Y 20 Summit in India/Y 20 शिखर परिषद म्हणजे काय? Y 20 and G 20 यातील संबंध
युवक 20-
भारतात पहिल्यांदा 2023 मध्ये Y20 संमेलन भरत आहे. या आधी हे संमेलन 2022 मध्ये इंडोनेशिया येथे संपन्न
झाले होते. Y 20 हा G 20 संघटनेच्या सदस्य देशाचा अधिकृत
विचारविमर्श करणारा युवा सहभाग गट वा मंच आहे. युवक हे भविष्यातले नेते आहेत म्हणून जागतिक प्रश्नाबद्दल
जागरूकता विकसित करण्यासाठी, विचार आणि कल्पनांचे आदान प्रदान, विविध विषयांवर एकमत आणि वाटाघाटी
करण्यास सक्षम करण्यासाठी हा मंच कार्य करतो. Y 20 हा गट जगभरातील तरुण नेत्यांना एकत्र आणतो. जागतिक आव्हानावर चर्चा करण्यासाठी आलेल्या G 20
नेत्यांना धोरणात्मक शिफारशी करतो.
उद्देश-
Ø Y 20 माध्यमातून जगभरातील युवक नेत्यांना एकत्र आणणे उज्वल भविष्यासाठी
जागतिक विषयांवर चर्चा करून एक अजेंडा निश्चित करणे.
Ø वैश्विक युवा नेतृत्व आणि
भागीदारी वाढवणाऱ्या गतीविधींवर विशेष लक्ष देणे
Ø युवक 20 संमेलन विश्वाला आव्हानित
करणाऱ्या विषयावर चर्चा करण्यासाठी G 20 देशातील तरुणांना एकत्र आणण्याचे
काम करते.
Ø युवक नेतृत्वात वैश्विक मुद्द्या
संदर्भात जागरूकता वाढवणे विचारांचे आदान प्रदान करणे विविध मुद्द्यांवर वाटाघाटी
आणि एकमत तयार करणे हा मुख्य उद्देश आहे.
Ø Y
20 शिखर परिषद ही तरुणांचे रचनात्मक विचार जागतिक पातळीवर पोचवण्याचे एक व्यासपीठ आहे.
Ø Y 20 थीम- Y 20 ची थीम भविष्याचे
कार्य: उद्योग 4.0, नवोपक्रम आणि 21 व्या
शतकातील कौशल्ये. हवामान बदल आणि आपत्ती जोखीम कमी करणे: शाश्वतता जीवनाचा एक
मार्ग बनवणे. शांतता निर्माण आणि सलोखा: युद्ध नसलेल्या युगाची सुरुवात. Y 20 हा एक
प्रतिबद्धता मंच आहे. या ग्रुपच्या माध्यमातून भारतीय
युवकाच्या आवाजाला एक ओळख किंवा एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो आहे. G 20 देशातील तरुण प्रतिनिधी एकत्र येऊन एक मत निश्चित करतील. भारत
सरकारच्या क्रीडा -युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर यांनी जाहीर केलेल्या
थीमवर चर्चा करून सहमती स्थापन केली जाईल. भारतात वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित
करून युवकांचे विषय जगासमोर आणले जातील
Ø भारतात Y 20 शिखर परिषदेच्या अंमलबजावणीची जबाबदारी केंद्रीय माहिती प्रसारण आणि क्रीडा-युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे सोपवलेले आहे. त्यांनी 6
जानेवारी 2023 रोजी Y 20 संमेलनाची ब्रीदवाक्य, लोगो आणि वेबसाईटचे उद्घाटन केले.
त्यांच्या मते, 'जागतिक अर्थव्यवस्थेचे आणि मानवतेचे भवितव्य तरुणांच्या हातात आहे. आजचे तरुण डिजिटल जागतिकीकरण आणि विकसित जगात जन्माला आलेले आहे. ते तरुण वर्तमानाचे भागदार आणि उद्याचे निर्माते आहेत.' याच संमेलनात युवक
अचीवर्स पॅनल संदर्भात चर्चा आयोजित केली होती. या संमेलनात भारताला महासत्ता
बनवण्यासाठी युवकांच्या लोकसंख्येचा कसा वापर करता येईल चर्चा करण्यात आली.
Ø देशातील विविध
विश्वविद्यालयांमध्ये चर्चा आणि सेमिनारचे आयोजन करण्यात आले. भारतात जवळपास साठ
ठिकाणी युवक 20 संमेलने आयोजित करण्यात आली.
Ø भारताच्या G 20 अध्यक्षांनी निश्चित केलेल्या फ्रेमवर्क नुसार केंद्रीय खेळ व क्रीडा मंत्रालय 17 ते 20 ऑगस्ट 2023 या कालावधीत वाराणसी युवा सबमिट 2023 चे आयोजन करण्यात आले होते. Y 20 इंडिया प्रतिबद्धता गटाची बैठक 20 ऑगस्ट 2023
रोजी वाराणसी येथे झाली.
Ø Y
20 भारत शिखर परिषद सामाजिक विकासाच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण, शाश्वत विकास आणि कृती करणे चर्चा करण्यासाठी आणि उपाय शोधण्यासाठी विचार मंथन केले.
Ø या शिखर परिषदेने
भारतीय तरुणांना उत्कृष्ट संधी प्रदान केली. स्वतःला शिक्षित करण्यासोबत G 20
सहभागी होणाऱ्या नेत्यांना सादर करणाऱ्या शिफारशी तयार करण्याची संधी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.