via IFTTT
परंपरेचा अभिमान
ॲरिस्टॉटल एका
कारागिराकडे गेला, त्या कारागिराकडे एक चाकू होता. ॲरिस्टॉटलने
विचारले, हा चाकू कधीपासून वापरतोस तो अभिमानाने उत्तरला माझ्या
पूर्वजांपासून आम्ही हा वापरतो. ॲरिस्टॉटल म्हणाला, 'कधी चाकूचे पाते
बदलले नाही का? हो कधी कधी
बदलावे लागते, आणि मूठ देखील
बदलावे लागते.' चाकूचे दोनच भाग होते. मूठ आणि पाते, या दोन भागापैकी कधी मूठ
बदलली तर कधी पाते तरीही कारागीर पूर्वजांपासून हा चाकू वापरतो आहे असे अभिमानाने
म्हणतो.
तात्पर्य- मानव परंपरेने
चालत आलेल्या गोष्टींचे मूर्खपणे पालन
करतो.
परंपरांची
निरर्थकता
गाडगे बाबा एकदा
पंढरपूरला गेलेले असताना काही लोक इंद्रायणी नदीच्या काठी श्राद्ध घालत होते.
बाबांनी विचारले काय करत आहात, 'त्यातील एक जण म्हणाला
माझे वडील वारले आहेत आम्ही श्राद्ध करतो श्रद्धातील मंत्रामुळे माझ्या वडिलांच्या
आत्म्यास शांती मिळेल आणि होमद्वारे वस्तूची प्राप्ती होईल.' हे ऐकून गाडगे बाबा इंद्रायणी नदीत उतरून श्राद्ध करणार्यांच्या दिशेने पाणी
उडवू लागले. श्राद्ध करणारे बाबांना म्हणाले हा काय बावळटपणा लावला आहे. बाबा
म्हणाले, 'मी माझ्या शेताला पाणी देत आहे.' ते सर्वजण म्हणाले, 'शेत कुठे आहे.' बाबा म्हणाले, 'शेत अमरावतीला आहे. ' मग येथून पाणी तेथे कसे पोहोचेल. तुमच्या वडिलांना स्वर्गापर्यंत होमद्वारे
अन्न पोहोचते तर माझ्या अमरावतीच्या शेतापर्यंत पाणी का पोहोचणार नाही हे ऐकताच श्राद्ध
करणाऱ्या लोकांना खऱ्या परिस्थितीची जाणीव होते. ते आपली चूक कबूल करतात.
तात्पर्य- अनेकदा पण
निरर्थक पणे परंपरेचे पालन करत असतो.
मनातील अंतर
आपण रागात असताना
जोरात ओरडतो किंवा आवाज वाढतो असे का होते? असा गौतम बुद्धाने
शिष्यांना प्रश्न विचारला. शिष्यानी आपल्या ज्ञानाप्रमाणे प्रश्नाचे उत्तर दिले
परंतु कोणत्याही उत्तराने बुद्धाचे समाधान झाले नाही. शेवटी बुद्ध म्हणाले की, 'जेव्हा दोन
व्यक्ती एकमेकावर रागावतात तेव्हा त्यांच्या मनामधले अंतर वाढलेले असते, आणि हेच अंतर
भरून काढण्यासाठी ते चढ्या आवाजात बोलतात. कारण दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात
असतात तेव्हा ते अतिशय हळू आणि शांतपणे बोलत असतात. कारण त्यांची मने जवळ
आलेली असतात. दोन मनांतील अंतर कमी झाले की प्रेम वाढू लागते तसतसा संवाद सुलभ होत
जातो या परिस्थितीत बोलण्याची गरज नसते फक्त नजर वा देहबोलीतून आपले म्हणणे
दुसऱ्या पर्यंत पोचवता येते.
तात्पर्य- मनामनातील अंतर
कमी झाल्यास समाजातील संघर्ष कमी होईल.
बोगदा
सुप्रसिद्ध
अर्थशास्त्रज्ञ अल्बर्ट हर्षमन बोगदा नावाची कथा सांगतात. बोगद्यातील दुपदरी रस्त्यावर ट्रॅफिक जाम होतो. त्यामुळे
वाहनांची लांब रांग लागते. अचानक बाजूच्या रस्त्यावरील वाहने सुरू होतात. हे दृश्य
बाजूच्या रस्त्यावरील वाहनधारकांना आश्वासक वाटते. वास्तविक त्यांचे वाहन जागेवर
असते परंतु रस्ता मोकळा झाला ही गोष्ट समाधान देणारी वाटते पण थोडा वेळ गेल्यानंतर
ही बाजूच्या रस्त्यावरील वाहने अजिबात हलत नाही मात्र शेजारच्या रस्त्यावरील वाहने
वेगाने पुढे जातात. त्यामुळे बाजूच्या रस्त्यावरील लोकांना थोड्या वेळात राग यायला
लागतो. दुसऱ्या रस्त्यावरील माणसांबद्दल मत्सर वाटू लागतो. तर रस्त्यावरील सर्व
माणसांना पुढे काहीतरी अन्याय किंवा पक्षपात घडत आहे असे वाटायला लागते. अन्यायाचे
ताबडतोब निवारण करण्यासाठी थेट कृती करायचे मनात येऊ लागते असे करणे बेकायदेशीर
वाटत असताना देखील आपला रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्यावर आपण गाडी टाकतो.
तात्पर्य- विकास हा
सर्वसमावेशक नसेल तर समाजात स्फोटक परिस्थिती निर्माण होते
मनाचा मोठेपणा
यशवंतराव चव्हाण
मुख्यमंत्री बनल्यानंतर साहित्यिक प्र.के. अत्रे यांनी मराठा वर्तमानपत्र 'निपुत्रिकाच्या हाती महाराष्ट्राच्या सत्तेच्या दोर्या' बातमी छापली. चव्हाण यांनी फोन करून अत्रे यांना सांगितले, अत्रे मी
निपुत्रिक नाही. इंग्रजांच्या विरोधात आंदोलन करत असताना मी सापडत नसल्यामुळे
त्यांनी माझ्या घरावर धाड टाकली. या धाडीत मी सापडलो नसल्याने त्यांनी माझा राग
पत्नी वेणूताई वर काढला. इंग्रज सैनिकांनी वेणूताईंना जबरदस्त मारहाण केली. या मारहाणीच्या
वेळेस त्या गरोदर होत्या. मारहाणीमुळे त्यांच्या गर्भाला आणि गर्भाशयाला इजा
झाल्यामुळे त्या आयुष्यभर आई बनू शकले नाहीत. परंतु त्यावेळेस त्यांना जेवढे दुःख
झाले नाही, त्यापेक्षा जास्त दुःख आज तुम्ही छापलेली बातमी वाचून
झाले.' दुसऱ्या दिवशी प्र के अत्रे यांनी यशवंतराव चव्हाण यांची जाहीर माफी मागितली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.