https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

भारतातील आदिवासींच्या समाजाच्या प्रमुख समस्या


 

भारतातील आदिवासींच्या समाजाच्या प्रमुख समस्या –

भारतातील आदिवासी समुदायात निर्माण झालेल्या समस्यांचे दोन प्रकारात वर्गीकरण करता येते. प्राचीन काळापासून आदिवासी समुदाय जगत असलेल्या पारंपरिक जीवनामुळे अनेक समस्या आदिवासींमध्ये निर्माण झालेल्या आहेत तर ब्रिटिश काळापासून प्रगत जातीशी आलेल्या संपर्कामुळे काही आधुनिक व रवीन समस्या आदिवासींच्या जीवनात निर्माण झालेल्या आहेत. दोन्ही प्रकारच्या समस्या निर्मितीची कारणे वेगळी वेगळी असली तरी त्या समस्यांमुळे आदिवासींच्या जीवनात अनेक अडचणींचे डोंगर उभे राहिलेले आहेत. या प्रस्तुत मुद्द्यांत दोन्ही प्रकारच्या समस्यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत.

१) पृथकता किंवा एकांतवास - आदिवासींच्या जीवनात समस्या निर्माण होण्यास कारणीभूत घटक म्हणजे 'एकांतवास' मानला जातो. मुख्य सांस्कृतिक हापासून आदिवासी समाज तुटून राहण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांचे दुर्गम डोगराळ प्रदेश, घनदाट जंगल, एकाकी बेटावर असलेले वास्तव्य मानले जाते. दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत कठीण व बिकट प्रदेशात वस्ती करून राहात असल्यामुळे समाजाशी त्यांचा संपर्क येऊ शकला नाही. संपर्काअभावी जगात झालेले बदल त्याच्यापर्यंत पोहचू शकले नाहीत. त्यामुळे आदिवासी समाज हा इतर समाजापेक्षा जगासलेला राहिला. एकांतवास आणि भौगोलिक पृथकता ही आदिवासींच्या कासाच्या मार्गातील सर्वांत मोठी अडचण ठरली. एकांतवासात राहिल्यामुळे स्कृतिक आदानप्रदान होऊ शकले नाही. सांस्कृतिक आदानप्रदानाच्या अभावी हा ब्याज शतकानुशतके निसर्गाधीन जीवनपद्धतीचा अवलंब करून जीवन जगत राहिला. तंत्रज्ञानाच्या अभावामुळे दारिद्र्य, अज्ञान, अनारोग्य, नैसर्गिक संकटे इत्यादी समस्याशी अनेक शतकापासून हा समाज झुंजत राहिला. प्रगत समाजाबद्दल भय दू आणि बुजऱ्या स्वभावामुळे आदिवासी जमातींनी संपर्क साधण्याचा प्रयत्न न करता अलिप्त राहण्याचे धोरण पत्करल्यामुळे आदिवासी समाज विकास प्रक्रियेपासून फेकला गेला.

२) संपर्कातून समस्या - आदिवासी भौगोलिकदृष्ट्या पृथक राहात असले तरी प्रगत समाजाने आपल्या हितासाठी आदिवासींशी संपर्क प्रस्थापित केले. ख्रिश्चन  मिशनरी आणि हिंदू धर्मप्रसारकांनी आपल्या धर्मप्रसारासाठी आदिवासी भागात कार्य करायला सुरुवात केली. त्याच्या परिणाम भोळ्याभाबड्या आदिवासींवर आपला धर्म लादला. आदिवासींचा धर्म निसर्गपूजेवर आधारलेला होता. इतर धर्मियांनी केलेल्या प्रसार व प्रचारामुळे आपली जुनी संस्कृती हे पूर्णपणे सोडू शकले नाहीत आणि नव्याने आलेल्या तत्त्वांचाही पूर्णपणे स्वीकार करू न शकल्यामुळे त्यांच्या धर्म, भाषा, बोलीभाषा, परंपरा, रूढीविषयक समस्या निर्माण होऊन त्यांचे सांस्कृतिक अस्तित्व नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली. जंगलतोड करणारे ठेकेदार, सावकार, फिरने व्यापारी, कंत्राटदार यांचा आदिवासी समाजाशी संपर्क आला. या प्रगत समाजातील लोकांनी आदिवासींचे करता येईल तेवढे शोषण करण्याचा प्रयत्न केला. जमिनी हडप करणे, आदिवासी मुलींना वेश्यागमनी करणे, त्यांच्या बायका-मुलींची विक्री इत्यादी समस्या निर्माण झालेल्या आहेत. 'जंगल हा आदिवासींच्या उपजीविकेचा प्रमुख आधार होता. जंगलातील संपत्ती मिळविण्यासाठी ब्रिटिशांनी काही नियम आदिवासींवर लादले. या नियमांमुळे आदिवासींच्या जंगलातील उत्पादनाच्या हक्कांवर गदा आली. ब्रिटिश राजवटीच्या काळात ब्रिटिशांनी जंगल खाते निर्माण केले. या खात्याचे कायदे आदिवासींच्या उदरनिर्वाहावर आघात करणारे होते. त्यांनी केलेल्या कायद्यामुळे आदिवासींचा जंगलावरील हक्क हिरावला गेल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. आदिवासींचे जीवनच पूर्णपणे जंगलावर अवलंबून असल्याने जंगलावरील हक्क नष्ट झाल्याने त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक हितावर आक्रमण झाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या त्यामुळे विकासाला बाधा आली.

३) आर्थिक विकासाच्या समस्या - 'आदिवासींची स्वतःची वेगळी समुदायाची शेतजमीन होती की जिचे स्वरूप इतर सामान्य शेतकऱ्यांपेक्षा वेगळे होते. आदिवासी नसलेल्या लोकांनी जंगल आणि डोंगर संपत्तीचे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शोषण करायला सुरुवात केली आणि परिणामतः आदिवासींची पारंपरिक अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था भरडली जाऊ लागली.' जंगलावर आदिवासींची मालकी होती. त्यांना जंगलात हवे ते करण्याची मुभा होती. जंगले हेच त्यांच्या जीवनाचा आधारस्रोत होता. परंतु, बदललेल्या परिस्थितीने त्यांना जंगलातून बेदखल करण्यात आले. जंगलातील साधनसंपत्तीचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घेण्याचे धोरण प्रगत समाजाने आखल्यामुळे आदिवासींच्या जीवनात अनेक समस्या निर्माण झाल्या. आदिवासींची अर्थव्यवस्था पूर्वी वस्तूविनिमयावर आधारित होती. ठेकेदार, कंत्राटदार, सावकार, खाण मालक आणि फिरते व्यापारी यांच्या संपर्कातून आदिवासींचा आधुनिक अर्थव्यवस्थेशी संबंध आला. सावकार नाममात्र कर्जापोटी भरमसाट व्याज आकारत असत. व्याज देण्यास आदिवासी अक्षम ठरल्यामुळे त्यांच्या जमिनी व्याजापोटी हिसकावून घेण्यात आल्या. आदिवासींना श्रम व वस्तूंची पुरेपूर किंमत माहिती नसल्याने मोठ्या प्रमाणावर लूट केली जाते. त्यांच्या जमिनी नाममात्र किमतीत गिळंकृत केल्या जातात. नैसर्गिक साधनसंपत्ती नाममात्र दरात मिळविली जाते. आदिवासींच्या आर्थिक शोषणामुळे ते विकासापासून वंचित झालेले दिसतात. भौगोलिक पृथकतेमुळे आदिवासी स्थलांतरित शेती करतात. तो त्यांच्या परंपरागत जीवनपद्धतीचा एक भाग मानला जातो. ही शेती मागासलेली असल्यामुळे आदिवासींना अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने दारिद्र्यात खितपत पडावे लागते. आधुनिक बी बियाणे, खते व अवजारांची माहिती नसल्याने शेतीतून उत्पन्न मिळत नाही. कमी उत्पन्नामुळे उदरनिर्वाहाची समस्या निर्माण होते आणि मग आदिवासी पोट भरण्यासाठी इतर भागात स्थलांतर करतात. आदिवासींच्या उत्पन्नाचे जंगल हे प्रमुख साधन होते. जंगलातील लाकूडफाटा गोळा करणे, मध, डिंक गोळा करणे, शिकार व मासेमारीतून त्यांचे जीवन चालत असे. नवीन जंगल कायद्यामुळे जंगलात शिकार, मासेमारी आणि लाकूडतोड यांना बंदी लादल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा भयंकर प्रश्न निर्माण झाला आहे. जंगल कायदे आणि जंगल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे आदिवासींचा हक्क हिरावला गेला. त्यामुळे आदिवासींच्या आर्थिक विकासात अडथळे येतात. जंगलावरील मालकी हक्क संपल्याने उदरनिर्वाहासाठी आदिवासी शहरात स्थलांतर करतात. त्यांच्याकडे तांत्रिक ज्ञानाचा अभाव असल्याने औद्योगिक क्षेत्रातील शारीरिक कामे, बांधकाम मजुरी किंवा इतर क्षेत्रातील अंगमेहनतीची कामे करतात. त्या कामाचा त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही. त्यांची मजुरी अनेकदा दिली जात नाही. दादागिरी करून अल्पमोबदल्यावर राबविले जाते. त्यांना कोणत्याही सुखसुविधा दिल्या जात नाहीत. ठेकेदार मधल्यामध्ये दलाली खातात. वरील सर्व कारणांमुळे आदिवासी आर्थिकदृष्ट्या प्रचंड हालाखीचे जीवन जगत आहे. त्यांच्याकडे कोणताही पैसा उरत नाही सर्व पैसा उदरनिर्वाहासाठी खर्च होत असल्याने प्रगतीच्या सर्व वाटा बंद होतात. आदिवासींच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न केले जात नाहीत तोपर्यंत ते आर्थिकदृष्ट्या संपन्न होऊ शकणार नाहीत आणि त्यांचा विकासदेखील होऊ शकणार नाही.

४) सामाजिक व सांस्कृतिक समस्या - आदिवासींचा मूळ धर्म निसर्गप्रधान होता. त्यांच्या निसर्गप्रधान जीवनवृत्तीशी मेळ खाणारा होता. वाघ्या, डोंगर, कडूवाणी हे सर्व जंगलातले देव आदिवासी संस्कृतीचा एक भाग होते. त्यांच्या पूजाविधीमध्ये निसर्गात आढळणाऱ्या झाडे, वेली, पाने आणि वनस्पतींचा समावेश होता. उदाहरणार्थ, लग्नात उंबर वृक्षाचा मंडप. ख्रिश्चन व हिंदू धर्माच्या संपर्कामुळे मूळ धमात व्यापक स्वरूपाचे परिवर्तन झाले. परधर्माच्या प्रभावाने आदिवासी समाजामध्ये अनेक वाईट रूढी, परंपरा सुरू झाल्या. आदिवासी विवाहामध्ये वधूमूल्याची रक्कम नाममात्र स्वरूपाची होती. हिंदू धर्मातील हुंडा पद्धतीच्या प्रभावामुळे वधूमूल्याची समस्या गंभीर बनली. वधूमूल्याची रक्कम वाढल्यामुळे ती चुकविण्यासाठी सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते. उच्चभ्रू समाजाच्या अनुकरणातून आदिवासी समाजातील लग्नात प्रचंड पैसा खर्च होऊ लागला. लग्न समारंभात भपकेबाजपणा व उधळपट्टीला उधाण आले. विवाहातील हा खर्च पेलण्याएवढे उत्पन्न नसल्यामुळे आदिवासी समाज कर्जबाजारी बनला. आदिवासी समाजात तरुण व तरुणींचे सामाजीकरण घडवून आणण्यासाठी युवागृहाची स्थापना करण्यात आली होती. आधुनिक चंगळवादी संस्कृतीच्या प्रभावामुळे युवागृहाचे पतन झाले. युवागृहामध्ये अनेक अनैतिक गोष्टी शिरल्या. आदिवासी समाजामध्ये बालविवाहाच्या वाढत्या प्रमाणामुळे बालमृत्यू आणि मातामृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात हजारी ४५ इतके बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण आहे. डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांनी 'कोवळी पानगळ' पुस्तकात बालमृत्यूचे वास्तव मांडले आहे. आदिवासी भागांमध्ये कुपोषणाची समस्या आढळून येते. वाढत्या कुपोषणातून सिकलसेल सारख्या गंभीर आजाराने अनेक आदिवासी तरुण मृत्युमुखी पडत आहेत. उच्चभ्रू समाजातील मुलींच्या घटत्या प्रमाणामुळे मुलांना मुली मिळत नाहीत. या समाजातील मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वा त्यांचा विवाह होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दलालांच्या माध्यमातून आदिवासींच्या मुलींशी विवाह होत आहेत. विवाहानंतर या मुलींना गुलामासारखे वागविले जाते. भोळ्याभाबड्या आदिवासी मुलींना लालूच दाखवून वा पालकांना पैसे देऊन मुली खरेदी केल्या जातात आणि या मुलींना जबरदस्तीने वेश्यागमन करण्यास भाग पाडले जाते किंवा वेश्या बाजारात त्यांची बिक्री केली जाते. आदिवासी स्त्रियांचे लैंगिक शोषण बिगर आदिवासी पुरुषांकडून केले जाते. दारिद्र्यामुळे आदिवासी स्त्रियांमध्ये वेश्यावृत्ती आणि अनैतिक व्यवसायाचा • प्रसार सुरू झाला. त्यातून कौटुंबिक तणाव आणि व्यसनाधीनता ही समस्या निर्माण होत आहे. कौटुंबिक तणावातून घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे.

५) भाषाविषयक समस्या - भाषा हा घटक आदिवासींच्या समस्या निर्मितीतील प्रमुख घटक बनलेला आहे. प्रत्येक आदिवासी समाज स्वतंत्र बोलीभाषा बोलतो. आदिवासींच्या बोलीभाषेसाठी स्वतंत्र लिपी नाही. आदिवासी भाषा या मौखिक स्वरूपाच्या आहेत. लोकगीते, कहाण्या, दंतकथा, उखाणे, म्हणी, वाक्प्रचार इत्यादी मौखिक स्वरूपात भाषेचे अस्तित्व असल्यामुळे आदिवासींच्या ऐतिहासिक माहितीची सुसंगती लागत नाही. आदिवासी संस्कृती, सणसमारंभ, पूजाविधी, सामाजिक व राजकीय इतिहासाची उकल करणे कठीण होऊन बसले आहे. ब्रिटिश काळात आदिवासींचा प्रगत जमातीशी संपर्क होऊ लागला. प्रगत समाजाशी संपर्कामुळे आदिवासींना प्रगत समाजाची भाषा शिकावी लागली. प्रगत समाजाशी बरोबरी करण्यासाठी आदिवासींना शिक्षण घेणे आवश्यक होते. प्रगत समाजातील शिक्षणव्यवस्था इंग्रजी, राष्ट्रीय व प्रादेशिक भाषेत शिक्षण उपलब्ध करू देते. प्रगत समाजाची भाषा अवगत करता करता आदिवासी समाज आपल्या मूळ भाषेला विसरू लागला. नव्याने स्वीकारलेली भाषा पूर्णपणे अवगत न केल्यामुळे आदिवासींची स्थिती 'इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. मूळ आपली भाषा पण पूर्ण येत नाही तर प्रगत समाजाच्या भाषेवर पकड मिळविता येत नाही. त्याच्या परिणाम आदिवासी समाजामध्ये न्यूनगंड निर्माण झाला. भाषिक कौशल्याच्या अभावामुळे इतर समाजाशी संवाद साधण्याऐवजी अंतर ठेवणे पसंत करू लागला. भाषिक न्यूनगंड हा आदिवासींच्या शैक्षणिक प्रगतीच्या मार्गात मोठा अडथळा ठरला. भाषिक न्यूनगंडामुळे इतरांशी मनमोकळेपणे संसूचन साधू शकत नाही. आदिवासी भाषा लिपीच्या अभावामुळे आपले अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करत आहे. भाषेच्या नष्ट होण्यातून तिचे सांस्कृतिक अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपले वेगळे अस्तित्व भाषेतून व्यक्त होते. भाषेतून संस्कृतीची ओळख होते; पण भाषा नष्ट झाली हे सर्व गोष्टी निरर्थक ठरतील म्हणून आदिवासींच्या भाषिक समस्या आदिवासींच्या विकासाच्या मार्गातील सर्वांत मोठी अडचण मानली जाते.

६) आरोग्यविषयक समस्या - आदिवासी समाजाच्या आरोग्यविषयक समस्यांचे वास्तव अत्यंत दाहक स्वरूपाचे आहे. आदिवासींना भेडसावणारी प्रमुख समस्या म्हणजे मद्यपान वा व्यसनाधीनता मानली जाते. मद्यपान करणे ही आदिवासी समाजात परंपरागत बाब होती. सण, समारंभ, उत्सव, लग्न इत्यादी कार्यक्रमात आदिवासी समाजात मद्याचे सेवन केले जात असे. परंतु, पूर्वीच्या काळी आदिवासी समुदायात निसर्गात उपलब्ध असणाऱ्या महूची फुले, ताड, माड इत्यादी वस्तूंचा वापर करून घरी दारू पाडत असत; पण आधुनिक काळात हातभट्टी आणि कारखान्यातून तयार होणाऱ्या दारूचे सेवन केले जाते. या दारूमध्ये मद्याकांचे प्रमाण जास्त असल्यामुळे अनेक अरोग्यविषयक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्न आदिवासींच्या जीवनात निर्माण झालेले आहेत. आत्यंतिक व्यसनाधीनतेमुळे शारीरिक कार्यक्षमता कमी होणे, आर्थिक नुकसान, कौटुंबिक झगडे, आजारपण, सामाजिक ताणतणाव व संघर्ष हे प्रश्न आदिवासी समाजामध्ये निर्माण होत आहेत. या समस्येप्रति जनजागृतीशिवाय •आदिवासींच्या विकासाचा मार्ग खुला होणार नाही. तसेच आदिवासींच्या पोषणाबाबत अनेक समस्या आहेत. गरोदर माता आणि लहान बालकांच्या कुषोषणाचा प्रश्न आदिवासी समाजात गंभीर आहे. डॉ. अभग बंग यांनी 'सर्च' संस्थेमार्फत 'कोवळी पानगळ' पुस्तकात महाराष्ट्रातील आदिवासींच्या कुपोषणाचे वास्तव मांडलेले आहे. महाराष्ट्रात दरहजारी बालमृत्यूचे प्रमाण ४५ इतके जास्त दिसून येते. यातील बहुसंख्य बालके आदिवासी समाजाची आहेत. यातून बालमृत्यू, कुपोषण, पोषक आहारासारख्या समस्या आदिवासींच्या विकासाच्या मूळावर आलेल्या दिसतात. आदिवासी समाजातील अज्ञान, अस्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी आणि स्वच्छ कपडे, सुरक्षित निवाऱ्याच्या अभावातून आदिवासींमध्ये त्वचारोग, टायफॉईड, न्यूमोनिया, कॉलरा, साथीचे आजार निर्माण होत आहेत. अपुऱ्या आरोग्य सुविधा आणि अज्ञानामुळे आदिवासी योग्य उपचारांऐवजी मंत्र, तंत्र, जडीबुटी, झाडपालांचा उपचार करतात त्यात रुग्ण दगावण्याची शक्यता असते. आदिवासींमध्ये अज्ञानामुळे मृत्यूचे प्रमाणही सर्वाधिक दिसून येते.

७) अज्ञान व दळणवळणाच्या समस्या - आदिवासी समाजाच्या विकासाच्या मार्गातील सर्वांत मोठी अडचण म्हणजे दळणवळण साधनांचा अभाव मानला जातो. आदिवासी समाज दुर्गम पर्वत, डोंगर रांगांमध्ये वस्ती करत असल्याने त्यांच्यापर्यंत शाळा, दवाखाने, नवीन तंत्रज्ञान, रस्ते, रेल्वे व इतर सर्व सुखसुविधा पोहचविणे अत्यंत अवघड असते. दळणवळणाच्या अभावी आदिवासींना इतरांशी जोडून ठेवणे अवघड होत असल्यामुळे विकासाचा विचार त्यांच्यापर्यंत पोहचत नाही, परिणामतः ते मागासलेले राहतात. तसेच आदिवासी समाजामध्ये अज्ञानाचे प्रमाण जास्त असल्याने त्यांच्यात राजकीय जागृतीचा अभाव असतो, म्हणून त्यांच्यासाठी शासनाने सुरू केलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचत नाही. सरकारी अधिकारी, दलाल, राजकीय कार्यकर्ते त्यांच्या नावावर लाभ उठवितात. आदिवासी भागात राबविल्या जाणाऱ्या योजनांतील प्रचंड भ्रष्टाचारामुळे लाखो रुपये खर्चून अपेक्षित विकास झालेला दिसत नाही. विकासाच्या अभावामुळे काही जहाल विचारांच्या नक्षलवादी संघटना समता आणि विकासाचे स्वप्न दाखवून आपल्या संघटनेत त्यांना ओढण्याचा प्रयत्न सुरू करत आहेत. मध्य भारतात अनेक आदिवासी विभागांमध्ये नक्षलवादी चळवळींचा जोर वाढलेला दिसतो. या चळवळींमुळे आदिवासी देशापासून छूटत चाललेला आहे. या चळवळी त्यांचा विकास करण्याऐवजी आदिवासींचा वापर रून घेत आहेत.

 ८) विस्थापनाच्या समस्या - आदिवासींच्या जीवनात भारताच्या विकासामुळे काही नवीन समस्या निर्माण झालेल्या दिसतात. स्वातंत्र्योत्तर काळात मोठ्या प्रमाणावर वारणी, कालवे, औद्योगिक वसाहती, खाणकाम, वनांचा व्यावसायिक वापर इत्यादी कारणांमुळे आदिवासींना मोठ्या प्रमाणावर विस्थापित व्हावे लागले आहे. भारतामध्ये १५० ते १९९० या कालावधीत कालवे काढणे कार्यक्रम, खाणी, औष्णिक वीज नर्मिती केंद्र, वन्यजीव अभयारण्य, उद्योगधंद्यांची वाढ इत्यादी कारणांसाठी २१२ लाख लोक विस्थापित झाले. त्यांच्यापैकी ८५ टक्के लोक आदिवासी आहेत.' स्थापनाचा सर्वांत मोठा फटका आदिवासींना बसलेला आहे. 'जीवनावश्यक नैसर्गिक साधनांवर सरकारी आणि अन्य ठेकेदारांनी ताबा मिळवून त्यांना निर्वासित करताना त्याचे मानवी हक्क पायदळी तुडविले आहेत. सरकारने विकासाच्या नावाखाली त्यांच्या गा, जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेतल्या आणि या जबरदस्तीला जर त्यांनी विरोध केला तर त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा शिक्का मारला जातो. ' मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले 'नर्मदा बचाव आंदोलन' हे सरदार सरोवरातील विस्थापितांच्या प्रश्नावरील प्रसिद्ध आंदोलन आहे. विस्थापनामुळे आदिवासींना आपल्या मूळ वस्तिस्थानापासून जावे लागले. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. आदिवासींच्या निर्वाहाचे जंगल हे प्रमुख साधन असते. विस्थापनामुळे हे साधन हिरावले जाते. थापन हे आदिवासींच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होय. विकासाच्या नावाखाली आदिवासींच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट केली जाते. या साधनसंपत्तीच्या मालकाला स्थापित करून बाहेर काढले जाते. आदिवासींना विविध कारणांसाठी विस्थापित ते जाते हा आदिवासी चळवळीतील सद्यःकाळातील महत्त्वपूर्ण प्रश्न बनला आहे.

अशा प्रकारे विविध समस्यांना आदिवासी समाजाला सामोरे जावे लागत आहे. या समस्यांतून आदिवासींच्या विकासाचा मार्ग अवरूद्ध केलेला दिसतो. वॅटी सौचरच्या मते, आदिवासींना स्वतःची अस्मिता, न्याय आणि राजकारणात सहभाग तीन गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. आदिवासींना भेडसावणाऱ्या समस्या जोपर्यंत विल्या जात नाहीत किंवा त्यांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केल्याशिवाय आदिवासींचा विकास होणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.