https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

गृहीत कृत्ये वस्तुनिष्ठ प्रश्न Hypothesis MCQ Question


 गृहीत कृत्ये वस्तुनिष्ठ प्रश्न Hypothesis MCQ Question 

1.------------------हा संशोधनाचा पाया असतो.

अ) निरीक्षण ब) गृहीत कृत्ये क) संशोधन आराखडा ड) सर्वेक्षण

उत्तर- ब

2. गृहीत कृत्येमुळे-------------------ला दिशा मिळत असते.

अ) निरीक्षण ब) सर्वेक्षण क) प्रश्नावली  ड) मुलाखत

उत्तर- अ

3. परीक्षण केल्या जाणाऱ्या विधानास गृहीत कृत्य असे म्हणतात असे कोणी म्हटले ?

अ) गुड आणि हॅट ब) लुंडबर्ग क) बोगार्डस ड) पॉलिन यंग

उत्तर- क

4. गुड आणि हॅट यांनी गृहीत कृत्याचे कोणते प्रकार सांगितलेले आहेत.

अ) अनुभवाधिष्ठित एकरूपतासंबंधी गृहीत कृत्य ब) जटिल आदर्श प्रारूपाशी संबंधित गृहीत कृत्य

क) विश्लेषणात्मक चलाशी संबंधित गृहीत कृत्य ड) वरील पैकी सर्व

उत्तर- ड

5. गृहीत कृत्याची वैशिष्ट्ये कोणती?

अ) स्पष्टता, विशिष्टता व अनुभवजन्यता ब) सिद्धांतनिष्ठता, पर्यायी उत्तर व प्राक्कथन सामर्थ्य

क) अ व ब दोन्ही ड) अ व ब दोन्हीही नाही

उत्तर- क

6. गुड आणि हॅट यांनी गृहीत कृत्य निर्मितीचे कोणते स्रोत सांगितले आहेत.

अ) सामान्य संस्कृती ब) वैज्ञानिक सिद्धांत क) सादृश्यता ड) वरील पैकी सर्व

उत्तर- ड

7. खालीलपैकी योग्य विधान निवडा.

अ) गृहीत कृत्य अध्ययनास दिशा प्रदान करते. ब) गृहीत कृत्य तथ्य संकलनास साहाय्यक ठरते.

क) गृहीत कृत्य निष्कर्ष काढण्यास साहाय्यक ड) वरीलपैकी सर्व

उत्तर- ड

8. अचूक विधान ओळखा.

अ) गृहीत कृत्य स्पष्ट व निश्चित असते. ब) गृहीत कृत्य अवैज्ञानिक असते.

क) गृहीत कृत्य अनुभवजन्य नसते. ड) गृहीत कृत्य असंदिग्ध व अस्पष्ट असते.

उत्तर- अ

9. गृहीत कृत्याचे महत्त्वाचे कार्य कोणते ?

अ) तथ्य संकलन व सिद्धांत निर्मितीस उपकारक ब) शास्त्रीय संशोधनाला पूरक

क) अ व ब दोन्ही ड) अ व ब दोन्हीही नाही

उत्तर- क

10. गृहीत कृत्याचे प्रमुख प्रकार कोणते?

 अ) शून्य गृहीत कृत्य ब) सांख्यिकी गृहीत कृत्य क) सरळ गृहीत कृत्य  ड) वरीलपैकी सर्व

 उत्तर- ड

11. गृहीत कृत्य निर्मितीतील समस्या कोणती?

अ) अध्ययन तंत्राचा अभाव ब) सैद्धांतिक चौकटीचा अभाव

क) संशोधन पद्धतीचा अभाव ड) यापैकी नाही

उत्तर- ब

12.गृहित कृत्याची वैधता---------------- तपासता येते.

अ) निरीक्षण ब) प्रयोग क) उपाययोजना ड) मुलाखत

उत्तर- ब

13. गृहीत कृत्य निर्मितीबाबत अयोग्य विधान निवडा.

अ)गृहीतकृत्यामुळे संशोधनात वेळ, श्रम व वेळेची बचत होते.

ब) गृहीतकृत्यामुळे निष्कर्ष निर्मितीस साहाय्य होते.

क) गृहीतकृत्यामुळे अयोग्य पद्धतीने तथ्यसंकलन होते.

ड) गृहीतकृत्यामुळे संशोधन कार्यास दिशा प्राप्त होते.

उत्तर- क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.