https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

मुख्य सचिव पदाचे महत्त्व, अधिकार आणि कार्य व भूमिका


 मुख्य सचिव पदाचे महत्त्वअधिकार आणि कार्य व भूमिका

 राज्य प्रशासनाचा आधारस्तंभ आणि केंद्रबिंदू 'मुख्य सचिव' असतो. मुख्य सचिवाला राज्यसरकारचा हात, पाय आणि मेंदूदेखील म्हटले जाते. मुख्य सचिव हा राज्य प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी असतो. राज्य सचिवालयातील पदसोपानातील सर्वांत वरच्या पदावरील अधिकारी असतो. मुख्य सचिव हा सर्व सचिवांचा प्रमुख असतो. महाराष्ट्र प्रशासन व्यवस्थेत मुख्यमंत्र्यानंतर मुख्य सचिव पदाला सर्वाधिक मानसन्मान अधिकार असतात. मुख्यमंत्री आणि मंत्रिपरिषदेच्या अपेक्षांची पूर्ती करण्याची जबाबदारी मुख्य सचिवावर असते. मुख्य सचिव पदी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांची निवड केली जाते. अर्थात, ही परंपरा प्रत्येक वेळी पाळली जात नाही. मुख्यमंत्री आपल्या मर्जीतील सचिवाची मुख्य सचिवपदी निवड करत असतो. त्यामुळे अनेकदा मुख्यमंत्री बदलला की मुख्य सचिव बदलत असतो. मुख्य सचिव हा सचिवालयाचा प्रमुख असतो. सचिवालयातील सर्व विभागावर त्यांचे नियंत्रण असते. मंत्रिपरिषदेचा मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांचा प्रमुख सल्लागार या नात्याने तो मंत्रिमंडळाच्या बैठकींना उपस्थित राहतो. मुख्य सचिव पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तीची बुद्धीमत्ता कार्यकुशलता, प्रामाणिकपणा आणि प्रश्न सोडविण्याच्या क्षमतेचा प्र संपूर्ण प्रशासनावर पडत असतो. मुख्य सचिवाकडे दिलेल्या जबाबदाऱ्या लक्षात घेता या पदावर योग्य अनुभवी व्यक्तींची निवड करणे आवश्यक असते. मुख्यसचिव राज्याला आवश्यक प्रशासकीय नेतृत्व प्रदान करू शकतो. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यात समन्वय प्रस्थापित करण्याचे कार्य मुख्य सचिवाला पार पाडावे लागते, आंध्रप्रदेश प्रशासकीय सुधार समितीच्या मते, "मुख्य सचिव हा लोकसेवा आणि सरकारी अधिकान्याचा सर्वोच्च नेता असतो आणि त्यांच्याशी संबंधित समस्या सेवाशर्ती आणि कार्य पाहात असतो. " प्रशासकीय सुधार आयोगाने मुख्य सचिवाबद्दल व्यक्त करताना सांगितले की, "या पदावरील व्यक्ती प्रशासनाचा दीर्घ अनुभव, वैयक्तिक क्षमता असलेल्या व्यक्तीला सर्वांचा सन्मान प्राप्त करता येऊ शकतो. सर्वांच्या सन्मानास पात्र असलेल्या व्यक्ती आपल्या जबाबदाऱ्या कुशलतेने पार पाडू शकतो. म्हणून आदरास पात्र व्यक्तीची मुख्य सचिव म्हणून नेमणूक करावी." प्रशासकीय सुधारणा आयोग आणि विविध आयोगांनी मुख्य सचिवाच्या नेमणुकीबाबत मार्गदर्शन केलेले आहे, तरी या पदावरील व्यक्तीची नियुक्ती राजकीय आधारावर केली जाते. त्यामुळे प्रशासकीय अनुभवाला दुय्यमत्व प्राप्त होते. डॉ. मीना सोगानी यांनी मुख्य सचिवाची नियुक्ती करताना सेवा ज्येष्ठता, सेवा अभिलेख, कार्य निवारण क्षमता आणि मुख्यमंत्र्यांचा विश्वास इत्यादी घटकांचा प्रभाव पडत असतो. मुख्य सचिवाच्या नेमणुकीत मुख्यमंत्र्यांच्या मताला सर्वाधिक महत्त्व असते. डॉ. एस. आर. माहेश्वरी यांच्या मतानुसार, "राज्य प्रशासन प्रभावी पद्धतीने चालण्यासाठी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांच्यात ताळमेळ आणि आपआपसांतील समन्वय आणि विश्वास असणे आवश्यक असते." या पदाचे महत्त्व लक्षात घेऊन डॉ. शर्मा आणि गोव्हर यांनी मुख्य सचिव पदाला 'किंग पीन' म्हटले आहे जी सचिवालयात कोठेही जोडली जाऊ शकते. मुख्य सचिव हा सचिवालयातील सर्व सचिव आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्याची भूमिका पार पाडतो. मुख्य सचिव पदावरील व्यक्तीची निवड अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक असते. सर्व सचिव अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रशासनाचा गाडा हाकत असतात. प्रशासन चालविताना सर्व विभागांशी त्यांना विचारविनिमय करावा लागतो. राज्य सेवेचा प्रमुख या नात्याने सचिवांच्या बैठकीचे अध्यक्षस्थान स्वीकारतो. राज्याचा प्रमुख विकास अधिकारी या नात्याने धोरण आखणी आणि अंमलबजावणीबाबत मंत्री, सचिव आणि विभागप्रमुखांना मार्गदर्शन सल्ला देण्याचे काम करतो. आपली योग्यता, पात्रता, प्रामाणिकपणा आणि निष्पक्षपातीपणा इत्यादी गुणांच्या जोरावर मुख्य सचिव सर्वांच्या आदर विश्वासास पात्र ठरू शकतो. मुख्य सचिव कार्य भूमिका मुख्य सचिव हा राज्य प्रशासनाचा मध्यवर्ती केंद्रबिंदू असतो. संपूर्ण प्रशासन त्यांच्या मार्गदर्शन, सल्ला आणि आदेशाने आपली वाटचाल करत असते. मुख्य सचिवाला पुढील जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतातमतभेद दूर करण्यासाठी प्रभावी मध्यस्थाची जबाबदारी मुख्य सचिवाला पार पाडावी लागते.

मुख्य सचिव कार्य व भूमिका- मुख्य सचिव हा राज्य प्रशासनाचा मध्यवर्ती केंद्रबिंदू असतो. संपूर्ण प्रशासन त्यांच्या मार्गदर्शन, सल्ला आणि आदेशाने आपली वाटचाल करत असते. मुख्य सचिवाला पुढील जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात

१) मंत्रिमंडळाचा प्रमुख सल्लागार- मुख्य सचिव हा मंत्रिमंडळाचा प्रमुख सचिव असतो. प्रशासकीय बाबतीत मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो. मंत्रिमंडळाचा सचिव या नात्याने मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा तयार करणे, बैठकीची व्यवस्था पाहणे, बैठकीतील चर्चेच्या नोंदी घेणे, बैठकीचे रेकॉर्ड तयार करणे, विविध विभागाचे प्रस्ताव बैठकीत ठेवणे आणि बैठकीत झालेल्या निर्णयानुसार अंमलबजावणी करणे इत्यादी कार्य करतो. तसेच मंत्रिमंडळाला धोरण निर्मितीसाठी आवश्यक साहाय्य आणि सल्ला देण्याचे कार्य मुख्य सचिव करत असतो. मुख्यमंत्र्यांचा प्रमुख सल्लागार म्हणूनदेखील त्याला कार्य करावे लागत असते. मुख्य सचिव हा मुख्यमंत्र्याला अनौपचारिकरीत्या राज्य प्रशासन, नीति निर्माणाबाबत सल्ला देत असतो. मुख्यमंत्रीदेखील अनेकदा मुख्य सचिवाचा सल्ला घेत असतात.

२) राज्य प्रशासनाचा समन्वयक - मुख्य सचिव हा राज्य प्रशासनाचा प्रमुख समन्वयक असतो. संपूर्ण सचिवालय प्रशासनावर मुख्य सचिवाचे नियंत्रण असते. सचिवालयाचे कामकाज प्रभावी आणि व्यवस्थित पद्धतीने चालविण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचा अधिकार त्याला असतो. सर्व खात्याशी विचारविनिमय करून विविध खात्यातील कार्यात समन्वय निर्माण करण्याचे कार्य पार पाडावे लागते. मुख्य सचिव हा कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभागाचा प्रमुख असतो. सचिवाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविणे. विविध विभागांशी संबंधित कार्याचे मूल्यमापन करून सचिवांमध्ये उचित समन्वय आणि सहयोग प्रस्थापित करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असते. मुख्य सचिव हा केंद्र आणि राज्य प्रशासनात आवश्यक समन्वय आणि संसूचन साधण्याचे काम करत असतो. आंतरराज्यीय सद्भाव आणि मतभेद निवारणाच्या बाबतीतदेखील मुख्य सचिवाचा सल्ला घेतला जातो.

३) विभागप्रमुख म्हणून कार्य- मुख्य सचिव हा राज्य प्रशासनाचा प्रमुख असतो. राज्य प्रशासनाचा प्रमुख या नात्याने सचिवाची बैठक बोलविणे, बैठकीचे अध्यक्षस्थान स्वीकारणे, बैठकीची कार्यक्रम पत्रिका तयार करणे, बैठकीत विविध विषयांवर चर्चा घडवून आणणे, विविध विभागातील मतभेदातील मुद्द्यांचे निवारण करणे आणि सचिवातील अंतर्गत मतभेद मिटविण्याचा प्रयत्न करणे इत्यादी कार्य विभागप्रमुख म्हणून पार पाडावे लागते. सचिवाचा प्रमुख म्हणून विविध विभागातील मतभेद दूर करण्यासाठी प्रभावी मध्यस्थाची जबाबदारी मुख्य सचिवाला पार पाडावी लागते

) पर्यवेक्षण नियंत्रण विषयक कार्य- मुख्य सचिव हा राज्य प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी असतो. राज्य प्रशासनातील सर्व सचिव इतर अधिकाऱ्यांदा प्रभावी नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पार पाडावी लागते. सचिवालयातील कार्याचे परीक्षण करून योग्य त्या सूचना मार्गदर्शन करण्याचा अधिकार असतो. सचिव प्रमुख या नात्याने त्यांच्या आदेशाची अवहेलना कोणीही करू शकत नाही. आदेश पाळणान्या सचिव अधिकान्यांवर कारवाई करण्यासंदर्भातील शिफारस करण्याचा अधिकार असतो. आदेशाची अवहेलना करण्यास जाब विचारण्याचा अधिकार असतो राज्य सचिवांना मार्गदर्शन सल्ला देण्यासोबत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्यदेखील पार पाडावे लागते. सर्व सनदी सेवांचे अध्यक्षांच्या नेमणुका, सनदी सेवकांच्या नियुक्त्या बदल्या, बढती . बाबत सर्व अधिकार मुख्य सचिवाला असतात.

) राष्ट्रपती राजवट काळातील कार्य- राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असेल तर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ बरखास्त होते. संपूर्ण सत्ता राज्यपालाच्या हातात येते. या काळात राज्य प्रशासनाचे संचलन मुख्य सचिवाच्या सल्ल्याने केले जाते. मंत्रिमंडळाच्या अनुपस्थितीत सर्व महत्त्वपूर्ण निर्णय मुख्य सचिवाद्वारे घेतले जातात. सर्व सचिवालय त्यांच्या आदेशाप्रमाणे कार्य करतात.

) आर्थिक कार्य-मुख्य सचिव हा खर्च प्राधान्य समितीचा सचिव असतो. वित्तमंत्री समिती अध्यक्ष आणि वित्त सचिव हा सदस्य असतो. ही समिती राज्यातील खर्चाचे प्राधान्यक्रम ठरवत असते. या समितीच्या शिफारशीनुसार विविध विभागांना रकम दिली जात असते. अंदाजपत्रकात कोणकोणत्या बाबींना महत्त्व दिले पाहिजे याबाबतही समिती काम करत असते. राज्याचे आर्थिक धोरण निश्चित करण्यात मुख्य सचिवाचा वाटा असतो.

) इतर कार्य- राज्याचा मुख्य विकास अधिकारी म्हणून मुख्य सचिवाला अनेक जबाबदान्या पार पाडाव्या लागतात. राज्याचा विकास घडवून आणण्यासाठी आवश्यक धोरण निर्मितीबाबत मंत्रिपरिषदेला सल्ला देणे. राज्य विकासासाठी आवश्यक बाबींची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होते की नाही यावर देखरेख ठेवणे. सार्वजनिक परिणाम करणारा निर्णय वा धोरण आखणीबाबत मुख्य सचिवाची सल्ला परवानगी घेणे विभागांना आवश्यक असते. राज्यात कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचा अधिकार मुख्य सचिवास असतो.

राज्य प्रशासनाचा प्रमुख या नात्याने सचिवाकडे अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाच्या सोपविलेल्या आहेत. सचिवाचा प्रमुख या नात्याने मुख्य सचिवाला अत्यंत कार्यक्षमतेने आपल्या जबाबदाच्या पूर्ण कराव्या लागतात. मुख्य सचिव पद हे समानातील प्रथम सचिवाच्या वास्तव प्रमुखाचे आहे. या पदासंदर्भात प्रो. माहेश्वरी सांगतात की, "राज्य सचिवालयात मुख्य सचिव ही अशी किंग पीन असते की सचिवालयातील सर्व विभागांना जोडण्याचे काम करते. मुख्य सचिव हा केवळ सचिवाचा नेता या नागरी सेवेचा अध्यक्ष नसतो तर मुख्यमंत्र्याचा प्रमुख सल्लागार असतो."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.