- राजकीय प्रमुखांना साहाय्य करण्यासाठी आणि धोरण निर्मिती अंमलबजावणी प्रक्रियेत समन्वय साधण्यासाठी निर्माण केलेले यंत्रणेला सचिवालय असे म्हणतात.
- सचिवांची आलय किंवा कार्यालय म्हणजे सचिवालय होय.
- संपूर्ण राज्याचे प्रशासन या यंत्रणेकडून चालवले जाते त्यास सचिवालय असे म्हणतात. सचिवालय हे सरकारचे Heart मानले जाते.
- सर्व कार्यपालिका यांचे आदेश, धोरण निर्मिती आणि प्रशासकीय कार्यक्रमांचा जन्म सचिवालयातून होतो.
- भारत सचिवालय व्यवस्थेचे जनकत्व इंग्रजांकडे जाते . ब्रिटिश राजवटीतील इम्पेरियल सेक्रेटेरिट व्यवस्थेतून भारतातील सचिवालय याचा जन्म झालेला आहे.
- मंत्री हा विभागाचा राजकीय प्रमुख असतो तर सचिव हा विभागाचा प्रशासकीय प्रमुख असतो. सचिवाला ही सज्ञा एका विशिष्ट सचिवासाठी वापरले जात नसून सचिवांच्या संकुलासाठी वापरले जाते.
- सचिवालयाची रचना-
- राज्य प्रशासनाचे तीन घटक असतात. मंत्री राज्याचे प्रमुख,सचिव प्रशासकीय प्रमुख आणि विभाग प्रमुख हा विशेष तज्ञअसतो.
- धोरण आखणी करणे मंत्र्याचे काम असते. निर्णय आणिधोरणासाठी आवश्यक माहिती व सल्ला देणे सचिवाचे कामअसते आणि निर्णयाची अंमलबजावणी करणे विभागप्रमुखाचे काम असते.
- राज्य सचिवालयात प्रत्येक विभागासाठी एक सचिव नेमलाअसतो. अर्थात एका सचिवाकडे एकापेक्षा जास्त विभागांचीजबाबदारी दिलेली असते.
- सचिवालय सचिवाच्या मदतीला विशेष सचिव, अप्परसचिव, सचिव, उपसचिव, अवर सचिव, सहाय्यक सचिव,कक्ष अधिकारी आणि लिपिकांची नेमणूक केलेली असते.
- सचिवालयाची आवश्यकता-
- राजकीय पदाधिकारी दैनंदिन राजकारणात सक्रियअसल्यामुळे प्रशासकीय कार्यासाठी देऊ शकत नसल्यामुळे सचिवांची गरज भासते.
- आधुनिक काळात प्रशासन अत्यंत किचकट बनल्याने प्रशासन चालवण्यासाठी तांत्रिक व विशेष ज्ञानअसलेल्यांची गरज असते. कारण मंत्र्याकडे हे कौशल्यअसेलच असे नाही. म्हणून मंत्र्यांना सहाय्य करण्यासाठीसचिवाची नेमणूक केली जाते.
- मंत्री हे तात्पुरत्या स्वरूपात असतात. परंतु प्रशासन हीकायमस्वरूपी प्रक्रिया असते. त्यामुळे ही प्रक्रियाकायमस्वरूपी हाताळण्यासाठी सचिवांची निवडणूक केलेजाते.
- आधुनिक कल्याणकारी राज्य संकल्पनेमुळे राज्यनागरिकांना अनेक सुविधा पुरवते त्यासाठी सरकारला फारमोठी प्रशासकीय यंत्रणा उभी करावी लागते. या यंत्रणेवर देखरेख व मार्गदर्शन करण्यासाठी सचिवांची गरज असते.
- सचिवालयाचे कार्य-
- मंत्र्यांना धोरण निर्मितीसाठी आवश्यक सहाय्य करणे.
- कायदे निर्मिती संदर्भातील विधयके तयार करणे.
- राज्याचे प्रशासन चालवण्यासाठी आवश्यक नियम निर्मिती करणे.
- मंत्र्यांना निर्णय घेण्यासाठी आवश्यक माहिती पुरविणे.
- प्रशासनातील विविध खात्यांमध्ये समन्वय प्रस्थापित करणे.
- राज्य प्रशासनाला नेतृत्व प्रदान करणे.
- राज्याचे अंदाजपत्रक वा विभागाचे अंदाजपत्रक तयारकरणे.
- अधिनस्त कार्यालयांवर नियंत्रण ठेवणे.
- जनतेकडून आलेल्या तक्रारींची दखल घेणे.
- मुख्य सचिव-
-
• मुख्य सचिव हा राज्य प्रशासनाचा आधारस्तंभ आणि केंद्रबिंदू असतो. त्यामुळे त्याला राज्य सरकारचा हात, पाय आणि मेंदू म्हटले जाते.
• मुख्य सचिव हा राज्य प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी असतो.
• सर्व सचिवांचा प्रमुख असतो.
• राज्य प्रशासनात मुख्यमंत्र्यांनंतर मुख्य सचिव पदाला मानसन्मान व अधिकार असतात.
• मंत्रिपरिषदेच्या अपेक्षांची पूर्ती करण्याची जबाबदारी मुख्य सचिवावर असते.
• मुख्य सचिवपदी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांची निवड केली जाते.
• अर्थात मुख्यमंत्री आपल्या मर्जीतील सचिवाची मुख्य सचिव म्हणून नेमणूक करतो. त्यामुळे अनेकदा मुख्यमंत्री बदलला की मुख्य सचिव बदलतो.
• मुख्य सचिव पदाचे महत्त्व-
• मुख्य सचिवाचे सचिवालयाच्या सर्व विभागांवर नियंत्रण असते.
• मंत्री परिषदेचा सचिव म्हणून मुख्य सचिव हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित राहतो.
• सचिवपदी प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या व्यक्तीची निवड करणे आवश्यक असते. कारण त्यांची बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण प्रशासनावर प्रभाव पडत असतो.
• डॉ. शर्मा आणि गोव्हर यांनी सचिव पदाला किंगपिन असे म्हटले आहे जी सचिवालयात कोठेही जोडली जाऊ शकते.
• मुख्य सचिव सर्व सचिव अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रशासनाचा गाडा चालवीत असतो.
• मुख्य अधिकार व कार्य-
• मुख्य सचिव हा मंत्रिमंडळाचा सचिव या नात्याने मंत्रिमंडळाचा मुख्य प्रशासकीय सल्लागार असतो. सर्व राज्य सेवांचा तो प्रमुख असतो. सर्व खात्यांची विचारविनिमय करणारा आणि समन्वय करणारा अधिकारी असतो.
• मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित राहून बैठकीचे इतिवृत्त लिहिणे. बैठकीत संमत ठरावांची अंमलबजावणी करणे.
• मंत्रिमंडळाला धोरण निर्मितीसाठी आवश्यक सहाय्य व सल्ला देणे.
• संपूर्ण सचिवालयावर नियंत्रण व मार्गदर्शन करणे. सचिवालयाच्या कार्यात समन्वय निर्माण करणे.
• राष्ट्रपती राजवटीच्या काळात राज्यपालांना प्रशासन चालविण्यासाठी आवश्यक सल्ला देणे. राष्ट्रपती राजवटीच्या काळात राज्य प्रशासनाचे संचालन मुख्य सचिवांच्या मार्गदर्शनाने चालते.
• खर्च प्रधान्य समितीचा सचिव या नात्याने खर्चाचे नियोजन करणे. राज्याची आर्थिक धोरण निश्चित करणे.
• राज्याचा विकास अधिकारी या नात्याने मंत्रिमंडळ आणि विविध विभागांना सल्ला देणे.
• राज्याची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक कारवाई करणे.
• राज्यातील सर्व सचिव अधिकार्यांवर नियंत्रण ठेवणे.त्यांच्या बदल्या, बढत्या आणि नियुक्त्या करणे.
• राज्यातील सचिव आणि विविध विभागातील अंतर्गत मतभेद मिटवणे.
• राज्याच्या सार्वजनिक जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टीबद्दल मुख्य सचिवाचा सल्ला घेतला जातो.
• अंदाज पत्रक निर्मितीबाबत सल्ला देणे.
• सचिवालयाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान स्वीकारणे.
•
राज्य सचिवालय You Tube Video Link- https://www.youtube.com/watch?v=tp6NJDfwqYk&t=11s
भारतीय राज्यघटना नोटस/ Indian Constitution- VEC notes
-
Download बटन वर दिलेल्या लिंकवर क्लिक करून FYBSc/B.A.-VEC-II Sem-
II-2024-25 Indian Constitution Notes PDf File Download करता येईल.
३ दिवसांपूर्वी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.