• मतदान पद्धती Voting Types and Method
- मानवी इतिहासात प्राचीन काळापासून राज्यकर्ते वर्ग निवडण्यासाठी आणि महत्त्वाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी मतदानाचा वापर केला जात असे.
•
ग्रीसमधील अथेन्स गणराज्यात, भारतात वेद आणि बौद्ध काळात अस्तित्वात असलेल्या गणराज्य पद्धतीत राजा आणि शासक मतदानातून निवडले जात असे.
•
मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू-
•
मतदानासाठी विविध रंगाच्या गोटया, विविध रंगाच्या लाकडी शलाका, रंगीत काट्या, शिंपले, उभे राहून किंवा हात वर करून मतदान केले जात असे. आधुनिक काळात कागदी चिठ्ठ्या किंवा मतदान यंत्राचा उपयोग करून मतदान केले जाते.
•
मतदानाच्या प्रमुख पद्धती-
•
मतदानाच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष या दोन प्रमुख पद्धती आहेत.
•
प्रत्यक्ष मतदान पद्धतीत जनतेकडून प्रत्यक्ष मतदानाद्वारे राज्यकर्ते निवडले
जातात. प्रत्यक्ष मतदान पद्धती म्हणजे मतदारांकडून प्रतिनिधींची निवड होय तर अप्रत्यक्ष मतदान पद्धती म्हणजे मतदारांनी निवडलेला प्रतिनिधी मतदारांच्या वतीने प्रतिनिधी निवडतो. उदा. राष्ट्रपती निवडणूक
•
खुले
मतदान आणि गुप्त मतदान-
•
उघड अथवा खुले मतदान आणि गुप्त मतदान या मतदानाच्या प्रमुख
पद्धती आहेत.
•
खुले
मतदान पद्धतीत हात वर करुन, उभे राहून
किंवा अवाजवी स्वरूपात खुले मतदान केले जाते. ही पद्धत अथेन्स गणराज्य, वेदकाळात सभा आणि समिती, बौद्ध काळात
गणराज्यातील शासक निवडण्यासाठी वापरली
जात असे. या पद्धतीत मर्यादित लोकांना मतदानाचा अधिकार होता. आधुनिक काळात मर्यादित ठिकाणी ही पद्धती वापरली जाते.
•
प्रतिनिधी निवड पद्धती-
•
आधुनिक
काळात जगातील बहुसंख्य देशात 18 वर्षे वय पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला जातो. या अधिकाराचा वापर करून नागरिक प्रत्यक्ष व गुप्त मतदानाने प्रतिनिधी निवडत असतो. प्रतिनिधी निवडण्याच्या विविध पद्धती अस्तित्वात आहेत.
•
साधी
मतदान पद्धती-
•
साध्या
मतदान पद्धतीत प्रादेशिक आणि भौगोलिक आधारावर एक मतदार संघ निर्माण केला जातो. या मतदार संघातून एक प्रतिनिधी निवडला जातो. ज्या प्रतिनिधीला सर्वाधिक मते मिळतील त्याला विजयी घोषित केले जाते. या पद्धतीचा वापर भारत, इंग्लंड, अमेरिका इत्यादी देशात केला जातो. या पद्धतीत मतविभागणी मुळे 50 टक्के पेक्षाही कमी मते मिळून उमेदवार विजयी होऊ शकतो.
•
हा दोष दूर करण्यासाठी दुबार किंवा पर्यायी मतदान पद्धतीचा वापर केला जातो. या पद्धतीत पहिल्या फेरीत एखाद्या उमेदवाराला पन्नास टक्के पेक्षा जास्त मते मिळाल्यास त्याला विजयी घोषित केले जाते.
•
कोणत्याही उमेदवाराला पन्नास टक्के मते न मिळाल्यास दुबार
मतदान घेतले जाते. यात पहिल्या दोन क्रमांकाच्या मते मिळालेल्या उमेदवारांना सोडून इतरांना बाद केले जाते. दुबार मतदानात 50 टक्केपेक्षा जास्त मते मिळालेल्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाते. ही पद्धत फ्रान्समध्ये वापरले
जाते.
•
प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत-
•
या पद्धतीत मतदाराला जेवढे उमेदवार असतील तेवढी मते देता येतात. ही मते पसंती क्रमांकानुसार द्यावी लागतात. उमेदवाराला निवडून देण्यासाठी कोटा निश्चित केलेला असतो. निश्चित केलेल्या कोटानुसार पसंतीची मते मिळालेल्या उमेदवाराला विजयी घोषीत केले जाते. जोपर्यंत कोटा पूर्ण होत नाही तोपर्यंत मतमोजणी होत राहते. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत एक एक उमेदवाराला बाद केले जाते.
•
या पद्धतीचा वापर राष्ट्रपती उपराष्ट्रपती,राज्यसभा, विधानपरिषद आणि विद्यापीठ निवडणुकीत केला जातो. या पद्धतीत अल्पसंख्यांक आणि प्रत्येक पक्षाला आपल्या संख्ये इतके प्रतिनिधित्व प्राप्त होते. परंतु ही मतदान पद्धती अत्यंत किचकट असल्याने सुशिक्षित किंवा
राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या मतदारांना पुरतीच वापरली जाते.
•
यादी
पद्धत-
•
यादी
पद्धतीत आपल्या मतदार उमेदवारांना मतदान करण्याऐवजी राजकीय
पक्षांना मतदान करतात. प्रत्येक पक्ष उमेदवाराची यादी
सादर करतो. त्या यादीला
मतदार मतदान करत असतात. ज्या पक्षाला जितके टक्के मतदान असेल तेवढ्या जागा त्या पक्षाच्या वाट्याला दिले जातात. या पद्धतींचा वापर बेल्जियम आणि इतर युरोपियन देशात केला जातो.
•
अशा प्रकारे मतदानाच्या प्रमुख
पद्धती सांगता येतात. प्रत्येक पद्धतीत गुणदोष आहेत. प्रत्येक देशाने आपापल्या परिस्थितीनुसार पद्धतींचा वापर
केलेला आहे.
Green Background Product Link- (Purchase Removing Video Backgroud to use Chroma Key)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.