लैगिक समानता निर्मितीत स्त्रीवादी तत्त्वज्ञानाच्या भूमिकेचा अभ्यास
स्त्री लैगिक समानता
निर्मितीत स्त्रीवादी तत्त्वज्ञानाच्या भूमिकेचा अभ्यास हा समाजशास्त्र, तत्त्वज्ञान आणि मानवाधिकारांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण मानला जातो. स्त्रीवादी तत्त्वज्ञानाने
लैंगिक समानता, स्त्रियांच्या अधिकारांची जाणीव, आणि महिलांच्या सामाजिक, राजकीय, आणि आर्थिक स्थानाच्या सुधारणा
करण्यासाठी अनेक तत्त्वांचा विकास केला आहे. स्त्रीवादी तत्त्वज्ञान समाजातील स्त्रियांचा अपमान, शोषण, आणि लैंगिक भेदभावाच्या विरोधात
कार्य करते. त्याच्या मूलभूत तत्त्वांचा उद्देश लैंगिक समानता, महिलांची स्वतंत्रता, आणि स्त्रियाच्या अधिकारांची मागणी करून समतावादी समाजाची निर्मिती करणे आहे. स्त्रीवादी तत्त्वज्ञान हे
लिंगभेदावर आधारित असलेल्या अन्याय आणि असमानतेचे विश्लेषण करणारे एक प्रभावी साधन आहे. स्त्रीवादी
तत्त्वज्ञानाचा मुख्य उद्देश स्त्रियांचे हक्क
संरक्षित करणे आणि त्यांच्या सामाजिक,
राजकीय आणि आर्थिक समानतेसाठी
प्रयत्न करणे. स्त्रीवादी विचारवंतांनी लिंगभेद
हे सामाजिक रचनेचे उत्पादन आहे, ते नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. लिंगभेदाचे स्वरूप स्पष्ट
करण्यासाठी समाजातील पुरुषप्रधानतेचे सखोल विश्लेषण करतात.
स्त्रीवादी चळवळीची ऐतिहासिक पार्श्वभूमी:- मानवी इतिहासातील प्राचीन कालखंडात स्त्री-पुरुष समानता होती. मातृप्रधान
कुटुंबव्यवस्था आणि मातृत्वाच्या अधिकारामुळे स्त्रियांचे पुरुषांपेक्षा समाजात
वरचे स्थान होते. मध्ययुगात धर्माचे प्राबल्य, सरंजामशाही काळात ही उपभोग्य वस्तू
मानली जाऊ लागल्यामुळे तिचे स्थान घसरत गेले. फ्रेंच राज्यक्रांतीपासून प्रेरणा घेऊन १७९२मध्ये मेरी वालस्टोन क्राफ्ट यांनी
इंग्लंडमध्ये 'दि व्हिडिकेशन ऑफ द राईट्स ऑफ वुमन' ग्रंथातून महिला अधिकाराबद्दल
सर्वप्रथम आवाज उठविला. हा ग्रंथ म्हणजे स्त्रियांच्या प्रश्नांची वैचारिक मांडणी
करण्याचा पहिला प्रयत्न मानला जातो. १८४४ मध्ये फ्रान्सची फलोरा ट्रिस्टन हिने
महिला संघटनेची स्थापना करून हक्कांप्रती स्त्रियांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न
केला. मागरिट फुलर यांनी 'Women in Nineteenth Century' या पुस्तकात अमेरिकन समाजातील
स्त्री प्रश्न मांडले. १८४८ मध्ये अमेरिकेन स्त्रियांनी 'भावनांचा जाहीरनामा' घोषणापत्राद्वारे आपल्या
प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला होता. १८४८ मध्ये न्यूयॉर्क येथे भरलेल्या
पहिल्या स्त्री हक्क परिषदेत स्त्रियांच्या गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविण्यात आला. १९११मध्ये मिसेस पॅक हस्ट हिने इंग्लंडमध्ये मतदान हक्कासाठी 'सफ्रेजेट बळवळ' सुरू केली. १९१० मध्ये कोपनहेगन येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेने जगातील
स्त्रियांच्या हक्काचे स्मरण करण्यासाठी ८ मार्च हा दिवस 'महिला दिन', म्हणून साजरा केला जावा, हा ठराव संमत केला. सिमाँन द
बूव्हा या फ्रेंच लेखिकेने 'दी सेकंड सेक्स' ग्रंथात
स्त्रीवादी विचारधारेची सैद्धांतिक मांडणी केली. स्त्री ही जन्मतः स्त्री नसते, तर समाजव्यवस्थेने 'स्त्री' ला एक भूमिका प्रदान केली हे मत
व्य्क्त केले. ९६० नंतर श्रमिक व नोकरी करणाऱ्या
स्त्रियांची संख्या प्रचंड वाढल्याने १९६०च्या दशकात स्त्रीवादी चळवळीचा पुनर्जन्म
झाला,
असे मानले जाते. स्त्री
पुनरुज्जीवनवादी चळवळीमुळे स्त्रियांचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर चर्चिले जाऊ
लागले. एलिझाबेथ कैंडी इ सुसान अँथनी
यांच्या प्रेरणेने स्त्रीवादी मुक्तीगट अमेरिकेत स्थापन झाले. मुक्कीगटामुळे
उच्चवर्णीय स्त्रियांसोबत कृष्णवर्गीय स्त्रियांचे प्रश्न हाताळले. स्त्रियांचे संघटन करण्यासाठी फ्रीडन यांनी 'National Organization of Women' हा गट स्थापन केला. केल मिलेट यांनी 'Sexual Politics' ग्रंथात लिंगविषयक राजकारणाची सैद्धांतिक मांडणी केली. लिंग (Sex) आणि लिंगभाव (Gender) या दोन्ही संज्ञांतील भेद स्पष्ट
केला. लिंग ही संज्ञा शरीर लिंगविशिष्टतेशी तर लिंगभाव ही संज्ञा
संस्कृतीविशिष्टतेशी निगडित असल्याचे स्पष्ट केले. १९७० ते १९८०च्या दशकात
स्त्रीवादी चळवळीने व्यापक स्वरूप धारण केले. स्त्रियांच्या शोषणाचे वैचारिक
विश्लेषण करणाऱ्या स्त्रीवाद विचारसरणीला सार्वत्रिक मान्यता मिळाली. यूनोने स्त्री प्रश्नाचे महत्त्व लक्षात घेऊन १९७५मध्ये आंतरराष्ट्रीय महिला
दशकांची घोषणा केली. १९७५ हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर केले होते. सद्यकाळात जागतिकीकरण प्रक्रियेचा प्रभाव स्त्रीवादी चळवळीवर पडल्याने ही चळवळ
माहिती तंत्रज्ञानामुळे अधिक वेगाने विकसित झालेली दिसते. १९८० ते २०१० हा कालखंड
स्त्रीवादी चळवळीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला. स्त्री-पुरुष संबंधाचे
नव्याने आकलन केले जाऊ लागले. स्त्रियांच्या प्रश्नाबद्दल सहानुभूती असलेल्या
पुरुषांच्या मदतीने जगभर चळवळी चालविल्या जाऊ लागल्या. विविध देशांत स्त्री हक्कांसाठी झालेल्या चळवळींमुळे स्त्रियांना कायदेशीर
संरक्षण दिले जाऊ लागले. त्यांच्या प्रश्नांकडे सहानुभूतीच्या भावनेने पाहिले जाऊ
लागले.
पाश्चिमात्य स्त्रीवादाच्या
प्रभावातून भारतात 19 व्या शतकात स्त्रीवादी तत्त्वज्ञान विकसित होऊ लागले. राजा
राम मोहन राय, महात्मा फुले, आणि इतर समाजसुधारकांनी स्त्री शिक्षण आणि
स्त्रियांबद्दलच्या अनिष्ट चालीरीतीच्या विरोधात आवाज ठेवण्यास प्रारंभ केला. 1882
मध्ये ताराबाई शिंदे यांनी 'स्त्री पुरुष तुलना' हा पहिला स्त्रीवादी ग्रंथ
लिहिला. पंडित रमाबाई यांनी हिंदू धर्मातील पितृसत्ताक व्यवस्था आणि
जातीव्यवस्थेवर टीका करून स्त्रीवादी चळवळीला आकार देण्याचा प्रयत्न केला. महात्मा
गांधीजींनी स्त्रियांच्या राजकीय समावेशनासाठी मोठ्या प्रमाणावर त्यांना राजकीय
चळवळीत सामावून घेतले. भारतीय स्त्रियांना संघटित करण्यासाठी 'ऑल इंडिया वुमन
कॉन्फरन्स' आणि 'नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमन' अशा संघटना निर्माण केल्या गेल्या.
या संघटनांनी महिलांचा राजकीय सहभाग, मताधिकार, समान अधिकार, लैंगिक समानता, महिलांना सामाजिक न्याय इत्यादी
विषयासंदर्भात प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध संघर्ष सुरू केला. या संघर्षामुळे
भारतीय राज्यघटनेत स्त्री पुरुष समानतेच्या संकल्पनेला मान्यता प्रदान करावी
लागली. श्री पुरुष समानता निर्माण करण्यासाठी अनेक कायदे संसदेला संमत करावे
लागले. भारतात देखील लैंगिक समानता निर्मितीत स्त्रीवादी तत्त्वज्ञानाने
महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली दिसते
स्त्रीवादी तत्त्वज्ञानाचे मुख्य उद्देश:
v स्त्रीवादी तत्त्वज्ञान
लिंगभेदांना मुळापासून उन्मूलन करण्याचा प्रयत्न करते.
v स्त्रीवादी तत्त्वज्ञान स्त्रियांना सक्षमीकरणावर करण्यावर भर देते.
v स्त्रीवादी तत्त्वज्ञान एक
न्यायपूर्ण समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करते.
v स्त्रीवादी तत्त्वज्ञान समाजात बदल घडवून
आणण्याचे साधन आहे.
v स्त्रीवादी तत्त्वज्ञान लैंगिक समानता निर्माण
संघर्ष करण्यासाठी प्रेरणा निर्माण करण्यास सहाय्यक ठरते
स्त्रीवादी तत्त्वज्ञानाची
गृहितके:
v
स्त्रीवादी तत्त्वज्ञान मानते की लिंगभेद हे जैविक नाही तर
सामाजिक रचना आहे. समाजातील संस्कृती,
धर्म, राजकारण आणि इतर संस्था लिंगभेदांना बळकटी देतात.
v
स्त्रीवादी तत्त्वज्ञान स्त्रियांच्या अनुभवांना महत्त्व
देते. स्त्रियांचे अनुभव ज्ञानाचे एक महत्त्वपूर्ण स्त्रोत आहेत आणि त्यांच्यावर
आधारित नवीन ज्ञान निर्माण केले जाऊ शकते.
v
स्त्रीवादी तत्त्वज्ञान सामाजिक बदलांचे प्रेरणास्त्रोत
आहे. या तत्त्वज्ञानाने स्त्रियांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि लैंगिक
समानतेसाठी झगडणारी चळवळींना प्रेरणा दिली आहे.
v
स्त्रीवादी तत्त्वज्ञानाने व्यक्तीगत आणि सामाजिक
परिवर्तनांना चालना दिली आहे. या तत्त्वज्ञानाने स्त्रियांना स्वतःचे मूल्य
ओळखण्यास आणि त्यांच्या हक्कांचा दावा करण्यास प्रोत्साहन दिले आहे.
संशोधन पद्धती:- लैंगिक समानता
निर्मितीत स्त्रीवादी तत्त्वज्ञानाचा भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी पुढील संशोधन पद्धतीचा
वापर केलेला आहे.
ग्रंथालय पद्धत-ग्रंथालय पद्धतीच्या माध्यमातून स्त्रीवादी साहित्याची समीक्षा केलेली आहे. सिमान द बूव्हा, बेटी फ्रीडमन, केट मिलेट,
ज्युलिएट मिशेल, रोबाथम, भारतीय स्त्रीवादी तत्त्वज्ञान इत्यादी स्त्रीवादी तत्त्वज्ञानाचा लैंगिक
समानता निर्मितीत केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतलेला आहे.
ऐतिहासिक पद्धत-ऐतिहासिक पद्धतीच्या माध्यमातून स्त्रीवादी तत्त्वज्ञान आणि चळवळीचा
लैंगिक समानता निर्मितीतील विविध टप्प्यांचा अभ्यास करून निष्कर्ष काढलेले आहेत.
वरील दोन्ही
पद्धतींचा वापर करून संशोधन पेपर लिहिलेला आहे.
लैगिक समानता निर्मितीत स्त्रीवादी
तत्त्वज्ञानाचे योगदान- स्त्रीवादी तत्त्वज्ञानाने
महिलांच्या अधिकारांची, समानतेची आणि स्वातंत्र्याची
उन्नती साधण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण विचारांचा विकास केला आहे. यामुळे
लैगिक समानतेच्या मुद्द्यांना अधिक प्रगल्भतेने समाजात मांडले गेले. स्त्रीवादी
तत्त्वज्ञानाच्या योगदानाचे काही महत्त्वाचे पैलू पुढीलप्रमाणे आहेत:
v लैंगिक
समानतेचा विचार:- स्त्रीवादी तत्त्वज्ञानाने पुरुष-स्त्री
यातील पारंपरिक भेदभावावर विचार केला आहे. त्याने पुरोगामी विचारधारेद्वारे
महिलांच्या समान हक्कांची मागणी केली आहे. यामध्ये महिलांसाठी समान संधी, समान वेतन आणि समान अधिकारांचा समावेश आहे.
v सामाजिक
संरचना आणि पितृसत्ताक विरोध:- स्त्रीवादी विचारकांनी
पितृसत्ताक व्यवस्थेचे विश्लेषण केले आणि त्याच्या निराकरणासाठी संघर्ष केला.
पितृसत्ताक व्यवस्थेतील अन्याय, स्त्रीच्या शोषणाचे विविध
पैलू, आणि समाजातील स्त्रीच्या भूमिकेला सीमित करण्याची
प्रवृत्तीवर प्रहार केला.
v शारीरिक
स्वातंत्र्य आणि लैंगिक अधिकार:- स्त्रीवादी तत्त्वज्ञानाने
महिलांच्या शारीरिक स्वातंत्र्याचा आणि लैंगिक अधिकारांचा मुद्दा उचलला. विशेषतः
प्रजननाच्या हक्कावर, गर्भपाताच्या अधिकारावर आणि
लैंगिक अत्याचाराच्या विरोधात विचार मांडला.
v पुरुषप्रधानतेचे
विघटन-: स्त्रीवादी तत्त्वज्ञानाने
"पुरुषप्रधान" समाजाच्या रचनेला आव्हान दिले आणि त्यात स्त्रीच्या
भूमिकेचा पुनर्विचार केला. यामध्ये महिलांना समाजात समान अधिकार मिळवून देण्यासाठी
नवे दृष्टिकोन आले.
v सांस्कृतिक
आणि साहित्यिक बदल:- स्त्रीवादी तत्त्वज्ञानाने साहित्य, कला, आणि संस्कृतीत महिलांचा आवाज वाढविला.
स्त्रीवादी साहित्यिकांनी महिलांच्या जीवनाचे विविध पैलू दाखवले आणि पुरुषप्रधान
सांस्कृतिक प्रतिमांवर प्रश्न उपस्थित केले.
v समाजातील
विविधतेचा स्वीकार:- स्त्रीवादी विचारधारेने विविध जात, धर्म, आणि वर्ग यांतील स्त्रियांच्या अनुभवांची
महत्त्वाची चर्चा केली. यामुळे महिलांची विविधतेची ओळख आणि त्यांचा संघर्ष अधिक
व्यापक बनला.
निष्कर्ष वा सारांश
:- स्त्रीवादी तत्त्वज्ञानाने लिंगभावाच्या आधारे होणाऱ्या
अन्यायाचे विश्लेषण करून त्याला आव्हान दिले आहे. महिलांसाठी
अधिक समताधारित समाज निर्माण करण्यासाठी विचार, आंदोलने आणि
तत्त्वज्ञानाचा वापर केला. त्यामुळे विविध सामाजिक, सांस्कृतिक
आणि कायदेशीर बाबींत लैगिक समानता साधण्याचे मार्ग मोकळे झाले. स्त्रीवादी तत्त्वज्ञानामुळे लैंगिक समानतेच्या प्रवासाला महत्त्वपूर्ण वळण दिले आहे. लैगिक समानता निर्मितीत स्त्रीवादी तत्त्वज्ञानाने केवळ
स्त्रियांना हक्क मिळवून दिले नाही, तर संपूर्ण समाजाच्या न्याय आणि समानतेच्या दृष्टिकोनातून
सुधारणा घडवून आणल्या आहेत. स्त्रीवादी तत्त्वज्ञानाने जेव्हा महिलांच्या हक्कांचे
संरक्षण, समानता आणि सशक्तीकरणाच्या
दृष्टीने केल्यामुळे संपूर्ण सामाजिक बदल घडवून आणण्यास हातभार लावला. समतामूलक आणि
न्यायपूर्ण समाज निर्मितीच्या
दिशेने वाटचाल
सुरु झाली..
संदर्भ सूची-
1.
Hooks, Bell (2000). Feminist Theory: From Margin to Center. New York: Simon & Schuster.
2.
Nicholson, Linda (Ed.)
(1997). The Second Wave. London:
Routledge
3.
Chaudhuri, Maitrayee (Ed.) (2005) Feminism in India. New
York: Zed Books
4.
भागवत, विद्युत स्त्रीवादी.(2008). सामाजिक विचार. पुणे: डायमंड
प्रकाशन
5.
लाडे, सुमती आणि तांबे, श्रुती (2005.) स्त्रीवाद. श्रीरामपूर: शब्दालय
प्रकाशन
6.
रचना, माने (2013). स्त्रीवाद संकल्पना आणि स्वरूप. कोल्हापूर: अक्षर प्रकाशन
7.
भागवत, वंदना, अनिल, सपकाळ, गीतांजली, वि. मं. (2014). स्त्रीवाद, महाराष्ट्रातील स्त्रीवाद.पुणे: शब्द प्रकाशन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.