वंचित
बहुजन आघाडीचा 'इंडिया' आघाडीत
प्रवेश होईल का?
प्रकाश आंबेडकरांनी
कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे
आणि 'राष्ट्रवादी'चे
अध्यक्ष शरद पवार यांना एक पत्र लिहिलं. पुन्हा एकदा 'वंचित
बहुजन आघाडी'ची
'इंडिया
आघाडी'मध्ये
सामील होण्याची आपली इच्छा आहे व्यक्त केली आहे. यांनी 'कॉंग्रेसचे
अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे प्रकाश आंबेडकरांशी बोलणार आहेत' असे
अमरावती इथे पत्रकार परिषदेत सांगितलं. मोदींना हरवणं हे उद्दिष्ट साध्य
करण्यासाठी आवश्यक आहे. प्रकाश आंबेडकर 'इंडिया' अथवा 'महाविकास
आघाडी'त
येतील ही चर्चा उद्धव ठाकरेंचं सरकार गेल्यानंतर अधिक वेगाने सुरु झाली. एकनाथ
शिंदे बाहेर पडल्यानं कमकुवत झालेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नवा मित्र हवा
होतो. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फूटीनंतर ही चर्चा अधिक वेगाने होऊ लागली.
इंडिया आघाडीतील नेते
उध्दव ठाकरे आणि आंबेडकर या पुवीच एकत्र आलेले आहेत. प्रकाश आंबेडकरांनी डॉ.बाबासाहेब
आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या संबंधांच्या इतिहासाची उजळणीही केली. ठाकरेंचं 'हिंदुत्व' हे कसं
बहुजनवादी आहे हे सांगत प्रकाश आंबेडकरांनी वैचारिक जवळीकीची मांडणीही केली आहे.
वंचित'ला 'इंडिया' म्हणजेच 'महाविकास
आघाडी' मध्ये
सहभागी करुन घेण्याबाबत आग्रह वाढतो आहे
याचं मुख्य कारण २०१९ च्या निवडणुका आहेत. आमदार-खासदार नसलेल्या 'वंचित'चं
उपद्रवमूल्य हे 'महाविकास आघाडी'च्या
नेत्यांना माहीत आहे. 2019 च्या निवडणुकांमध्ये फटका बसलेला आहे.या निवडणुकीत'वंचित' आणि
एमआयएम युतीमुळे सुशीलकुमार शिंदे (सोलापूर) अशोक चव्हाण (नांदेड),
विशाल
पाटील (सांगली),
राजेंद्र
शिंगणे (बुलढाणा), राजू शेट्टी (हातकणंगले), माणिकराव
ठाकरे (यवतमाळ-वाशीम) अशा आघाडीचे उमेदवार पराभूत होऊन भाजपा-शिवसेना युतीच्या
उमेदवारांना फायदा झाला होता. प्रकाश आंबेडकर यांची अकोला आणि सोलापूरमधील
उमेदवारी भाजपाच्या फायद्याचीच होती. 'वंचित' मुळे
भाजपाचे ९ अतिरिक्त खासदार निवडून आले होते.२०१९ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या
लोकसभा निवडणूकीत वंचित व एआयएमआयएमच्या उमेदवारांना ४१,३२,२४२
(७.६४%) एवढी मते मिळाली होती.राज्यातील २८८ मतदारसंघापैकी २,५२३,५८३
(४.५८%) मते मिळाली. वंचितमुळे ३२ जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार
पडल्याची दिसून आले होते. या मतांची विभागणी २०२४ च्या निवडणुकीत टाळण्यासाठी
त्यांनी 'इंडिया' यावं
याचे प्रयत्न सुरु आहेत. वंचित बहुजन आघाडी' महाविकास
आघाडी सोबत आली तर समविचारी मतदारांमध्ये विभागणी टळेल. आणि त्यामुळे विजय सोपा
होईल, हे
गणित आहे. मायावतींचा 'इंडिया' पासून
अंतर राखून आहे. त्यांची कमतरता भरून काढण्यासाठी कॉंग्रेस प्रकाश आंबेडकर यांना
इंडिया आघाडीत घेण्याचा प्रयत्न करत आहे.
इंडिया
आघाडीत येण्याच्या मार्गातील प्रथम अडथळा म्हणजे शरद पवार होय. प्रकाश आंबेडकर हे
शरद पवार आणि त्यांच्या 'राष्ट्रवादी'वर टीका
करतात. पण पवार त्यांच्यावर बोलणं टाळतात. परंतु याच कारणामुळे राष्ट्रवादी कायम
आंबेडकरांबाबत साशंक राहिलेली आहे.
दुसरा अडथळा म्हणजे कॉंग्रेस होय. कॉंग्रेस
मध्येही त्यांच्याविषयी पूर्ण विश्वास नाही. 2019 च्या निवडणुकी अगोदर 'वंचित'ला 'आघाडी'मध्ये
सहभागी करुन घेण्याची बोलणी अंतिम टप्प्यात आली होती. कॉंग्रेसचा त्यात पुढाकार
होता. परंतु प्रकाश आंबेडकर यांनी अवास्तव मागण्या केल्यामुळे शेवटी बोलणी
फिसकटली. त्यामुळे आजही कॉंग्रेसचे अनेक नेते आंबेडकरांच्या सहभागीविषयी आजही शंका
व्यक्त करतात. प्रकाश आंबेडकर काय मागण्या करतील याचा योग्य अंदाज बांधता येत म्हणून
कॉंग्रेस जपून पावले टाकत आहे.
- वंचित बहुजन आघाडीच्या अटी आणि शर्तींनी महाविकास आघाडीचे नेते हैराण झाले आहेत.
- जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाबाबत आघाडीची नेमकी भूमिका काय आहे.
- महाराष्ट्रातील उमेदवारात १५ ओबीसी आणि ३ उमेदवार हे अल्पसंख्याक समुदायाचे असावेत.
- निवडणुकीआधी किंवा नंतर भाजपसोबत समझोता करणार नाही, याचे लेखी आश्वासन द्यावे.
- महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीत बुधवारी मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत चर्चा झाली. वंचितच्या भूमिकेत वारंवार बदल
- आम्हाला महाविकास आघाडीत घ्या, नाही तर निवडणुकीत तुम्हालाही गाडू, असे प्रकाश आंबेडकर
- पूर्वी चारही पक्षांना समान १२ जागाचा फार्मुला वंचित कडून सादर
- प्रकाश आंबेडकर यांनी वंचित स्वबळावर लोकसभेच्या ६ जागा जिंकेल हा दावा
- प्रकाश आंबेडकर यांनीही वंचितच्या नेत्यांना मविआच्या कोणत्याही व्यासपीठावर जाऊ नये, अशा सूचना दिल्या होत्या. बुधवारी मुंबईतील फोर सिझन्स हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीला प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थिती
- वंचितने २७ जागांचा आढावा मविआला पाठविला होता.
- बैठकीला येण्याआधी ‘वंचित’कडून १५ जागांची मागणी
- पाच जागांपर्यंत बोलणी आली. मात्र आघाडी तीन जागा देण्यास तयार त्यातील दोन जागा या ठाकरे गटाच्या कोट्यातून तर उर्वरित जागा जगाबाबत निर्णय नाही.
- हवंत तर मी अकोल्याची जागा द्यायला तयार आहे. पण तुम्ही बोला. बैठकीतही मविआ वंचितला कोणत्या जागा देणार, याबद्दल काहीच चर्चा झाली नाही.
- मी आघाडीसोबत आहे, पण आघाडी माझ्यासोबत नाही हे प्रकाश आंबेडकरांची खंत
- बैठकीनंतर तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरुन काय वाटतं?' असा प्रतिप्रश्न आंबेडकरांची युतीबाबत उत्तर देण्यास टाळले.
तिसरा
अडथळा म्हणजे आंबेडकरांनी जागावाटपाचा फॉर्म्युला होय. आंबेडकरांनी चार पक्ष
महाराष्ट्रात एकत्र निवडणुक लढवणार असतील तर लोकसभेच्या एकूण 48 जागांसाठी समसमान
वाटप व्हावे.12+12+12+12. म्हणजे आणि प्रत्येकाला 12 जागा मिळाव्यात. समसमान जागा वाटप
हा 'इंडिया' अथवा 'महाविकास
आघाडी'च्या
बैठकांमधलं सूत्र नाही. ज्या पक्षाचा उमेदवार जिंकून येण्याची सर्वाधिक क्षमता आहे, त्या उमेदवारास
सगळ्यांनी मिळून पाठिंबा द्यायचा ह्या सूत्रावर एकमत आहे. उद्धव
ठाकरेंच्या शिवसेनेने 23 जागांवर दावा सांगितला आहे. कॉंग्रेसचाही आकडा 20 च्या
पुढेच आहे. महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाला समान अथवा 12 जागाचा फॉर्म्युला मान्य होणार
नाही. आघाडी प्रवेश हा 'इंडिया' साठी
इकडे आड आणि तिकडे विहीर, अशी स्थिती बनला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.