https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त वस्तुनिष्ठ प्रश्न आणि माहिती International Women Day quiz



 
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त वस्तुनिष्ठ प्रश्न  सरावासाठी उपलब्ध करून देत आहे.

Computer Science Quiz

Please fill the above data!
coin :  0

Name : Apu

Roll : 9

Total Questions:

Correct: | Wrong:

Attempt: | Percentage:

 

आंतरराष्ट्रीय महिला दिवस इतिहास, उद्देश, थीम आणि महत्व-

International Women Day History & Importance

दरवर्षी 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात 'द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितां विषयी पूर्वग्रह असणारी होती. या संघटनेने केलेल्या मर्यादित मतदान हक्क चळवळीला बहुसंख्य काळया वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला 

    १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. या परिषदेत क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे अशी घोषणा केली. आंतरराष्ट्रीय महिला दिवस कामगार आंदोलनाची देण आहे. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकेतील समाजवादी पक्षाच्या  सूचनेनुसार २८ फेब्रुवारी १९०९ मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा केला जाऊ लागला. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, महिला दिन साजरा केला जावा हा ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. साजरा करण्याची तारीख निश्चित नव्हती. या ठरावानंतर २०११ मध्ये  ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि इतर युरोपीन देशात साजरा केला जाऊ लागला. 

    १९१७ मध्ये रशियामध्ये महिला दिनी महिलांनी भाकरी, कपडा आणि मतदानाच्या अधिकारासाठी संप केला. या संपाचा परिणाम स्वरूप रशियातील अंतरिम सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार दिला. या काळात रशियात जुलियन कॅलेंडर चालत होते आणि बाकी देशांमध्ये गेग्रेरियन कॅलेंडर वापरले जात होते. या दोन्ही कॅलेंडर मध्ये  तारखांमध्ये फरक होता. जुलियन कॅलेंडरनुसार १९१७च्या फेब्रुवारी महिन्यातील आखरी रविवार २३ फेब्रुवारीला होता तर गेगरिअन कॅलेंडर नुसार या दिवशी ८ मार्च ही तारीख होती. रशियाने देखील साम्यवादी क्रांतीनंतर गेग्रेरियन कॅलेंडर वापरायला सुरुवात केल्यामुळे ८ मार्च हा दिवस महिला दिवस म्हणून सर्वत्र साजरा होऊ लागला. या दिनामुळे महिलांनी युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला, युनोने १९७५ आंतरराष्ट्रीय महिला दशक साजरा करण्याचा निर्णय घेतला. या दशकाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय महिला दिनाला १९७५ मध्ये औपचारिक मान्यता प्रदान केली.२०११ मध्ये या दिनाचा शताब्दी समारंभ साजरा करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय महिला दिवस उद्देश- विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान, प्रशंसा आणि प्रेम प्रकट करण्यासाठी आणि महिलांना आपल्या ह्क्काप्रती जागरूक करण्यासाठी  हा दिवस साजरा केला जातो.

महिला दिवस थीम- १९९६ पासून दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनी एक थीम निश्चित केली जाते.२०२१ च्या महिला दिनाची थीम 'महिला नेतृत्व: कोविड-19 च्या जगात समान भविष्य साध्य करणे' अशी होती. 2022 ची थीम 'जेंडर इक्वॅलिटी टुडे फॉर अ सस्टेनेबल टुमॉरो' म्हणजेच शाश्वत उद्यासाठी लैंगिक समानता आज आवश्यक आहे'. महिला २०२३ ची थीम "डिजिटल: लैंगिक समानतेसाठी तंत्रज्ञान आणि नवीनता" आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे प्रतिनिधित्व करणारे  रंग- जांभळा, हिरवा आणि पांढरा - हे तीन आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे रंग आहेत.,"जांभळा हा न्याय आणि प्रतिष्ठेचा रंग आहे. हिरवा हा आशेचा रंग आहे. पांढरा हा शुद्धतेचा रंग आहे. असे ठरवण्यात आले."




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.