सोशल मिडिया आणि निवडणुका socia Media and Election
•
आधुनिक
युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रभावापासून समाजातील एकही क्षेत्र सुटलेले नाही. निवडणुकांवर देखील माहिती तंत्रज्ञानाचा खूप प्रभाव पडलेला दिसतो. आधुनिक काळात ‘माध्यम हाच संदेश ' हा मॅक लुहान यांचा संदेश वास्तवता येत आहे.
•
21व्या शतकात इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे निवडणुकांमध्ये तंत्रज्ञानाला महत्व प्राप्त झाले आहे.
•
भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात शंभर कोटी पेक्षा जास्त मोबाईल धारक आहेत. त्यातील जवळपास साठ कोटी लोक इंटरनेटचा आणि चाळीस कोटी लोक सोशल मीडियाचा वापर करतात म्हणजे जवळपास निम्मे मतदारांवर माहिती तंत्रज्ञानाचा प्रभाव
दिसून येतो.
•
भारतात सोशल मीडियाचा वापर-
•
भारताच्या राजकारणात सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील 'करप्शन
अगेस्ट इंडिया' या सामाजिक चळवळीत अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या
प्रमाणावर केला.
•
अरविंद
केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करून निवडणुकीत यश संपादन केले.
•
2014
च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय
जनता पक्षाने नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करून निवडणुकीत यश संपादन केले. पंतप्रधान बनण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांची प्रतिमा विकास पुरुष म्हणून निर्माण करण्यात सोशल मीडियाने हातभार लावला.
•
सोशल मीडियाचा निवडणुकीवरील प्रभाव-
•
भारतीय
जनता पक्षाला निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे देशातील इतर पक्षांनी देखील सोशल मिडीयाचा वापर करण्यास सुरुवात केली. कारण सोशल
मीडियाच्या माध्यमातून देशातील कोणत्याही कोपर्यातून राजकीय पक्ष आणि नेत्यांना जनतेशी
थेट संपर्क साधता येतो.
•
सोशल
मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे सर्वच
पक्षांनी हायटेक प्रचारासाठी आयटी
तज्ञांच्या टीम सज्ज केल्या. पक्षाच्या निवडणूक प्रकाराचे नियोजन करण्यासाठी बड्या
कंपन्यांची मदत घेतली जाऊ लागली.
•
पक्षाच्या घोषणा, धोरणे, जाहीरनामा आणि प्रचार यंत्रणेचे नियोजन कंपन्यांच्या मदतीने होऊ लागले.
•
नेत्यांची जनतेत प्रतिमा उंचावण्यासाठी तज्ञांची मदत घेतली जाऊ लागली. उदा. प्रशांत किशोर सोशल मिडीयाच्या प्रभावा चा वापर करून नेत्यांची' प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर'प्रतिमा विकसित केले जाऊ लागले. राष्ट्रीय नेते ज्या ज्या भागात जातात तेथील इतिहास, भाषा, प्रमुख मुद्दे इत्यादींचे टिपण्या काढून भाषणे तयार करून दिली जाऊ लागली जनतेच्या भाषेत बोलून जनतेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला.
•
सोशल
मीडियाचे महत्त्व लक्षात घेऊन राजकीय पक्षांनी आपल्या कार्यालयात स्वतंत्र कक्ष निर्माण केले. या कक्षात पगारी आणि स्वयंसेवक लोकांची नियुक्ती केली जाऊ लागली. हे लोक पक्षाची भूमिका जनतेसमोर मांडण्याचे काम करतात. त्यासोबत पक्षविरोधी किंवा पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्या व्यक्ती आणि गटाला ट्रोल करण्याचे काम करतात. राजकीय पक्षांची आयटी सेल कंपन्यां सारखे काम करू लागले. निवडणुकीच्या विषयपत्रिकेवर सोशल
मीडियाने ताबा मिळवला.
•
निवडणूक काळात प्रचारासाठी सोशल मीडिया वापर करणे सोपे व कमी खर्चिक असल्याने सर्वच पक्ष त्याचा वापर करू लागले. या माध्यमांमुळे लोकांकडे प्रत्यक्ष न पोहताही संपर्क साधता येतो.
•
भारतासारख्या आकाराने विशाल आणि मोठे मतदार संघ असलेल्या देशात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया हे फार मोठे माध्यम राजकीय पक्षांना प्राप्त झाले. या माध्यमांमुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याची संधी
राजकीय पक्षांना प्राप्त झाली. ते आपली भूमिका चांगल्या पद्धतीने लोकांपुढे मांडू शकतात. राजकीय ओळख विकसित करण्यासाठी ही माध्यमे उपयुक्त मानली जातात. सोशल मीडिया हा राजकीय पक्ष आणि नागरिकांना जोडणारा दुवा किंवा मध्यस्थ बनला.
•
सोशल
मीडियाच्या वापराचे मूल्यमापन-
•
सोशल
मीडियामुळे जगातल्या कानाकोपऱ्यातील बातम्या व्हिडिओ फोटोग्राफ आणि संदेशाची वेगवान पद्धतीने देवाण-घेवाण होत असल्याने ही माध्यमे राजकीय जागृतीसाठी उपकारक बनली आहे. या माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या संदेश यावर प्रतिक्रिया नोंदवण्याची सोय असल्यामुळे जनता मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया नोंद
होते.
•
जनतेचा
प्रतिसाद लक्षात घेऊन राजकीय नेतृत्वाने सोशल मीडियाचा वापर सुरू केला. अत्यंत वेगवान पद्धतीने सोशल मीडिया राजकीय संसूचन निर्मितीचे कार्य
करत असल्याने लोकमताची मोठ्या प्रमाणावर घुसळण होत असते. राजकीय जाणिवा आणि प्रतीके निर्मितीचा आधुनिक काळात सोशल मीडिया फार मोठा वाटा उचलते आहे.
•
सोशल
मीडियामुळे जनतेला कान व डोळे लाभलेले आहेत. कारण या माध्यमातून जनतेला लगेच माहिती प्राप्त होत असते. ती माहिती जनतेला राजकीय निर्णय घेण्यास हातभार लावत असते.
•
अर्थात
सोशल मिडियाची अनेक फायदे सोबत प्रचंड तोटे देखील आहेत. सायबर गुन्ह्यात वाढ, नियंत्रण नसलेली प्रचार यंत्रणा, आभासी जगाची
निर्मिती, वैयक्तिक जीवनावर आक्रमण, खोट्या माहितीचा प्रसार, माहितीचे विश्वासार्हतेचा प्रश्न, फेक माहिती मुळे होणारा हिंसा व दंगे इत्यादी दोष आहेत.
•
आधुनिक
काळात सामाजिक व राजकीय चळवळी सावकाश डिजिटल माध्यमांनी व्यापला. आधुनिकोत्तर काळातील समाजात सोशल मीडियाचा सहभाग दखलपात्र बनला. सोशल मीडिया राजकिय पक्षांची गरज बनला. मतदारांना संघटित करण्यासाठी, प्रचार आणि संपर्काचे साधन म्हणून ओळखला जाऊ लागला. आभासी आणि भौतिक या दोन प्रकारच्या संस्कृतीचा सोशल मीडियातून विकास होऊ लागला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.