https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

तालिबान राजवट आणि भारत सरकारच्या भूमिकेबाबत सद्यस्थिती


 तालिबान राजवट आणि भारत सरकारच्या भूमिकेबाबत सद्यस्थिती-

अफगाणिस्तानातील सत्ता बदलाबाबत भारत सरकारची द्विधा मनोवस्था झालेली आहे. तालिबानी राजवटीला मान्यता द्यावी की विरोध करावा याबद्दल स्पष्ट भूमिका भारताने घेतलेली नाही. भारताकडे सध्या दोन मार्ग आहेत. अफगाणिस्तानात सत्तेवर आलेले तालिबानी सरकारशी असलेले सर्व संबंध समाप्त करणे हा पहिला मार्ग होय. या मार्गाचा वापर केल्यास अफगाणिस्तान मध्ये भारताने केलेली तीन अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीला विसरावे लागेल. इराणच्या चाबहार बंदराचा विकास आणि मध्य आशियाई देशांशी अफगाण रस्तामार्गे व्यापार करण्याच्या योजनेला गुंडाळावे लागेल. त्यामुळे हा मार्ग भारताच्या राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून योग्य नाही.

दुसरा मार्ग म्हणजे तालिबानी सरकारशी चर्चा करणे. परंतु ही गोष्ट सोपी नाही. भारताने अधिकृतरित्या तालिबान सरकारला मान्यता दिलेली नाही. भारतीय राजदूत दीपक मित्तल यांनी दोहा  येथे तालिबानचे राजकीय प्रमुख शेर मोहम्मद अब्बास यांच्याशी ही औपचारिक चर्चा केली. दोहा येथील भारतीय दूतावासात दोन्ही देशांच्या प्रतिनिधी मध्ये औपचारिक स्वरूपाची चर्चा झाली. या चर्चेत अफगणिस्तान मध्ये अडकलेले भारतीय नागरिक आणि  भारतात येऊ इच्छिणाऱ्या अफगाण नागरिकांना प्रवेश देण्याबाबत चर्चा झाली. तसेच अफगाण भूमीचा भारताविरुद्ध दहशतवादी कारवायांसाठी वापर न करू न देण्याबाबत चर्चा झाली. शेर मोहम्मद अब्बास यांनी," तालिबानी संघटनेला भारतासोबत पूर्वीप्रमाणेच राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध टिकवायचे आहेत.अफगाणिस्तानमधील राजकीय पेच प्रसंग सुटेपर्यंत  भारताने तटस्थ राहावे" हे मत स्पष्टपणे मांडले आहे.  तालिबानी राजवटीने भारताबाबत सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. तालिबानी प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद्दीन यांनी पाकिस्तान वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट म्हटले आहे की,"भारत हा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण देश आहे. भारताशी चांगले राजकीय संबंध प्रस्थापित करण्याची आमची इच्छा आहे. त्यामुळे भारताने अफगाण जनतेच्या इच्छेप्रमाणे आपले धोरण आखावे."

अफगाण परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. भारताकडे आशेने पाहणाऱ्या अफगाण बांधवांना मदत करण्याची सूचना पंतप्रधानांनी केली.  पंतप्रधानांनी अफगाणिस्तानातील प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक बोलावली.  या बैठकीत  तालिबान बाबतची भारताची अधिकृत भूमिका सरकारने मांडली. तसेच पंतप्रधानांनी अफगाण परिस्थितीबद्दल रशियाचे अध्यक्ष  पुतीन यांच्याशी देखील चर्चा केली. भारत रशियाच्या मदतीने तालिबानशी चर्चा करू शकतो हा संदेश या भेटीतून मिळाला. भारताची तालिबान सोबत अनऔपचारिक स्वरूपात चर्चा सुरू असल्याचे दिल्लीच्या वर्तुळात बोलले जाते.  

तालिबान सरकार आणि भारत संबंधातील अडचणी-

भारताने अधिकृतरित्या तालिबानला मान्यता दिलेली नाही. दोहाची बैठक सोडली तर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी मध्ये औपचारिक चर्चा झालेली नाही. अफगाणिस्तानमधील भारतीय मोहिमांवर झालेल्या हल्ल्याबाबत भारत तालिबानला जबाबदार मानतो. तसेच 1999 मध्ये भारताचे विमान अतिरेक्यांनी अपहरण करून कंदहार येथे नेले होते. त्या विमानातील प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनांच्या नेत्यांना सोडावे लागले. या प्रकरणात तालिबानने दिलेल्या साथीमुळे तालिबानीबाबत भारताच्या मनात अविश्वासाची भावना आहे.’

तालिबान जवळ सत्ता चालविण्याबाबत कोणतेही मॉडेल नाही. कट्टर इस्लामिक विचारधारेच्या आधारावर अफगाणिस्तानमध्ये सत्ता राबवण्याचा त्यांचा सध्या अजेंडा दिसतो. तालिबानी सरकारने  शरीयत   कायद्याच्या आधारावर काही नियम अफगाणिस्थान मध्ये लागू केलेले आहेत. तालिबानसोबत असलेले जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हक्कानी गटाची भूमिका आज पर्यंत भारत विरोधी राहिलेले आहे.  या गटांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात प्रशिक्षण दिल्यास भारतासाठी धोकेदायक स्थिती निर्माण होईल. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी पुन्हा सक्रिय होऊ शकतील. या गटांकडून अफगाण भूमीचा वापर भारताविरोधात केले जाण्याची शक्यता आहे. ही शक्यता खरी ठरली तर भारताच्या सुरक्षिततेला फार मोठा धोका पोहोचेल. त्यामुळे भारत अत्यंत जपून पावले उचलत आहेत.

व्यापार आणि संपर्क प्रस्थापित करण्यासाठी अफगाणिस्तान हा महत्त्वपूर्ण देश आहे. मात्र चीन आणि पाकिस्तान सोबत असलेले तालिबानचे मैत्री संबंध भारताच्या चिंता वाढविणारे आहेत. तालिबान सरकारमधील अनेक नेत्यांना पाकिस्तानचा पाठिंबा आहे. तालिबानला पाकिस्तान हा जवळचा देश वाटतो. चीन सोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी तालिबान प्रयत्न करते आहे. पाकिस्तान आणि चीन तालिबानला मान्यता देण्याच्या तयारीत आहे.  तालिबानची चीन आणि   पाकिस्तानशी वाढती मैत्री प्रादेशिक सत्ता समतोल बिघडवणारी आहे.

तालिबानी राजवटीबाबत भारत सरकारची भूमिका-

भारत तालिबानशी कधी चर्चा सुरू करेल याबाबत अनेक तर्क वितर्क  लढविले जात आहेत. अफगाणिस्तानमधील तालिबानची सत्ता दुसऱ्या टप्प्यात कशी स्थिरावते आणि प्रत्यक्षात कशा प्रकारची धोरणे   अंमलात आणली जातात याची भारत  सरकार वाट पाहते आहे. सरकार  खात्री पटत नाही तोपर्यंत विशिष्ट अंतर ठेवून तालिबानशी संपर्क प्रस्थापित  केला जात आहे. भविष्यात तालिबानची पावले कशी पडतील यावर भारताची भूमिका अवलंबून असेल. काही अभ्यासकांच्या मते, जगातील इतर देश तालिबानला मान्यता देण्याबाबत काय भूमिका घेतात  यावर देखील भारताचे लक्ष आहे. तालिबानने भारता संदर्भात  माध्यमात मांडलेली भूमिका आणि प्रत्यक्षातील कृतीत फरक नसेल तेव्हा भारत चर्चा करेल असे अनेक अभ्यासकांना वाटते. तालिबानला जागतिक स्तरावरील देशांकडून मान्यता आणि सहकार्य हवे आहे म्हणून त्यांनी आपल्या भूमिकेत बदल केलेला आहे परंतु हा बदल खरा की खोटा याची प्रचिती आल्याशिवाय भारत पुढचे पाऊल उचलणार नाही याच कारणामुळे भारत अफगाण संबंधाचा अजूनही नीट उलगडा झालेला नाही.

सारांश वा निष्कर्ष- तालिबान सरकार बाबत भारताने आत्तापर्यंत कोणतीही अधिकृत भूमिका न घेतल्यामुळे  संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. वास्तविक अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेतल्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी भारताने प्रयत्न करणे गरजेचे होते. परंतु आपली भूमिका स्पष्ट नसल्यामुळे  चीन आणि पाकिस्तानचे फावले आहे हे दोन्ही देश अफगाणिस्तान मध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून भारताची 'थांबा  आणि वाट पहा' आणि 'जैसे थे'  धोरण राष्ट्रहितासाठी धोकेदायक ठरेल.

 अफगाण प्रश्नाच्या अभ्यासक अभ्यासक डॉ. शांती  मॅरियट डिसूजा यांनी बीबीसी बोलताना सांगितले की,"अफगाणिस्तानची सत्ता तालिबानच्या हातात आलेली आहे हे वास्तव भारताने स्वीकारले पाहिजे. तालिबान सरकारशी चर्चा सुरु करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून अफगाण विकासासाठी भारताने केलेले प्रयत्न सुरू राहतील." तालिबानने देखील भारताच्या विरोधात वक्तव्य केलेले नाही. अफगाण विकासाच्या  बाबतच्या भारताच्या भूमिकेला चुकीचे ठरवलेले नाही. जम्मू-काश्मीर बाबतच्या 370 कलम रद्द करण्याचा मुद्दा भारताचा अंतर्गत मामला मानला आहे. तालिबान मधला एक गट भारता प्रति सहकार्याची भूमिका ठेवण्याच्या बाजूचा आहे.

तालिबान 2.00 ची राजवट तालिबान 1.00 पेक्षा वेगळी आहे हे आत्तापर्यंत घडलेल्या घडामोडी वरून दिसून येते. काही किरकोळ घटना वगळता तालिबानी राजवटीने स्वतःला हिंसाचारापासून दूर ठेवलेले आहे. सरकार मध्ये सामावून घेण्यासाठी विविध  गटांशी चर्चा सुरू ठेवली आहे.  त्यामुळे भारताने चर्चा सुरू करण्यास काही हरकत नाही. परंतु भारताने चर्चा सुरू करण्याबाबत अधिकृत भूमिका घेतलेली नाही. अफगाणिस्तानात अडकलेल्या  भारतीयांना बाहेर काढण्या पर्यंत  आणि  अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर भारताच्या  वापर करू देऊ नये  इतपर्यंतच भारताची भूमिका  मर्यादित आहे. इराणमधील चाबहार बंदर प्रकल्प विकास, अफगाण विकासातील भूमिका आणि मध्य आशियाई देशांशी अफगाण मार्गे व्यापार करण्याच्या प्रकल्पावर पडलेले अनिश्चिततेचे सावट दूर  करण्यासाठी भारताने तालिबानी राजवटी सोबत चर्चा करून भारताच्या उपस्थितीची जाणीव करून देणे गरजेचे आहे. अन्यथा भारताच्या अनुपस्थितीचा फायदा उचलून चीन आणि पाकिस्तान अफगाणिस्तानमधील आपली स्थिती मजबूत करून दक्षिण आशियातील प्रादेशिक सत्ता समतोल बिघडवू शकतात.



स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके-

Indian Polity - For Civil Services and Other State Examinations | 6th Edition-https://amzn.to/3AkhXPw VASTUNISTH: BHARAT KA ITIHAS; KALA EVAM SANSKRITI (Hindi Edition)-https://amzn.to/3AvC25g सेट/नेट राज्यशास्त्र पेपर-२-https://amzn.to/3CmgIkJ Samanya Budhi Avum Tarkshakti Parikshan-https://amzn.to/37yNIb0 Ksagar Sampurna Rajyashastra संपूर्ण राज्यशास्त्र-https://amzn.to/3AnWmFA विसाव्या शतकातील राजकीय विचारप्रवाह https://amzn.to/36LU5rh आधुनिक राजकीय विचारप्रणाली- https://amzn.to/3xpwU0R भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था पुस्तक link https://amzn.to/3iwtpjt https://amzn.to/3kMDY4U आधुनिक राजकीय सिद्धांत पुस्तक https://amzn.to/3BLcdQm महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय चळवळी आणि महाराष्ट्र प्रशासन Redmi Note 10 (Aqua Green, 4GB RAM, 64GB Storage) -Amoled Dot Display | 48MP Sony Sensor IMX582 | Snapdragon 678 Processor link- https://amzn.to/3xpahtm Canon EOS 1500D 24.1 Digital SLR Camera (Black) with EF S18-55 is II Lens-https://amzn.to/3AfUkax https://amzn.to/3iG9wXl-(boya Mic for good voice Quality for lecture and video) https://amzn.to/3y3Qr7Z (Adjustable Tripod and Stand ) https://amzn.to/36ZtgQy (Sony Camera) https://amzn.to/2UGoDbB (Dell MS116 1000DPI USB Wired Optical Mouse) Redmi note 10 amazon link-https://amzn.to/3y3e8gU

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.