राजकीय समाजशास्त्राचा परिचय-
- राजकीय समाजशास्त्र हा विषय सुरवातीच्या काळात समाजशास्त्राची एक शाखा म्हणून उदयाला आला.
- दुसऱ्या महायुद्धानंतर राजकीय समाजशास्त्र हा विषयस्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून उदयाला आला
- .प्रतिनिधिक लोकशाहीचा उदय, समाजवादाचा विकासआणि कल्याणकारी राज्य संकल्पनेमुळे राजकीयसमाजशास्त्राच्या उदयालाला पोषक पार्श्वभूमी निर्माण झाली.
- विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखांच्या माध्यमातून झालेल्याअभ्यासातून राजकीय समाजशास्त्र विषयाच्या उदयालाअनुकूल सामग्री जमा झाली.
- विसाव्या शतकाच्या प्रारंभात मॅक्स वेबर, रॉबर्ट मिचेल्स,मोस्का, पॅरेटो आणि डरर्खिम इत्यादी समाजशास्त्रज्ञांनी राजकीय समाजशास्त्राची सैद्धांतिक बांधणी केली. राजकीय समाजशास्त्र म्हणजे काय?-
- राजकीय समाजशास्त्र म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी पुढील काही व्याख्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
- एस. एम. लिपसेट- यांच्या मते समाज आणि राज्य व्यवस्था, सामाजिक रचना आणि राजकीय संस्थायातील परस्पर संबंधाच्या अभ्यासाला राजकीय समाजशास्त्र म्हटले जाते.
- रूश आणि अल्थाफ- यांच्या मते राजकीय समाजशास्त्र म्हणजे समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र यांना जोडणारा सैद्धांतिक पूल होय.
- डाऊजे- यांच्यामते राजकीय समाजशास्त्र म्हणजे समाजशास्त्राच्या चौकटीत केलेल्या राजकीय वर्तणुकीचा अभ्यास होय.
- राजकीय समाजशास्त्राची व्याप्ती-राजकीय समाजशास्त्र व्याप्तीत पुढील गोष्टींचा समावेश होतो.
- .१. राजकीय वर्तणुकीचा अभ्यास
- २. राजकीय सामाजीकरणचा अभ्यास
- ३. सत्ता, प्रभाव आणि अधिकार संकल्पनांचा अभ्यास
- ४. राजकीय अभिजन व राजकीय संस्कृतीचा अभ्यास
- ५. नोकरशाही आणि राजकीय संसूचन साधनांचा अभ्यास
- ६. राजकीय बदल, विकास, परिवर्तन आणि आधुनिकीकरणाचा अभ्यास
- ७. राजकीय व्यवस्था आणि राजकीय भरतीचा अभ्यास
- ८. राजकीय आणि सामाजिक नियंत्रणाचा अभ्यास
- ९. गैर राजकीय समस्यांचा अभ्यास
- राजकीय समाजशास्त्राची वैशिष्ट्ये-
- राजकीय समाजशास्त्र राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र पासूनस्वतंत्र असलेली ज्ञानशाखा आहे.
- राजकीय समाजशास्त्र विषयात सामाजिक आणि राजकीयचलांना समान महत्त्व दिले जाते.
- राजकीय समाजशास्त्र हा स्वतंत्र विषय म्हणून आधुनिककाळात वेगाने विकसित होत आहे.
- राजकीय समाजशास्त्रात अन्य सामाजिक शास्त्राप्रमाणेविशिष्टता, स्वतंत्रता आणि नवीनता आहे.
- राजकीय समाजशास्त्र हा विषय सामाजिक आणि राजकीयअंतर्दृष्टी च्या आधारावर आणि समान महत्त्व देत संकल्पनांचाअभ्यास करतो.
- राजकीय समाजशास्त्राची दोन डोळे असून एका डोळ्यातूनसामाजिक भूमिका आणि दुसऱ्या डोळ्यातून राजकीय भूमिकेचाविचार केला जातो.
- राजकीय समाजशास्त्राचे स्वरूप-
- राजकीय समाजशास्त्र हा विषय समाजशास्त्राची शाखाम्हणून सुरुवातीच्या काळात उदयाला आला.
- राजकीय समाजशास्त्रात सुरुवातीच्या काळातसमाजशास्त्रज्ञांनी लेखन केल्यामुळे सामाजिक घटकांनाप्राधान्य मिळाले आणि राजकीय घटकांना दुय्यम स्थान मिळाले.
- लिपसेट यांच्या मते राजकीय समाजशास्त्र विषयातसमाजशास्त्र आणि राज्यशास्त्र दोन्ही विषयांना सारखेमहत्त्व आहे.
- सारतोरीच्या मते राजकीय समाजशास्त्र ज्ञानशाखा राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे संमिश्रण आहे.
- राजकीय समाजशास्त्र म्हणजे सामाजिक व राजकीयस्वरूपाचे आधारभूत घटक एकत्रित आणण्याचा प्रयत्नकरणारे आंतरराष्ट्रीय संकर आहे.
- राजकीय समाजशास्त्राचे महत्व-
- राजकीय समाजशास्त्राचे अध्ययनामुळे सामाजिक आणि राजकीयघटना मागील शास्त्रीयता कळू लागली.
- राजकीय समाजशास्त्राच्या अज्ञानामुळे राजकीय स्थैर्य आणि आधिमान्यतेचे महत्व लक्षात येऊ लागले.
- राजकीय समाजशास्त्रामुळे राजकीय संस्कृती आणि राजकीय सामाजिककरणाच्या अध्ययनाला चालना मिळाली.
- राजकीय समाजशास्त्राची अध्ययन सामाजिक आणि राजकीयविकास सहाय्यक ठरले.
- राजकीय समाजशास्त्राचा अभ्यास राजकीय सहभाग वाढविण्यासपोषक ठरला.
- राजकिय समाजशास्त्राचे अध्ययनातून राजकीय संघर्षाचे अध्ययन होऊ लागले.
- राजकिय समाजशास्त्राचे अध्ययनातून अनेक नवीन संकल्पनाचे अध्ययन होऊ लागले.
- Realted Article -
राजकीय संस्कृतीच्या प्रतीकांचे महत्त्व
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.