https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

G 20 ऐतिहासिक पार्श्वभूमी, उद्देश आणि कार्य पद्धती/ भारत आणि G 20 शिखर संमेलन 2023


 

G 20 ऐतिहासिक पार्श्वभूमी, उद्देश आणि कार्य पद्धती

स्थापना- 26 सप्टेंबर1999 (पूर्व आशिया आणि आग्नेय आशियात 1997 मध्ये आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर हा गट उदयाला आला.)

ऐतिहासिक पार्श्वभूमी- G 20 हा जगातील प्रमुख विकसित आणि अविकसित देशांचा आर्थिक मंच वा राष्ट्र गट आहे. सुरुवातीला देशाचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांचे गव्हर्नर एकत्र येऊन आर्थिक प्रश्नावर चर्चा करायचे. 2008 मध्ये आलेल्या आर्थिक संकटानंतर या गटातील देशाचे राष्ट्रप्रमुख वर्षातून एकदा G 20 च्या शिखर संमेलनामध्ये सहभागी होऊ लागले. प्रथम संमेलन 1999 जर्मनीची राजधानी भरलेली येथे झाली. अध्यक्षांचे शिखर संमेलन घेण्याची कल्पना फ्रान्सने सर्वप्रथम मांडली. पहिले शिखर संमेलन 2008 मध्ये अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे झाले.

उद्देश- आर्थिक सहयोग आणि विकासावर चर्चा हा प्रमुख उद्देश आहे. जागतिक पातळीवरील आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी प्रमुख देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे. याशिवाय विकसनशील आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना सामावून घेण्यासाठी आणि जगाच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता देण्यासाठी या गटाची स्थापना केलेली आहे.

सदस्य- भारत, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण, कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका हे 19 देश सदस्य आहेत याशिवाय युरोपियन युनियन ही संघटना विसावा सदस्य आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्रे, जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी वर्ल्ड बँक अशा संघटनेचे प्रमुख शिखर परिषदेत सहभागी होतात. सदस्य देशाचे पाच गटात विभाजन  भारत ग्रुप २ मध्ये आहे. रशिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, भारत ग्रुप २ चे सदस्य आहे.  आफ्रिका देशाच्या संघटनेच्या समावेशनाचा भारताकडून आग्रह

आमंत्रित देश-  बांगलादेश, मॉरीशस,इजिप्त, संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर, ओमान,नायजेरिया, नेदरलँड्स आणि स्पेन- कायमस्वरूपी आमंत्रित देश-

शिखर परिषद- २०२२ इंडोनेशिया, २०२३ भारत, २०२४ ब्राझील

गटाची वैशिष्टये-

Ø जगातली 60 टक्के लोकसंख्या G20 गटातील राष्ट्रात राहते.

Ø  जगातील एकूण जीडीपीच्या 85 टक्के उत्पन्न या देशांच्या आहे.

Ø जागतिक व्यापाराचा 75 टक्के हिस्सा या गटातील राष्ट्रांचा आहे.

Ø G7 चे विस्तारित रूप G20 आहे.

G 20 बैठका-

शिरपा बैठका- उदयपूर, वित्त आणि केंद्रीय बँक प्रतिनिधी- बंगलोर, विकास कार्य गट- मुंबई, आराखडा कार्य गट-थिरूवनंतपुरम, आंतरराष्ट्रीय वित्तीय शिल्पकार कार्य गट-चंडीगड, शिक्षण कार्य गट—चैन्नई, कामगार गट- जोधपूर,

कार्य पद्धती- राष्ट्राध्यक्षांच्या वर्षातून भरणाऱ्या एका बैठकीत गटाचा अजेंडा तयार केला जातो. अजेंडा तयार करण्यासाठी एका सदस्य देशात शिखर संमेलन आयोजित केले जाते. वर्षभर गटाचे वित्त विभाग आणि शिरपा विभाग हे समांतर पद्धतीने काम करत असतात. वित्त विभागात अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नर तर शिरपा विभागात राष्ट्राध्यक्षाचा प्रतिनिधी असतो. या गटाला कायमस्वरूपी कार्यालय किंवा सचिवालय नाही. त्यामुळे अजेंडा आणि समन्वय साधण्याचे काम G 20 देशाचे प्रतिनिधी करतात त्यांना शिरपा म्हणून ओळखले जाते. शिरपा हा अध्यक्षाचा प्रतिनिधी असतो. नीति आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत हे भारताचे शिरपा आहेत. याशिवाय नागरिक संसद, महिला, युवा, विचार मंच, श्रमिक, शोधकर्ता इत्यादींचा संपर्क समूह असतो. या समूहाची चर्चा करून अजेंडा निश्चित केला जातो. शिखर संमेलनाच्या शेवटी एक संयुक्त घोषणापत्र जारी केले जाते

भारत आणि G 20-

भारतात पहिल्यांदा संमेलन होते आहे. G 20 राष्ट्रगटाचे अध्यक्षपद भारताकडे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्याचे अध्यक्ष आहेत. 1 डिसेंबर 22 ते 30 नोव्हेंबर 23 शिखर परिषदेपर्यंत अध्यक्ष राहतील. विद्यमान अध्यक्ष आधीचे आणि पुढच्या अध्यक्षाच्या मदतीने कारभार चालवतात. 9 ते 10 डिसेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे शिखर परिषद आहे. आयोजक देशाला वर्षभराचा अजेंडा निश्चित करता येतो. तसेच अध्यक्ष इतर देशांच्या पाहुण्यांना बोलू शकतो. G 20 परिषदेला नवा आयाम देण्यासाठी भारत सरकारने मंत्री स्तरावरील आणि इतर संलग्न घटकांच्या बैठका दिल्लीला घेतलेल्या नसून भारतातील द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या जवळपास 200 शहरांमध्ये बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये जवळपास एक लाख पेक्षा जास्त प्रतिनिधींनी भाग घेतला. विविध ठिकाणी घेतलेल्या बैठकांमुळे भारताची विविधता, संस्कृती, आणि विकासाची अनुभूती जागतिक प्रतिनिधींना देखील घेता आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मत व्यक्त केले की, "जोपर्यंत भारताकडे  G 20 परिषदेचे अध्यक्षपद आहे तोपर्यंत जगाला भारताकडून भविष्यासाठीचे रोडमॅप  तयार करून दिले जातील." पंतप्रधान विविध नेत्यासोबत बैठका करतील. व्यापार करार देखील करतील. जागतिक नेत्याशी भारत सरकारने द्विपक्षीय वाटाघाटी करून विविध व्यापार करार केले. ८ देशासोबत रेल्वे कॉरिडॉर वाटाघाटी-भारत, मध्य-पूर्व आशिया आणि युरोप कॉरिडॉर

ब्रीदवाक्य- भारतात होणाऱ्या शिखर परिषदेचे ब्रीदवाक्य उपनिषादातून घेतले आहे. 'वसुधैव कुटुंबकम' 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' ही प्रमुख थीम आहे.

लोगो मध्ये पृथ्वी ग्रहासोबत 'कमळ' हे चिन्ह आहे. कमळ चिन्हातून प्राचीन वारसा, आपली आस्था आणि बौद्धिकता यांचे दर्शन होते.संघर्ष बरोबर विकास आणि पृथ्वी पर्यावरण अनुकूल दृष्टीकोन दर्शवितो.

G20 च्या बैठकीतील प्रमुख मुद्दे-

Ø युक्रेन वरील रशियाचे आक्रमण-वाढते भूराजनीतिक मतभेद

Ø वैश्विक अर्थव्यवस्था- व्याजदर वृद्धी आणि कोविड 19 महामारी, वाढती मुद्रास्थिती , प्रमुख अर्थव्यवस्थेतील मंदी, महागाईवर नियंत्रण, अधिक खुले आणि पारदर्शी व्यापार नियम

Ø खाद्य सुरक्षा

Ø जलवायू परिवर्तन- 2015 पॅरिस करार लक्षपूर्ती

Ø डिजिटल परिवर्तन- डिजिटल कौशल्य आणि साक्षरता वाढ

Ø स्वास्थ्य- महामारींवर नियंत्रण, स्वास्थ्य प्रशासनाची मजबुती

Ø ऊर्जेची किंमत,

Ø वैश्विक मूल्यांची स्थापना

India Achievement by G 20 hosting

G 20 च्या आयोजनातून भारताने काय साधले?

Ø G 20 परिषदेचे अनेक शंका असताना अत्यंत यशस्वी आयोजन 

Ø रशिया युक्रेन युद्ध संदर्भात परस्पर विरोधी गटात योग्य संतुलन साधत युद्धाची छाया परिषदेवर पडू दिले नाही.

Ø  G 20 नवी दिल्ली शिखर परिषद घोषणा पत्राला परस्परविरोधी देशांची समती मिळवल्यामुळे भारताचे जागतिक पातळीवरील महत्त्व वाढले.

Ø  भारताच्या आग्रहामुळे G 20 मध्ये आफ्रिकन देशाच्या संघटनेचा आफ्रिकन युनियन समावेश झाला. त्यामुळे G 20 ऐवजी G 21 असे संघटनेचे नाव बनले.

Ø  चीनच्या कर्जा सापडत अडकलेल्या आफ्रिकन देशांना भारताच्या रुपाने नवा मित्र मिळाला 

Ø ग्लोबल साउथ आणि विकसनशील आणि विकसित देशांचे नव नेतृत्व म्हणून भारताकडे पाहिले जाऊ लागले.

Ø  भारत मध्यपूर्व युरोप कॅरिडोमुळे (रेल्वे आणि शिपिंग कनेक्टिव्हिटी, व्यापार आणि आर्थिक संबंधात वाढ) नवीन आर्थिक कॅरिडोरमुळे चीनच्या वन बेल्ट वन रोड योजनेला नवा पर्याय मिळाला.

Ø भारताच्या सॉफ्ट पॉवरचे जगाला दर्शन झाले.

Ø  जलवायू परिवर्तन, निम्न कार्बन ऊर्जा निर्मिती, क्रिप्टो करन्सी डिजिटल कम्युनिकेशन इत्यादी विषयासंदर्भात परिषद चर्चा होऊन अनेक गोष्टींवर एकमत झाले.

Ø  विकसनशील देशातील पायाभूत सुविधा विकासाला गती आणि पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक उपायांवर चर्चा झाली,

Ø  जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करण्याचा भारताचा आग्रह

Ø भारताला सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्याचा दावा मजबूत

Ø जागतिक बँक आणि जागतिक नाणेनिधीमध्ये विकसनशील देशांना अधिक प्रतिनिधित्वावर चर्चा

Ø शिखर परिषदेला आलेल्या प्रतिनिधींना भारतीय कला संस्कृती आणि विविधतेचे दर्शन घडले.

Ø  याशिवाय ग्लोबल बायोफ्युल अलायन्स निर्मिती निश्चिती

Ø  भारताच्या डिजिटल सामर्थ्याचे जगाला दर्शन- डिजिटल चलनाचे अनावरण

Ø या शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनामुळे भारताकडे पाहण्याचा  जगाचा दृष्टिकोन बदलला.

Ø  आंतरराष्ट्रीय माध्यमाने देखील भारतीय मुत्सद्देगिरीचे कौतुक केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.