पंजाब विधानसभा निवडणूक निकाल-
• एकूण जागा- ११७ जागा
• आम आदमी पक्ष- ९२ जागा
• कॉंग्रेस- १८ जागा
• शिरोमणी अकाली दल- ०३ जागा
• भाजप- ०२ जागा
• इतर पक्ष- ०२ जागा
पंजाब विधानसभा निवडणूक निकाल तुलना-
वर्ष |
पक्ष |
प्राप्त जागा |
मतदान टक्केवारी |
२०१७ |
कॉंग्रेस |
७७ |
३८.५० |
२०२२ |
कॉंग्रेस |
१८ |
२२.९८ |
२०१७ |
आप |
२० |
२३.७२ |
२०२२ |
आप |
९२ |
४२.०१ |
२०१७ |
अकाली दल |
१५ |
२५.२४ |
२०२२ |
अकाली दल |
०३ |
१८.३८ |
२०१७ |
भाजप |
०३ |
५.३९ |
२०२२ |
भाजप |
०२ |
६.६० |
पंजाब विधानसभा निवडणूक निकाल वैशिष्टे-
• पंजाब विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित पक्षांना मात देत आम आदमी पक्षाने ऐतिहासिक विजय संपादन केला.
• या निवडणुकीत अनेक प्रस्थापित नेत्यांचा पराभव झाला. मुख्यमंत्री चरणजीत चन्नी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग, माजी मुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल
• काँग्रेस पक्षाच्या 50 टक्के जागा घटल्या. शिरोमणी अकाली दल पक्षाच्या अनेक जागांमध्ये घट
• अनुसूचित जातीच्या मतदारांची सर्वाधिक संख्या लक्षात घेऊन काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावाची घोषणा करूनही फारसा फायदा मिळाला नाही.
• पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकी पैकी एकट्या पंजाब राज्यात सत्तांतर झाले.
• आम आदमी पक्षाच्या रूपाने पंजाबच्या जनतेने नवा पर्याय निवडला.
• पंजाब सारखे राज्य गमावून काँग्रेसने आपली पत कमी केली. काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणातील भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे केले जाऊ लागले.
• आप मधील पंजाबच्या विजयामुळे आणि इतर राज्यात मिळालेल्या मतांमुळे आप कडे भविष्यातील भारतातील विरोधी पक्ष म्हणून पाहिले जाऊ लागले.
• अकाली दल आणि भाजप यांच्या तुटलेल्या युतीमुळे दोन्ही पक्षांचे नुकसान झाले. भाजपने अमरिंदरसिंग यांच्या पक्षाशी केलेली युती फारशी लाभदायक ठरले नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.