तत्त्वाला हरताळ फासला जातो. पंतप्रधान मंत्रिमंडळ ऐवजी विशिष्ट गटाच्या सल्ल्याने निर्णय घेतो ही गोष्ट सामुहिक लोकशाही निर्मितीला बाधक सिद्ध होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.